मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥५७॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५७॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥५७॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुपरपरायै नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय सद्गुरो करुणासागरा । देईं तूंचि चित्तासी थारा । पूर्ण करी तूंचि गुरुवरा । ग्रंथ सारा हा पाहीं ॥१॥ जरी माझे अपराध अगणित । तरी तूं देवा रक्षीं मजप्रत । तुजवांचोनि अन्य ना निश्र्चित । उद्धरावया गुरुराया ॥२॥ आजवरी जन्म वायां गेला । मी कोण हें विदित ना मजला । 'देह मी' ऐसा भाव हा भला । दृढतर वसला मम हृदयीं ॥३॥ तव कृपेवीण सर्वथा । नच जाय देह - ममता । धांव धांव तरी आतां । कृपा करी बाळावरी ॥४॥ तुज म्हणती भक्तवत्सल । तरी कां बा इतुका वेळ । ये ये झडकरी धांवुनी वेल्हाळ । हृदयीं माझ्या तूं देवा ॥५॥ तूंचि वास करितां हृदयीं । मग उणीवता नाहीं कांहीं । परिपूर्ण ज्ञान होय पाहीं । अगाध महिमा तव बापा ॥६॥ असो आतां श्रोते हो सज्जन । नऊही आश्रमांचे चरित्रकथन । ऐकिलें तुम्ही प्रेमेंकरोन । एकाग्र मनें पहा हो ॥७॥ या साऱ्या कथा ऐकतां । अनुमान न वाटूं द्या चित्ता । कीं ह्या साऱ्या कथिल्या कथा । सत्य कीं असत्य म्हणोनियां ॥८॥असत्य नव्हती कदापि जाणा । अवतार - पुरुषचि श्रीसद्गुरुराणा । मग काय वर्णूं मी त्यांना । सहजचि महिमा प्रगट असे ॥९॥ सद्गुरुइतुकी प्रेमळ जगांत । अन्य वस्तु नाहीं निश्र्चित । पहा पहा हो त्यांचें चित्त । कैसें शांत रात्रंदिन ॥१०॥ शांत चित्त म्हणोनि त्यांचें । बोलती जें वैखरी - वाचे । असत्य न होय कधीही साचें । वाक्य निश्र्चयें हो पाहीं ॥११॥ यावरी बेचाळ अध्यायामाझारीं । मंगेशभट्ट हट्टंगडी यांची अंतुरी । माझी माता राधा ही खरी । यांसी दिधला आशीर्वाद ॥१२॥ तेणेंचि अद्याप माझी माता । सौभाग्यानें नांदे तत्त्वतां । ऐसे कथिलें होतें आतां । पुढती ऐका अणुमात्र ॥१३॥ की माझी माता राधाबाई । त्यानंतर शिवाधीन झाली पाहीं । म्हणूनि बेचाळिसाव्या अध्यायांत ही । वार्ता नाहीं कथियेली ॥१४॥ परी आतां सांगतों सत्य । सौभाग्यें गेली ती परलोकांत । वचन न होय असत्य । पांडूरंगाश्रमस्वामींचे ॥१५॥ एवं श्रीस्वामींच्या वचनें । निवर्तली मम माता सौभाग्यानें । गुरुकृपा असतां मग काय उणें । महिमा अपार त्यांची हो ॥१६॥ बेचाळिसाव्या अध्यायीं कथा लिहिली । तेव्हां माझी माता होती म्हणाली । कीं ही कथा जरी तूं लिहिली । भीति वाटते मम जीवा ॥१७॥कीं माझें आयुष्य किती म्हणोनि । कैसें कळेल तुजलागोनि । जरी बहुत वर्षें उरलें जगोनि । स्वामींस दोष देतील जन ॥१८॥ अर्थात् तिचा हेतु इतका । जरी न मेल्यें सौभाग्यें देखा । स्वामीचे वाक्य गेलें फुका । ऐसें जन म्हणतील ॥१९॥ म्हणोनि ही कथा सविस्तर । लिहू नको तूं सांगतें विचार । तेव्हां बोलिले वडील निर्धार । भिऊं नको तूं सर्वथा ॥२०॥ अन्यथा न होय स्वामींचें वचन । तूं जाशील सौभाग्यें पूर्ण । भय नाहीं लिहाया जाण । आशीर्वाद सत्य पहा ॥२१॥ असो खचितचि आशीर्वाद । खरा झाला स्वामींचा प्रसिद्ध । सांगाया होय परमानंद । मजलागीं हो जाणावें ॥२२॥ शके अठराशें सदसष्टामाजीं जाणा । सौभाग्यानें पावली मरणा । पिता मंगेश अण्णाजी भट्ट यांना । मरण आलें चौर्याहत्तरीं ॥२३॥ एवं स्वामींचे वचनचि सत्य । झालें असें सांगावें न लागत । अखंड सौभाग्य हेंही प्राप्त । झाले आशीर्वादेंचि त्यांच्या ॥२४॥ सहासष्ट वर्षें होतां पूर्ण । गेली राधाबाई आपण । एवं अखंड सौभाग्य पावून । गेली निघोन परलोकीं ॥२५॥ होती दृढतर भक्ति तिजला । सद्गुरुस्वामींच्या चरणकमलां । तिच्याच इच्छेनें ग्रंथ रचियेला । आभार तियेचे अमित पहा ॥२६॥ तेवींच माझा पिता हट्टंगडी । मंगेश अण्णाजी भट्ट याची आवडी । लिही लवकरी म्हणोनि घडीघडी । सांगत होता मजलागीं ॥२७॥ परी दोघांच्याही हयातींत । ग्रंथ नाहीं झाला समाप्त । याचा खेद वाटे बहुत । सांगावया मजलागीं ॥२८॥ तैसाच माझा बंधु अण्णाजी यानें । लिहावयासी सुचविलें आग्रहानें । तेणेंच मी उत्सुक मनानें । आरंभिले हें कार्य ॥२९॥ असो आतां नऊही आश्रम । यांचें चरित्रकथन उत्तम । जरी संक्षिप्त तरीही प्रेम । न होय संक्षिप्त कदापि तें ॥३०॥ मज नाहीं तीव्र बुद्धि । अथवा भक्तिप्रेमाची वृद्धि । नाहीं माझ्या अंगी, गुरुपदीं । दृढ विश्वासही नसे तो ॥३१॥ हें नव्हे वरपांगीं बोलणें । खचितचि मजला भक्तिप्रेम उणें । सद्गुरूची इच्छा तोचि जाणे । की कधीं देईल दृढभक्ति ॥३२॥ तेव्हां कैंचा ग्रंथ सुरेख । होय सांगा मजकडूनि देख । परी सद्गुरुकृपेंचि निश्र्चयात्मक। झाला ग्रंथ पूर्ण खरा ॥३३॥ भावहीन बुद्धिहीन । ऐसा मी एक पामर अज्ञ । ऐशियालागीं गुरुकृपा कोठून । होईल सांगा श्रोते हो ॥३४॥ परी आमुच्या मातापित्यांच्या । भक्तिसी पावला श्रीगुरु साचा । पुरवावयासी हेतु त्यांचा । करविला ग्रंथ मजकडुनी ॥३५॥ आणि माझिया बंधूनेंही । आग्रहें सांगितलें ग्रंथ तूं लिही । तेव्हां उत्सुकता आली लवलाहीं । मजलागींही त्या समयीं ॥३६॥ आणि त्याच समयीं आमुचे स्वामी । आनंदाश्रम धारवाड - ग्रामीं । आले होते तेव्हांचि मीं । लिहावया आरंभ केला पैं ॥३७॥ कर्मधर्मसंयोगें जाण । स्वामी सद्गुरु दयाघन । प्रारंभ - समयींच आले असोन । दाविला ग्रंथ झाला तितुका ॥३८॥माझा बंधु अण्णाजी यानें । ग्रंथ हातीं देऊनि तो म्हणे । प्रसाद द्यावा आपुल्या हस्तानें । मग बोलाविलें मजलागीं ॥३९॥ सद्गुरु हस्तींचा प्रनाद। ग्रंथासहित घेतला प्रसिद्ध । तेव्हां जाहला मज आनंद । वाढली उत्सुकता लिहावया ॥४०॥ म्हणोनि त्यांच्याचि कृपें ग्रंथ । झाला समाप्त हा निश्र्चित । सद्गुरुमहिमा अगाध असत । यामाजीं संशय ना कांही ॥४१॥ कर्ता करविता एक गुरुवर । मी काय करितों अज्ञ पामर । म्हणोनि तुम्ही श्रीते हो समग्र । अवधारा हा ग्रंथ प्रेमभरें ॥४२॥ जरी अबद्ध सुबद्ध कथिलें । तरी त्यांत गुरुप्रेमचि भरलें । ऐसें जाणुनी तुम्हीं आपुलें । चित्त लावावें येथेंचि ॥४३॥ झाले अध्याय सप्तपंचाशत । नऊ आश्रमांचे प्रेम तयांत । एकचि असुनी रूप नाम मिथ्य । जाणा तुम्ही सारें हें ॥४४॥ आम्हां सारस्वतांचे सद्गुरू । करिती आम्हां पैलपारू । सांगती सकलां स्वधर्माविचारू । केवीं उपकारू विसरावा ॥४५॥ सर्वही इंद्रियें त्यांच्या भजनीं । लावावीं आम्हीं रात्रंदिनी । तेणें पापें भस्म होऊनि । चित्त शुद्ध होय पहा ॥४६॥ जरी न होय सर्व करावया । तरी चरित्र श्रवण केलिया । अथवा पठण करितां तया । चिराशुद्धीस उशीर नसे ॥४७॥ करितां चरित्र श्रवण पठण । इच्छा अने नी होय पूर्ण । नाहीं यामाजीं अनुमान । धरावा विश्वास निजहृदयीं ॥४८॥ श्रीस्वामींची आगाध महिमा । किती मांगूं आतां तुम्हां । अधिक न वर्णवे आम्हां । अन पामरां पहा ती ॥४९॥ सकल अध्यायांचे सार । आठवूं पुनरपि अणुमात्र । तेव्हां हृदयीं ठसेल चरित्र । गुरुपरंपंरेचें पहा हो ॥५०॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण । सर्व आश्रमांसी केलें वंदन। आणिक आमुचे कुलदेव मिळोन । सद्गुरुस्मरण केलें पैं ॥५१॥ द्वितीय अध्यायीं नगर - संस्थानीं । आमुच्या जनांसी सद्गुरु नसे म्हणोनी । राजा क्षोभला तेव्हां भक्तांनीं । प्रार्थिला बहुवस महाबळेश्वर ॥५२॥ ईश्वर - पार्वती संवाद होऊनि । शंकर धांवला वेगें धरणीं । हेचि कथा सविस्तर कथोनि । तृतीयाध्याय संपविला ॥५३॥ चतुर्थाध्यायीं महादेव । परिज्ञानाश्रम घेऊनि नांव । सद्गुरु आला पाहुनी भाव । नगरसंस्थानीं प्रयाण करी ॥५४॥ पंचमाध्यायीं शृंगेरीं प्रयाण । देवीचें तेज घे आकर्षोन । शृंगेरी - स्वामी तेज घे मागोन । आणि संमतिपत्र देती पहा ॥५५॥ षष्ठाध्यायी शंकराश्रमासी । शिष्य करोनियां परियेसीं । स्वधर्म स्थापुनी उद्धरिलें जनांसी । बांधिला मठ गोकर्णीं ॥५६॥ सप्तमाध्यायीं झालें कथन । निजभक्तांसी बोध करोन । घेतली समाधि परिज्ञानाश्रमांनीं आपण । झाले दुःख भक्तजनां ॥५७॥ शंकराश्रमस्वामी यांनीं । बंकीकोड्ल - ग्रामीं जावोनि । दिधलें दर्शन भक्तांलागोनि । अष्टमाध्यायीं हेचि कथा ॥५८॥ नवमाध्यायीं केला बोध । जो आधीं होता निंदक बद्ध । आणिक कथा असे शुद्ध । दरिद्रिया केला श्रीमंत ॥५९॥ कथिलें दहाव्या अध्यायामाजीं । शंकराश्रमस्वामी द्वितीय गुरुजी। जाती आनंदें समाधि - शेजीं । चित्रापुर - ग्रामांत ॥६०॥ एकादशाध्यायीं समाधीवरती । मृत्तिकालिंग करूनि स्थापिती । तें भंग कराया निश्र्चितीं ॥ अधिकारी प्रयत्न करिती महा ॥६१॥ पाणी घालूनि पुष्कळ पाहिलें । परी तें नाहीं विरघळलें । रक्त ओकूनियां ते मेले । ऐसी महिमा सद्गुरूंची ॥६२॥ द्वादशाध्यायी परिज्ञानाश्रम । तृतीय स्वामी झाले उत्तम । सावकारकांतेसी वाचविलें परम । कृपासामर्थ्येंकरूनियां ॥६३॥ लक्ष्मणनामें अभक्तासी । भेट होतां मेम उपजे मानसीं । शरण गेला गुरुचरगासी । बांधिले त्रयोदशी गुरूंनी त्या ॥६४॥ जनांसी करितां बोध उत्तम ॥ श्रीस्वामी परिज्ञानाश्रम । करोनि शिष्य - स्वीकार निजधाम । गांठिनी चतुर्दश अध्यायीं ॥६५॥अनुष्ठानसमयीं शंकराश्रम । दंडावरी ज्वर ठेविती उत्तम । बोध करिती धरुनि प्रेम । शिष्यस्वीकार पंचदशीं ॥६६॥ सोळाव्या अध्यायीं केलें वर्णन । वडे न भाजती विस्तव असोन । स्वामींस पेज न वाढिल्याकारण । क्षोभ झाला शंकराचा ॥६७॥ पेज न वाढिल्याकारण । भक्तांनीं क्षमा मागितली जाण । बोधूनि केलें समाधान । स्वामींनी सप्तदश-अध्यायीं ॥६८॥ नरसोबावाडीच्या पुजान्यासी । स्वप्न झालें मी असें मल्लापुरासी । जातां तेथें तुज आणि तव पुत्रासी । बरें होईल वदती अष्टादशांत ॥६९॥ मल्लापुर - समाधि उघडिती । विल्वदळें ताजींच तेथे दिसती । पांडुरंगाश्रम कुमठ्यांत घंटा घेती । स्वप्नापरी एकोणिसांत ॥७०॥ सात वरुषांचें एक बाळ । वाचा नसतां करी तळमळ । त्यासी दिधली वाचा प्रेमळ । विसाव्यामध्यें केशवाश्रमें ॥७१॥ स्वप्नीं तेल चोळूनि त्वरा । केला एक गरीब भक्त बरा । आणि शिष्य - स्वीकार खरा । कला एकवीस - अध्यायीं ॥७२॥ कृष्णाश्रममूर्ति श्रेष्ठ । ऐसें बालपणीं कथिले भविष्य स्पष्ट । वामनाश्रम स्वामींनी शिष्य - पाट । दिधला बाविसाव्यामाजीं ॥७३॥ तेविसाव्यांत वामनाथमगुरूंनी समाधि घेतली देवीसि प्रार्थुनी । हीच महिमा वर्णन करूनि । संपविला अध्याय गुरुकृपें ॥७४॥ रामगर लाभादाय । खटला होतां वाटलं त्या भय । वामनाथम गुरुमाय। पावली त्यास चोबिमारी ॥७५॥ मुल्कीग्रामी देऊळ बांधाया। कृष्णाश्रमांमी घालावया पाया। बोला- विलें नंव्हां मनापानियां। बोधिलें जनांम पंचविसीं ॥७६॥ सव्विसाव्यांत सद्गुण - वर्णन । नागरकट्टी दुर्गप्पय्यालागून । दिधली सप्तशती कराया पारायण । झालें कल्याण त्याचें पैं ॥७७॥ पांडुरंगाश्रम शिष्य झाले । कंठी पाहिजे म्हणोनि बैसले । शिष्याचे लाड पुरविले । बहुप्रेमानें सत्ताविसीं ॥७८॥ पांडुरंगाश्रम - शिष्यप्रेमास्तव । ठेविला चैत्रमासीं रथोत्सव । हेचि कथा कथिली अपूर्व । अठ्ठाविसाव्या अध्यायीं ॥७९॥ बाजारकारीं केली निंदा । बाजारा अग्नि लागला तदा । शांत होय शरण जातां गुरुपद । कृष्णाश्रमसमाधि एकोणतिशीं ॥८०॥ श्रीपांडुरंगाश्रम यांचा अवतार । केल्या सगुणलीला अपार । गुरुआज्ञेपरी वर्तले निरंतर । तिसाव्यांत ही कथा ॥८१॥ स्वामींचे वाक्य सत्य होय शीघ्र । आणि शिराली खेडें केलें शहर। केवळ लोकहितासी समग्र । हेंचि कथिले एकतिशीं ॥८२॥ बैंदूर मंगेश यावरी द्वेषे । खटला केला परियेसें । श्रीस्वामींच्या कृपाकटाक्षें । पार पडला बत्तिसांत ॥८३॥ तेहतीस - अध्यायीं हासगणी कुळकर्णी । हिंडला साऱ्या क्षेत्रस्थानीं । समाधान न मिळे मग स्वामींनीं । भेट देऊनि उद्धरिला ॥८४॥ चौतिसावे अध्यायीं एक । सावकार - सुता जगविलें देख । बोध केला त्यासी अनेक । श्रीस्वामी - गुरुरायें ॥८५॥ गणपत रामजी माने । यांची नोकरी गेली जाणें । स्वामीसी प्रार्थितां मिळाली त्वरेनें । नोकरी पुनरपि पस्तिसावीं ॥८६॥गोकर्ण शंकर यासी स्वामींनीं । आपण उपदेश न देतां झणीं । अन्यांच्या जपें मुक्त केला तत्क्षणीं । वाक्यमहिमा छत्तिसांत ॥८७॥ मंगेश भट्ट यांची कन्या । इजसी सन्निपात झाला तो हटेना । गुरुवाक्यें काढा पाजितां जाणा । जगली ही कथा सदतिसांत ॥८८॥ कुंदापुरींचा सावकार कामत । त्यावरी मिठाचा आरोप येत । स्वामींसी शरण जातां त्वरित । रक्षिलें त्या अडतिशीं ॥८९॥एकोणचाळीस - अध्यायीं कथन । दुग्गप्पाशेट्टीचा हरिला अभिमान । पुनरपि घोडा गेला घेऊन । शरण जाऊन स्वामींसी ॥९०॥ अल्लीशा नामें एक यवन । त्यावरी आलें संकट दारुण । रक्षिला त्याचा भाव बघोन । चाळिसाव्या अध्यायीं ॥९१॥ अल्लीशावरी पुनरपि संकट । ओढवतां रक्षी सद्गुरुनाथ । तोचि अंती स्वामींसी स्मरत । प्राण मोडी एकेचाळिसीं ॥९२॥ श्रीस्वामींच्या आशीर्वचनें । राधा राहिली सौभाग्यानें । आणि अभक्तासी दत्तदरुशनें । ओढिला प्रेमबळें बेचाळिसीं ॥९३॥ स्वामी पांडुरंगाश्रम झाले क्षीण । शिष्य - स्वीकारा प्रार्थिती जन । सद्गुरु हणनी न करूं आपण । ही कथा त्रेचाळिसाव्यांत ॥९४॥ चव्वेचाळिसांत सद्गुरुस्वामींसी । दृष्टांत होतां पाचारूनी जनांसी । शिष्यस्वीकार - सिद्धता करा वेगेंसी । ऐसें प्रेमें आज्ञापिलें ॥१५॥ शिष्य-स्वीकार केला त्वरें । आनंदाश्रम नाम ठेविलें बरें । पांडुरंगाश्रमस्वामी - गुरुवरें । घेतली समाधि पंचेचाळिसीं ॥९६॥ जगीं स्वधर्म रक्षायाकारण । अवतार घेई रमारमण । हीच कथा सुलक्षण । शेचाळिसीं कथियेली ॥९७॥ सत्तेचाळीस अध्यायामाजीं । जगीं अवतरले भक्तकाजीं । आनंदाश्रम नाम हें सहजीं । घेऊनि लीला दावियली ॥९८॥बहुत श्रमें विद्याभ्यास । केला संस्कृतादि भाषांचा बहुवस । स्वामी - आनंदाश्रमें निश्र्चयास । धरूनि, हे कथा अठ्ठेचाळिससीं ॥९९॥ एकांतवास करावा म्हणोन । जाती स्वामी ग्राम सोडोन । प्रार्थुनी आणिती भक्तजन । हेंचि वर्णन एकोणपन्नाशीं ॥१००॥ हरिद्वार हर्षीकेशादि क्षेत्र - । यात्रा करिती परम पवित्र । कृष्णाचार्य - स्वामींकडोनि स्वतंत्र । केलें श्रवण पन्नासांत ॥१०१॥ गुलवाडी अंबाबाईसी भले । पांडुरंगाश्रम - आनंदाश्रम स्वप्नीं भेटले । एकरूपचि आपण ऐसें दाविलें । महिमान आपुलें एकावन्नीं ॥१०२॥ तोंबत बंधुद्वय यांना । अनुताप झाला ऐकतां प्रवचना । शरण गेले सद्गुरुचरणा । ही कथा बावन्नांत ॥१०३॥ नारायण शुद्र एक भक्त । खटल्यांतुनी केला मुक्त । आणि सुब्राय भटजी यांप्रत । भक्ति उपजली त्रेपन्नीं ॥१०४॥ मठ स्वामी आमुच्यास्तव । म्हणोनि वर्गणी द्यात्री जनांनीं सर्व । हेंचि कथिलें अपूर्व । चौपन्नाव्या अध्यायीं ॥१०५॥ आमुचे सद्गुरु शिवानंदतीर्थ । यांचे वर्णिले सद्गुण किंचित । अवतरले ते साक्षात् दत्त । ऐसी कथा पंचावन्नीं ॥१०६॥ नऊ आश्रमांसी केलें नमन । साधन - सप्ताहसमयीं रक्षिले जन । आणि भटजींचें केलें वर्णन । छप्पन्नाच्या अध्यायीं ॥१०७॥ माझी माता सौभाग्यें निवर्तली । स्वामींच्या आशीर्वादें भली । आणिक सकल अध्यायांचे सार समूळीं । सत्तावन्नीं काढिलें ॥१०८॥ असो आतां ऐसें हें चरित्र । प्रेमळ समूळ परम पवित्र । ऐकतां पढतां जन समग्र । इच्छित पावतील निश्चयें ॥१०९॥ करितां सप्ताह याचा खचित । सकलाभीष्टें लाधतील त्वरित । करितां पारायण दिन नित्य । दारिद्र्य फिटेल त्यांचें ॥११०॥ स्त्रिया मुलें आणि शुद्र । सकलांसी असे याचा अधिकार । गुरुभक्तीच असे पवित्र । करावें पठन प्रेमानें ॥१११॥ जरी असे भक्तिहीन । तरी पढतां होय तो पावन । भक्ति उपजे नको अनुमान । अमावा निश्र्चय दृढतर तो ॥११२॥ शिरालीग्रामीं मठामाझारीं । सप्ताह करावा प्रेमें निर्धारीं । तेणें अभिकचि पुण्य पदरीं । पडेल निश्चयें जाणा हो ॥११३॥ मठासी जावया न होय अनुकूल । त्यानें जेथें असे आपुलें स्थल । तेंथेचि स्मरूनि गुरुपदकमल । करितां सप्ताह पुण्य मिळे ॥११४॥ सप्ताह करणें कवणे रीतीं । हेंचि कथितों धरावें चित्तीं । त्यापरी करावें निश्र्चितीं । प्रेमपूर्वक श्रोते हो ॥११५॥ प्रथम दिवशीं अध्याय आठ । सतरा वाचावे द्वितीय दिवशीं नीट । सत्तावीस अध्यायपर्यंत । तृतीय दिनीं वाचावे ॥११६॥ छत्तीस वाचावे चतुर्थ दिवशीं । पांचवे दिनीं चव्वेचाळ परियेसीं । एकावन्न अध्याय निश्र्चयेंसीं । वाचावे सहाव्या दिवशीं हो ॥११७॥ सत्तावन्न अध्याय आतां । सातव्या दिनी प्रेमानें वाचितां । सप्ताह संपूर्ण होय तत्त्वतां । गुरुपरंपरारित्राचा ॥१०८॥ असो आतां आणिक काय । नाहीं उरला पहा संशय । एवं हें ऐकतां पठतां होय । समाधान चित्तासी ॥११९॥ न धरोनि कामना पढे जो नर । त्यामी फल मिळेल पैं सत्वर । निष्कामिकांसी आत्मज्ञान शीघ्र । होईल विश्वासें पढतां पैं ॥१२०॥ यामाजीं नका धरूं संशय । कीं पुण्यप्राप्ति कासयानें होय । तरी ऐका धरा निश्र्चय । सद्गुरूचि हो पुण्यपुरुष ॥१२१॥ सद्गुरु - गुणगान ऐकतां पाप । नासुनी पुण्यचि उरे अमूप । कैसें तें कळे आपोआप । विचार करितां आपणासी ॥१२२॥ तरी आतां बोलूं किंचित । की सद्गुरुंचे गुण ऐकतां अद्भुत । त्याचेंच मनन होय सतत । तेव्हां आनंदे मन आपुलें ॥१२३॥ तैसेंचि मन हें परम शुद्ध । होऊनि संसारीं न वाटे खेद । खेद सुटतां जाय भेद । मग परम शांति चित्तासी ॥१२४॥ संसारी जनांसी जेथें भेद । तेथेंचि मनासी होय खेद । खेद हाचि किल्मिष प्रसिद्ध । मनासी जाणा निश्र्चयें ॥१२५॥ तेणेंचि अन्यांचे दोष अखंड । दिसती मनासी ते प्रचंड । यामाजींच आयुष्य उदंड । व्यर्थ जातसे पहा हो ॥१२६॥ एवं अन्यांचें दोष पाहणें । हेंचि एक पाप मनानें । माथी घेतलें अहंपणें । चरित्र ऐकतां तें जाय ॥१२७॥ पाप जातां पुण्योदय होत । तेव्हां चित्तशुद्धि होय त्वरित । चित्तशुद्धि होतां निश्चित । ब्रह्मज्ञान पावतसे ॥१२८॥ एवं करितां चरित्रपठण । सात्त्विक वृत्ति होय जाण । हेंचि एक समजावें पुण्य । त्याहूनि अन्य नाहीं हो ॥१२९॥ अमो एवं चरित्रकथन । करविलें गुरुरायें मजकडोन । त्यांनींच पार घातलें जाण । नाहीं संशय यामाजीं ॥१३०॥ मीं नाहीं रचिला ग्रंथ । गुरुनाथें मजला करूनि निमित्त । वदविलें मजकडुनी समस्त । सत्य सत्य त्रिवाचा ॥१३१॥पहा कैसें ते सांगूं आतां । प्रारंभ करोनि या ग्रंथा । चार वर्षें झालीं तत्त्वतां । झाला समाप्त या वर्षीं ॥१३२॥ मी बळेंचि बैसें लिहायासी । तरी कांहीं न स्फुरे मम चित्तासी । सद्गुरुकृपेवांचूनि कैसी । कृति होय ही सांगा हो ॥१३३॥ कांहीं वेळां सहजचि स्फुरे । आपैसे अध्याय होती बरे । अणुमात्र सायास न करितां त्वरें । कार्य होऊं लागे पैं ॥१३४॥तात्पर्य ग्रंथा लागला जो उशीर । तो गुरुइच्छेपरीच साचार । त्यांनींच रचिला ग्रंथ सविस्तर । निमित्त करोनि मजलागीं ॥१३५॥ मज नाहीं विद्या कवणही । बुद्धि चातुर्य अणुमात्र पाहीं । म्हणोनि लिहिले त्यांनींच लवलाहीं । नाहीं संशय यामाजी ॥१३६॥ म्हणोनि आमुचे सद्गुरुदेव । तेचि कर्ते करविते सर्व । वदनीं वदतां त्यांचें नांव । तुटे बंधन हें सारें ॥१३७॥ म्हणोनि ऐसा हा ग्रंथ प्रेमळ । पठण करितां नासे तळमळ । अभीष्ट प्राप्त होय सकळ । निःसंशय जाणा हो ॥१३८॥सकामाची कामना होय पूर्ण । निष्काम पावे आत्मज्ञान । ऐसे आमुचे स्वामी कृपाघन । महिमा अगणित त्यांची पैं ॥१३९॥ दुर्जन हीन दीन अभक्त । ऐकतां वाचितां तरती समस्त । इतुकी महिमा त्यांची निश्चित । वर्णितां न पुरे मेदिनी ॥१४०॥ धरोनि दृढतर विश्वास चरणीं । मूर्ति धरावी अंतःकरणीं । लावावी तनु - मन - वाणी । त्यांच्या भजनीं रात्रंदिन ॥१४९॥ तेव्हां तोचि घालील पार । घालावा विश्वासें त्यावरी भार । करणें नलगे आणिक विचार । गुरुभक्तिवीण अन्य जनां ॥१४२॥असो आतां सकल आश्रमांसी । नमितों घेऊनि आपुल्या नामासी । आणि माझ्या सद्गुरुनाथासी । नमितों आतां सद्भावें ॥१४३॥ तेवींच माझी कुलदेवी । शांतादुर्गा परम लाघवी । तिजला वंदन करितो शमवीं । माझिया चित्ता करुणाळे ॥१४४॥ शके अठराशें अडसष्ट । व्ययनाम संवत्सर उत्कृष्ट । चैत्र शुद्ध रामनवमी श्रेष्ठ । बुधवारी ग्रंथ केला संपूर्ण ॥१४५॥ परमहंम - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ साक्षात् परब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें सप्तपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१४६॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपगरित्र सुंदर । ऐकतां मोक्षचि लाभे साचार । सप्तपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१४७॥ अध्याय ॥५७॥ ओंव्या १४७ ॥ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ इति सप्तपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 23, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP