मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥१०॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१०॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥१०॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥ जय जय देवा श्रीगुरुराया । काय तुझी अवघी माया । मी अज्ञ बालक न जाणें तया । अगाध महिमा अपार ॥१॥ काय तुझें स्वरूप दयाळा । कवणासीही न कळे लीला । तूंचि प्रभो भक्तवत्सला । दावीं देवा कृपाळा ॥२॥ करूं जातां तुजला नमन । तरी हो ऐसें हें मन । तुजवांचोनि ना मी भिन्न । हेंचि वंदन घडतसे ॥३॥ शब्द - स्पर्श रूप - रस - । गंध मिळोनि पांच हे सुरस । या पंचविषयीं तूं भरलास । व्यापक अससी सर्वत्रीं ॥४॥ ऐकतां तुझे गुणकीर्तन । निंदा-स्तुतिही सर्व समान । शब्दातीत ब्रह्म आपण । ऐसें ज्ञान उदया ये ॥५॥ त्वचेसी लागतां चरणस्पर्श । तुटती सर्व कामपाश । स्पर्श विषयामाजीं खास । दिससी तूं बा घनदाट ॥६॥ पाहतां तुझें रूप सुंदर । न दिसे नयनीं सारासार । सर्वही ब्रह्म पूर्ण हा निर्धार । होय साचार सहजचि ॥७॥ जिव्हा चाखितां तव प्रसादा । तिखट आम्ल याचिया फंदा । न पडे, निशिदिनीं निज आनंदा । पोंचविसी तूं निजभक्तां ॥८॥ ऐशा या रस विषयीं । यांतही तुझेंचि स्वरूप पाहीं । याहुनी आणिक कांहीं नाहीं । ऐसा निश्र्चय बाणविसी ॥९॥ चरणकमलीं पुष्पतुळसी । वाहती त्यांचा सुगंध भक्तांसी । घ्राणामाजीं येतां कैसी । वृत्ति स्वरूपीं निमतसे ॥१०॥ याही गंध-विषयाभीतरीं । तूंचि दिससी देवा अंतरी । तुझ्या स्वरूपा नाहीं सरी । कवणाचीही ब्रह्मांडीं ॥११॥ एवं पंचविषयीं दिशा दाही। आत्मरूपा दाविनी पाहीं । ऐसी तूं सद्गुरु माझी आई । निजभक्तां सांभाळिसी ॥१२॥ असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं निरुपण । गरीब भक्तालागीं जाण । उद्धरिलें भाव बघोनि ॥१३॥ बघती एक भावार्थ । जेथें बाहती तेथें जात । नाहीं गरीब श्रीमंत त्यांप्रत । सारें आत्मरूपचि तयां ॥१४॥ असो आतां परिसा सावध । सांगू त्यांचा परम प्रसिद्ध । जनासी करिती जो शुद्ध बोध । अति आवडीं ते पाहीं ॥१५॥ जेथें तेथें आमुचे जन । असती तेथें जाउनी आपण । शंकराश्रमस्वामी सघन । करिती उद्धार जनांचा ॥१६॥ कासया त्यांसी करणें भ्रमण । केवल जगदोद्धाराकारण । न पाहे देहाकडे जाण । खचितचि बापा निश्चयें ॥१७॥ एवं फिरुनी ग्रामोग्रामीं । सुखवीतसे जनांसी स्वामी । आणिक लाविले जन स्वधर्मीं । वारंवार बोधोनि ॥१८॥ इतुकें कराया काय कारण । कासया त्यांसी इतुकें बंधन । करावया जनांचे कल्याण । हेंचि काज सद्गुरूचें ॥१९॥ असो आतां सद्गुरुस्वामी । कधीं कधीं जाती ग्रामोग्रामीं । तेथें भक्त अंतर्यामीं । आनंदोनि काय करिती ॥२०॥ धेनूसी देखतां वत्स पाठीं । लागे आनंद न समाये पोटीं । तैसी गुरुमाउली देखता दृष्टीं । भक्त धांवती आनंदें ॥२१॥ सन्मानोनि आणिती भक्त । आणि उत्सव करिती बहुत । आपापुल्या गृहाप्रत । पाचारूनि नेती प्रेमानें ॥२२॥ करोनि सुंदर सिंहासन । बैसविती स्वामींसी प्रेमेंकरून । पादपूजादि करूनि जाण । सर्वोपचार समर्पिती ॥२३॥ घेउनी जाती गृहालागून । आणिक करोनि भिक्षावंदन । नाना वैभव करोनि अर्पण । भाविक सज्जन संतोषती ॥२४॥ सकलांसी आनंद थोर होय । म्हणती आम्हीं सद्गुरुपाय। देखिले आजि परम सदय । बोलका देव हा पाहीं ॥२५॥ पाषाणमूर्ति न बोले कांहीं । त्यापासुनी जनांसी उपयोग नाहीं । परी ही सद्गुरुमाई । करी बोध भक्तांसी ॥२६॥ म्हणोनि सद्गुरु बोलका देव । तयांपासुनी जनांनी सर्व । होउनी सद्बोध लाभे अपूर्व । निजस्वरूपाचें तें ज्ञान ॥२७॥ देव म्हणिजे स्वयंप्रकाश । जाणणें ऐसें म्हणती त्यास । जो जाणे आपुल्या स्वरूपास । तोचि देव निर्धारें ॥२८॥ त्याविण अन्य नाहीं देव । म्हणोनि धरावा तेथेंचि भाव । त्यावांचुनी आणिक आठव । करूं नये विषयांचा ॥२९॥ असो यापरी करितां उद्धार । लोटलीं कांहीं वरुषें परिकर । भक्तजनांनीं अपार । आनंदें काल क्रमियेला ॥३०॥ ऐसें असतां एकेकाळीं । शंकराश्रम-सद्गुरु माउली । भटकळ ग्रामाप्रति पातली । परिवारसमवेत जाण पां ॥३१॥ तेथील आमुचे सारस्वत । यांनीं केला अपराध बहुत । श्रीसद्गुरुसंनिधीप्रत । केलें दुर्लक्ष अनिवार ॥३२॥ जो करावा योग्य सत्कार । तो त्यांनीं न केला निर्धार । तेथुनी मग सद्गुरुवर । निघाले गोकर्ण - ग्रामासी ॥३३॥ आधींच देहासी व्यथा होत । त्यामाजीं तेथील गृहस्थ । नच करिती सन्मान आपुल्याप्रत । बघतां खिन्न जाहले ॥३४॥ खिन्न कां जरी प्रश्न करितां । तरी सांगूं उत्तर आतां । सावध करोनि आपुल्या चित्ता । परिसा भाविक चतुर हो ॥३५॥ अवचित लाभला हातासी परिस । तो टाकतां म्हणावें काय त्यास । कामधेनु येतां घरास । तिजसी दवडी अज्ञपणें ॥३६॥ मिळतां परम उत्कृष्ट भोजन । अविचारें जाय दवडून । ऐसें करितां होय नुकसान । हें न कळे अज्ञपणें ॥३७॥ तैसें साधु येतां ग्रामासी । करितां दुर्लक्ष त्यांजपाशीं । काय गति होईल कैसी । हेचि चिंता सद्गुरूंतें ॥३८॥ जे असती धर्मगुरु आमुचे । त्यांसी सकलही सारस्वत साचे । मुलांपरी वाटती, त्यांचे । रक्षणा इच्छिती सदा ते ॥३९॥ पुत्र जरी मातेसी अव्हेरी । तरी खिन्न माता आपुल्या अंतरीं । म्हणे देवा क्षमा करीं । माझ्या बाळाचा अपराध ॥४०॥ जरी त्याचा अपराध थोर । तूं करीं त्याचें रक्षण साचार । ऐसें विनवी माता सत्वर । आपुल्या पुत्रासाठीं पैं ॥४१॥ मातेचा जो करी धिक्कार । पाप नसे त्याहुनी थोर । येर केले पुण्याचे डोंगर । निष्फल होती त्यापुढें ॥४२॥ म्हणोनि मातेसी वाटे चिंता । घडी घडी प्रार्थी रक्षण करीं सुता । न होय अपमान तिचिया चित्ता । जरी अव्हेरी पुत्र तिला ॥४३॥ परी तिच्या मनामी खिन्नता । वाटे ती इतुक्याचकरितां । कीं आपुल्या मुलानें कर्तव्या सर्वथा । चुकूं नये हेंचि पैं ॥४४॥ नाहीं तिच्या अंगीं स्वार्थ । मुलापुढें खचितचि किंचित । सुखी असो आपुला हा सुत । करी ती प्रार्थना दिनरजनीं ॥४५॥ तैसी आपुली सद्गुरुमाता । आम्हां सारस्वतां जनां समस्तां । बचे शिशुपरी आपुल्या भक्तां । न वाटे अपमान त्यांलागीं ॥४६॥ सद्गुरूचा केला अव्हेर । तें पाप महा थोर । म्हणोनि खिन्न झाले अपार । निघाले सत्वर आमासी ॥४७॥ जावया गोकर्ण - ग्रामांतरी । शिरालीमाजीं ते अवसरीं । आले बघोनि येती सामोरी । भक्तमंडळी तेथील पैं ॥४८॥ पालखीमाजीं बैसवुनी त्वरित । मिरवित नेलें ग्रामाप्रत । गौरवुनी सकलांनी तेथ । उत्सव थोर मांडियला ॥४९॥ आणिक म्हणती रहावें येथ । स्वास्थ्य नाहीं आपुल्या देहांत । आतां नच जावें गोकर्णाप्रत । येथेंचि रहावें ही प्रार्थना ॥५०॥ शरीरव्यथा जाय तोंवरी । येथेंचि वास करावा निर्धारीं । ऐसी प्रार्थना करुनी चरणांवरी । घातलें दंडवत त्या समयीं ॥५१॥ पाहुनी भक्तांचा अति आग्रह । राहिले तेथें परिवारासह । दिवसेंदिवस झाला देह । अशक्त बहुतचि स्वामींचा ॥५२॥ केलें औषध नाना उपचार । परी ते निष्फल झाले समग्र । मग सारस्वत चिंतातुर । जाहले सकल निजमानसीं ॥५३॥ केला विचार सकल जनांनीं । की स्वामी जातील केलासभुवनीं । पुढें आम्हां सारस्वतांलागुनी । कोण दावील सुपंथ ॥५४॥ म्हणोनि गेले संनिधीजवळी । म्हणती शिष्य - स्वीकार करावा ये वेळीं । ऐसी प्रार्थना चरणकमलीं । देवा गुरुराया दयाळा ॥५५॥ पाहुनी भक्तजनांचा भाव । परम संतोषे सद्गुरुदेव । परी कराया शिष्य स्वीकारा ठाव । नेदी बळेंचि त्या काळीं ॥५६॥ म्हणती कासया शिष्य आतां । सांगितला बोध धरा चित्ता । आम्ही न करूं शिष्य स्वीकार सर्वथा । सत्यवचन आमुचें पैं,,॥५७॥ तेव्हां म्हणती भक्त सारे । करावा शिष्य - स्वीकार स्वकरें । तरीच आम्हांसी पुढती बहु बरें । होय निर्धारें अज्ञजनां ॥५८॥ नसतां सद्गुरु कोण करील । सुबोध जनासी देवा ये वेळ । कृपा करोनि त्वां वेल्हाळ । करावाचि शिष्य - स्वीकार तो ॥५९॥ यावरी बोले सद्गुरुराय । भटकळ ग्रामींची बघतां सोय । मन हें आमुचें खिन्न होय । नको वाटे शिष्य पुढें ॥६०॥ सांगतों आतां निर्वाण वचन । नको शिष्य स्वीकार कवण । भवानीशंकर तुमचें कल्याण । करील जाणा खचितचि ॥६१॥ भिऊं नका सर्वथा तुम्ही । धरा वचन अंतर्यामीं । आतां सांगतों जो आम्ही । बोध धरा दृढ तो मनीं ॥६२॥ जरी धरितां दृढभाव । काय उणीवता तुम्हां सर्व । भावें भजतां सद्गुरुराव । मिळेल सहजचि निर्धारें ॥६३॥ मुख्य परमात्म्यावरी धरावें प्रेम । तरीच साधेल आपुलें काम । प्रेमावांचुनी कैंचाही नेम । न येचि उपयोगातें पैं ॥६४॥प्रेम म्हणजे प्रीति । त्यासीच म्हणती भक्ति । ऐसी भक्ति करितां दृढ ती । कैंचें असाध्य होय त्या ॥६५॥ तीच करावी भक्ति बळकट । पार होईल सकल संकट । जरी आले नाना कष्ट । तरी न सोडावे चरण ते ॥६६॥ सारा मोह सांडुनी जाण । काया वाचा आणि मन । करावें प्रभूसी अर्पण । भक्तिपूर्वक निर्धारें ॥६७॥ ऐसें करितां तो दयाघन । पार करील न लागतां क्षण । येथे न करावें अनुमान । खचितचि जाण निश्चयें ॥६८॥ असो आतां श्रोते हो सज्जन । येथे थोर येईल प्रश्न । भटकळ जनांकारण । इतुका शोभ कासया ॥६९॥ शिराली - ग्रामीं सकल जनांनी । प्रार्थिलें परी तें न घेती कर्णीं । कैसी नुपजली करुणा स्वमनीं । श्रीस्वामींच्या जाणा हो ॥७०॥ तरी ऐका तुम्ही भाविक । साधुपुरुषां अमुक एक । ऐसेंचि वर्तविं नाहीं देख । स्वइच्छेपरी वागती ते ॥७१॥ न होय कष्ट दुज्यांलागून । ऐसेंचि आचरण करिती ते जाण । जें जें करिती तें तें पूर्ण । होय कार्य सफल त्यांचें ॥७२॥ नाहीं त्यांसी मानावमान । न होती ते कवणाच्या स्वाधीन । मनासी येतां सकलही जाण । कराया सिद्ध असती ते ॥७३॥ ते जें करिती कार्य । तेणें सकलांचे हितचि होय । आम्हां अज्ञांसी सत्पुरुषांचे हृदय । कैसें असे तें समजेना ॥७४॥ नसे त्यांच्या अंगीं क्रोध । त्यांची क्रिया होय ती शुद्ध । आम्ही मानव आहों बद्ध । म्हणोनि शब्द लावितों त्यां ॥७५॥ एवं जे पुरुष जीवन्मुक्त । ते करुनी अकर्ते होत । भोगुनी अभोक्ते असत्ती सतत । मग कैंचा दोष तयांसी ॥७६॥ जगाच्या कल्याणास्तवचि सदय । सद्गुरूचा अवतार खचित होय । म्हणोनि ते जें करिती कार्य । तेणेंच होय हित आमुचें ॥७७॥ असो आतां श्रीगुरुराय । बोधुनी सकलांसी देती अभय । मग करिती सारस्वत - समुदाय । विचार थोर तो पाहीं ॥७८॥ कीं हे जरी झाले मुक्त । समाधि कोठें करावी येथ । ऐसें परस्परांमाजीं बोलत । बैसले विचार करावया ॥७९॥ तेव्हां तेथें एक गृहस्थ । नागरकट्टी सकलां विदित । त्यांचा पूर्वज एक भक्त । म्हणे आम्ही जागा देऊं पैं ॥८०॥ आमुच्या सदनीं स्थळ उत्तम । समाधि द्यावया होईल सुगम । देतों आम्ही शंकराश्रम - । स्वामींलागीं निश्रयेंसीं ॥८१॥ ऐकतां जाहलें समाधान । तेथील सारस्वत जनांलागुन । सद्गुरुस्वामींचा आजार जाण । अतिशय झाला त्या काळीं ॥८२॥ जरी केले नाना उपचार । तरी उपयोगा न येती साचार । त्यामाजींच त्यांनीं क्षीरसागर । मार्ग क्रमिला त्या काळीं ॥८३॥ शके सोळाशें एकूणऐंशीं । ईश्वर - संवत्सर आश्विनमासीं । शुद्ध षष्ठी ऐशा दिवशीं । जाहले समाधिस्थ जाणा हो ॥८४॥ जाहला थोर हाहाःकार । हळहळती सकल नारी नर । सांगावया भला विचार । नाहीं कोणी म्हणोनि ॥८५॥ जाहला सकलांसी बहुत ताप । सद्गुरूसाठीं करिती विलाप । मग करोनि उत्सव खूप । पुढील कार्य जन करिती ॥८६॥ त्याचि समयीं तेथें एक । उत्तर हिंदुस्थानाहूनि देख । संन्याशी आले होते साहजिक । पाचारिलें तयांसी ॥८७॥ अंत्यविधि - कर्म ते वेळ । करविलें तयांकडुनी सकल । मिरवुनी केला उत्सव विपुल । शंकराश्रमस्वामींचा ॥८८॥ नेमिल्या जागीं नागरकट्टी । यांच्या सदनामाजीं गोमटी । बैसवुनी प्रेमळ सद्गुरुमूर्ति । दिधली समाधि त्या समयीं ॥८९॥ तेथेंचि आतां चित्रापुर - । मठ जाहला महाथोर । आणि देव भवानीशंकर - । मूर्ति स्थापिली त्या स्थानीं ॥९०॥ तीच होय मुख्य समाधी । आपण त्यासी म्हणतों 'होडि - समाधि' । ऐसी त्याची होय प्रसिद्धी । सारस्वतांसी विदितचि ॥९१॥ असो तयां नागरकट्टी यांनीं दिधली जागा मोठी । अद्यापिही त्यांची कीर्ती । गाजतसे आमुच्यांत ही ॥९२॥ द्यावया समाधि आणि मठासी । दिधली आपुली जागा कैसी । उत्तम असुनी अर्पिली मानसीं । अणुमात्र खेद न करितां ॥९३॥ म्हणोनि त्यांच्या स्मरणार्थ जाण । अजूनिही त्या वंशजांलागुन । मठामाजीं प्रथम सन्मान । देती सकल कार्यासी ॥९४॥ सर्व सत्कार्याचे दिवशीं । पूजादि यांची व्हावी प्रथम ऐसी । चाल अद्यापि आहे हें सर्वांसी । असे विदित पहा हो ॥९५॥ आमुच्या मातृभाषेमाजीं । 'पहिलो विडो' म्हणती सहजीं । नागरकट्टी यांच्या वंशजीं । अर्पिती सन्मान हा पहा ॥९६॥ असो आतां परिसा सावध । झाले समाधिस्थ सद्गुरु सुखद । शिष्य - स्वीकार न करितां अंध । जाहले सारस्वत गुरुवीण ॥९७॥ पुनरपि आली पूर्वस्थिती । सद्गुरुवांचुनी जन तळमळती । पुढील अध्यायीं ती प्रख्याती । बोलूं सविस्तर पहा हो ॥९८॥ काय महिमा त्यांची सुंदर । आठवितां सगुण मनोहर । जळतील पापें समग्र । क्षण न लागतां निर्धारें ॥९९॥ काय तें हृदय किती कोमल । भक्तांसाठीं फिरोनि सकल । देह झिजविला आपुला निर्मल । काय काज तयांसी ॥१००॥ केवल भक्तप्रेमासाठीं । जेथें तेथें उठाउठीं। जाउनी सकलां देउनी भेटी । केला उद्धार जनांचा ॥१०१॥ जरी झाले व्याधिग्रस्त । तरीही न सोडिती जनांचे हस्त । वारंवार बोधुनी त्यांप्रत । आणिलें निजमार्गासी ॥१०२॥ किती वानूं त्यांची कीर्ती । लिहाया मेदिनी पुरत नसे ती । तेथें हा मंदमती । काय वर्णूं शकेल पैं ॥१०३॥ सद्गुरुस्वामी - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ एकचि ब्रह्म । त्यांच्या कृपाप्रसादें दशम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०४॥ स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां भक्ति होय दृढतर । दशमाध्याय रसाळ हा ॥१०५॥ अध्याय १०॥ ओंव्या १०५ ॥ॐ॥ तत्सत श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP