मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मना तूं लक्षीं । मना तूं ...

भक्ति गीत कल्पतरू - मना तूं लक्षीं । मना तूं ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मना तूं लक्षीं । मना तूं लक्षीं । होवुनीया सर्व साक्षी ॥धृ०॥

साक्षी होवुनी जरी तूं पाहसी । मुक्त होशील निश्चयेसी ।

हेंची सद्‌गुरु तुज उपदेशी । पूर्वपक्षीं पूर्वपक्षीं । होवुनीया० ॥१॥

ऐसा साक्षी होतां दृढ । अंतरीं वृत्ती होईल रुढ ।

मग तुजसी कांही न गूढ । अंतरीं निरक्षी । होवुनीया० ॥२॥

ऐशा अभ्यासाच्या योगें । लय साक्षी कळुं लागे ।

मग सदा स्वरुपीं जागें । लय साक्षी लय साक्षी । होवुनीया० ॥३॥

लय साक्षी तुज निश्चय कळता । सद्‌गुरु कृपा आली हातां ।

अभ्यासाने वाढवी आतां । वारी म्हणे नुपेक्षी । होवुनीया. ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP