मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥११॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥११॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥११॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥ जय जय सद्गुरो शंकराश्रमा । असे तुझी अपार महिमा । परी न समजे मानवां आम्हां । काय लीला तव देवा ॥१॥ तूं भक्तांची माउली । संकटसमयीं सकलां पावली । तयासाठींच अवनीं आली । जगदोद्धाराकारणें ॥२॥ जरी केली कोणीं निंदा । तूं न सांपडसी त्याचिया फंदा । सदा राहसी निज आनंदा- । माजीं देवा कृपाघना ॥३॥ कैसें करावें तुझें स्तवन । हेंचि न कळे मजलागोन । तुझ्या स्वरूपाचें वर्णन । कराया कवण समर्थ जगीं ॥४॥ आतां ऐका मागील अध्यायीं । शंकराश्रम सद्गुरुमाई । करोनि संचार सर्वां ठायीं । केला उद्धार जनांचा ॥५॥ मग आतां शिराली ग्रामीं । तेथेंचि येती समाधि स्वामी । जन झाले अंतर्यामीं । दुःखित गुरुकविण ते पाहीं ॥६॥ पुनरपि झाले सद्गुरूवीण । कष्टी अंतरी उदासीन । मग निंदा करिती दुर्जन । मत्सरही करूं लागले ॥७॥ मागें ज्यांनीं केला द्वेष । ते अधिकारी आतां विशेष । देते झाले सारस्वतां दोष । मग काय करिती तें ऐका ॥८॥ नगर - संस्थान येथील राया । सांगती तेथील अधिकारी तया । सारस्वत-स्वामींच्या ठाया । नाहीं पुनरपि गुरु केले ॥९॥ होते जे स्वामी मुक्त झाले । त्यांनीं आणिक शिष्य नाहीं केले । मठासी कुलूप घालावें ये वेळे । नाहीं वारस म्हणोनि ॥१०॥ तेथील सर्व जमीन - जुमला । करावा जप्त ये वेळां । संस्थानासी जोडावा वहिला । ऐसें सांगती रायासी ॥११॥ मग तो राजा देई हुकूम । अधिकाऱ्यांवरी सोंपवी काम । जप्त करोनि आणावें प्रथम । शिरालीसी जावोनि ॥१२॥ आधींच तेथील येर अधिकारी । करिती द्वेष आमुच्या जनांवरी । राजाचा हुकूम होतां सत्वरी । गेले शिरालीग्रामासी ॥१३॥ एक अधिकारी आणि हेर । गेले दोघे ग्रामाभीतर । मठासी जाउनी करिती दुर्धर । पापाचरण ते पाहीं ॥१४॥ शंकराश्रम - स्वामींसी जेथें । समाधि दिधली होती तेथें । लिंग त्यावरी ठेविलें होतें । मृत्तिकेचें जनांनीं ॥१५॥ त्यावरी ओतुनी पाणी सारें । लिंग विरवोनि टाकीं त्वरें । ऐसा हुकूम केला अहंकारें । हेरासी अधिकारीयानें पैं ॥१६॥तेव्हां हेर तेथें जाऊन । लिंगावरी घाली जीवन । असंख्य घातलें तरी तें जाण । विरघळेना कदापि ॥१७॥ मग तेणें केलें काय । फोडावया लिंग बहुत उपाय । केला परी तो निष्फल होय । जैसे तैसेंचि असे तें ॥१८॥ पाण्यामाजीं विघुरेना। फोडों गेल्या न फोडवे कवणा । अघटित करणी देखुनी स्वमना - । माजीं विस्मित झाला हेर ॥१९॥ भयभीत होउनी निजमानसीं । गेला तो इसम अधिकाऱ्यापाशीं । ज्याने केला हुकूम त्यासी । सकल वृत्तांत निवेदिला ॥२०॥ म्हणे खचितचि भीति हो मज । वाटते बहुतचि महाराज । दुजें कांहीं सांगा काज । नका पाठवूं त्या मठासी ॥२१॥ तया स्वामींची महिमा अपार । काय सांगूं तुम्हां निर्धार । साक्षात् विष्णूचा अवतार । नाहीं संशय यामाजीं ॥२२॥हुकुमापरी केलें काम । ओतितां उदक आला घाम । अमित घातलें, झाला बहु श्रम । विरोनि नच जाय तें पाहीं ॥२३॥ मग तें फोडाया केला प्रयत्न । न फुटेचि सर्वथा जाण । पाहिले नाना उपाय करोन । सकल निष्फल जाहले ते ॥२४॥ म्हणोनि ते स्वामी नव्हेत मनुष्य । देवचि ते कीं असती खास । आतां सांगतों मी तुम्हांस । पुनः तेथें नच जाऊं ॥२५॥ ऐसें ऐकतां त्याचें भाषण । अधिकाऱ्याचेंही भयभीत मन । होउनी विचारी मानसीं जाण । काय चमत्कार हा म्हणावा ॥२६॥ असो मग तेचि दिनीं । रात्रीं रक्त भडभडां ओकुनी । हेर आणि अधिकारी त्या स्थानीं । पावले मरण तत्काळ ॥२७॥ तेव्हां पसरली वार्ता समूळ । भ्याले संस्थानींचे अधिकारी सकळ । नको जप्त करूं ये वेळ । म्हणोनि स्वस्थ बसले ते ॥२८॥ येथें आमुचे सारस्वत ब्राह्मण । करिते झाले अर्जी आपण । संस्थानींच्या रायालागून । काय ती सांगूं आतां पैं ॥२९॥ अहो राया आमुचे स्वामी । मुक्त झाले, आतां आम्ही । शिष्य करूं तोंवरी तुम्ही । न करा जप्त कांहींही ॥३०॥ यावरी राजा जाहला कबूल । करा शिष्य झडकरी ये वेळ । नातरी पुढें जप्त होईल । ऐसा हुकूम पाठविला ॥३१॥ असो मग सारस्वत । जाहले परम चिंताक्रांत । आळविती तेव्हां शंकराश्रमाप्रत । देवा आतां काय करूं ॥३२॥ तूंचि राखीं तुझें ब्रीद । दावीं आतां सद्गुरु प्रसिद्ध । कोण करील आम्हां बोध । तूंचि सांगें दयाळा ॥३३॥ जरी झाला अपराध थोर । तरी त्वां पोटीं घालुनी सत्वर । दाखवीं आम्हां सद्गुरुवर । क्षमा करोनि तूं बापा ॥३४॥ मागें बहुपरी विनविलें तुजला । परी शिष्यस्वीकार नाहीं केला । काय ती नेणे आपुली लीला । तूं जें करिसी तेंचि खरें ॥३५॥ सद्गुरु नसतां कोण दुर्दशा । होते जनांची कळलें जगदीशा । म्हणोनि आतां धरूनि आशा । आलों शरण तुज देवा ॥३६॥ व्हावा मनासी अति अनुताप । तेव्हांचि मिळेल सद्गुरुवाप । म्हणोनिच तुवां दाविला प्रताप । नच केला शिष्य सर्वथा पैं ॥३७॥ त्वां केलें तें बरवेंचि झालें । परी आतां न करीं उशीर ये वेळे । सत्वर दावीं सद्गुरुमाउले । काय करूं तें कळेना ॥३८॥ ऐसें म्हणोनि सकल भक्त । स्तविते झाले श्रीसद्गुरूप्रत । इकडे भटकळ ग्रामीं जेथ । दुर्लक्षिलें स्वामींसी ते येती ॥३९॥ऐकुनी सकल वर्तमान । श्रीसद्गुरुनाथांचे महिमान । मृत्तिकेचे लिंग तें जाण । कांहीं केल्या विष्ठुरेना ॥४०॥ ऐसी वार्ता पडतां कानीं । धांवत आले सद्गुरुचरणीं । म्हणती देवा आम्हांलागुनी । क्षमा करावी दयाळा ॥४१॥ नाहीं कळले तुझें चरित्र । ऐकतां दिसूं लागे विचित्र । ऐशा तुजला स्मरतां पवित्र । होईल वाणी आमुची ही ॥४२॥ अहा देवा भक्तवत्सला । अपराध आमुचा थोर झाला । परी तूं क्षमा करोनि तारिसी सकलां । ऐसें वाटते हो देवा ॥४३॥ ऐसी विनवणी नानापरीनें । करिती प्रेमें केविलवाणें । म्हणती देवा आतां त्वरेनें । दावा सद्गुरुस्वामींसी ॥४४॥ यापरी करिती प्रार्थना सकल । मग करिती विचार प्रबल । सारे मिळोनि भक्त प्रेमळ । करावें स्वामी कवणातें ॥४५॥ आतां ऐका श्रोते सादर । नभीं विमानें दाटली अपार । करिती पुष्पवृष्टि समाधीवर । स्वर्गीहुनी सुरवर ते ॥४६॥ की आतां होईल तृतीय । अवतार येथें येईल सदय । श्रीमहेशचि म्हणोनि अभय । देती आनंदें ते पाहीं ॥४७॥ किती धन्य अवनींचे लोक । ऐकती सतत सद्गुरुविवेक । आम्ही देव तयांसन्मुख । काय उपयोग आमुचा पैं ॥४८॥ऐसें म्हणोनि स्वर्गींचे देव । जयजयकार करिती सर्व । तेव्हां काय झाले तें अपूर्व । सांगूं आतां परिसा हो ॥४९॥ आमुचे हे सारस्वत ब्राह्मण । सद्गुरुसंनिधी प्रार्थना करोन । विचार करिती तेव्हां जाण । कवण मिळेल शिष्यपदा ॥५०॥ ऐसें परस्पर बोलतां तेथ । बैसले होते वडील बहुत । एक बोले तेव्हां त्यांच्याप्रत । म्हणे सांगतों मी ऐका ॥५१॥ शंकराश्रम स्वामी आमुचे । यांचे शिष्य असती साचे । शिराली पंडित यांच्या वंशजाचे । कोलूर - ग्रामीं वसती ते ॥५२॥ संन्यासदीक्षा त्यांनीं घेतली । शंकराश्रमस्वामींजवळी । आप - संन्यासी होउनी या काळीं । असती योगाभ्यास करुनी ते ॥५३॥ ते आमुचे सद्गुरु व्हावया । योग्य असती ऐशा ठाया । त्यांसीच येथे पाचारूनियां । करावें सद्गुरु वाटतें ॥५४॥ ऐसें ऐकतां सकल जनांसी । आनंद जाहला निजमानसीं । म्हणती जाउनी तयांपाशीं । विनवुनी आणूं आतांचि ॥५५॥ ऐसा विचार सकल जनांनीं । करोनि लगबगें प्रमुख कुणी कुणी । गेले पाचारावया स्वामींलागुनी । कोछूर ग्रामीं त्या समयीं ॥५६॥ पुढील अध्यायीं निरूपण । तृतीय अवतार होईल जाण । ऐकतां पाप होय दहन । त्यांचे सगुण ते पाहीं ॥५७॥ पहा आतां कैसें होय । दाविले श्रीसद्गुरूचे पाय । शंकराश्रमस्वामी सदय । ओळले यांच्या भक्तीस ॥५८॥ आपुल्या बाळांचे माता सहज । कळवळोनि करी सकलही काज । सांगावें नलगे तिजला समज । आपणचि करी ती प्रेमानें ॥५९॥ नाहीं तिजला मानावमान । झटे ती प्रेमानें बाळाकारण । तैसा आपुला शंकराश्रम सघन । कळवळोनि धांविन्नला ॥६०॥ त्यांनींच त्या वृद्ध मुखानें । सुचविलें सकलां बहु प्रेमानें । गुरुकृपेनें काय तें उणें । होईल सांगा खचितचि ॥६१॥ आतां येथें येईल प्रश्न । की स्वामी यांनींच दाविला सघन । सद्गुरु कोल्लूरी आहे म्हणोन । वृद्धमुखानें म्हणसी तूं ॥६२॥आणिक म्हणतां मातेपरी । शंकराश्रम आपुल्या अंतरी । कळवळोनि धांवे सत्वरी । निजभक्तांसी रक्षाया ॥६३॥ तरी आधींच शिष्यस्वीकार । कां न केला सांगा साचार । तरी ऐका त्याचे उत्तर । तुम्ही भाविक श्रोते हो ॥६४॥ मुलें जरी करिती अपराध । मातेच्या अंतरी नाहीं खेद । परी शिकवाया त्यांसी क्रोध । दावी वरिवरी ती पाहीं ॥६५॥म्हणे नायकें तुमचें वचन । खावया नेदीं तुम्हांलागुन । परी ठेवी लपवून । त्यांसीच द्यावयाकारणें ॥६६॥ जेव्हां तीं येती पताळ्यावरी । आणिक अपराध न करूं निर्धारीं । म्हणोनि रडतां झडकरी । देई कळवळोनि तेधवां ॥६७॥ तैसें केलें सद्गुरुरायें । शंकराश्रमस्वामी - सदयें । बुद्धीवर यावया जनांसी पाहें । बळेंचि शिष्य नच केला ॥६८॥ जेव्हां जनांसी जाहला अनुताप । तेव्हां आपुलें परमस्वरूप । शंकराश्रम मायबाप । निजभक्तांवरी ओळले ॥६९॥ आधींच सिद्ध करोनि स्वामी । ठेविले होते कोल्लूर ग्रामीं । शरण येतां भक्त निष्कामी । दाविले तत्काल त्या समयीं ॥७०॥ साक्षात् अवतरे शंकर खचित । बळेंचि लपवुनी ठेविला जगांत । मातेचा जो दिधला दृष्टांत । त्यापरी केलें सद्गुरूंनीं ॥७१॥ जाहले म्हणोनि समाधिस्थ । न पावे त्यांचा आत्मा अस्त । असती व्यापक निश्चयें सतत । सद्गुरुस्वामी ते पाहीं ॥७२॥ महिमा तयांची न जाय कोठें । म्हणोनि दाविलें महत्त्व मोठें । कांहीं केल्या लिंग न फुटे । विरेना तें मृत्तिकेचें पैं ॥७३॥ घेतली समाधि म्हणोनि पाहीं । महिमा न जाय कुठें कांहीं । अज्ञपणें मानव म्हणे नाहीं । सद्गुरुस्वामी ते पाहीं ॥७४॥ ज्याच्या चित्तीं असे भाव । त्यासी सदा दिसे देव । नातरी तो सद्गुरुराव । सन्मुख असतांही दिसेना ॥७५॥ चित्त असे आमुचें मलिन । म्हणोनि न दिसे आम्हांलागुन । संनिध असतां सद्गुरु जाण । भावितों मनुष्य ऐसें त्यां ॥७६॥ अणुमात्र नसावी मनुष्यभावना । यामाजीं विचारचि करावा जाणा । न लागे विचारावें कवणा । मनामाजींच करावा ॥७७॥ विचार करितां समजेल आपणा । मनुष्य नव्हे सद्गुरुराणा । बघतां तयाच्या सद्गुणा । सहजचि समजेल मानवा पैं ॥७८॥ जो असेल खरा भक्त । त्यासीच कळे सद्गुरु समर्थ । देवचि ऐसा भाव निश्चित । धरी त्या ठायीं तो सर्वदा ॥७९॥ ज्यासी होय पित्तज्वर । त्याची जिव्हा कडवट समग्र । मुखीं घालितां पदार्थ रुचिकर । म्हणे कडू हें सकळही ॥८०॥ तैसें ज्याचें चित्त मलिन । त्यासी सद्गुरूचे गुणदोष जाण । दिसती अमित याचिकारण । मनुष्य समजोनि दवडिती ॥८१॥ आपुली जीभ कडू म्हणोन । लागे कडू सकलही जाण । तैसें आपुल्याकडे असतां दुर्गुण । साधूंसी लाविती ते दोष ॥८२॥ म्हणती पदार्थचि कडू सर्व । तैसें साधूंसी म्हणती असे गर्व । बहुत ढोंगी निष्ठुर स्वभाव । ऐसें वाटे आपुल्यापरी ॥८३॥ ज्याचें असे चित्त शुद्ध । त्यासी सद्गुरु देवचि दिसे प्रसिद्ध । तोचि भोगी निजानंद । न ढळे कदापि तो मनीं ॥८४॥ न पाही कदापि गुणदोष त्यांचे । ते जें सांगती आपुल्या वाचे । तेंचि प्रमाण तया साचें । त्यावरी संशया ना दुसरा ॥८५॥ अन्य न बघे तो सद्गुरूवांचून । सारें जगचि गुरुरूप जाण । गुरुवांचोनि त्यासी आन । देव खचितचि नाहीं पैं ॥८६॥ जेथें जाय आपुलें मन । तेथे सद्गुरूचि दिसे पूर्ण । ऐशिया भक्तालागुन । म्हणती 'सद्भक्त' खचित पैं ॥८७॥ असो आतां बहुत कासया । बोलतां जाईल वेळही वायां । त्यापरीच आम्हींही गुरुराया । भजावें तरीच सार्थक पैं ॥८८॥ जरी आम्हां नाहीं भक्ति । बळेंचि आणावी आम्हीं ती । मग येईल सहजगतीं । दृढतर भक्ति निर्धारें ॥८९॥ कित्येकांचा प्रेमा बहुत । नाहीं तैसा आम्हांप्रत । म्हणतां जुलुमेंचि आणावा तरी त्यांत । कैसा आणावा सांगा पैं ॥९०॥ ऐका उत्तर कैसें तें हैं । श्रीगुरु जें बोधीत आहे । प्रवचनादि करूनि पाहें । तें लक्ष देऊनि ऐकावें ॥९१॥ करावें नेमानें श्रवण । जेथें मिळेल तेथें जाण । कळो न कळो तरी जावोन । करिती प्रवचन तें परिसावें ॥९२॥ यावरी ऐसा येईल प्रश्न । न कळतांचि करुनी श्रवण । काय त्याचें प्रयोजन । त्याचें परिसा उत्तर पैं ॥९३॥ श्रवणाचा गुण पापदहन । न कळतां जरी केले श्रवण । तरी पाप सारें होय हरण । नसे संशय यामाजीं ॥९४॥अग्नीचा गुणचि पोळावयाचा । न कळतांचि जरी पाय आमुचा । पडे त्यावरी तरीही साचा । पोळल्यावीण न राहे ॥१५॥ तैसें करितां पुराणश्रवण । जरी ना कळे आम्हांलागून । अथवा लक्ष नसे तेथें जाण । तरीही पाप दहन होय ॥९६॥ श्रवणाचा गुगचि पापदहन । होतसे खचितचि, नसे अनुमान । पाप गेलिया सर्वही पूर्ण । येई गुरुभक्ति दृढतर ती ॥९७॥ जरी न मिळे गुरुमुखें श्रवण । तरी कोणी सांगती तेथे जावोन । परिसावें तेंचि सद्गुरु कृपाघन । सांगती ऐसें समजोनि ॥९८॥ तेंही न मिळे जरी एकासी । तरी त्यानें ग्रंथ आपुल्याशीं । उपास्यमूर्ति - सन्मुखेंसीं । गुरु त्या मानोनि वाचावा ॥९९॥ आपणचि मुखें वाचावें । परी गुरु सांगती ऐसें भावावें । गुरुभावचि तारक स्वभावें । गुरूपरिस जाणा हो ॥१००॥ जरी ना समज वाचावयासी । तरी करावें आपुल्या मानसीं । नामस्मरण तेंही नाशी । पाप सारें निर्धारें ॥१०१॥ एवं पाप नामतां संपूर्ण । सगुरुभक्ति जडेचि जाण । गुरुवांचोनि न दिसे आन । काय सांगूं ती नवलाई ॥१०२॥ गुरुभक्ति होतां दृढतर । होय आत्मज्ञान साचार । म्हणोनि बळेंचि करावी भक्ति थोर । नच तरी अंगीं आणावी ती ॥१०३॥ करितां अभ्यास वारंवार । उपजे भक्ति साचार । असो आतां आठवूं सत्वर । श्रीगुरुचे चरण पैं ॥१०४॥ शंकराश्रम द्वितीयस आश्रम । झालें अवतारकार्य सुगम । दाविला जनांसी मार्ग उत्तम । सुलभ करोनि सकलांसी ॥१०५॥ यापरी करोनि प्रेमानें त्यांनीं । शके सोळाशें बेचाळपासुनी । एकोण्यायशींवरी जगीं राहुनी । स्वधर्म - राज्य चालविलें ॥१०६॥ पुढील अध्यायीं तृतीय आश्रम । परिज्ञानाश्रम सद्गुरु परम । सद्गुणी माउली चालवील स्वधर्म - । राज्य सारस्वतवृंदाचें ॥१०७॥ त्यांची कथा परम सुरस । महिमा असे अगाध विशेष । ऐकतां होईल चित्त खास । तल्लीन प्रेमळ भक्तांचे ॥१०८॥ आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें एकादश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०९॥ स्वस्ति श्रीचित्रापुर -। गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां चित्त होय एकाग्र । एकादशाध्याय रसाळ हा ॥११०॥ अध्याय ॥११॥ ओव्या ॥११०॥ ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP