श्रवणद्वादशी .
इयमेवश्रवणद्वादशी तत्रैकादश्यांद्वादशीश्रवणयोगेसैवोपोष्या एकादशीद्वादशीचवैष्णव्यमपितत्रचेत् तद्विष्णुशृंखलंनामविष्णुसायुज्यकृद्भवेदिति विष्णुधर्मोक्तेः नारदीयेपि संस्पृश्यैकादशींराजन् द्वादशींयदिसंस्पृशेत् श्रवणंज्योतिषांश्रेष्ठंब्रह्महत्यांव्यपोहति द्वादशीश्रवणस्पृष्टास्पृशेदेकादशींयदि सएववैष्णवोयोगोविष्णुशृंखलसंज्ञित इतिहेमाद्रौमात्स्योक्तेश्च दिनद्वयेद्वादशीश्रवणयोगेपिपूर्वा निर्णयामृतेत्वस्यपूर्वार्धमन्यथापठितं द्वादशीश्रवणर्क्षंचस्पृशेदेकादशींयदीति तेनहेमाद्रिमते एकादश्याः श्रवणयोगाभावेपितद्युक्त द्वादशीयोगमात्रेणविष्णुशृंखलंभवति निर्णयामृतमतेतु श्रवणस्यैकादशीद्वादशीभ्यांयोगएवविष्णुश्रृंखलंनान्यथेति यदानिशीथानंतरंसूर्योदयावधिद्विकलामात्रमपिश्रवणर्क्षंभवतितदापिपूर्वैव तदुक्तंतत्रैवनारदीये इमांप्रकृत्य तिथिनक्षत्रयोर्योगोयोगश्चैवनराधिप द्विकलोयदिलभ्येतसज्ञेयोह्यष्टयामिक इति द्वादशीश्रवणस्पृष्टाकृत्स्नापुण्यतमातिथिः नतुसातेनसंयुक्तातावत्येवप्रशस्यत इतिमदनरत्नेमात्स्याच्च दिवोदासीयेतु रात्रेः प्रथमपादेचेच्छ्रवणंहरिवासरे तदापूर्वामुपवसेत्प्रातर्भांतेचपारणमित्युक्तं इदंतुनिर्मूलत्वात्पूर्वविरोधाच्चोपेक्ष्यं इयंबुधवारेतिप्रशस्ता बुधश्रवणसंयुक्तासैवचेद्दूदशीभवेत् अत्यंतमहतीसास्याद्दत्तंभवतिचाक्षयमिति हेमाद्रौस्कांदात् ।
हीच श्रवणद्वादशी होय . त्या श्रवणद्वादशीचा निर्णय असा - एकादशीस श्रवणाचा आणि द्वादशीचा योग असतां त्या दिवशींच उपोषण करावें . कारण , " जर एक दिवशीं एकादशी , द्वादशी आणि श्रवणनक्षत्र हीं तीनही असतील , तर त्या योगाला विष्णुशृंखल म्हटलें आहे , तो योग विष्णूचें सायुज्य देणारा होतो , असें विष्णुधर्मांत वचन आहे . नारदीयांतही - " सर्वांमध्यें श्रेष्ठ असें श्रवणनक्षत्र जर एकादशीस स्पर्श करुन द्वादशीस स्पर्श करील तर तें - उपोषणाच्या योगानें - ब्रह्महत्या दूर करितें . " " श्रवणानें स्पर्श केलेली द्वादशी जर एकादशीस स्पर्श करील तर तोच विष्णुशृंखल नांवाचा वैष्णवयोग आहे " असें हेमाद्रींत मात्स्यवचनही आहे . दोन दिवस द्वादशी व श्रवण यांचा योग असतांही पूर्वा करावी . निर्णयामृतांत तर ‘ द्वादशी श्रवणस्पृष्टा स्पृशेदेकादशीं यदि ’ या स्थानीं ‘ द्वादशी श्रवणर्क्षं च स्पृशेदेकादशीं यदि ’ असा पाठ केलेला आहे . म्हणजे द्वादशी आणि श्रवणनक्षत्र हीं दोन जर एकादशीस स्पर्श करतील तर तो विष्णुशृंखलयोग होतो . यावरुन हेमाद्रीच्या मतीं एकादशीस श्रवणयोग नसला तरी श्रवणयुक्त द्वादशीचा योग एकादशीस असला म्हणजे विष्णुशृंखलयोग होतो . निर्णयामृताच्या मतीं तर श्रवणाला एकादशी व द्वादशी या दोघांचा योग असेल तरच विष्णुशृंखलयोग होतो , अन्यथा होत नाहीं . जेव्हां मध्यरात्रीनंतर सूर्योदयाच्या आंत दोन कलाही श्रवणनक्षत्र असेल तेव्हां देखील पूर्वाच करावी . तें तेथेंच नारदीयांत - ह्या श्रवणद्वादशीचा उपक्रम करुन सांगतो - " तिथि व नक्षत्र यांचा योग हा दोन कला योग जर मिळेल तर तो आठ प्रहर योग जाणावा . " आणि " श्रवणानें स्पर्श केलेली द्वादशी तिथि ती सारी पुण्यकारक आहे . श्रवणानें युक्त जितकी द्वादशी तितकीच पुण्यकारक आहे , असें नाही " असें मदनरत्नांत मात्स्यवचनही आहे . दिवोदासीयांत तर - " जर एकादशीचे दिवशीं रात्रीच्या पहिल्या प्रहरीं श्रवण असेल - अर्थात् दुसर्या दिवशीं द्वादशी व श्रवण असेल - तर पूर्व दिवशीं उपवास करावा , आणि दुसर्या दिवशीं प्रातःकाळीं नक्षत्र संपल्यावर पारणा करावी " असें सांगितलें आहे . हें वचन निर्मूल असल्यामुळें व ‘ तिथिनक्षत्रयोर्योगो० ’ इत्यादि पूर्ववचनाचा विरोध येत असल्यामुळें उपेक्षणीय ( अस्वीकार्य ) आहे . ही श्रवणद्वादशी बुधवारीं असेल तर अतिप्रशस्त आहे . कारण , ‘‘ तीच द्वादशी बुधवार व श्रवण यांनीं युक्त असेल तर ती अतिशय मोठी आहे . त्या दिवशीं दान केलेलें अक्षय होतें . " असें हेमाद्रींत स्कांदवचन आहे .
यानितुपठंति उत्तराषाढसंयुक्ताश्रोणामध्याह्नगापिवा आसुरीसैवतारास्याद्धंतिपुण्यंपुराकृतं उदयव्यापिनीग्राह्याश्रोणाद्वादशिकायुता विश्वर्क्षसंयुतासाचनैवोपोष्याशुभेप्सुभिरित्यादीनिविष्णुधर्मस्कांदभविष्यादिवचनानि तानिनिर्मूलानि यदपिस्मृत्यर्थसारेउदयव्यापिनीग्राह्येत्युक्तं यच्चबृहन्नारदीयेउदयव्यापिनीग्राह्याश्रवणद्वादशीव्रत इति तद्यदाशुद्धाधिकाद्वादशीपरदिनंएवोदयेश्रवणयोगः पूर्वेह्निचतद्भिन्नेकालेयोगस्तत्परम् दिनद्वयेउदययोगेपूर्वैव बहुकर्मकालव्याप्तेरित्युक्तंमदनरत्ने यदात्वेकादश्येवश्रवणयुतानद्वादशीतदापिपूर्वैव यदानप्राप्यतेऋक्षंद्वादश्यांवैष्णवंक्कचित् एकादशीतदोपोष्यापापघ्नीश्रवणान्वितेतिमदनरत्नेनारदीयोक्तेः यदापरैवर्क्षयुतातदापरा तत्रशक्तेनोपवासद्वयंकार्यं एकादशीमुपोष्यैवद्वादशींसमुपोषयेत् नचात्रविधिलोपः स्यादुभयोर्दैवतंहरिरिति भविष्योक्तेः यत्तुविष्णुधर्में पारणांतंव्रतंज्ञेयंव्रतांतेविप्रभोजनं असमाप्तेव्रतेपूर्वेनैवकुर्याद्व्रतांतरमिति तदेतद्भिन्नपरं अत्रगौडाः श्रृणुराजन्परंकाम्यंश्रवणद्वादशीव्रतमितिस्थूलशीर्षवचनात्काम्यमेवेदम् तेनाशक्तस्यनित्यैकादशीव्रतमेवेतिमन्यंते द्वादश्यामुपवासेनशुद्धात्मानृपसर्वशः
आतां जीं कोणी सांगतात कीं , " उत्तराषाढायुक्त श्रवणतारा मध्याह्नव्यापिनी असली तरी ती तारा आसुरी आहे , ती पूर्वी केलेलें पुण्य घालविते . द्वादशीनें युक्त श्रवणतारा ( नक्षत्र ) उदयव्यापिनी घ्यावी . तीच श्रवणतारा उत्तराषाढायुक्त अशी असतां तिचें उपोषण कल्याणेच्छूंनीं करुं नये . " इत्यादिक विष्णुधर्म - स्कंदपुराण - भविष्यपुराणादिकवचनें तीं निर्मूल होत . आतां जें स्मृत्यर्थसारांत उदयव्यापिनी श्रवणद्वादशी घ्यावी असें सांगितलें आहे , आणि जें बृहन्नारदीयांत - " व्रताविषयीं श्रवणद्वादशी उदयव्यापिनी घ्यावी . " तें सांगणें जेव्हां पूर्वदिवशीं द्वादशी संपूर्ण असून दुसर्या दिवशींच वाढलेल्या द्वादशीस सूर्योदयकालीं श्रवणयोग असेल व पूर्वदिवशीं उदयभिन्नकालीं श्रवणयोग असेल तद्विषयक आहे . दोन दिवस उदयकालीं श्रवण असतां पूर्वाच करावी . कारण , पूर्वदिवशीं बहुत कर्मकालाला श्रवणद्वादशीची व्याप्ति आहे , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . जेव्हां तर एकादशीच श्रवणयुक्त आहे , द्वादशी श्रवणयुक्त नाहीं तेव्हां देखील पूर्वाच करावी . कारण , " जेव्हां श्रवणनक्षत्राचा योग द्वादशीस मुळींच नसेल तेव्हां श्रवनयुक्त एकादशीस उपोषण करावें , ती पापनाश करणारी आहे " असें मदनरत्नांत नारदीयवचन आहे . जेव्हां दुसर्या दिवशींच श्रवणयुक्त द्वादशी असेल तेव्हां पराच करावी . त्या वेळीं सशक्तानें दोन उपवास करावे . कारण , " एकादशीस उपोषण करुनच द्वादशीचें उपोषण करावें . आतां एकादशीव्रत व द्वादशीव्रत हीं दोन व्रतें भिन्न असल्यामुळें एकाची समाप्ति झाल्यावांचून दुसरें केलें असतां व्रतविधीचा विघात होईल ? असें म्हणूं नये ; कारण , दोन्ही व्रतांची देवता हरि ( विष्णु ) आहे . " असें भविष्यपुराणवचन आहे . आतां जें विष्णुधर्मांत - " पारणा होईपर्यंत व्रत समजावें . व्रत समाप्त झाल्यावर ब्राह्मणभोजन करावें . पहिलें व्रत समाप्त झाल्यावांचून दुसरें व्रत करुं नयेच " असें वचन , तें हें व्रत सोडून इतरव्रतविषयक आहे . या स्थलीं गौड ग्रंथकार - " हे राजा ! दुसरें काम्य असें श्रवणद्वादशीव्रत सांगतो , श्रवण कर . " ह्या स्थूलशीर्षवचनावरुन हें श्रवणद्वादशीव्रत काम्यच आहे . यावरुन अशक्त मनुष्याला एकादशीव्रतच नित्य आहे . आणि द्वादशीव्रत काम्य आहे असें मानितात . आणि " हे राजा ! द्वादशीस उपवास केल्यानें सर्व प्रकारानें आत्मा शुद्ध होऊन अनुपम चक्रवर्तित्व आणि उत्तम संपत्ति यांतें पावतो " ह्या गौडनिबंधांतील मात्स्यवचनावरुनही हें द्वादशीव्रत काम्य असें होत आहे . दक्षिणेकडील विद्वान् तर - " एकादशीस भोजन करुन द्वादशीस उपवास केल्यानें दोन्ही व्रतांचें सारें पुण्य निःसंशय प्राप्त होतें " ह्या वराह - वामनपुराणवचनावरुन श्रवणद्वादशीव्रतच नित्य आहे , असें सांगतात . आतां ह्या वचनांत " एकादशीस भोजन करुन " असें सांगितलें तें ‘ फलादि आहार करुन ’ असें समजावें . ‘ अन्नभोजन करुन ’ असें समजूं नये . कारण , ‘ अन्नाश्रित पापें आहेत , तीं एकादशीस अन्न खाणारास प्राप्त होतात . ’ या वचनेंकरुन एकादशीस भोजनाचा निषेध आहे . आणि " मनुष्यास दोन उपवास करण्याची शक्ति जर नसेल तर पहिल्या दिवशीं फलाहार करुन दुसर्या दिवशीं निराहार कारावा " असें दिवोदासीयांत भविष्यवचनही आहे . दोन उपवासांविषयीं अशक्त असून ज्यानें एकादशीव्रत घेतलें आहे त्याला सांगतो - मात्स्यांत - " शुक्लपक्षांतील द्वादशीस जर श्रवण नक्षत्र असेल तर त्या वेळीं एकादशीचें उपोषण करुन द्वादशीचे दिवशीं हरीची पूजा करावी " अर्थात् द्वादशीस उपवास करुं नये . एकादशीव्रत ग्रहण केलेलें नसेल तर एकादशीस भोजन करुन द्वादशीचें उपोषण करावें . कारण , " एकादशीस भोजन करुन द्वादशीस उपवास करावा , म्हणजे पूर्व दिवसाचें सारें पुण्य निःसंशय प्राप्त होतें " असें नारदीयवचन आहे .
पारणंतूभयांतेन्यतरांतेवाकुर्यात् तिथिनक्षत्रनियमेतिथिभांतेचपारणमितिस्कांदात् तिथिनक्षत्रसंयोगेउपवासोयदाभवेत् पारणंतुनकर्तव्यंयावन्नैकस्यसंक्षय इतिनारदीयादितिहेमाद्रिः यद्यप्यत्रनक्षत्रमात्रांतेपिपारणंप्रतिभाति तथापितिथिमात्रांतेज्ञेयम् नत्वृक्षांतेतिथिमध्येपि याः काश्चित्तिथयः प्रोक्ताः पुण्यानक्षत्रयोगतः ऋक्षांतेपारणंकुर्याद्विनाश्रवणरोहिणीमिति विष्णुधर्मे श्रवणांतमात्रेपारणनिषेधात् रोहिण्यांतु भांतेकुर्यात्तिथेर्वापिइतिवह्निपुराणात् तदंतेप्यस्तुनत्वत्रैवमस्तीतिनऋक्षांतोनुकल्प इतिमदनरत्ने असंभवेतु तिथ्यंतेतिथिभांतेवापारणंयत्रचोदितम् यामत्रयोर्ध्वगामिन्यांप्रातरेवहिपारणेतिज्ञेयम् यत्तुमदनरत्ने द्वादशीवृद्धौश्रवणवृद्धौवाश्रवणांतएवपारणंकुर्यात् पारणंतिथिवृद्धौतुद्वादश्यामुडुसंक्षयात् वृद्धौकुर्यात्रयोदश्यांतत्रदोषोनविद्यत इतिवह्निपुराणादित्युक्तम् तत्प्रकरणादेतस्यामेवश्रवणयुक्तैकादश्यांविहितविजयैकादशीव्रतपरंनतुश्रवणद्वादशीपरमितिमदनरत्ने गौडास्तुश्रवणद्वादशीपरमाहुः ।
ह्या श्रवणद्वादशीव्रताची पारणा तर - श्रवण व द्वादशी दोन्ही संपल्यावर किंवा दोघांपैकीं एक संपल्यावर करावी . कारण , " तिथि व नक्षत्र यांच्या निमित्तानें उपवास असतां तिथि व नक्षत्र संपल्यावर पारणा करावी " असें स्कांदवचन आहे . आणि " जेव्हां तिथि व नक्षत्र यांच्या संयोगाचा उपवास असेल तेव्हां जोंपर्यंत एकाची समाप्ति झाली नाहीं तोंपर्यंत पारणा करुं नये " असें नारदीय वचन आहे , असें हेमाद्रि सांगतो . आतां जरी येथें या वचनावरुन केवळ नक्षत्र संपल्यावरही पारणा करावी असें दिसतें , तरी एक संपल्यावर म्हणजे तिथि संपल्यावर पारणा जाणावी . नक्षत्र संपल्यावर तिथि असेल तर तिथीमध्यें ( द्वादशीमध्यें ) ही पारणा समजूं नये . कारण , " ज्या कोणत्या तिथि नक्षत्रयोगानें पुण्यकारक म्हणून सांगितल्या त्या तिथींची पारणा नक्षत्र संपल्यावर करावी ; पण श्रवण व जन्माष्टमीसंबंधी रोहिणी हीं दोन नक्षत्रें वर्ज्य करुन हा निर्णय समजावा " असा विष्णुधर्मांत केवळ श्रवण संपल्यावर द्वादशी असतां पारणेचा निषेध केला आहे . रोहिणीविषयीं तर " नक्षत्रांतीं पारणा करावी , किंवा जन्माष्टमीच्या अंतीं पारणा करावी " ह्या अग्निपुराणवचनावरुन केवळ नक्षत्रांतीं सुद्धां पारणा असो . तशी या ठिकाणीं ( श्रवणद्वादशीव्रतांत ) केवळ नक्षत्रांतींच पारणा नाहीं ; म्हणून नक्षत्रांतीं पारणा , हा अनुकल्प ( कनिष्ठपक्ष ) असें समजूं नये ; अर्थात् श्रवणांतींच पारणा हा मुळींच पक्ष नाहीं , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . आतां जें मदनरत्नांत - द्वादशीची वृद्धि किंवा श्रवणाची वृद्धि असतां श्रवणांतींच पारणा करावी . कारण , " द्वादशीचे दिवशीं तिथीची वृद्धि असतां नक्षत्र संपल्यावर द्वादशींत पारणा करावी . आणि नक्षत्राची ( श्रवणाची ) वृद्धि असेल तर ( द्वादशी संपल्यावर ) त्रयोदशींत पारणा करावी , त्याविषयीं दोष नाहीं " असें वह्निपुराणवचन आहे , असें सांगितलें तें प्रकरणावरुन ह्याच श्रवणयुक्त एकादशीस विहित जें विजयैकादशीव्रत तद्विषयक आहे . श्रवणद्वादशीव्रतविषयक नाहीं , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . गौड तर - हें वचन श्रवणद्वादशीव्रतविषयक आहे , असें सांगतात .