मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥३८॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३८॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥३८॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगा श्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जया जी सद्गुरुदेवा। म्यां कांहीं न केली मेवा। परी न धिक्कारिलें मज तुवां । उपकार कैसा फेडावा ॥१॥ अन्य कवणाचाही उपकार । फेडाया होय साचार । परी सद्गुरूचा उपकार थोर । न होय फेडाया कवणाही ॥२॥ धन्य धन्य सद्गुरुराया । तब कृपेची पडतां छाया । काय उणीवता निजदासा या । भक्तवत्सला कृपाघना ॥३॥ मज नसतां प्रेमभक्ति । तूंचि करोनि निष्काम प्रीति । ओढूनि घेतलें मन माझें निश्र्चितीं । आपुल्या चरणीं बा देवा ॥४॥ आतां नच जाय कदापि मन्मन । सोडोनियां हे तुझे चरण । बळेंचि ओढितांही जाण । तरीही न येई सोडोनि ॥५॥ अहा काय मोहक शक्ति । कैशी ओढिते लगबगें ती । म्हणोनि देवा तुझी प्रीति । खरी याचिकारणें ॥६॥ म्हणोनि देवा न मांगें कांहीं । तुझे प्रेम एकचि देईं । त्याचीण सारें नश्वर पाहीं । देवा गुरुराया कृपाघना ॥७॥ असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । पांडुरंगाश्रमस्वामी सघन । यांचे वाक्यचि श्रेष्ठ असे ॥८॥ मंगेशभट यांच्या मुलीसी । ज्वरमुक्त करोनि परियेसीं । वांचविली महिमा ऐसी । कथिली हेचि सुरस कथा ॥९॥ आतां आणिक सांगूं महिमा । नाहीं निश्चयें त्यासी सीमा । ऐकतां सहज उपजेल प्रेमा । भाविक सज्जन श्रोत्यांसी ॥१०॥ असो आतां ऐका सादर । श्रीपांडुरंगाश्रम गुरुवर । साक्षात् दत्ताचा अवतार । नाहीं संशय यामाजीं ॥११॥ पहा आणिक सांगूं कथा । स्वामींची अद्भुत शक्ति आतां । ठेवावें येथेंचि आपुल्या चित्ता । स्थिर करोनि गुरुचरणीं ॥१२॥ दक्षिणदेशीं कुंदापुर । या नामें असे एक नगर । तेथें होता सावकार । कामत उपनाम तयाचें ॥१३॥ तो करी व्यापार थोर । तेव्हां ओढवलें संकट दुस्तर । खटला झाला तयावर । काय करणें तें ऐका ॥१४॥ सरकारासी नकळत । मीठ बनवोनि तो विकीत । ऐसा आरोप दुर्जन घालीत । सावकार कामत याजवरी ॥१५॥ आणि खटला केला त्याजवरी । मॅजिस्ट्रेट याकडे सत्वरी । पोटीं धरोनि मत्सर भारी । जनांनीं झडकरी त्या समयीं ॥१६॥ होता ख्रिश्चन मॅजिस्ट्रेट । त्याकडे खटला नेला थेट । विचार त्यानें केला नीट । कायद्याची दृष्टि धरूनि ॥१७॥ मुख्य ठराव सांगणें एक । तो सांगूं जाणा उदयीक । ऐसें बोलिला मॅजिस्ट्रेट देख । आरोपियातें परियेसा ॥१८॥ बोलुनी तो गेला गृहासी । कामतही आपुल्या सदनासी । होऊनि चिंतातुर मानसीं । विचार करीत बैसला ॥१९॥ उदयीक सारा ठराव होय । शिक्षा ठरविती कीं काय। आतां कोण मजला अभय । द्यावया समर्थ या जगतीं ॥२०॥ ऐशी चिंता करीत मानसीं । बैसला असतां त्या समयासी । त्याचा मित्र सारस्वत त्यासी । अवचित येऊनि त्या बोले ॥२१॥ अहो भिऊं नको सर्वथा । सोडीं निश्चयें सर्वही चिंता । आमुचे स्वामी येती आतां । तेचि हरतील संकट हो ॥२२॥ चित्रापुर - स्वामी पांडुरंगाश्रम । ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ परम । आमुचे सारस्वतांचे गुरुजी उत्तम । दत्तावतार म्हणती तयां ॥२३॥ उदयीकचि येती येथें । त्यांच्या भेटीसी नेऊं तूंतें । शरण जाऊनि त्यां, चरणांतें । करीं साष्टांग प्रणिपात ॥२४॥ त्यांसी जातां दृढभावें शरण । ते रक्षितील तुजलागोन । यामाजीं नको अनुमान । धरूं तूं बा लवलाहीं ॥२५॥ यावरी कामत याचें हृदय । शांत झालें ऐकुनी अभय । म्हणे तूं मजला ये समय । बरवा पोंचलास धैर्याला ॥२६॥ जाऊं आम्ही तये स्थानीं । पूर्वसुकृत उगवलें म्हणुनी । ऐशा संकटीं येती धांवुनी । ऐसें मजला वाटतें ॥२७॥ व्याधीनें पीडितां बहुत । चालुनी आला वैद्य अवचित । तेसे तुमचे सद्गुरुनाथ । येती संकटी रक्षाया ॥२८॥ दरिद्री भुकेनें झाला व्याकुळ । पाचारुनी अन्न घालिती ते वेळ । तैसे आपुले स्वामी दयाळ । आले मजला रक्षावया ॥२९॥ असो बहुत कासया बोलावें । उदयीक तुवां सत्वर यावें । स्वामि - दर्शना मजला न्यावें । उपकार तुझे होतील बा ॥३०॥ यावरी बोले त्याचा मित्र । येतों निश्चयें सरतां रात्र । ऐसें बोलत असतां भरले नेत्र । त्या मित्राचे प्रेमानें ॥३१॥ तो म्हणे कामता तुजला । संशय न यावा कीं मी आपुला । जातीचा नव्हे म्हणोनि मजला । स्वामी पोंचती कीं नाहीं ॥३२॥ ऐसें अनुमान सोडीं सकल । स्वामी मनुष्य नव्हे दयाळ । देवचि, त्यांचा भेद समूळ । नासूनि गेला आधींच ॥३३॥ ते न बघती याती कुळ । भाव ज्याचा असे निश्चळ । त्याचा करिती सांभाळ । सांगावें नलगे त्यांलागीं ॥३४॥ इतुकें बोलुनी मित्र सारस्वत । गेला, तो दुज्या दिनीं त्वरित । आला कामताच्या सदनाप्रत । जावया दरुशना स्वामींच्या ॥३५॥ मग दोघे मित्र मिळोनि । गेले भेटाया स्वामींलागोनि । येत होते ते जेथोनि । तेथें गेले सामोरे ॥३६॥ मार्गीं तिष्ठत बैसला कामत । तोंच आली पालखी तेथ । तेव्हां घातला साष्टांग प्रणिपात । मार्गींच तेणें प्रेमानें ॥३७॥ मार्गीं पालथा पडला पायां । तो न उठेचि तेथोनियां । प्रेमाश्रु लोटले कांपे काया । भयभक्तीनें ते समयीं ॥३८॥ बघुनी लोकीं त्यासी उठवुनी । पालखीजवळी गेले घेउनी । वंदन केलें चरणांलागुनी । कामत - सावकारें त्या समयीं ॥३९॥ तो म्हणे कर जोडोनि । प्रभो स्वामिन् तुजवांचोनि । रक्षिता नसे आन त्रिभुवनीं । म्हणोनि आलों शरण तुला ॥४०॥ मजवरी झाला असे खटला । आजिचा दिन हा शेवटला । शिक्षाचि होईल ये वेळां । ऐसें मजला वाटतसे ॥४१॥ ऐसा अपमान करोनि सहन । जगण्याहुनी बरवें मरण । म्हणोनि आलों वंदावया चरण । अंतकाळीं हे आपुले ॥४२॥ अंतकाळीं सद्गुरु - भेट । त्याहुनी आणिक नाहीं श्रेष्ठ । माझें मन हैं झालें भ्रमिष्ट । तव पदकमलीं स्थिर करीं ॥४३॥ आणिक कांहीं मागणें नाहीं । हीचि प्रार्थना या तव पायीं । भक्तवत्सल तूं गुरुमाई । परम कृपाळू दयाघन ॥४४॥ पहा कैसा प्रेमळ भक्त । चुकवी अपकीर्ति नाहीं बोलत। त्यासी वाटे श्रीगुरूप्रत । ऐसें मागणें उचित नव्हे ॥४५॥ त्यांसी घालूं नये भीड । आमुच्या सुखदुःखाची धडपड । बोलणे व्यर्थ बडबड । ते जाणती सारें मन आमुचें ॥४६॥ मातेसी सांगावें नलगे बालकें । सहजचि जतन करी कौतुकें । तिच्या हस्तीं असे जें निकें । तें देउनी लाड पुरवी ती ॥४७॥ परी जें नसे तिचे हातीं । तें कोडुनि कैसें देईल ती । रडतांही बाळ आक्रोशे अति । न शके ती द्यावया ॥४८॥हट्ट केला त्यानें अति । मारी सक्रोधें तयाप्रति । आणि म्हणे माझिया हस्तीं । नसतां काय तुज देऊं ॥४९॥ तद्वत् सद्गुरु स्वामीनाथ । यांसी कळतसे भक्त - हेत । परी प्रारब्ध चुकवाया नच होत । कवणासीही निश्चयें ॥५०॥ जें असे सद्गुरु - हस्तीं । भाविकां भजतां प्रेमें देती । मागावें न लगे तयांप्रती । आपणचि देती संतोषें ॥५१॥ यावरी येईल सहज प्रश्न । जरी प्रारब्धें मिळे जाण । तरी गुरुकृपा काय कारण । सहजचि मिळे तें त्यासी ॥५२॥ तरी ऐका सावध चित्तें । कीं ग्रह फिरतां संकट येतें । त्यासी गुरुकृपा झालिया अवचितें । परिहार होय त्याचा पैं ॥५३॥ सारें जगचि त्यांच्या हातीं । तेव्हां ग्रहांसी यावया छाती । सद्गुरुसन्मुख कैशा रीतीं । होईल सांगा तुम्ही हो ॥५४॥ मातेपरी त्यांच्या हस्तीं । जें असे तेंचि देती । ईश्वरें प्रारब्ध रचिलें त्याप्रती । न करिती ते प्रतिबंध ॥५५॥ प्रारब्ध चुकवावयासी । कवणाही न होय परियेसीं । न चुके प्रारब्ध ज्ञानियांसी । चुकवील कैसा तो अन्याचें ॥५६॥ रामकृष्णादि अवतार । त्यांसही प्रारब्ध - भोग थोर । चुकले नाहींत साचार । एवं कवणाही न चुके प्रारब्ध ॥५७॥ आजवरी ऐसेच ब्रह्मज्ञानी । होऊनि गेले अनेक धरणीं । न घेतलें प्रारब्ध चुकवोनि । कधींकाळीं कवणेंही ॥५८॥ ग्रहबाधें कांहीं येती संकष्टें । सद्गुरुकृपें ती पळती नेटें । परी प्रारब्ध हें न सुटे । सद्गुरुकृपा असतांही ॥५९॥ ईश्वर - इच्छेच्यावरी आपण । सद्गुरुस्वामी कृपाघन । न करी अन्य मत - स्थापन । कदापिही निश्र्चयेंसीं ॥६०॥ ग्रहबाधें जी येती संकष्टें । तीं तोडिती आपुल्या कृपेनें नेटें । ऐसें सद्गुरुनाथ मोठे । अगाध महिमा त्यांची पैं ॥६१॥ कालमृत्यु हा प्रारब्धाचा । अपमृत्यु हा ग्रहबाधेचा । म्हणोनि कालमृत्यु कवणाचा । न चुके कदापि हो जाणा ॥६२॥ अपमृत्यु हा सद्गुरुकृपेनें । चुकतो जाणा निश्र्चयानें । तैशींच संकटें येती जीं ग्रहबाधेनें । गुरुकृपेनें तीं चुकती ॥६३॥ यावरी आतां येईल प्रश्न । सद्गुरु हा ईश्वर असतां जाण । त्यावरी आणिक ईश्वर कवण । प्रारब्ध - रचिता तो ॥६४॥ तरी ऐका याचें उत्तर । ईश्वर म्हणिजे नव्हे साकार । साकार ईश्वर परतंत्र साचार । प्रारब्धें भोगे तो सुखदुःख ॥६५॥ तरी श्रोते ऐका हा प्रकार । सांगूं कोण असे तो ईश्वर । परी क्षमा करा मजला सत्वर । वृथाचि वटवटतो म्हणूं नका ॥६६॥ परब्रह्म जें निर्विकार । त्याचें मायेंत प्रतिबिंब साचार । तयासीच म्हणती ईश्वर । त्याच्यानि प्रेरणें प्रारब्ध हें ॥६७॥ बुद्धीमाजीं जें प्रतिबिंब पडे । तेणें तें ब्रह्मचि जीव रोकडें । प्रारब्धापरी सुखदुःख उघडें । भोगी 'मी कर्ता' म्हणोनि तो ॥६८॥ मायेमाजीं पडे प्रतिबिंब । म्हणोनि तो ईश्वर नियंता स्वयंभ । तेणें प्रेरणा करितां आरंभ । होय सर्वही कार्यासी ॥६९॥ त्याचेवरी ब्रह्मज्ञानी आपुली । थोरवी न दाविती भूतळीं यावरी संशय धरूं नये ये वेळीं । ज्ञानी असमर्थ म्हणोनियां ॥७०॥ समर्थचि असे तो निश्र्चित । तोचि ईश्वर असे प्रख्यात । असाध्य कैंचें असे त्याप्रत । परी हानी न करी प्रारब्धाची ॥७१॥ काय कारणें तें ऐका । त्यांचा अवतार कायसा तो निका । जगदोद्धारासाठींच देखा । नव्हे भुलवाया जनांसी ॥७२॥ जरी प्रारब्ध चुकवील आपण । तरी सर्वही धरितील चरण । उसंतचि न मिळे त्यालागोन । क्षणभरीही जाणा निश्चयें ॥७३॥ मग कैंचा जगदोद्धार । एकमेकां वधितील नर । पापाचें भय सारें दूर । पळोनि जाय निर्धारें ॥७४॥ नाना पायें करोनि जगतीं । प्रार्थितील श्रीसद्गुरुप्रती । आणिक म्हणतील चित्तीं । गुरुकृपें भय ना आम्हांसी ॥७५॥ यापरी होईल म्हणोनी । प्रारब्ध न चुकविती ते अवनीं । जो भजे निष्काम चरणीं । त्यासीच उद्धरिती कनवाळू ॥७६॥ म्हणोनि सद्गुरुस्वामी सदय । ज्याचा असे प्रारब्ध - उदय । त्याचें संकष्ट करिती चिन्मय । कृपाप्रसादें आपुलिया ॥७७॥ आणिक जे निष्काम मुमुक्षु । त्यांचा तोडिती भवपाशु । दाविती आनंद निर्विशेषु । करिती उद्धार तयांचा ॥७८॥ निष्कामा बघतां अनिवार । सद्गुरूच्या प्रेमासी येई पूर । सकामांचाही अंगीकार । करुनि उद्धरिती युक्तीनें ॥७९॥ एवं सद्गुरुस्वामींचा अवतार । जगाच्या कल्याणा असे साचार । देह झिजविती निरंतर । परोपकारास्तव जाणा ॥८०॥ म्हणोनि प्रारब्ध चुकविणें हातीं । सत्पुरुष कदापि न घेती । निजकृपेनें ग्रहबाधा चुकविती । पापें जाळोनि अवलीळें ॥८१॥ असो तो सावकार कामत । याचिकारणें नाहीं बोलत । कीं मज संकटीं रक्षो गुरुनाथ । ऐसें न मागे तो जाणा ॥८२॥ म्हणे देवा सद्गुरुराया । पार करीं निजदासा या । अज्ञ बालक असें यी सदया । न कळें कांहीं मजलागीं ॥८३॥ ऐकूनि कामत यांचे वचन । झालें सद्गद अंतःकरण । दया उपजली स्वामींलागुन । तेव्हां बोलती प्रेमानें ॥८४॥ भिऊं नको तूं बा सर्वथा । भवानीशंकर हरी चिंता । तोचि रक्षील तुजला आतां । संकटांतुनी निश्र्चयेंसी ॥८५॥ येई मध्यान्हीं आमुच्या स्थानीं । महापूजा पार्टी नयनीं । प्रस्तुत प्रसाद घेईं हा झणीं । भवानीशंकर देवाचा ॥८६॥ तेव्हां प्रेमें घेतला प्रसाद । बांधिला उपरण्यामाजीं शुद्ध । वंदुनी श्रीसद्गुरूचे पाद । गेला कोर्टामाजीं तो ॥८७॥ काय ठराव झाला ऐसें । बघाया कोर्टासी गेला उल्हासें । तेव्हां आनंदा पार नसे । ऐका काय कैसें तें ॥८८॥ तो ख्रिश्र्चन मॅजिस्ट्रेट । गृहींच बैसलासे लिहीत । कागदपत्र सर्वही तेथ । पाही सारें तपासोनि ॥