मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥६॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥६॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥६॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॐ जय जय सद्गुरो देवा सदया । करुणाकरा निजबाळासी या । पार घालीं कृपा करोनियां । भवसागरांतूनि पैं ॥१॥ तूंचि करविसी कार्य समस्त । ऐसा धरोनि चित्तीं भावार्थ । पुढें सरसावलों स्मरुनी तुजप्रत । तूंचि सफल करीं हें आतां ॥२॥ मातेवीण बालका आधार । कोणी नाहीं पृथ्वीवर । तैसा तूं मज सद्गुरु सुखकर । आधार सर्वांसी अससी पैं ॥३॥ आधार म्हणिजे अधिष्ठान । अससी तूंचि सकलां जाण । मग कैसा राहूं भिन्न । तुजहुनी देवा दयाळा ॥४॥ समुद्र लाटेसी होय अधिष्ठान । तेव्हां लाट कैसी होईल भिन्न । अलंकार सुवर्णाहून । न राहे वेगळा कदापि ॥५॥ तैसा देवा तुजवांचोन । नच मी कधींही राहें भिन्न । परी ना समजे मजलागोन । तूंचि दयाळा शिकवीं बा ॥६॥ असो आतां ऐका सज्जन । मागील अध्यायीं नगरासी जाण । धाडिलें पत्र सारस्वतांलागून । गोकर्णाहुनी प्रमुख जनीं ॥७॥ बघतां पत्र तेथील लोक । भक्तवृंद सारे प्रमुख । गोकर्णग्रामीं धांवुनी देख । आले लगबगें त्या ठायीं ॥८॥ भेट घेउनी सद्गुरु-स्वामींची । करिती प्रार्थना चरणीं साची । म्हणती दयाळा रहावें येथेंचि । म्हणोनि घातलें लोटांगण ॥९॥ आम्हां बालकां सोडुनी येथ । न जावें ऐसें प्रार्थितों तुजप्रत । कांहीं अपराध जरी होत । तरी करावी क्षमाचि बा ॥१०॥ जावया निघालां ऐसी वार्ता । ऐकुनी आलों चरणीं ताता । कृपा करोनि त्वां बा आतां । रहावें येथेंचि कृपानिधे ॥११॥ ऐकुनी सकल जनांची प्रार्थना । तोषला चित्तीं सद्गुरुराणा । आणि म्हणती न करा अनुमाना । निर्भय मानसीं असा हो ॥१२॥ तुमच्या भक्तीच्या दोरीनें आम्हांस । बांधिलें तें न सुटे खास । नका होऊं तुम्हीं उदास । राहूं आम्ही येथेंचि ॥१३॥ मातेसी न लगे सांगणें येथ । कीं बालकाचें रक्षण करीं तूं सतत । तैसें आपुल्या निजभक्तांप्रत । स्वयें गुरुनाथ सांभाळी ॥१४॥ जैसें भक्तांसी सद्गुरुप्रेम । तैसेचि निजभक्त सद्गुरूसी परम । प्रियकर असती ऐसा नेम । असे सहजचि निर्धारें ॥१५॥ निजभक्तांच्या प्रेमासाठीं । अवतार धरितो जगजेठी । मग आम्ही कैसे जाऊं उठाउठीं । सांगा पाहूं आतां पैं ॥१६॥ तुमच्याकरितांचि आमुचा अवतार । तेव्हां जाऊं कुठें भूवर । परी पाहिला निर्धार । भक्तजनांचा आम्हीं पैं ॥१७॥ आतां तुम्ही सुखानें शांत । रहा धरोनि नाम सतत । हृदयीं आठवा प्रभुवर समर्थ । भवानीशंकर तो पाहीं ॥१८॥ जें जें दिसतें तें तें सर्व । पहा सारा एकचि देव । ऐसा धरितां दृढभाव । पार करील तोचि पैं ॥१९॥ हातानें जें करितां काम । तें असावें शुद्ध उत्तम । तरी ती सेवा होय सुगम । परमेश्वराची पाहीं पां ॥२०॥ सर्वांठायीं भगवद्भाव । धरोनि करावा व्यवहार सर्व । तेव्हां होईल संतुष्ट देव । नसे संशय यामाजीं ॥२१॥ होतां संतुष्ट परमेश्वर । सहजचि होईल उद्धार । म्हणोनि धरा निरंतर । ध्यान त्या गुरुदेवाचें ॥२२॥ करितां ध्यान वारंवार । सारें जगचि दिसेल साचार । कीं भगवद्रूप खचितचि, निर्धार । धरा चित्तीं निजप्रेमें ॥२३॥ ऐसें तेव्हां ऐकतां वचन । श्रीसद्गुरूचें प्रेमळ भाषण । गुंगुनी गेले सकल सज्जन । प्रेमळ भक्त त्यावेळीं ॥२४॥ यावरी करोनि नमस्कार । निरोप घेऊनि सत्वर । गृहासी परतले नगराचे नर । धरोनि मानसीं गुरुमूर्ति ॥२५॥ यावरी करोनि सर्वीं विचार । सद्गुरु - आज्ञा घेउनी सत्वर । मठ बांधावया उत्तम सुंदर । केली सिद्धता त्या समयीं ॥२६॥ मग गेले नगरासी । संस्थानांतुनी बहुवसी । लांकुडें मठ बांधावयासी । राजाज्ञेनें मिळालीं ॥२७॥ मग बांधोनि सत्वर सुरेख । मठ तयार केला देख । आणि सद्गुरुस्वामींसन्मुख । प्रार्थना केली ती ऐका ॥२८॥ भवानीशंकर-देवासमवेत । येथेंचि राहावें आपण सतत । अवश्य म्हणुनी सद्गुरुनाथ । राहिले अत्यंत प्रेमानें ॥२९॥मग करिती तेथें भक्त । गुरुमुखें श्रवण परमार्थ । ऐसें असतां सुखानें शांत । गेलीं कांहीं वरुषें तीं ॥३०॥ एके दिनीं भक्त मिळोनि । प्रार्थिती संनिधीं येवोनि । शिष्यस्वीकार करावा झणीं । कृपा करोनि आम्हांवरी ॥३१॥ पुढें गुरुपरंपरा अनुदिनीं । चालावी शाश्वत ऐसीच धरणीं । जरी आज्ञा द्याल कृपा करोनी । तरी आम्ही प्रयत्न करूं ॥३२॥ पाहुनी जनांचें भक्तिप्रेम । आनंदलें स्वामींचें हृदय परम । म्हणती शिष्यस्वीकार करूं, प्रेम । धरा त्या ठायीं मीचि असें ॥३३॥ ऐकुनी तेव्हां आनंदले चित्तीं । भक्तजन ते कार्या लागती । कोणता शिष्य करावा निश्चितीं । ऐसा श्री विचार चालविला ॥३४॥ तेव्हां एक हरिटेकार । यांचा वंशज परम पवित्र । कृष्णय्या शं गु कुलकर्णी यांचा पुत्र । मर्तु याजला निवडिला ॥३५॥ अंगीं असती बहुत सद्गुण । क्षमा शांति वसे पूर्ण । आणि भक्तिप्रेम बहुत जाण । ऐसा पुत्र तो देखा ॥३६॥ म्हणूनि तोचि शिष्य पटासी । योग्य ऐसें वाटुनी सर्वांसी । विचारिते झाले कृष्णय्यासी । काय तें आतां अवधारा ॥३७॥ म्हणती तेव्हां दहा लोक । कृष्णय्या तुमचा पुत्र देख । शिष्यपटासी योग्य सुरेख । म्हणोनि आलों मागावया ॥३८॥ यावरी बोले कृष्णय्या कुलकर्णी । ‘‘एकुलता एक पुत्र सुलक्षणी । तस्मात् द्यावया अंतःकरणीं । खेद वाटतो बहुतचि ॥३९॥ म्हणोनि मागतों संनिधीपाशीं । क्षमा करावी मजला ऐसी । प्रार्थना करितों निजभावेंसीं" । ऐकतां खिन्न झाले जन ॥४०॥ मग बोलती एकमेकांजवळी । करावें काय आम्हीं या वेळीं । ऐसें सुपात्र कोणत्या स्थळीं । मिळेल कैसें कळेना ॥४१॥ यावरी सकलांनीं करोनि विचार । नगर-संस्थानीं जनांसी सविस्तर । कळविली वार्ता लिहोनि पत्र । धाडिलें झडकरी त्या समयीं ॥४२॥ बघतां पत्र नगरींच्या सुजनीं । उत्तर दिधलें गोकर्णालागुनी । दहा जणांसी न लागतां क्षणीं । युक्तिपूर्वक तेव्हां पैं ॥४३॥ " कृष्णय्यासी घालावी समजूत । कीं तुम्ही देतां आपुला सुत । मठाचें आधिपत्य तुमच्याप्रत । देऊं सर्व आम्ही हो ॥४४॥ आणिक यापुढें तुमचाचि वंशज । शिष्य निवडुनी आणूं सहज । ऐसें सांगतां तरीच काज । होईल सारें निश्चयें" ॥४५॥ ऐसें पत्र पोंचतां गोकर्णीं । विचारण्या कृष्णय्यालागुनी । गेले सकलही धांवोनी । अति उल्हासें लगबगें ॥४६॥ भेटूनियां कृष्णय्यासी । म्हणती सकलही सांगतों तुम्हांसी । जरी मान्य होईल तुम्हांसी । तरी अंगीकार करा हो ॥४७॥ तुमच्या पुत्राऐसा सगुणी । धुंडितां मिळेना साऱ्या स्वजनीं । आतां द्यावा तोचि म्हणोनि । सांगतों गोष्ट ऐका ती ॥४८॥ आधिपत्य देऊं मठाचें सकल । तुम्हांसीच खचितचि ये वेळ । पुढेंही तुमचाचि वंशज निर्मल । निवडूं शिष्यपट द्यावयासी ॥४९॥ यावरी म्हणे कृष्णय्या जनांसी । ऐसीच इच्छा जरी तुमच्या मानसीं । देऊं पुत्र, सर्व कबूल मजसी । ऐकुनी आनंदले सकलही ॥५०॥ तेव्हां धाडिती पत्र नगराप्रती । आपुले जन जेथें असती । मग ते सकल गोकर्णा येती । अति आनंदें परियेसा ॥५१॥ तेव्हां करोनि करारपत्र । लिहिला विचार केला जो समग्र । त्याहुनी आणिक एक साचार । लिहिलें काय तें सांगूं पैं ॥५२॥ जरी कृष्णय्या यांच्या वंशजीं । न मिळे योग्यसा मुलगा सहजीं । तरी त्यांनींच दुज्या वंशामाजीं । शोधूनि दिला तोचि शिष्य करूं ॥५३॥ ऐसें एक करारपत्र । करुनी दिधलें कृष्णय्यासी शीघ्र । दहा जणांनीं तेव्हां समग्र । केली सिद्धता त्या समयीं ॥५४॥ मग पाचारुनी कृष्णय्या-सुतासी । 'मर्तू' या नामें बाहती ज्यासी । मिरवुनी नेला निजमठासी । मोठ्या थाटें त्या समयीं ॥५५॥ नंतर तयांनीं विधिपूर्वक । केलीं कर्में सकलही देख । विरजा - होमादि करुनी चोख । संपादिलें कार्य सर्वही ॥५६॥ सोळाशें बेचाळ शकामाझारीं । शार्वरी संवत्सर शनिवारीं । चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या अवसरीं । केला उपदेश गुरुनाथें ॥५७॥ एवं झाला शिष्य-स्वीकार । अभिधान देउनी 'शंकराश्रम' सुंदर । करिती सकलही महाथोर । उत्सव परम उत्कृष्ट तो ॥५८॥ स्वर्गींचे सुरवर सुमनवृष्टि । करिती गुप्तपणें आणि म्हणती । धन्य ते नर राहती जगतीं । सद्गुरुसंगें प्रेमानें जे ॥५९॥ यापरी समारंभ गोकर्णग्रामीं । जाहला मठामाजीं नामी । द्वितीय सद्गुरु शंकराश्रमस्वामी । साक्षात् अवतार विष्णूचा ॥६०॥ असो तेव्हां सकल मिळोनि । कृष्णय्यासी म्हणती आजिपासोनि । तुम्हां आणि संततीलागूनि । 'शुक्ल' भटजी हें नाम असो ॥६१॥ जैसा वाढे शुक्लपक्षींचा चंद्र । तैसा वाढो तव वंशसमुद्र । ऐसा आशीर्वाद सद्गुरुयतींद्र । देती तुम्हां निजमानसीं ॥६२॥ म्हणोनि 'शुक्लभट्ट' किताब तुजला । वंशपरंपरा असे पहा, दिधला । उपकार मोठा आम्हांवरी झाला । तुझा, कृष्णय्या धन्य तुझी ॥६३॥ ऐसें म्हणुनी कृष्णय्यासी । वचनापरी 'मणेगार' नेमला त्यासी । अर्थात् मठाचे आधिपत्य -कामासी । नेमिला सकल जनांनीं त्या ॥६४॥ मग गेले सकल लोक । मनीं धरोनि सद्गुरु-विवेक । आपापुल्या ग्रामीं अनेक । नगरसंस्थाना परतूनि ॥६५॥ असो ऐसा हा कृष्णय्या कुलकर्णी । यांच्या पुण्य-संततीपासोनी । तीन शाखा पहा होवोनी । नांदती अद्यापि अवनीं या ॥६६॥ मंगलूर-शिराली-मल्लापूर- । ग्रामीं अद्यापिही नांदती थोर । 'शुक्लभट्ट' या नामें साचार । असो नमन तयांसी ॥६७॥ स्वामींचा जन्म ज्यांच्या वंशीं । तो वंशचि असे पुण्यराशी । काय वर्णावें ऐशा वंशासी । सद्गुरु जन्मले ज्यामाजीं ॥६८॥ विपुल पुण्य पाहिजे जाण । व्हावया ऐशा सद्गुरूचें दरुशन । म्हणोनि जेव्हां भेटे तो दयाघन । तत्काळ शरण जावें तया ६९॥ तोचि दावी खरा मार्ग । दिसे हें जें तें मिथ्या जग । आणिक येथील सर्वही भोग । असती मिथ्या ते जाणा ॥७०॥ ऐसा विचार न येई आम्हांसी । म्हणोनीच जावें सद्गुरूपाशीं । त्यांचे विचार घेउनी मानसीं । धरावे दृढतर ते पाहीं ॥७१॥ जातां त्यासी अनन्य शरण । तोचि उद्धरी आम्हांलागुन । परी करावा परम प्रयत्न । आपणचि जाणा तो पाहीं ॥७२॥ जरी न घेतला गुरु-उपदेश । गुरु न करी साधन- अभ्यास । आपणचि करावा प्रयत्न विशेष । फलदाता असे सद्गुरु तो ॥७३॥ बीज पेरितांचि झाड नुगवे । तयासी प्रयत्न बहुविध करावे । तरीच उगवोनि वाढे स्वभावें । फल लाभेल त्यानंतरीं ॥७४॥ घालुनी खत पाणी सर्व । आपणचि कष्ट करावे सदैव । तरीच फल देईल तो देव । नातरी काय करील तो ॥७५॥ तैसें येथे श्रीगुरुराव । देईल पहा ज्ञान अपूर्व । परी करावा प्रयत्न सर्व । साधन-अभ्यासेंकरोनि ॥७६॥ एवं सद्गुरु-देव एक । परम श्रेष्ठ असे व्यापक । स्वरूप त्याचें न वर्णवे देख । कवणाचेनि निधारें ॥७७॥ पुढील अध्यायीं शंकराश्रमस्वामींचें । सद्गुणवर्णन करूं साचें । आणि परिज्ञानाश्रमगुरूंचें । होय गमन निजधामा ॥७८॥ ऐशा सद्गुरुमाउलीप्रतिं । आठवितां लाभ ज्ञानविरक्ति । तेणें होय सहज प्राप्ति । निजस्वरूपाची तात्काळ ॥७९॥ आनंदाश्रम-सद्गुरु श्रेष्ठ । शिवानंदतीर्थ ब्रह्मनिष्ठ । एकचि यांच्या प्रसादें षष्ठ । अध्याय गुरुदासें संपविला ॥८०॥ स्वस्ति श्रीचित्रापुरः । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां येत सद्विचार । षष्ठाध्याय रसाळ हा ॥८१॥ अध्याय ॥६॥ ओंव्या ॥८१॥ ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥ ॥छ॥॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP