मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥७॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥७॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥७॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरत्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जया जी श्रीगुरुदेवा । भक्तवत्सला करुणार्णवा । उद्धरिसी तूं सकलां जडजीवां । निजकृपेनें लडिवाळें ॥१॥ जय जय सद्गुरो ऐशा तुजला । नमितों दावीं परम सुखाला । देईं सुमति वर्णायाला । तव गुणमहिमा तूंचि बा ॥२॥ परिसें आतां देवा दयाळा । धरितों हृदयीं चरणकमळां । महिमा ऐकुनी प्रार्थितों ये वेळां । तूंचि कृपाळू बाळासी ॥३॥ असो आतां श्रोते हो सज्जन । सांगूं मागील कथेचें अनुसंधान । शिष्यस्वीकार होऊन । झाले चौदा दिन ते पैं ॥४॥ सोळाशें बेचाळ शकांतरीं । शार्वरीनाम संवत्सरीं । चैत्र वद्य चतुर्दशी रविवारीं । झाली वार्ता ती सांगूं ॥५॥ पहाटे उठतांक्षणीं स्वामी । बाहुनी म्हणनी भक्तां आम्ही । सांगतों तें चित्तीं धरा तुम्ही । आणि रहा सुखानें ॥६॥ करावा स्वधर्म आपुला आपण । न करावी निंदा परधर्माची जाण । तेव्हां करी तोचि रक्षण । प्रभु भवानीशंकर ॥७॥ जरी आपुला कठिण धर्म । तरीही करावा धरोनि प्रेम । तेव्हांचि कळे आत्माराम । कोण मी कैसा हें पाहीं ॥८॥ स्वधर्म हीच मोक्षाची वाट । त्याविण जावया न होय नीट । जरी होतील तेथें कष्ट । तरी भिऊं नये किमपिही ॥९॥ ज्याचिया अंगीं दुखणें असतें । तेणें कडुनिंबा घ्यावें लागतें । कंटाळतां न ये उपयोगातें । न जाय तें दुखणें त्याविण ॥१०॥ तैसा स्वधर्म जरी कठिण । तेणेंच तरुनी जाऊं आपण । नातरी पुनरपि जननमरण । फेऱ्या लागती घालावया ॥११॥ जरी आपुली माता कुबडी । तरी बालका तिचीच आवडी । तिच्याचि प्रेमें आपण सांकडीं । जगतों खचित निश्चयेंसीं ॥१२॥ जरी कुबडी होय ती माता । प्रेमा कुबडा न होय सर्वथा । येर रंभेहुनी सुंदर वनिता । बालका ती कैशी प्रिय होय ॥१३॥ आपुल्या मातृप्रेमाच्या अभावीं । येरावरी प्रेम करवेल केवीं । तैसा स्वधर्म हाचि दावी । मोक्षमार्ग आपणांतें ॥१४॥पाण्याहुनी तूप बहुमोल । परी त्यांत मासा कैसा जगेल । तैसें स्वधर्म सोडुनी परधर्म धरील । तरी होतील कष्ट बहु ॥१५॥ म्हणोनि स्वधर्मेंचि करा व्यवहार । मग सहजचि येईल अधिकार । परमार्थाचा यांत लवमात्र । संशय न धरा तुम्ही हो ॥१६॥ करितां स्वधर्म-कर्म थोर । होय चित्तशुद्धि साचार । मग होय ज्ञान अनिवार । निजानंद - स्वरूपाचें ॥१७॥ विवेक-वैराग्य-शमादिषदक । मुमुक्षुत्व मिळुनी चारही देख । साधनें अंगीं असतां सकळिक । येई अधिकार श्रवणासी ॥१८॥ श्रवण करितां होय मनन । मननेंचि होय निदिध्यासन । मग निजानंदीं समाधान । होईल पहा तत्काल ॥१९॥ म्हणोनि असावा अधिकार पूर्ण । तरीच होय श्रवण मनन । नातरी काय उपयोग जगून । पशुसम आयुष्य जाय सारें ॥२०॥ आतां सांगूं अधिकाऱ्याचें लक्षण । तरी ऐका चित्त देऊन । ऐसें ते स्वामी चिद्धन । परिज्ञानाश्रम सांगती पैं ॥२१॥ हरएक कार्या असावा अधिकार । नातरी तें काज न होय निर्धार । अधिकार म्हणिजे काय तो साचार । दाखवू तुम्हां आतांचि ॥२२॥ परीट करी वस्त्रे शुभ्र । वस्त्रे विणी तो पट्टेगार । शिंपी शिवी आंगरखे सुंदर । परम उत्कृष्ट सकलही ॥२३॥ ज्याचा अधिकार त्यासी म्हणोनि । करिती ते कीं उत्तम करणी । करूं जातां आम्हांलागोनि । न येईचि तें सर्वथा ॥२४॥ तेवीं परमार्थीं कवणा अधिकार । तरी ज्याच्या अंगीं साधनें चार । असती त्यासीच तो मिळे साचार । येरां न मिळे कदापिही ॥२५॥ विणण्यासी कळे ज्या सुंदर । त्यासचि म्हणती त्याचा अधिकार । तैसें जें जें ज्यासी कळे साचार । तो तो अधिकार तयाचा ॥२६॥ येथें घ्याल तुम्ही आक्षेप । पाहिजे श्रवणासी अधिकार खूप । त्यासी होती कष्ट अमूप । हेंचि पैं अवघड मानवां ॥२७॥ तरी याचें उत्तर आइका । प्रपंचीं अवघड कवणाही एका । नाहींत हीं साधनें खचितचि देखा । सांगतों हेंचि विवरुनी ॥२८॥ आधीं चारी साधनें विवरून । मग करूं शंकेचें समाधान । परिसा एकाग्र चित्त करून । ऐसें बोलती सद्गुरु ॥२९॥ 'ब्रह्म सत्य, मिथ्या जग' हें । ऐसा जो मनाचा निश्चय होये । त्यासीच म्हणती 'विवेक' पाहें । हेंचि प्रथम साधन पैं ॥३०॥येथील आणि परलोकींचे । भोग अनित्य म्हणोनि साचें । उबगे मन हें तेथें नवचे । त्यासीच म्हणती 'वैराग्य' ॥३१॥ शमदम - श्रद्धा जाण । उपरति-तितिक्षा-समाधान । एवं सकलही मिळोन । 'शमादिषटूक' म्हणती त्या ॥३२॥ 'शम' म्हणजे सकल वासना । त्याग करुनी शमवावें मना । 'दम' म्हणती इंद्रियदमना । शब्दादिविषयांपासोनि ॥३३॥ प्रपंचापासुनी निवृत्ति । त्यासी म्हणती 'उपरति' । शीत - उष्ण-क्षुधा तृषा ती । साहणें हेचि 'तितिक्षा' ॥३४॥ आणि मान- अवमान । साहणें हेंही तितिक्षा-लक्षण । ऐसें हें द्वंद्व-धर्म जाण । सांगितलें बा तुजलागीं ॥३५॥ गुरु आणि वेदान्त-वाक्यावरी । भक्ति असणें जी निर्धारीं । तीचि 'श्रद्धा 'जाणा बरी । निश्चयें तुम्ही श्रोते हो ॥३६॥ करितां अध्यात्माचें श्रवण । एकाग्र व्हावें आपुलें मन । त्यासीच म्हणती 'समाधान' । एवं 'षट्संपत्ति' ही पाहीं ॥३७॥ मोक्षाची जो तीव्र इच्छा करी । तोचि 'मुमुक्षु' निर्धारीं । एवं ऐसीं हीं साधनें चारी । सांगितलीं पैं तुम्हांसी ॥३८॥ ऐसीं हीं साधनें आपुल्या अंगीं । येती प्रपंचामाजीं वेगीं । नको शिकवावें कोणींच या जगीं । असती अंगी सहज तीं ॥३९॥ समजा एकासी पाहिजे नोकरी । तरी जाऊनि श्रेष्ठांचा आश्रय तो धरी । तेथे मानावमान सहन करी । जरी शिडकारिलें श्रेष्ठानें ॥४०॥ जरी सद्गुरु शोभती आम्हांसी । अपमान होय निजनानसीं । आपुलें हित होय हे ऐसी । न ये कल्पना त्या काळीं ॥४१॥ दोघे बोलती तेव्हां आपण । करितों आपुलें एकाग्र मन । देऊनि तिकडेचि आपुले कान । काय हे बोलती समजूं पैं ॥४२॥ यापरी प्रपंचीं चारी साधनें । येती आपुल्या अंगीं त्वरेनें । ऐसें होगें कोणत्या कारणें । बोलूं आतां अवधारा ॥४३॥ विषय ते सकलही वाढती गोड । खरेंच ऐसें वाटे तें दृढ । म्हणोनि मोह ममता वाढ । होय तेथे सहजचि ॥४४॥ जेथें वाटे सत्यता पूर्ण । तेथें जाय आपुलें मन । मनचि मुख्य कारण । सकल कार्यांलागीं पैं ॥४५॥ जेथें आपुले मन जाय । धांवती तेथे इंद्रियें निःसंशय । म्हणोनि त्यासी आधीं करावें काय । तेंचि आतां सांगूं पैं ॥४६॥ वर्णाश्रमविहित कर्म । करणें हा आपुला स्वधर्म । तेव्हां होईल मन हें परम । शुद्ध जाणा निर्धारें ॥४७॥ मग श्रवणासी अधिकार । येतसे जाणा सत्वर । तेव्हां आत्मसाक्षात्कार । होय सहजचि गुरुकृपें ॥४८॥ समई आणि वाती तेल । सिद्ध असतां नाहीं वेळ । उजळितां दीप सोज्जवळ । विलसे सुंदर तो पाहीं ॥४९॥ तद्वत् स्वधर्मकर्में करितां करितां । होय चित्तशुद्धि तत्त्वतां । मग सद्गुरूचा उपदेश घेतां । उशीर न लागे निजज्ञाना ॥५०॥ म्हणोनि मद्भक्तांनो आतां । केला उपदेश तुम्हां जो त्वरितां । तैसेंचि वागलिया येईल हाता । मोक्षधाम सहजचि ॥५१॥ समर्थ असे भवानीशंकर । तोचि करी सकलां पार । शंकराश्रम सांगेल विचार । पुढें सकलांसी पहा हो ॥५२॥ आतां आमुचें संपलें कार्य । येतों आम्ही देतों अभय । सांगीतला तरण्या उपाय। धरा अंतरीं सकलही ॥५३॥ ऐसें सांगोनि निजभक्तांसी । बाहती शंकराश्रम - स्वामींसी । मद्वाक्य कळलें कीं आतां तुजसी । ऐसाच उपदेश करीं जना ॥५४॥ आधीं आपण वर्तोनि दावीं । मग जनासीं सांगें तेवीं । ना भीं, हृदयीं सदा ठेवीं । अनुसंधान तें पाहीं ॥५५॥ 'असें मी बझ परिपूर्ण चिद्धन'। हेंचि घरी अनुसंधान । पुढें येतील विघ्नें दारुण । लय विक्षेपादि चार पाहीं ॥५६॥ परी "नको भिऊं त्यांसी ताता । विचारें दवडुनी त्यांसी तत्वतां । धरिलें अनुसंधान न सोडीं सर्वथा । निजस्वरूपाचें कदापि ॥५७॥ सर्वांभूतीं समान भाव । ठेवुनी करीं व्यवहार सर्व । भवानीशंकर असतां देव । नाहीं भय तुजलागीं ॥५८॥ ऐसें बोलुनी सद्गुरुराव । परिज्ञानाश्रमस्वामी देव । बैसले स्तब्ध होऊनि ठाव । द्यावया आपुल्या भक्तांसी ॥५९॥ कोणता 'ठाव' काय तो कैसा ।" प्रश्न उद्भवेल श्रोतया - माननां । त्याचें उत्तर देऊं स्वस्थ असा । तुम्ही निवांत चित्तानें ॥६०॥ सद्गुरु न मिळतां सारस्वत । औदासीन्य येई आपुल्या चित्तांत । हें सकलांसी असे विदित । मागील अध्याय वाचोनि ॥६१॥ आधीं जनांची कैसी स्थिति । मग भेटतां सद्गुरुमूर्ति । धीर तो बहु तयांप्रति । आला निर्धारें जाणा हो ॥६२॥ सद्गुरु होय भक्तां आधार । त्यावीण न मिळे मनासी थार । विश्रांतीचें स्थान तें निर्धार । त्यासीच 'ठाव' म्हणती पैं ॥६३॥ सद्गुरु हेंचि विश्रांति - स्थान । अनुभवसिद्ध ना अनुमान । जैसें मीनासी जीवन । तैसे जनांसी गुरुराय ॥६४॥ म्हणोनि सद्गुरु करुणाकर । द्यावया भक्तांसी आधार । करूं लागले अनुष्ठान थोर । चालण्या गुरुपरंपरा शाश्वत ॥६५॥ त्याचि पुण्यप्रभावेंकरुनी । आजवरी वाढली परंपरा धरणीं । नऊ आश्रम झाले सद्गुणी । नसे ज्ञानहीन एकही ॥६६॥ पुढें येईल सकलांचें वर्णन । प्रस्तुत बोलूं सद्गुरु सघन । परिज्ञानाश्रम - स्वामींनीं अनुष्ठान । केलें पांच तासवरी ॥६७॥ तेव्हां पसरे वार्ता सकल । परिज्ञानाश्रमस्वामी प्रेमळ । घेती समाधि ये वेळ । ऐकुनी धाविन्नले नरनारी ॥६८॥ येती मठामाजीं सर्व । भेटाया धरुनी दृढभाव । आनंदें म्हणती सद्गुरुराव । निजभक्तांसी तेधवां ॥६९॥ मुखीं सतत धरा नाम । तेव्हां निर्मल निर्विकार निष्काम । मन होउनी, निःसीम प्रेम । बाणेल अंगीं सहजचि ॥७०॥ धरा प्रेम सद्गुरुचरणीं । तोचि तुम्हांसी बोध करोनी । नेईल निजपदासी तत्क्षणीं । परी ठेवावा विश्वास ॥७१॥ धरिल्या तुम्हीं विश्वास । तुमचेंचि होईल कल्याण खास । नको आम्हां संन्यासीयांस । मठादिक हें पहा हो ॥७२॥ कैंचा ग्राम कैंचा मठ । जेथे जाऊं तेथे राहूं स्पष्ट । ब्रह्मांड हाचि आमुचा श्रेष्ठ । संन्याशाचा मठ पहा हो ॥७३॥ आम्हां नाहीं जात गोत । जगचि सारें आमुचे आप्त । जेथें प्रारब्ध असे तेथ । वसे देह हा पाहीं ॥७४॥ ऐसें बोलुनी सगुरुनाथ । प्राण नेती ब्रह्मरंध्री त्वरित । नेत्रीं बघती जन समस्त । झाले समाधिस्थ गुरुराज ॥७५॥ तेव्हां सकलांसी बहुत खेद । वाटला चित्तीं अति विषाद । परी उठे वृत्ति धैर्यप्रद । बघुनी शंकराश्रम - स्वामींतें ॥७६॥ असो मग पुढील कार्य । थोर थाटें करी समुदाय । विधिपूर्वक कर्में सविनय । केलीं लोकांनीं त्या समयीं ॥७७॥ मग चिन्मय सद्गुरुमूर्ति । बैसवुनी ठायीं समाधि देती । झाली आजि अवतार-समाप्ति । म्हणोनि हळहळती सकल जन ॥७८॥ अहा देवा सद्गुरुनाथा । महिमा अपार तुझी ताता । सगुण कैसे वर्णाचे आतां । न कळे अज्ञ बालकांसी ॥७९॥साहुनी सारा मानावमान । संरक्षिलें निजभक्तांलागुन । केलें शिशूपरी संगोपन । कैसे फेडूं उपकार तव ॥८०॥ सद्गुरु माता ऐसें म्हणती । मातेहुनी अमित तुझी प्रीति । कैसी गाऊं आतां कीर्ति । न कळे आम्हां दयाळा ॥८१॥कधींही जनांसी निष्ठुर वचन । न बोलिलासी तूं दयाधन । राव रंक-हीन-दीन । सकलही समान तुजलागीं ॥८२॥ तव गुणांसी नाहीं सीमा । कोणती द्यावी तुजला उपमा । न कळे देवा कांहीं आम्हां । बोलावया बापा हो ॥८३॥ निजभक्तांच्या कार्यासाठीं । देह झिजविला त्वां जगजेठी । परी अनुताप आमुच्या पोटीं । नुपजे देवा गुरुराया ॥८४॥ तुज कासया ऐसें बंधन । मठाऐसें महाकठिण । परी तूं सकलजनांकारण । घेतला भार सकलही ॥८५॥ येथें श्रोते करितील प्रश्न । कीं मठ हा होय कैसें बंधन । मठाचे स्वामी सुखी पूर्ण । काय कठिण होय तयां ॥८६॥ तरी ऐका त्याचें उत्तर । दृष्टांतसहित सांगूं निर्धार । येवें असावें सादर । आतां भाविक चतुरांनीं ॥८७॥ परमार्थविचारें बघतां । स्वामी खचितचि सुखी तत्त्वतां । दुःख नसे त्यांचिया चित्ता । अणुमात्र जाणा निश्र्चयें ॥८८॥ सुखदुःखातीत तयांची । वृत्ति असतां पूर्ण साची । तेथे दुःखप्राप्ति कैंची । सदा सुखी ते परिपूर्ण ॥८९॥ ऐसें बघतां नाहीं बंधन । श्रीस्वामी सद्गुरूलागुन । नातरी मठाऐसें कठिण । आणिक बंधन ना दुसरें ॥९०॥ तरी ऐका तें आतां आपण । समजा एक धनाढ्य ब्राह्मण । नाना परीनें सुखी तो पूर्ण । परी थोर कुटुंब तयाचें ॥९१॥ सर्वांचा भार असे त्यावरी । तेव्हां कैंचें सुख त्याच्या अंतरीं । चिंता होय दिवसरात्रीं । चित्तीं त्याच्या बहुत हो ॥९२॥ एका मुलाचें दुखे पोट । एकानें धरिली सदा खाट । एक होय बहु उद्धट । येती गाऱ्हाणी ग्रामींचीं ॥९३॥ करितां सकलांचे समाधान । थके तो बहुतचि ब्राह्मण । जन म्हणती सुखी तो पूर्ण । धनसंपन्न म्हणोनि ॥९४॥ एवढा प्रपंच असे कठिण । ज्याचें त्यासी होय बंधन । पुरे पुरे बा ऐसें म्हणोन। तापे अंतरी बहुत तो ॥१५॥ एवं इतुका थोर भार । सर्व ज्ञातीचा असे मठावर । करितां समाधान निरंतर । त्रास अनिवार होई त्यां ॥९६॥ मठ नव्हे सद्गुरूसाठीं । लोकांची होतां भेटी गांठी । त्यांचा उद्धार होईल शेवटीं । म्हणोनि संस्था स्थापिली ॥९७॥ एका कुटुंबाचा व्यवहार । करितां थकती सगळे नर । सद्गुरु तरी विश्वकुटुंबी साचार । विचार करितां समजेल ॥१८॥ म्हणाल सद्गुरु सर्वां अलिप्त। त्यांसी कोणतें कार्य असे येथ । मठाचा भार सर्व गृहस्थ । घेती बपती सकलही ॥९९॥ स्वामींलागीं काय बंधन । तरी ऐका सांगतों वचन । जो धनाढ्य ब्राह्मण । त्यासी न लगे कांहींएक ॥१००॥ सकलही करवी त्याची कांता । परी भार यावरी म्हणोनि चिंता । बहुत काय बोलावें आतां । सकलांसी विदितचि हें सारें ॥१०१॥ एवं मठ हा होय बहुत बंधन । परी राहती स्वामी जनांकारण । नातरी संन्याशां काय गरज म्हणून । रहावें ऐशा बंधनीं॥१०२॥ नको पैसा अडका त्यांसी । न लगे श्राम मठ परियेसीं । जेथें जातील तेथे आपैसी । होय सोय गुरुकृपें ॥१०३॥ म्हणोनि मठ नव्हे केवळ स्वामींचा । आम्हां सर्व सारस्वतांचा । पुढें बोलिजेल विवर याचा । तेव्हां समजेल सकलही ॥१०४॥ असो आतां सकल जनांनी । केला आकांत गुण आठवोनी । मग आपापुल्या गृहालागुनी । गेले सकलही तेधवां ॥१०५॥ शके सोळाशें तिसापासुनी । बेचाळीसपर्यंत अनुदिनी । परिज्ञानाश्रमस्वामीजींनीं । स्वधर्म - राज्य चालविलें ॥१०६॥पुढील अध्यायी सद्गुरुराय । शंकराश्रमस्वामी सदय । सांगती जनां बोध सुखमय । उत्कृष्ट जाणा तो पाहीं ॥१०७॥परमहंस - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ एकचि ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें सप्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०८॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभे मोक्ष सत्वर । सप्तमाध्याय रसाळ हा ॥१०९॥ अध्याय ॥७॥ ओंव्या ॥१०९॥ ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP