मनारे भुलूं नको विषया ॥धृ०॥
विषय हे मोहक नटुनी आले ।
फाशीं तुज पाडाया ॥ मनारे० ॥भुलूं नको० ॥१॥
थोर थोर हे ब्रह्मादिकहि । बुडले रे पायीं या ॥मनारे०॥ भुलूं नको०॥२॥
मायेचे हे खेळ जाणुनी । रतची हो स्वरुपीं या ॥मनारे ॥भुलूं नको०॥३॥
वैराग्याचें कवच हें घालुनी । घेई ज्ञान शस्त्रा या ॥मनारे.॥भुलूं नको०॥४॥
विषय शत्रू ते छेदन करण्या । आश्रयीं सत्य धैर्या ॥मनारे.॥भुलूं नको०॥५॥
भक्ति बळाने विषयवासना । छेदी विवेक करी अय ॥मनारे.॥भुलूं नको०॥६॥
शत्रू सैन्य तें ठार करुनी । नीजपदीं स्थीर राही या ॥मनारे०॥भुलूं नको०॥७॥
वारी म्हणे बा प्रभूपद सोडुनी । जावूं नको भटकाया ॥मनारे०॥भुलूं नको०॥८॥