८९॥ कोर्टासी नाहीं येत ये दिनीं । ऐसी वार्ता पडली कर्णीं । आनंदें कामत निजमनीं । म्हणे मज सद्गुरु पावले ॥१०॥ महापूजे येई आजि । मध्यान्हींच्या समयामाजीं । ऐसें आज्ञापिती स्वामीजी । कृपा त्यांची मजवरी ॥११॥ म्हणोनि आजि कोर्टांतरीं । साहेब न आला ही गुरुकृपा खरी । पूजेसी जावया मजला बरी । सोय करोनि दिधली पैं ॥९२॥ मग जाऊनि सदनाप्रत । स्नान - संख्या उरकुनी त्वरित । गेला सद्गुरुसंनिधीं धांवत । महापुजेसी ते समयीं ॥९३॥ इकडे मैजिस्ट्रेट ख्रिश्र्चन । बैसला ठराव लिहायालागून । झाला सर्व रिपोर्ट लिहोन । मुख्य ठराव राहिला ॥९४॥ मुख्य ठराव लिहिण्या अवचित । न सुचे कांहींही त्याप्रत । घाबरला मानसीं बहुत । धडधडे छाती त्याची हो ॥१५॥बैसला तेव्हां क्षणभरी स्तब्ध । बोलवेना त्या एकही शब्द । पहा हो श्रोते स्वामींची प्रसिद्ध । महिमा कैसी अद्भुत ती ॥९६॥ मग आपुलें खाजवुनी डोकें । कारकुनाच्या जवळी निरखे । बोलूं लागे परम कौतुकें । काय झालें बा मजलागीं ॥९७॥ तेथें होता जो कारकून । तो चित्रापुर - सारस्वत ब्राह्मण । त्याजकडे बोले आपण । मॅजिस्ट्रेट प्रेमानें ॥९८॥ म्हणे पुढें काय लिहावें आतां । हेंचि न सुचे माझिया चित्ता । आजवरी ऐसें न आलें तत्त्वतां । कांहीं न कळे मजलागीं ॥९९॥ इतुकें बोलुनी आपुली लेखणी । ठेविली धरणीवरी तत्क्षणीं । ध्यानस्थापरी बैसला ते स्थानीं । कारकून निरखोनि पाहे त्या ॥१००॥ कांहीं क्षण गेलिया । कारकून बोले ते अवसरीं । तुम्हीं कागदपत्रावरी । सारें कांहीं लिहिलें असे ॥१०१॥ अखेर एकत्रि ठराव उरला । ऐसें वाटतसे हो मजला । तितुकाचि एक लिहितां संपला । अधिक लिहिणें नुरलेंसे ॥१०२॥ यावरी तो साहेब बोले । तेंचि लिहाया कठिण झालें । इतुकें सुलभपणें लिहिलें । मुख्य तेंचि समजेना ॥१०३॥ आजचि ऐसें व्हावया कारण । काय असे तें सांग बा पूर्ण । कळत असे कां तुजलागोन । काय नवल हें बापा ॥१०४॥यावरी बोले कारकून । मज कैसें हें येईल कळून । परी एकचि कारण सांगूं शकेन । स्वामींची महिमा ही वाटे ॥१०५॥आजिचे दिनीं आरोपी कामत । भेटला आमुचे स्वामींप्रत । त्यांनीं दिधला आशीर्वाद निश्चित । याविणें नेणें मी कांहीं ॥१०६॥ यावरी बोले मॅजिस्ट्रेट । तुमचे स्वामीजी इतुके श्रेष्ठ । दाविती अद्भुत चमत्कार स्पष्ट । खरें बोलसी कां तूं हें ॥१०७॥तेव्हां बोले कारकून । सत्य समजा माझें वचन । काय सांगूं महिमान । वर्णितां न ये मजलागीं ॥१०८॥ आपुला क्राइस्ट होता जैसा । आमुचा सद्गुरुनाथही तैसा । साक्षात् परमेश्र्वरचि परियेसा । असत्य नव्हे कदापिही ॥१०९॥ तेचि आम्हां रक्षिती खास । ऐसा आमुच्या जनांसी विश्वास । आणिक काय सांगूं तुम्हांस । न वर्णवे आमुचेनी ॥११०॥ तेव्हां तो मॅजिस्ट्रेट स्वमनीं । विचार करिता झाला ते क्षणीं । नाना प्रकारे विचार करोनि । ठराव सिद्ध तेणें केला ॥१११॥ विचारांतीं काय ठरलें । ऐका आतां श्रोते ये वेळे । गुरुकृपाचि त्यावरी ओळे । नाहीं संशय यामाजीं ॥