मनारे किती तुला शिकवुं ॥धृ०॥
विषय हे मोहक नटुनी आले ।
तुजला पाहाती झकवुं ॥मनारे० ॥किती तुला शिकवुं॥१॥
काम क्रोध हे लुटती तुजला ।
त्या मार्गीं नको जाऊं ॥मनारे० ॥किती तुला शिकवुं० ॥२॥
भजनानंदीं रंगुनी निशिदिनीं ।
रामकृष्ण हरी गावुं ॥मनारे० ॥किती तुला शिकवुं० ॥३॥
वारी म्हणे बा सुलभ हा मार्ग ।
हृदयीं हरीला ध्यावुं ॥मनारे० ॥किती तुला शिकवुं ॥४॥