मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
गोविंद गोविंद नाम मना तूं...

भक्ति गीत कल्पतरू - गोविंद गोविंद नाम मना तूं...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


गोविंद गोविंद नाम मना तूं घेई अखंड ।

सर्व पातकें नष्ट होवुनी चुकेल यमदंड ॥धृ०॥

राम कृष्ण हरी गोविंद हा लागुं दे छंद ।

जन्म मरण संसृतीचा तुटेल तो बंध ।गोविंद गोविंद० ॥१॥

गोविंद गोविंद भोजन समयीं वदे जो ग्रासोग्रासीं ।

भोजन समयीं नाम घेई तो जेवुनी उपवासी ।गोविंद गोविंद० ॥२॥

येतां जातां उठतां बसतां गोविंद उच्चारी ।

त्रैतापाची होळी करुनी गोविंद प्रगटें अंतरीं ।गोविंद गोविंद० ॥३॥

गोविंदाची गोडी रसने चाखी एक वेळ ।

गोडी लागतां तृप्‍ती होवुनी जाईल तळमळ ।गोविंद गोविंद० ॥४॥

गोविंद नाम गोद फार हें करी सुखरुप ।

वारी म्हणे नामीं चित्त जडतां होय तद्रूप । गोविंद गोविंद० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP