मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
देवीनवरात्र

द्वितीय परिच्छेद - देवीनवरात्र

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथाश्विनशुक्लप्रतिपदिनवरात्रारंभः तन्निर्णयः तत्रभार्गवार्चनदीपिकायांदेवीपुराणेसुमेधाउवाच शृणुराजन्प्रवक्ष्यामिचंडिकापूजनक्रमम् ‍ आश्विनस्यसितेपक्षेप्रतिपत्सुशुभेदिने इत्युपक्रम्योक्तम् ‍ शुद्धेतिथौप्रकर्तव्यंप्रतिपच्चोर्ध्वगामिनी आद्यास्तुनाडिकास्त्यक्त्वाषोडशद्वादशापिवा अपराह्णेचकर्तव्यंशुद्धसंततिकांक्षिभिः इदंचापराह्णयोगिन्याः प्राशस्त्यंद्वितीयदिनेप्रतिपदोभावेज्ञेयम् ‍ तथातत्रैवदेवीपुराणेडामरतंत्रेचदेवीवचः अमायुक्तानकर्तव्याप्रतिपत्पूजनेमम मुहूर्तमात्राकर्तव्याद्वितीयादिगुणान्विता आद्याः षोडशनाडीस्तुलब्ध्वायः कुरुतेनरः कलशस्थापनंतत्रह्यरिष्टंजायतेध्रुवं मार्कंडेयदेवीपुराणयोः पूर्वविद्धातुयाशुक्लाभवेत्प्रतिपदाश्विनी नवरात्रव्रतंतस्यांनकार्यंशुभमिच्छता देशभंगोभवेत्तत्रदुर्भिक्षंचोपजायते नंदायांदर्शयुक्तायांयत्रस्यान्ममपूजनमिति स्कांदेपि प्रतिपद्याश्विनेमासिसाशुद्धाशुभदाभवेत् ‍ भाद्रपंचदशीकृष्णातयायुक्तानशस्यते विरुद्धफलदासाहिपुत्रदारभयावहेति तथा वर्जनीयाप्रयत्नेन अमायुक्तातुपार्थिव द्वितीयादिगुणैर्युक्ताप्रतिपत्सर्वकामदा तथादेवीपुराणे योमांपूजयतेनित्यंद्वितीयादिगुणान्विताम् ‍ प्रतिपच्छारदींज्ञात्वासोश्नुतेसुखमव्ययम् ‍ यदिकुर्यादमायुक्तांप्रतिपत्स्थापनेमम तस्यशापायुतंदत्वाभस्मशेषंकरोम्यहम् ‍ आग्रहात्कुरुतेयस्तुकलशस्थापनंमम तस्यसंपद्विनाशः स्याज्जेष्ठः पुत्रोविनश्यति अमायुक्तानकर्तव्याप्रतिपच्चंडिकार्चने धनार्थिभिर्विशेषेणवंशहानिश्चजायते नदर्शकलयायुक्ताप्रतिपच्चंडिकार्चने उदयेद्विमुहूर्तापिग्राह्यासोदयदायिनीति देवीपुराणे याचाश्वयुजिमासेस्यात्प्रतिपद्भद्रयान्विता शुद्धाममार्चनंतस्यांशतयज्ञफलप्रदम् ‍ रुद्रयामले अमायुक्तासदाचैवप्रतिपन्निंदितामता तत्रचेत्स्थापयेत्कुंभंदुर्भिक्षंजायतेध्रुवं प्रतिपत्सद्वितीयातुकुंभारोपणकर्मणीति यद्यपिरुद्रयामलंडामरंचनिर्मूलंतथाप्यविरोधात् ‍ प्रचाराच्चतद्वचनानिलिख्यंते तिथितत्त्वेदेवीपुराणेपि प्रातरावाहयेद्देवींप्रातरेवप्रवेशयेत् ‍ प्रातः प्रातश्चसंपूज्यप्रातरेवविसर्जयेत् ‍ तत्रैव शरत्कालेमहापूजाक्रियतेयाचवार्षिकी साकार्योदयगामिन्यांनतत्रतिथियुग्मता तथाकुहूकाष्ठोपसंयुक्तांवर्जयेत्प्रतिपत्तिथिम् ‍ राज्यनाशायसाप्रोक्तानिंदिताचाश्वपूजन इति।

आतां आश्विनशुक्ल प्रतिपदेस देवीनवरात्रारंभ होय . त्याचा निर्णय - त्याविषयीं भार्गवार्चनदीपिकेंत - देवीपुराणांत - सुमेधा सांगतो - " हे राजा , चंडिकेच्या पूजनाचा क्रम सांगतों , श्रवण कर ! आश्विन शुक्ल पक्षीं प्रतिपदेस शुभ दिवशीं " असा उपक्रम करुन सांगतो - " तें नवरात्र शुद्ध तिथीस करावें . प्रतिपदा ऊर्ध्वगामिनी असतां शुद्ध संतति इच्छिणार्‍यांनीं पहिल्या सोळा किंवा बारा घटिका सोडून अपराह्णीं करावें . " ही जी अपराह्णव्यापिनी प्रतिपदा प्रशस्त सांगितली ती दुसर्‍या दिवशीं प्रतिपदा नसतां जाणावी . तसें तेथेंच ( भार्गवार्चनदीपिकेंत ) देवीपुराणांत व डामरतंत्रांत देवीवाक्य - " माझ्या पूजेविषयीं अमावास्यायुक्त प्रतिपदा घेऊं नये . द्वितीयादि गुणांनीं युक्त अशी मुहूर्तमात्र जरी प्रतिपदा असली तथापि तीच घ्यावी . पहिल्या सोळा घटिकांत जो मनुष्य कलशस्थापन करितो तेथें निश्चयानें अरिष्ट होतें . " मार्केंडेय देवीपुराणांत - " शुभ इच्छिणारानें पूर्वविद्धा ( अमावास्यायुक्त ) जी आश्विनशुक्ल प्रतिपदा तिचे ठायीं नवरात्रव्रत करुं नये ; कारण , दर्शयुक्त प्रतिपदेस जेथें माझें पूजन होतें तेथें देशभंग होतो व दुर्भिक्षही होतें . " स्कंदपुराणांतही - " आश्विनमासांत जी प्रतिपदा शुद्ध ती शुभदायक होईल . भाद्रपद कृष्ण अमावास्यायुक्त प्रतिपदा प्रशस्त नाहीं . कारण , ती विपरीत फल देणारी पुत्र , स्त्रिया यांस भयावह होतें . " तसेंच " हे राजा ! अमायुक्त प्रतिपदा प्रयत्नानें वर्ज्य करावी . व द्वितीयादि गुणांनीं युक्त प्रतिपदा सर्व मनोरथ देणारी होय . " तसेंच देवीपुराणांत - " द्वितीयादि गुणयुक्त अशी शारदीप्रतिपदा जाणून जो माझें पूजन नित्य करितो तो अविनाशी सुख पावतो . जर अमायुक्त प्रतिपदेस माझें स्थापन करील तर त्यास मी हजारों शाप देऊन भस्म करीन . जो आग्रहानें माझें कलशस्थापन ( अमायुक्तप्रतिपदेस ) करतो त्याच्या संपत्तीचा नाश होतो व ज्येष्ठपुत्राचा नाश होतो . चंडिकेच्या पूजनाविषयीं अमायुक्त प्रतिपदा करुं नये ; धनाची इच्छा करणारांनीं तर विशेषेंकरुन न करावी . केली तर वंशहानि होते . कलामात्र दर्शानें युक्तही प्रतिपदा चंडिकापूजनाविषयीं करुं नये . सूर्योदयीं दोन मुहूर्तही प्रतिपदा असेल ती घ्यावी . कारण , ती उत्कर्ष करणारी आहे . " देवीपुराणांत - " आश्विनमासांत द्वितीयेनें युक्त जी प्रतिपदा ती शुद्ध , तिचेठायीं माझें पूजन केलें असतां तें शंभर यज्ञांचें फल देणारें होतें . " रुद्रयामलांत - " अमायुक्त प्रतिपदा सर्वथा निंदित होय . अमायुक्त प्रतिपदेचे ठायीं जर कुंभस्थापन करील तर निश्चयानें दुर्भिक्ष होईल . द्वितीयासहित प्रतिपदा कुंभस्थापनकर्माविषयीं शुभ होय . " जरी रुद्रयामल डामरतंत्र हीं निर्मूल आहेत तरी तीं अविरुद्ध असल्यामुळें व प्रचारांत असल्यामुळें त्यांचीं वचनें लिहिलीं आहेत . तिथितत्त्वांत - देवीपुराणांतही - " प्रातःकालीं देवीचें आवाहन करावें व प्रातःकालीं स्थापन करावें . दररोज प्रातःकालीं पूजन करुन प्रातःकालींच विसर्जन करावें . " तेथेंच - " शरदृतूंत आणि वर्षप्रतिपदेस जी महापूजा करितात , ती उदयव्यापिनी तिथीस ( प्रतिपदेस ) करावी . त्या पूजेविषयीं युग्मवाक्यानें अमावास्यायुक्त प्रतिपदा घेऊं नये . " तसेंच " काष्ठा ( कलेचा तिसावा भाग ) प्रमाणही अमावास्यायुक्त प्रतिपदा वर्ज्य करावी . कारण , ती राज्यनाशाकरितां होते , आणि अश्वपूजेविषयीं ती निंदित आहे . "

एषुवचनेषुकलशस्थापनग्रहणात् ‍ तदेवप्रथमदिनेनिषिध्यतेनतूपवासादि तस्य प्रतिपद्यप्यमावास्येति युग्मवाक्यात् ‍ शुक्लास्यात्प्रतिपत्तिथिः प्रथमतइति दीपिकोक्तेः शुक्लपक्षेदर्शविद्धेतिमाधवोक्तेश्च पूर्वदिने प्राप्तस्यबाधेमानाभावादितिकेचित् ‍ वस्तुतस्तुपूर्वोक्तवाक्येषुचंडिकार्चनपूजाग्रहणादुपवासादेश्चांगत्वात्प्रधानदेवीपूजादावपिपरेतियुक्तं कलशस्थापनग्रहणंतूपलक्षणम् ‍ अतएवदेवलः व्रतोपवासनियमेघटिकैकापियाभवेत् ‍ सातिथिस्तद्दिनेपूज्याविपरीतातुपैतृकइति अत्रघटिकामुहूर्त इतिगौडाः यदातुपूर्वदिनेसंपूर्णाशुद्धाच भूत्वापरदिनेवर्धतेतदासंपूर्णत्वादमायोगाभावाच्चपूर्वैव यानिचद्वितीयायोगनिषेधकानिवचनानिकेचित्पठंति तान्यपिशुद्धाधिकनिषेधपराणि परदिनेप्रतिपदोत्यंतासत्त्वेतुदर्शयुतापिपूर्वैवग्राह्या तदाहलल्लः तिथिः शरीरं तिथिरेवकारणंतिथिः प्रमाणंतिथिरेवसाधनमिति यानित्वमायुक्ताप्रकर्तव्येत्यादीनिनृसिंहप्रसादेवचनानितानिसमूलत्वेसत्येतद्विषयाणि अत्रेदंतत्त्वम् ‍ पूर्वोक्तवाक्यानांसर्वेषांहेमाद्याद्यलिखितत्वेननिर्मूलत्वात्तैश्चान्यनिर्णयस्यानुक्तेः सामान्यनिर्णयात् ‍ पूर्वप्राप्तावपि गौडनिबंधेषुविशेषनिर्णयादौदयिकीग्राह्या तत्रापिघटिकैकेत्यस्य द्विमुहूर्तस्तुतित्वोक्तेर्द्विमुहूर्ताग्राह्या उदितेदैवतंभानावित्यत्रद्विमुहूर्तंत्रिरह्नश्चेतिऔदयिक्याद्विमुहूर्तत्वनियमात् ‍ तेन उदयेद्विमुहूर्तापीत्याद्यनुसारोपि मुहूर्तमात्राकर्तव्येतिद्विमुहूर्तस्तुतिः अन्यथाद्विमुहूर्तविधिवैयर्थ्यात् ‍ केचित्तु मुहूर्तमात्रेतिवचनात्ततोन्यूनत्वेपरानेत्याहुः गौडाअप्येवम् ‍ ।

वरील वचनांत कलशस्थापन सांगितल्यामुळें तेंच अमावास्यायुक्त प्रतिपदेस निषिद्ध केलें आहे . उपवासादिक निषिद्ध केलें नाहीं . कारण , ‘ प्रतिपदा व अमावास्या यांचें युग्म महाफलदायक आहे . ’ असें युग्मवाक्य प्रथम परिच्छेदांत सांगितलें असल्यामुळें ; आणि " शुक्लपक्षांतील प्रतिपदा अमायुक्त घ्यावी " असें दीपिकावचन असल्यामुळें ; व " शुक्लपक्षीं ( प्रतिपदा ) दर्शविद्धा करावी " असें माधवाचें ही वचन असल्यामुळें पूर्वदिवशीं जें प्राप्त उपवासादिक त्याचा बाध करण्याविषयीं प्रमाण नाहीं , असें केचित् ‍ म्हणतात . वास्तविक म्हटलें तर - पूर्वोक्त वाक्यांत ‘ चंडिकेचें अर्चन - पूजन ’ असें सांगितल्यामुळें पूजा प्रधान व उपवासादिक त्याचें अंग असल्यामुळें प्रधान अशा देवीपूजादिकांविषयीं देखील परा घ्यावी , हें योग्य आहे . कलशस्थापन म्हटलें तें पूजेचें उपलक्षण होय . म्हणूनच देवल सांगतो - " व्रत , उपवास , नियम यांविषयीं प्रातःकालीं एक घटिकाही जी तिथि असेल ती तिथि त्या दिवशीं पूज्य आहे . पैतृककर्माविषयीं याच्या विपरीत समजावी . " या वचनांत घटिका म्हणजे मुहूर्त समजावा , असें गौड सांगतात . ज्या वेळीं पूर्वदिवशीं संपूर्ण शुद्ध ( ६० घटिका ) असून परदिवशीं वाढलेली असेल त्या वेळीं संपूर्ण असल्यामुळें व अमावास्येचा योग नसल्यामुळें पूर्वाच घ्यावी . जीं द्वितीयायोगनिषेधक वचनें केचित् ‍ सांगतात तीं देखील पूर्वदिवशीं शुद्ध असून दुसर्‍या दिवशीं वाढलेल्या तिथीचा निषेध करणारीं आहेत . दुसर्‍या दिवशीं प्रतिपदा मुळींच नसेल तर दर्शयुक्त असली तरी पूर्वाच घ्यावी . तें सांगतो लल्ल - " कर्माचें शरीर तिथि आहे . कर्माला कारण तिथि आहे . कर्माला प्रमाण तिथि आहे . आणि कर्माला साधन तिथिच आहे . " ह्या चार हेतूंनीं ज्या कर्मास जी तिथि सांगितली ती अवश्य असलीच पाहिजे असें समजावें . आतां जीं " अमावास्यायुक्त प्रतिपदा करावी " इत्यादिक नृसिंहप्रसादांत सांगितलेलीं वचनें तीं समूल असतील तर ह्या ( प्रतिपदाक्षया ) विषयीं समजावीं . येथें खरा प्रकार असा कीं , पूर्वीं सांगितलेलीं वाक्यें हेमाद्रिप्रभृति निबंधकारांनीं न लिहिल्यामुळें तीं सारीं निर्मूळ असल्याकारणानें , व त्या निबंधकारांनीं अन्य निर्णय सांगितला नसल्याकारणानें , सामान्य निर्णयावरुन पूर्वींची प्राप्त असली तरी गौडनिबंधांत विशेष निर्णय केल्यानें उदयव्यापिनी घ्यावी . त्या उदयव्यापिनींतही ‘ एक घटिका ’ असें सांगितलें तें द्विमुहूर्ताची स्तुति आहे , असें सांगितल्यावरुन द्विमुहूर्ता घ्यावी . कारण , प्रथम परिच्छेदांत तिथिनिर्णय प्रकरणीं " उदिते दैवतं भानौ पित्र्यं चास्तमिते रवौ ॥ द्विमुहूर्तं त्रिरह्नश्च सा तिथिर्हव्यकव्ययोः " असें विष्णुधर्मवचन आहे . त्याचा अर्थ - " सूर्योदय झाला असतां दोन मुहूर्त देवांचे आहेत . आणि दिवसाचे शेवटचे तीन मुहूर्त पितरांचे आहेत , म्हणून जी तिथि प्रातःकाळीं दोन मुहूर्त असेल ती देवकर्माविषयीं घ्यावी , आणि जी सायंकालीं तीन मुहूर्त असेल ती पित्र्यकर्माविषयीं घ्यावी . " या वचनानें उदयव्यापिनी म्हणजे द्विमुहूर्ता असा नियम सांगितला आहे . तेणेंकरुन ‘ उदये द्विमुहूर्तापि ग्राह्या ’ ह्या वर सांगितलेल्या देवीपुराणवचनास अनुसरल्यासारखेंही झालें . ‘ मुहूर्तमात्रा कर्तव्या ’ हें वर सांगितलेलें देवीपुराण - डामरतंत्रांतील देवीवचन तें द्विमुहूर्ताची स्तुति आहे . असें नसेल तर ( मुहूर्तमात्र घ्यावयाची असेल तर ) देवीपुराणांत द्विमुहूर्ताचें विधान केलें तें व्यर्थ होईल . केचित् ‍ तर ‘ मुहूर्तमात्रा कर्तव्या ’ ह्या वचनावरुन मुहूर्तापेक्षां न्यून असेल तर परा करुं नये , असें सांगतात . गौडही असेंच सांगतात .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP