मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
तोडी हा भवपाश ॥ मनारे ॥ ...

भक्ति गीत कल्पतरू - तोडी हा भवपाश ॥ मनारे ॥ ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


तोडी हा भवपाश ॥ मनारे ॥ तोडी हा भवपाश ॥धृ०॥

तोडी बेडी भवपाशाची । सोडुनी मायापाश ॥ मनारे ॥ तोडी हा० ॥१॥

आशा तृष्णा इच्छा कल्पना । सोडी यांची आंस ॥मनारे॥तोडी हा० ॥२॥

अभ्यास करी तूं दृढ प्रेमाने । होवुनी हरीचा दास ॥मनारे॥तोडी हा० ॥३॥

सद्‌गुरुवांचुनी पाश सुटेना । म्हणुनी दृढ धरी कांस ॥ मनारे॥तोडी हा० ॥४॥

वारी म्हणे दृढ कांस धरुनी । जोडी पद अविनाश ॥ मनारे॥तोडी हा० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP