जय जय गुरुदेव समर्थ !
"ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥"
हे ज्ञानेश्वरमाउलीचे उद्गार ज्ञानेश्वरीविषयींचे आहेत; पण हेंच विधान प्रस्तुत गुरुचरित्राला अधिक प्रमाणानें लागू पढतें. निःसंशय हें चरित्र म्हणजे गुरुकृपेचें वैभव होय.
केवळ ऐतिहासिक गोष्टींखेरीज, इतर ठिकाणीं उल्लेखित व अनुल्लेखित चमत्कार, व आत्मसाक्षात्काराच्या पथावर सुंदर सुबोध भाणि संशयनिरसन करणारीं सयुक्तिक प्रश्नोत्तरें सुद्धां ह्या चरित्रांत विलसत आहेत.
प्राचीन कालीन दप्तर नग्निनारायणाच्या आहुतींत पडलें. सुव्यवस्थित समकालीन लेख बहुतेक उपलब्ध नाहींत. परंतु प्रयत्नपूर्वक संशोधन केल्यास, मौलिक सत्य गोष्टी प्रकाशांत येतील.
चमत्कार हे श्रद्धा बिंबविण्यास उपयुक्त होत; पण याशिवाय ते फारसे महत्त्वाचे नाहींत. खरोखर पाहूं गेलें तर, अनेक अप्रकट अद्भुत गोष्टी विद्यमान व्यक्तींना ज्ञात आाहेत. त्यांनीं कृपा करून प्रकाशकाकडे लिहून पाठविल्यास, द्वितीयावृत्तींत त्यांचा समावेश होईल.
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
शैली सरळ व सहज, दृष्टांत समर्पक व साधे. समजण्यास कठीण असा भाग जवळ जवळ मुळींच नाहीं. परंतु हें चरित्र असें नाहीं कीं, एकदां वाचून बाजूला ठेवून दिले. त्याचें नित्य वाचन व मनन झालें पाहिजे; शिकवणूक आचरणांतही आली पाहिजे. चरित्र सर्वांचा निधि आहे, आाणि सर्वांचें कल्याण करील.
५७ अध्यायांत एकूण ६६१३ ओंव्या आहेत. सर्वांत दीर्घतम ४५ वा अध्याय; त्यांत २२२ ओंव्या आहेत. सर्वांत लघुतम १६ वा अध्याय; त्यांत ७९ ओंव्या आहेत. सरासरी एका अध्यायास ११६ ओंव्या आहेत. एका मिनिटांत सहजपणे ५ ओंव्या वाचणें शक्य आहे. प्रतिदिनीं एक अध्याय वाचण्यास सरासरी २३ मिनिटांहून अधिक वेळ लागू नये.
सप्ताहपद्धति ५७ व्या अध्यायांत दिली आहे:
दिवस अध्याय
१ ला -- १-८
२ रा -- ९-१७
३ रा - १८-२७
४ था - २८-३६
५ वा - ३७-४४
६ वा - ४५-५१
७ वा - ५२-५७
एका आठवड्यांत रोज साधारण ३ तास वाचून एक सप्ताह करितां येईल.
रोज एका अध्यायाचे वाचन कोणालाही कठीण होऊं नये. व्यवहारांत व्यग्र असणाऱ्या व्यक्तींना देखील सप्ताह सुटीच्या दिवसांत अशक्य वाटूं नये. वेळ नाहीं ही सबब निरर्थक होय. इच्छा असली तर मार्ग मिळतो. देवासाठीं वेळ नाहीं म्हणणें सोपें. पण आमच्यासाठीं देवाला वेळ नसला तर? पुढचा श्वास घेतां येणार नाहीं; पुढचे पाऊल टाकतां येणार नाहीं.
आमच्या वारसाची किंमत आम्हांला कळत नाहीं. मठ हा दिसतो त्याहून फार फार महान् आहे. गुरुपरंपरा तर कल्पनातीत महत्वाची बाहे. अर्जुन श्रीकृष्णाचा जिवलग मित्र होता; पण श्रीकृष्णाच्या खऱ्या महत्वाचा साक्षात्कार त्यास केव्हां झाला? विश्वरूपदर्शन झाल्यानंतरच. आणि त्याला विश्वरूपदर्शन केव्हां झालें ? भगवंतानें त्यास दिव्यचक्षु दिल्यावरच. हें चरित्र डोळयांत अंजन घालणारें जाई. त्यांचा लक्षपूर्वक अभ्यास केला तर, मठ व गुरुपरंपरा यांवियीं चकित करणारा प्रकाश पडेल.
देवाची भक्ति, मठाबद्दल आदर, गुरुमाउलीविषयीं पूज्यभाव, गुरुसेवावत्परता हे आमचे मूलमंत्र असले पाहिजेत. जेथें हे गुण नाहींत, तेथें चरित्राच्या अभ्यासानें ते उत्पन्न होतील; जेथें आहेत, तेथें वृद्धि होऊन दृढच राहतील; पाषाणहृदयालाही पाझर फुटेल.
प्रस्तावना १६
चरित्राच्या आरंभीं विषयानुक्रमणिका जोडली जाहे. शक्यतोंवर मूळांतले शब्दच उपयोगांत आणिलेले आहेत. म्हणून सहज विहंगमावलोकन होईल. विशेषतः चरित्रांत सोडविण्यांत आलेल्या १०२ प्रश्नसंशयादिकांची यादी दिली आहे.
पण अजून एक प्रश्न विचारितां येईल. जर गुरु देवश्च तर महासभा व स्थायीसमितीची आवश्यकता काय ? आम्हांला आवडो अगर नावडो, हे दिवस लोकसत्ता व सरकारी नियंत्रणाचे आहेत. व्यवहारांत कांहीं उपचार पाळावे लागतात. श्रीकृष्णानें कौरवसेनेचा निःपात क्षणांत केला असता; पण तसें केलें नाहीं. त्यानें साधनांचा उपयोग केला. "मयेवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥" अर्जुन स्वतः एक निमित्तच होता. महासभा व स्थायीसमिती देखील निमित्तमात्र. "यो बुद्धेः परतस्तु सः" हें जाणून आपले कर्तव्य पार पाडीत असतात; आपलें विचार विनयानें गुरुमाउलीपुढें मांडतात; गुर्वाज्ञा संतोषानें पाळितात. १९३२ सालापासून असेंच चालत आलें आहे. आणि पुढेंही असेंच चालू राहील ह्याबद्दल मला संशय वाटत नाहीं.
गुरुमाउली कार्ये करून घेते. ती योग्य वेळीं योग्य निमित्तांची निवड करिते. गेल्या २२ वर्षाच्या इतिहासावरून हें सिद्ध होतें. या चरित्राचें चरित्रही एक नवीन दृष्टांत. लेखिका, संशोधक, प्रकाशक, मुद्रक इत्यादि हे सर्व निमित्तमात्र, त्यांनी गुरुमाउलीचे आशीर्वाद सहज मिळविले आहेत, आणि ते सर्वांच्या हार्दिक कृतज्ञतेला पात्र आहेत.
शेवटीं खालील प्रार्थना करून ही विनंती संपवितों.
गुरुमठु आमुची आई । असो आचंद्रार्क स्थायी ॥१॥
गुरु जीवींचा जीवनु । तोचि नंदाचा नंदनु ॥ध्रु०॥
बरें स्वधर्मराज्य करी । चिरकाल नांदो भारी ॥२॥
वदनीं सदा गुरुनाम । हृदयीं वसो गुरुप्रेम ॥३॥
दास म्हणे सद्गुरुदेवा । सतत करवीं आपुली सेवा ॥४॥
गुरुप्रतिपदा, जय सं.
दि० ७-२-१९५५
गुरुचरणरज,
शंकर