सदा सत्चिदरुप ब्रह्म । मना नित्य पाहिरे ॥धृ०॥
सत्रुप तें नित्य असे । चिद्रुपीं जगतीं भासे ।
आनंद तेणें होत असे । म्हणुनी तूं तें गाईरे । सदा सत्चिदरुप० ॥१॥
पाहातां तें होय प्राप्त । गातां तें होय तृप्त ।
घ्याता तूं होसी मुक्त । नाही दुजी जोड रे । सदा० ॥२॥
ऐसा हा ध्यान योग । करुनी पाही मना प्रयोग ।
गुरुकृपें होय संयोग । वारी म्हणे ह्याच देहीं रे ।सदा० ॥३॥