मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मना तूं सोडी , मना तूं सो...

भक्ति गीत कल्पतरू - मना तूं सोडी , मना तूं सो...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मना तूं सोडी, मना तूं सोडी । ह्या विषय विषाची गोडी ॥धृ०॥

प्रथम विषय वाटती गोड । क्षण एक पुरविती तुझें कोड ।

परी तें आहेत मोठें द्वाड । घालीती संसार बेडी, संसार बेडी ।

ह्या विषय विषाची गोडी०॥१॥

वासना गळां पडतां धामीण । सोडी न तुज मी एकही क्षण ।

पाठी लागे जन्ममरण । नरका धाडी, नरका धाडी ।

ह्या विषय विषाची गोडी०॥२॥

मिळुनी विषय हे पांचीजण । घेतील तुझे पंचप्राण ।

तेथे तुजला सोडवी कोण । म्हणुनी हरी जोडी, म्हणुनी हरी जोडी ।

ह्या विषय विषाची गोडी०॥३॥

वणवण फिरुनी देशोधडी । न मिळे एकही फुटकी कवडी ।

दृष्य वस्तुची आशा सोडी । स्वरुपीं दे बुडी, स्वरुपीं दे बुडी ।

ह्या विषय विषाची गोडी०॥४॥

श्रीहरीचरणीं जडतां वृत्ती । नामस्मरण धरी तूं चित्तीं ।

विषय तुज ते नच बाधती । वारी सांगे घडी घडी, सांगे घडी घडी ।

ह्या विषय विषाची गोडी०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP