मनारे घेई आता संन्यास ।
करुनी विषयाचा न्यास ॥धृ०॥
षड्रीपूचें तें मर्दन करुनी ।
स्वस्वरुपी घरी ध्यास ॥मनारे॥घेई आता० ॥१॥
विषय सुखाला दूर झुगारुनी ।
गिरीं कंदरीं करी वास ॥ मनारे॥घेई आता० ॥२॥
जग हें मिथ्या मृगजलवत रे ।
जाणुनी राही उदास ॥मनारे॥घेई आता० ॥३॥
एकांतामध्ये बैसुनी अक्षयीं ।
करी बा आत्माभ्यास ॥मनारे॥घेई आता० ॥४॥
वारी म्हणे बा आत्माभ्यासें ।
मुक्ति मिळे तुज खास ॥मनारे॥घेई आता० ॥५॥