मना तूं शुभेच्छा ती करी । शुभेच्छा ती करी ॥मना० ॥धृ०॥
नित्यानित्य विचार करुनी । वैराग्यातें वरी ॥ मना तूं० ॥१॥
इहपर भोगा त्याग करुनी । भक्तिमार्ग धरी ॥ मना तूं० ॥२॥
कर्म फलाचा त्याग करुनी । मुक्त हो संसारी ॥ मना तूं० ॥३॥
वारी म्हणे शुभ इच्छा हीच । सद्गुरुध्यान धरी ॥ मना तूं ॥४॥