सदा सद्गुरुचें नाम, मना नित्य गाईरे ॥धृ०॥
गुरु गुरु नित्य गातां । गुरुपद येई हातां ।
सद्गुरु ऐसा जगीं दाता । नाही बा कुणीरे ।
सदा सद्गुरुचें नाम० ॥१॥
गुरुनाम श्रेष्ठ फार । करी तुजसी भवपार ।
मिथ्या होईल हा संसार । जन्ममरण नाही रे । सदा० ॥२॥
गुरुनाम पडतां कानीं । काळ मृत्यू जाय पळुनी ।
सच्चिदानंद भुवनीं । राही अक्षयीं रे । सदा० ॥३॥
गुरु गुरु नित्य ध्याता । जीव ब्रह्म होय स्वतः ।
अनुभव हा वारी घेतां । सत्य जाहलें रे । सदा० ॥४॥