११२॥ परिसा आतां चित्त देऊन । काय सांगूं सद्गुरु-महिमान । कैसा उलटला साहेब पूर्ण । काय ठराव तो ऐका ॥११३॥ जेणें दिधली फिर्याद । तया साक्षी - पुरावे बहुविध । म्हणोनि आरोपीच शुद्ध । गुन्हेगार होत असे ॥११४॥ परी कोर्टांतरी जें आणिलें मीठ । आणि बाजार - मीठ तें स्पष्ट । एकचि दिसे परम उत्कृष्ट । नसे भेद त्यामाजीं ॥११५॥ यापरी आरोपी यानें मीठ । चोरुनी न केलें हें स्पष्ट । दिसे, म्हणोनि व्यर्थ वटवट । कासया आपणा पाहिजे ॥१०६॥ एवं गुन्हेगार नाहीं होत । कामत हा कदापि निश्चित । ऐसें ठरवोनि मी त्याप्रत । सोडितों निर्दोषी म्हणोनि ॥११७॥ ऐसा ठराव लिहोनि । गेला तो कोर्टालागोनि । बैसला होता कामतही येवोनि । गुरुस्मरण करीत ॥११८॥ ठराव वाचला सर्वांसमोर । निर्दोषी कामत सावकार । ऐसें सांगूनि सत्वर । सोडूनि दिधलें तयासी ॥११९॥ सद्गुरु - कृपेनेंचि माझी । सुटका झाली खचितचि आजि । ऐसें म्हणोनि मनामाजीं । कामत पावला आनंद ॥१२०॥मग तो गेला धांवत । श्रीस्वामींच्या मठाप्रत । भेट घ्यावयासी त्वरित । पांडुरंगाश्रमस्वामींची ॥१२१॥ वंदिले चरण प्रेमपूर्वक । निवेदिला वृत्तांत सकळिक । पादपूजादि करूनि सुरेख । तीर्थ घेतलें प्रेमानें ॥१२२॥ आणि म्हणे प्रभो गुरुराया । पडतां आपुल्या कृपेची छाया । काय उणीवता निजदासा या । भक्तवस्तला दयाळा ॥१२३॥ साक्षात् तूं विष्णूचा अवतार । मज नसे संशय अणुमात्र । न विसंवें मी तव उपकार । कदापिही निर्धारें ॥१२४॥तुझें नाम गातां सत्वर । येई अशक्तांसी धीर । महिमा तुझा अगाध थोर । न वर्णवे माझेनी ॥१२५॥ असो यापरी करितां स्तोत्र । भरले प्रेमाश्रृंनीं नेत्र । मग सद्गुरु परम पवित्र । फलमंत्राक्षता देनी तया ॥१२६॥ घेउनी गेला आपुल्या गृहास । भजे स्वामींसी रात्रंदिवस । ठेवूनि त्यांचे चरणीं विश्वास । सेवेसी तत्पर सर्वदा ॥१२७॥ स्वामी राहती शिराली - ग्रामीं । तरीही कामत त्यांची नेहमीं । मूर्ति धगेनि अंतर्यामीं । ध्यान करी प्रेमानें ॥१२८॥ कधीं कधीं जाय दरुशनासी । स्वामीही प्रेमानें बघती त्यासी । याती - कुळ नाहीं मानसीं । श्रीस्वामींच्या अणुमात्र ॥१२९॥ याती - कुळ न पाहे सद्गुरु । तो असे दयेचा सागरु । स्वधर्मापरी राहाटे हा निर्धारु । परी समदृष्टी त्यांची असे ॥१३०॥ आणिक बोलूं महिमा अपार । पुढील अध्यायीं सविस्तर । चित्त करोनि एकाग्र । ऐका तुम्ही भाविक हो ॥१३१॥ आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें अष्टत्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१३२॥स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंगचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । अष्टत्रिंशाध्याय रसाळ हा ॥१३३॥ अध्याय ३८ ॥ ओंव्या १३३ ॥ ॐ तत्सत् श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ इति अष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP