रत हो गुरुपायीं ॥ मनारे ॥ रत हो गुरुपायीं ॥धृ०॥
नाम रुप हें दूर करुनी । सत्वस्तू पाही ॥मनारे॥रत हो गुरुपायी ॥१॥
जग नरा सारा भ्रम टाकुनी । निजवस्तू घेई ॥मनारे॥रत हो० ॥२॥
यद्र्ष्टं तंनष्टं जाणुनी । सत्च्चितरुप होई ॥मनारे॥रत हो० ॥३॥
वारी म्हणे बा सद्गुरुवांचुनी । वस्तू दुजी नाही ॥मनारे॥रत हो० ॥४॥