वांचुनी केलें काय ॥ मना तूं ॥ वांचुनी केलें काय ।
धरलें न सद्गुरु पाय ॥ हृदयीं तूं ॥ धरलें न सद्गुरु पाय ॥धृ०॥
भवसागर हा तरण्याला बा । हाची असे सदुपाय ॥
मना तूं ॥ वांचुनी० ॥१॥
उत्तम हा नरदेह घालवुनी । करिसी मग हाय हाय ॥
मना तूं ॥ वांचुनी० ॥२॥
सद्गुरुपद हें हृदयीं धरतां । तळमळ सर्वही जाय ॥
मना तूं ॥ वांचुनी० ॥३॥
सद्गुरुकृपें वांचुनी साधनें । व्यर्थची सर्वही जाय ॥
मना तूं ॥ वाचुनी० ॥४॥
वारी म्हणे बा सद्गुरुपदतें । हृदयीं निशिदिनीं ध्याय ॥
मना तूं ॥ वाचुनी० ॥४॥