कर कर कर प्रेम मना सत्य वस्तूवरती ॥धृ०॥
प्रेमाचें स्थान कसें । संतांना जावुनी पुसे ।
तरीच विश्वास बसे । आत्म्यावरती । कर कर कर प्रेम० ॥१॥
प्रेमासी तोच योग्य । करुनी घेई तूं संयोग ।
तेणें होय दुःख वियोग । होय सुख प्राप्ती ।कर कर कर प्रेम मना० ॥२॥
सर्व सुखाचें तें मूळ । जेवी मुंग्यांना तो गूळ ।
टाकी विषयाचें खूळ । घेई आत्मप्रचीती । कर कर कर प्रेम मना० ॥३॥
प्रेमाचें मुख्य ध्येय । आत्मा तो नित्य होय ।
गुरुकृपें लागे सोय । वारी सत्य सांगे ती । कर कर कर प्रेम मना० ॥४॥