माघशुक्लचतुर्थीतिलचतुर्थी साप्रदोषव्यापिनीग्राह्या माघशुक्लचतुर्थ्यांतुनक्तव्रतपरायणाः येत्वांढुंढेऽर्चयिष्यंतितेर्च्याः स्युरसुरद्रुहामितिकाशीखंडात् माघमासेचतुर्थ्यांतुतस्मिनकालउपोषितः अर्चयित्वातुयोदेविजागरंतत्रकारयेदितित्रिस्थलीसेतौलैंगाच्च इयमेवकुंदचतुर्थी साप्रदोषव्यापिनीग्राह्या माघशुक्लचतुर्थ्यांतुकुंदपुष्पैः सदाशिवम् संपूज्ययोहिनक्ताशीसप्राप्नोतिश्रियंनर इति कालादर्शेकौर्मोक्तेः माघशुक्लपंचमीश्रीपंचमी तदुक्तंहेमाद्रौवाराहे माघशुक्लचतुर्थ्यांतुवरमाराध्यचश्रियः पंचम्यांकुंदकुसुमैः पूजां कुर्यात्समृद्धये इयंमाधवमतेपूर्वा हेमाद्रिमतेपरा चैत्रशुक्लेश्रीपंचमीतिदिवोदासः ।
माघशुक्ल चतुर्थी ही तिलचतुर्थी. ती प्रदोषव्यापिनी घ्यावी. कारण, “ हे ढुंढादेवि ! माघ शुक्लचतुर्थीस नक्तव्रत करणारे असून तुझी पूजा करितील ते देवांस पूज्य होतील ” असें काशीखंडवचन आहे. आणि “ हे देवि ! माघमासांत चतुर्थीस प्रदोषकालीं उपोषित राहून पूजन करुन त्या कालीं जागरण करावें ” असें त्रिस्थलीसेतूंत लिंगपुराणवचनही आहे. हीच कुंदचतुर्थी होय. ती प्रदोषव्यापिनी घ्यावी. कारण “ जो मनुष्य माघशुक्ल चतुर्थीस कुंदपुष्पांनीं सदाशिवाची पूजा करुन नक्तभोजन करितो त्याला लक्ष्मी प्राप्त होते ” असें कालादर्शांत कूर्मपुराणवचन आहे. माघशुक्ल पंचमी ही श्रीपंचमी होय. तें सांगतो हेमाद्रींत वाराहांत - “ माघशुक्ल चतुर्थीस लक्ष्मीचें उत्तम आराधन करुन पंचमीस कुंदपुष्पांनीं पूजा करावी, म्हणजे समृद्धि प्राप्त होते. ” ही पंचमी माधवाच्या मतीं पहिली ( चतुर्थीयुक्त ) घ्यावी. हेमाद्रीच्या मतीं परा ( षष्ठीयुक्त ) घ्यावी. चैत्र शुक्ल पक्शांत श्रीपंचमी होते, असें दिवोदास सांगतो.