मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥३३॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३३॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥३३॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय देवा श्रीगुरुराया । तुजवांचोनि मजला जगीं या । समर्थ नसे उद्धराया । कवणही जाण आतां पैं ॥१॥ जगीं पाहतां तुजवांचोनि । न दिसे मला या त्रिभुवनीं । तूंचि भरलासि असे या जनीं । सत्य जाण गुरुनाथा ॥२॥ पहातां तुझें रूप सुंदर । आनंद चित्तीं होय अपार । वाचेनें बोलतां न ये साचार । काय सांगूं गुरुराया ॥३॥ ऐसी तुझी अगाध महिमा । कैसी वर्णावी न कळे आम्हां । तुझ्या प्रेमासी नाहीं सीमा । काय कैसें न कळे तें ॥४॥ आतां श्रोते हो ऐका उत्तम । श्रीसद्गुरु पांडुरंगाश्रम । यांची कथा सुंदर परम । रसाळ असे जाणा ती ॥५॥ जे असती भाविक भक्त । त्यांसी प्रसन्न होती त्वरित । ज्यांचा निश्चय दृढतर सतत । त्यांसी नच ते धिक्कारिती ॥६॥ तरी ऐका सावधान । करितों सद्गुरुप्रेम कथन । ऐकतां सकलांचे मन तल्लीन । होतसे जाण सहजचि ॥७॥ शिर्शींत एक भाविक ब्राह्मण । सारस्वत आमुचा असे जाण । 'हासगणी कुळकर्णी' त्यालागुन । म्हणती सकल जन तेथें ॥८॥ एके काळीं तो कुळकर्णी । गेला स्वामीमठालागुनी । घेतलें प्रेमें दर्शन झणीं । पांडुरंगाश्रमस्वामींचें ॥९॥ जाऊनि श्रीस्वामींसी शरण । मंत्र घेतला तयांकडोन । आणि श्रीगुरुचरित्र पठण । कराया आरंभ पैं केला ॥१०॥ जाऊनि राहिला आपुल्या ग्रामीं । गुरुचरित्रपारायण करी नेहमीं । धरूनि श्रीदत्त अंतर्यामीं । सप्ताह करी प्रतिवर्षीं ॥११॥ तो असे परम दत्तभक्त । दत्ताचेंचि ध्यान करी सतत । कधीं भेट होईल मजप्रत । ऐसा ध्यास तयासी ॥१२॥ जरी तो करी कुळकर्णी - काम । मुखीं अखंड दत्तनाम । अंतरीं असे बहुत प्रेम । ध्यातसे मूर्ति हृदयांत ॥१३॥ जारिणी करी पतिसेवा । अमितचि दावी प्रेमभावा । परी नाहीं तिच्या जीवा । पतिप्रेम अणुमात्र ॥१४॥ तिचें लक्ष असे तेथ । जार पुरुषावरीच सतत । वरिवरी पतिसेवा करोनि, त्वरित । जाय धांवोनि जाराकडे ॥१५॥ तैसा हा कुळकर्णी भक्त । करी प्रपंच वरिवरी सतत । परी त्याचें मन असे रत । दत्तचरणीं सारें तें ॥१६॥ लागलें श्रीदत्ताचें ध्यान । तळमळे मानसीं रात्रंदिन । म्हणे दत्ता तुझें वदन । कधीं दाविसी मजलागीं ॥१७॥ ऐसा करितां करितां धांवा । श्रमला बहुतचि घेऊनि नांवा । परी न भेटे दत्त, तो भावा । बघतो त्याचिया निश्चयासी ॥१८॥ ऐसेचि कांहीं दिन लोटले । त्याचिया मानसीं ध्यान लागलें । श्रीदत्ताचें दर्शन आगळें । व्हावें मजला आतांचि ॥१९॥ कांहीं केल्या न भेटे मजला । आतां काय करावें याला । " मिळे कीं जातां त्याच्या स्थळा । गाणगापूर - वाडीसी ॥२०॥ ऐसा विचार करोनि मानसीं । बहुत तळमळ होय त्यासी । मातेवीण बाळ रडे उपवासी । तैसें जाहले त्यासी पां ॥२१॥ पतिवीण पतिव्रता । गायीवांचूनि वत्स तत्त्वतां । तैसें होय त्याच्या चित्ता । दत्तदर्शनावरांचोनि ॥२२॥ असो मग करोनि विचार । उठोनि चालिला सत्वर । गांठिलें जाऊनि गाणगापूर । राहिला तेथें मासवरी ॥२३॥ भाकिली करुणा नानापरी । न भेटे त्रैमूर्ति साजिरी । तेणें दुःखित झाला भारी । अंतःकरणीं त्या समयीं ॥२४॥ तेव्हां आणिक योजिलें त्यानें । उचित नव्हे येथे राहणें । नरसोबावाडीसी जाणें । हेंचि बहु बरें मजलागीं ॥२५॥ तेथे जातां होईल दर्शन । श्रीदत्ताचें न लागतां क्षण । ऐसी मानसीं कल्पना करून । गेला थेट वाडीसी ॥२६॥ तेथे राहिला दोन मास । करी ध्यान रात्रंदिवस । घडी घडी प्रार्थी श्रीदत्तास । भेटी देईं म्हणोनियां ॥२७॥ म्हणे देवा प्रभो दत्ता । देईं दर्शन मजला ताता । तुजवांचोनि कवणही त्राता । अन्य नसे या जगतीं ॥२८॥ मी अपराधी हीन दीन । म्हणोनि न टाकीं मजलागोन । येईं लगबगें तूं धांवोन । वाट पाहतों तव बापा ॥२९॥ तूं दीनदासांचा कैवारी । ऐसें म्हणती तुजला सारीं । परी मजलाचि कां बा वैरी। होसी देवा दयाळा ॥३०॥ श्रीगुरुचरित्र केलें पठण । अमितचि केलें पारायण । परी तूं न भेटलासि म्हणोन । गेलों गाणगापुरासी ॥३१॥ तेथे राहिलों एक मास । प्रार्थिलें तुजला बहुवस । तरीही न भेटसी म्हणोनि वाडीस । जाऊं ऐसें वाटलें ॥३२॥ आतां येथें दोन मास । येऊनि झाले मजला खास । परी तूं न देशी दर्शन, यास । काय करावें बा सांगें ॥३३॥ तूं जरी न भेटसी आतां । निश्चयें देईन प्राण ताता । येचि स्थानीं तव पायीं तत्त्वतां । सत्य सत्य गुरुदेवा ॥३४॥ तुझ्या भेटीवीण देवराया । शरीर हें ठेवावें कासया । वाउगेंचि पोसुनी वाढवावें तया । श्रम घेवोनि कां इतुके ॥३५॥ त्याहुनी येथेंचि राहावें पडोन । अन्न - उदकावांचोनि जाण । जावो अथवा राहो प्राण । त्याची चिंता मज नाहीं ॥३६॥ तुजवांचोनि जग हें अनित्य । पां तुझें स्वरूपचि एक असे नित्य । म्हणोनि देवा सांगतों सत्य । तुजवीण मजला करमेना ॥३७॥ किती आळखूं आतां तुजला । माझा घसा कोरडा झाला। येईं झडकरी भक्तवत्सला । देईं दर्शन मजलागीं ॥३८॥ तुझ्या चरित्रीं ऐकिली लीला । आतां ती लपली कां ये वेळां । इतुका निष्ठुर कां हो दयाळा । झालासी सांग गुरुनाथा ॥३९॥ बालकाअंगीं जरी दुर्गुण । मातेसी कधींही वीट न ये जाण । रडतांचि येई धांवोन । सांडोनि काज हातींचें ॥४०॥ जन म्हणती तुजला माउली । श्रांतांची तूं अससी साउली । कां न दया माझी या वेळीं । येतसे तुजला सांगें हो ॥४१॥तुझे भक्त असतील अगणित । सकळांचा सांभाळ तूंचि करीत । म्हणोनि नसे कीं तुजला उसंत । काय कारणें न येसी ॥४२॥ तूं सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ । तुजला काय हो असे कठिण । यावें लागे की येथें दुरोन । हेंही कारण नसे बा ॥४३॥ येथेंचि अससी हृदयामाजीं । नलगे उशीर यावया आजी । पाहूं नको परीक्षा माझी । देवा दयाळा प्रभुराया ॥४४॥ अससती जरी हृदयांतरीं । अज्ञत्वें मी न जाणें निर्धारीं । म्हणोनि देवा मजला सत्वरीं । प्रत्यक्ष भेट देई तूं ॥४५॥ नेणं मी बा कांहीं एक । तुझ्या प्रेमावांचूनि आणिक । तूंचि अससी माय जनक । आप्त इष्ट सकलही तूं ॥४६॥ सारे विषय तूंचि जाण । न रुचती अन्य तुजवांचोन । येईं आतां कृपा करोन । देईं दर्शन वेगेंचि ॥४७॥ बहुत जनांचे कष्ट निवारण । केलेस गुरुराया तूं धांवोन । मजपाशींच कां इतुकें कठीण । केलें मन वञ्चाहुनी ॥४८॥ तूंचि लिहिलें कीं पुराणीं । सारे विषय तुच्छ म्हणोनि । सद्गुरुदेवचि श्रेष्ठ धनी । तोचि करील उद्धार ॥४९॥ तूंचि गुरु आणि देव माझा । मज नसेचि भाव दुजा । दास असें मी निश्र्चयें तुझा । मज कां तूं न भेटसी ॥५०॥ कितीतरी विनवूं तुजला । अंत किती पाहसी भला । प्राण जरी माझा गेला । तरीही न वचें येथुनी ॥५१॥ आतां निश्चयें सांगतों देवा । दर्शन दिधल्यावांचूनि तुवां । अन्न - उदक न घें मी माधवा । खचितचि जाण निर्धारें ॥५२॥ ऐसी त्यानें नानापरी । करुणा भाकिली निज अंतरीं । उपवासी राहिला सप्त दिनवरी । अन्न - उदकावीणचि तो ॥५३॥ म्हणे येथेंचि राहोन । तव संनिधचि देईन प्राण । ऐसें बोलुनी रात्रंदिन । करीत ध्यान बैसला ॥५४॥ तेव्हां जाहला चमत्कार । तो आतां ऐका सविस्तर । साक्षात् दत्तात्रेयाचा अवतार । पांडुरंगाश्रम सद्गुरु हे ॥५५॥ यांत संशय नाहीं अणुमात्र । ऐकतां सहजचि कळे साचार । सावध चित्त करा सत्वर । तुम्ही सकल श्रोते हो ॥५६॥ तेथेंच तो देउळासंनिधीं । राहिला आळवीत परमावधि । लाविली तेणें आपुली बुद्धि । दत्तध्यानीं निरंतर ॥५७॥ तेव्हां इकडे चित्रापुर - ग्रामीं । श्रीगुरु पांडुरंगाश्रम - स्वामी । कळवळले बहुत अंतर्यामीं । आठवुनि आपुल्या भक्तातें ॥५८॥ म्हणती मानसीं मद्भक्त थोर । अज्ञपणें न कळे विचार । त्यामी आणावें भानावर । म्हणोनि उठले लगबगें ॥५९॥ दंड कमंडलु घेऊनि हातीं । पायीं पादुका मधुर वाजती । भगवी छाटी अंगावरुती । सुंदर मूर्ति चालली ॥६०॥ इकडे वाडीमाजीं हा भक्त । निजला असे धांवा करीत । डोळा लागला त्यासी त्वरित । काय वर्तलें तें ऐका ॥६१॥ आठव्या दिवशीं प्रातःकाळीं । पांच वाजतां तयेवेळीं । धांवत आली सद्गुरुमाउली । स्वप्नामाजीं न भक्ताच्या ॥६२॥ पहा कैसा निश्रय फळला । जरी अज्ञपणें स्वामींसी विसरला । तरी स्वामी न विसरले त्याला । कळवळोनि धांविन्नले ॥६३॥ बालक जरी विसरे मातेसी । तरी माता न विसरे त्यासी । सदा चिंता तिच्या मानसीं । निजबाळाची निश्र्चयें ॥६४॥ तैसी सद्गुरुमाउली आमुची । तिजला चिंता निजभक्तांची । विसरतांही रक्षी साची । करी कृपा तयांवरी ॥६५॥ परी प्रेम असावें बळकट । तरीच गुरुकृपा होय निकट । त्यावीण करितां बहु खटपट । होय व्यर्थ ती जाणा ॥६६॥ असो मग ते सद्गुरु दयाघन । बैसले तेथें जवळी येऊन । पाठीवरी थोपटती स्वयें जाण । आणि म्हणती मद्भक्ता ॥६७॥ ऊठ येईं आमुच्या संनिधीं । चित्रापुरासी निघें आधीं । तेथे मी असतां तुझी बुद्धि । कुठें गेली हिंडाया ॥६८॥ म्हणोनि जिकडे तिकडे पाहीं । भटकुनी म्हणसी भेट देईं । येथें मी निश्चयें नाहीं । आहें चित्रापुर - ग्रमासी ॥६९॥ ऐसें असतां तूं येथें जरी । बैसलास आळवीत जन्मभरी । तुजला भेट न होय निर्धारीं । येईं झडकरी तेथेंचि ॥७०॥ ऐसें बोलुनी मधुर वचन । हस्त फिरविला पाठीवरोन । क्षणेंचि पावले अंतर्धान । जागा जाहला तो भक्त ॥७१॥ विस्मय करी आपुल्या चित्तीं । काय देखिलें स्वप्न निश्चितीं । पांडुरंगाश्रम-सद्गुरुमूर्ति । भेटली कैसी मजलागीं ॥७२॥ मी आळविलें रात्रंदिन । श्रीदत्तासी प्रेमेंकरून । परी दिधलें स्वामींनीं दर्शन । स्वप्नामाजीं मजलागीं ॥७३॥ आणि म्हणती चित्रापुरीं । मी असेंचि बा निर्धारीं । यावरोनि तेचि विधि-हरि - । हर त्रैमूर्ति निश्चयेंसीं ॥७४॥ म्हणोनि आतां तेथेंचि जाउनी । घ्यावें दर्शन स्वामींचे झणीं । ऐसा विचार मानसीं करोनि । निघाला जावया चित्रापुरा ॥७५॥ जाऊनि पोहोंचला शिराली - ग्रामीं । त्वरितचि गेला सद्गुरुस्वामी । यांच्या संनिध पडला भूमीं । घातलें दंडवत प्रेमभरें ॥७६॥ तेव्हां सद्गुरुस्वामिराय । म्हणती तुजला दत्तात्रेय । यांनीं पाठविला कीं काय । सांग बापा या समयीं ॥७७॥ ऐसें बोलुनी प्रसन्नवदन । हस्त फिरविती मस्तकावरोन । तेव्हां काय चमत्कार तो आपण । ऐका सावध होऊनियां ॥७८॥ नसे देहभान अणुमात्र । निजानंदीं समरसला सुपवित्र । बघतां तोषले पंकजनेत्र । सद्गुरुवर्य त्या समयीं ॥७९॥ असो मग तो कुळकर्णी भक्त । दोन तासांवरी बैसला स्वस्थ । जन सारे झाले तटस्थ । आनंदले श्रीस्वामीही ॥८०॥ पहा ऐसा सद्गुरुमहिमा । कैसा वर्णावा न कळे आम्हां । त्यांच्या धरितां पादपद्मा । काय उणीव ती राहील ॥८१॥ झालें ऐक्य दत्तचरणीं । देहभान हरपलें झणीं । असे ही श्रीस्वामींची करणी । नाहीं अनुमान यामाजीं ॥८२॥ सद्गुरुकृपा झालियावरी । इच्छित प्राप्त होय झडकरी । उशीर नलगे तयासी निर्धारीं। सत्य सत्य त्रिवाचा ॥८३॥ परी असावा भावार्थ थोर । नच त्या धिक्कारी गुरुवर । जरी विसरे आपुल्यासी तो नर । तरीही त्यासी रक्षिती ॥८४॥ तो हासगणीचा गृहस्थ । असे परम दत्तभक्त । परी स्वामीचि असती दत्त । हें तो न जाणे अज्ञपणें ॥८५॥ घेतला उपदेश स्वामींकडुनी । परी गेला धुंडाया दुज्या स्थानीं । दत्ता धांव धांव म्हणोनि । केली दिनरजनीं विज्ञापना ॥८६॥ परी साक्षात् दत्तावतार । तोचि याचा सद्गुरुवर । असोनि ग्रामीं चित्रापुर । कासया भेटेल अन्य स्थळीं ॥८७॥ आपुल्या भक्ताचा भाव बघोनि । करुणा उपजली स्वामींच्या मनीं । अज्ञ भक्त माझा म्हणोनि । कळवळोनि धांविन्नले ॥८८॥ नेणतें बालक आपुल्या मातेसी । नेणोनि, अन्य स्त्रियेच्या स्तनासी । लागे, परतोनि हुडके परियेसीं । परी न मिळे दूध तयातें ॥८९॥ तेव्हां कळवळोनि ती माय । लगबगेंचि धांवोनि जाय । ओसंगा धरीतसे ती सदय । निजबाळकालागीं हो ॥९०॥ अज्ञ बाळ नेणे आपुल्यासी । हें माता समजे निजमानसीं । तरीही न क्षोभे निश्र्चयेंसीं । बालकावरी कदापि ती ॥९१॥ तैसा हा कुळकर्णी भक्त । नेणोनि स्वामींचा महिमा अद्भुत । सैरावैरां धांवला अमित । दत्तभेटीस्तव पाहीं ॥९२॥ परी जाणती सद्गुरु त्यासी । कळला हेतु भक्ताचा मानसीं । म्हणोनीच भेट दिधली त्यासी । कळवळोनि सत्य पहा ॥९३॥ पहा कैसी सद्गुरुकृपा । दाविला कैसा मार्ग सोपा । जावया ऐशा सत्स्वरूपा । बहुविध यत्न लागती जनां ॥९४॥ गुरुकृपेवीण स्वरूपस्थिति । न लाभे निश्चयें कवणाप्रति । म्हणोनि ऐसी सद्गुरुमूर्ति । धरावी हृदयीं सतत पहा ॥९५॥ सद्गुरुस्वामी कृपाघन । मनुष्य नसे तो निश्चयें जाण । नातरी ऐसीं कार्यें आम्हांकडोन । कैसीं होतील सांगा पैं ॥९६॥ आणिक ऐका महिमा अद्भुत । साक्षात् अवतरलासे हा दत्त । त्याचा ऐका पुढील वृत्तांत । तुम्ही भाविक श्रोते हो ॥९७॥ कुळकर्णी श्रीदत्तस्वरूपीं लीन। होउनी राहे तास दोन । मग तो पावे सहज उत्थान । घाली लोटांगण गुरुचरणीं ॥९८॥ तेव्हां स्वामी म्हणती तयासी। अरे बाळा तूं उपवासी । राहिलास सत्य दिवसनिशीं । ऊठ झडकरी आतां पैं ॥९९॥ स्नान करोनियां सत्वर । घेईं भोजन -प्रसाद थोर। ऐसें बोलत असतां भरले नेत्र । प्रेमाश्रूंनीं स्वामींचे ॥१००॥ कंठ झाला सद्गदित । पुढें न बोलवे शब्दही त्यांप्रत । 'सद्गुरुमाउली' म्हणतां शोभत । याचिकारणं हो पाहीं ॥१०१॥ जैसी माता आपुल्या बाळां । सांभाळी प्रेमानें वेळोवेळां । तैसा सद्गुरुनाथ हा आपुला । करितो रक्षण भक्तांचें ॥१०२॥ देह झिजविती रात्रंदिन । संकटीं रक्षिती भक्तांलागोन। स्वार्थ ना अंगीं अणुमात्र जाण । नसे अनुमान यामाजीं ॥१०३॥ असो मग तो हासगणी -भक्त । साष्टांग नमुनी उठला त्वरित । गुरु-आज्ञेपरी स्नानादि निश्चित । उरकुनी भोजना बैसला ॥१०४॥ मग सद्गुरुस्वामींनीं त्यासी । बोलाविलें विश्रांति घ्यावयासी । माडीवरीच नीज तूं ऐशी। दिधली आज्ञा प्रेमानें ॥१०५॥ तेव्हां तो जाउनी निजला स्वस्थ । श्रमला होता तो अत्यंत । घोर निद्रा लागली त्याप्रत । सुखानें पहुडे त्याठायीं ॥१०६॥ संध्याकाळ झाल्यावरी । दिवे लागले घरोघरीं । दोन तास झाले तरी । हा भक्त पडला घोरतचि ॥१०७॥ मग झाला तो जैं जागृत । नयनीं देखे चमत्कार अद्भुत । सद्गुरुस्वामी शेजारीं फिरत। विश्रांतिस्थानीं आपुल्या ॥१०८॥ तितुक्यामाजीं तेथे सुंदर । दत्तात्रेयचि देखिला सत्वर । तीन शिरें सहा हात परिकर । देखिली मूर्ति स्वामींची ॥१०९॥ मुखें बघतां श्रीस्वामींचीं। तीन असती तीं सुंदर साचीं। दचकोनि बैसे तेथेंचि । प्रेमाश्रु आले नयनांत ॥११०॥ बोलूं जातां फुटेना शब्द । बैसला तेव्हां तैसाचि स्तब्ध । पोटीं न समावे आनंद । बघुनी मूर्ति दत्ताची ॥१११॥ तेव्हां म्हणती सद्गुरुनाथ । इच्छा तुझी झाली कीं तृप्त । भेटला कां तुजला दत्त । सांग बाळा आतां तूं ॥११२॥ मग पुनरपि पाहतां वदन। दिसतसे एकचि त्यालागुन । तेव्हां तयासी पटली खूण । साक्षात् अवतार हा दत्ताचा ॥११३॥ आणि म्हणे सद्गुरुस्वामी । नोळखिलें देवा तुजला मीं। दर्शनासाठीं ग्रामोग्रामीं । हिंडलों वृथाचि हो पाहीं ॥११४॥ टाकुनी कल्पवृक्ष हातींचा । दारोदारीं हिंडें मी साचा । जवळी असतां तूं देव आमुचा । गेलों धुंडाया अन्य स्थळीं ॥११५॥ गृहामाजींच माय असत । अज्ञ बालक जाय रांगत । हुडके तिसी रडत रडत । जिकडे तिकडे लवलाहीं ॥११६॥ रडें ऐकुनी माय त्वरित । काम टाकुनि येई धांवत । बालकासि त्या उचलूनि घेत । कळवळोनि लडिवाळपणें ॥११७॥ तैसी जवळीच तूं गुरुमाय । असतां साक्षात् दत्तात्रेय । इकडे तिकडे धुंडीत जाय । अज्ञपणें मी देवा ॥११८॥ मातेपरी धांवत येऊन । केलेंस माझें प्रेमें रक्षण । दाविले श्रीदत्ताचे चरण । येथेंच तूं बा आत्मत्वें ॥११९॥ अज्ञान्यांसी दाविती वाट । सद्गुरु हेचि असती श्रेष्ठ । तेवीं मी असतांही कनिष्ठ । आणिला बळेंचि ओढुनी ॥१२०॥ बालक जातां इकडेतिकडे । माय आणीत त्या आपुल्याकडे । निवारी त्याचें घोरही सांकडें । तैसें देवा केलेस तूं ॥१२१॥ माता असे आपुली रक्षक । ऐसें नेणुनि धांवे बालक । हें जाणूनि माय ती देख । आणी ओढुनी त्यालागीं ॥१२२॥ तद्वत् देवा तूंचि त्राता । साक्षात् दत्तचि आमुचा असतां । हें नेणूनि भलत्याचि पंथा । गेलों तुजला शोधाया ॥१२३॥ तेव्हां मी अज्ञ हें जाणोनि । धांविन्नलास तूं पाठ धरोनि । बलात्कारें आणिला झणीं । निजस्थानासी प्रेमानें ॥१२४॥ किती देवा हे तव उपकार । विसरूं कसा मी सांग सत्वर । फेडूं कैसे ते न कळे निर्धार । प्रभो गुरुराया कृपाधना ॥१२५॥ ऐसी बहुविध करुनी प्रार्थना । वृत्तांत मारा कथिला जाणा । ऐकुनी बोले सद्गुरुराणा । पूर्वपुण्य तुझे हें ॥१२६॥ इतुकें बोलुनी नानापरी । केला बोध तया निर्धारीं । तेव्हां जाहला आनंद भारी । तया कुळकर्णी - भक्तासी ॥१२७॥ धरोनि तो मानसीं बोध । त्यापरीच वागला तो प्रसिद्ध । तेणें जाहले तयासी शुद्ध । ब्रह्मज्ञान गुरुकृपें ॥१२८॥ काय सांगूं सद्गुरु - महिमा । अधिक न वर्णवे ती आम्हां । पुढील अध्यायीं आणिक तुम्हां । सागूं चरित्र स्वामींचें ॥१२९॥ आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें त्रयस्त्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१३०॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती थोर । त्रयस्त्रिंशाध्याय रसाळ हा ॥१३१॥ अध्याय ३३ ॥ ओव्या १३१ ॥ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥६॥ ॥६॥॥ इति त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP