मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
चतुर्दशीश्राद्ध

द्वितीय परिच्छेद - चतुर्दशीश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां चतुर्दशीश्राद्ध सांगतो .

अथचतुर्दशी पृथ्वीचंद्रोदयेप्रचेताः वृक्षारोहणलोहाद्यैर्विद्युज्जलविषाग्निभिः नखिंदष्ट्रिविपन्नायेतेषांशस्ताचतुर्दशी ब्राह्मे युवानः पितरोयस्यमृताः शस्त्रेणवाहताः तेनकार्यंचतुर्दश्यांतेषांतृप्तिमभीप्सता नागरखंडे अपमृत्युर्भवेद्येषांशस्त्रमृत्युरथापिवा श्राद्धंतेषांप्रकर्तव्यंचतुर्दश्यांनराधिप एतच्च प्रायोनाशकशस्त्राग्निविषोदकोद्बंधनप्रपतनैश्चेच्छतामितिगौतमोक्तदुर्मरणोपलक्षणम् ‍ एकयोगनिर्देशात् ‍ सर्वेषांतुल्यधर्माणामेकस्यापियदुच्यते सर्वेषांतत्समंज्ञेयमेकरुपाहितेस्मृताइत्युशनसोक्तेश्च तच्चकृतक्रियाणामेवेतिवक्ष्यामः मरीचिः विषशस्त्रश्वापदाहितिर्यग्ब्राह्मणघातिनाम् ‍ चतुर्दश्यांक्रियाः कार्याअन्येषांतुविगर्हिताः अत्रब्राह्मणघातीतेनहतोनतुब्रह्महा तस्यपतितत्वादितिशूलपाणिः अत्रोद्देश्यविशेषणस्याविवक्षितत्वात् ‍ स्त्रीणामपिशस्त्रादिहतानामेकोद्दिष्टंकार्यंनपार्वणमितिश्रीदत्तोपाध्यायः इदंविषादिहतानामेवनप्रसवादिमृतानामितिवाचस्पतिः यत्तुशाकटायनः जलाग्निभ्यांविपन्नानांसंन्यासेवागृहेपथि श्राद्धंकुर्वीततेषांवैवर्जयित्वाचतुर्दशीमिति तत्प्रायश्चित्तार्थजलादिमृतविषयमित्याकरेउक्तम् ‍ अतएववैधत्वात् ‍ सहगमनेपिनकार्यमितिहेमाद्रिः एतच्चदैवयुक्तमेकोद्दिष्टंकार्यमित्युक्तंप्रयोगपारिजाते प्रेतपक्षेचतुर्दश्यामेकोद्दिष्टंविधानतः दैवयुक्तंतुतच्छ्राद्धंपितृणामक्षयंभवेत् ‍ तच्छ्राद्धंदैवहीनंचेत्पुत्रदारधनक्षयः एकोद्दिष्टंदैवयुक्तमित्येवंमनुरब्रवीत् ‍ भविष्येपि समत्वमागतस्यापिपितुः शस्त्रहतस्यच चतुर्दश्यांतुकर्तव्यमेकोद्दिष्टंमहालये चतुर्दश्यांतुयच्छ्राद्धंसपिंडीकरणेकृते एकोद्दिष्टविधानेनतत्कार्यंशस्त्रघातिन इति संवत्सरप्रदीपेहारीतः विश्वेदेवांश्चतत्रापिपूजयित्वादितोमलान् ‍ येवैशस्त्रहतास्तेषांश्राद्धंकुर्यादतंद्रितः अत्रैकोद्दिष्टवचनानांनिर्मूलत्वम् ‍ समूलत्वेपिपार्वणाशक्तपराणि विष्ण्वादिवचनैः प्रकरणात्कृष्णपक्षीयपार्वणावगतेरितिशूलपाणिः तन्नवाक्येनप्रकरणस्यबाधात् ‍ पित्रादीनांपार्वणंभ्रात्रादीनामेकोद्दिष्टमितिगौडार्वांचः तन्न पितुरित्यनेनविरोधात् ‍ विशेषवाक्यवैयर्थ्यापत्तेश्च अत्रशस्त्रहतस्यैवचतुर्दश्यामितिनियमोनतुचतुर्दश्यामेवशस्त्रहतस्येति श्राद्धंशस्त्रहतस्यैवचतुर्दश्यांमहालये इति कालादर्शात् ‍ वार्षिकादीनामकरणापत्तेश्च तेनमहालये एवदिनांतरेपार्वणंमातामहादितृप्त्यर्थंकार्यमेव पितामहोपिशस्त्रहतश्चेदेकोद्दिष्ट्द्वयंकार्यं तदुक्तंहेमाद्रौस्मृत्यंतरे एकस्मिन्द्वयोर्वैकोद्दिष्टमिति त्रिषुशस्त्रहतेषुपार्वणमेवकार्यम् ‍ ।

पृथ्वीचंद्रोदयांत प्रचेता - " वृक्षावर चढणें , लोहादिक शस्त्रें , वीज , उदक , विष , अग्नि , नखांचे पशु , दाढांचे पशु इत्यादिकांनीं जे मृत झाले त्यांच्या श्राद्धाविषयीं चतुर्दशी प्रशस्त आहे . " ब्राह्मांत - " ज्याचे पितर तरुण असतां मृत झाले किंवा शस्त्रानें मृत झाले असतील त्यानें त्यांच्या तृप्तीकरितां चतुर्दशीस श्राद्ध करावें . " नागरखंडांत - " ज्यांना अपमृत्यु होईल , किंवा शस्त्रानें मृत्यु होईल , त्यांचें श्राद्ध चतुर्दशीस करावें . " हें वरील वचनांनीं सांगितलेलें मरण , " प्रायोपवेशन , अनशन , शस्त्र , अग्नि , विष , उदक , फांस लावून घेणें , पर्वतादिकांवरुन उडी घेणें , यांनीं मरण इच्छिणारांचें " ह्या गौतमानें सांगितलेल्या दुर्मरणाचें उपलक्षण ( बोधक ) आहे . कारण , वरील वचनांत तरुणमरण , अपमृत्यु व शस्त्रमरण असें एका वचनांत सांगितलें आहे , म्हणून तरुणमरणादिकही दुर्मरण समजावें . आतां कोणी म्हणेल कीं , वरील वचनांनीं सांगितलेल्या मरणावांचून इतर मरणाला चतुर्दशी येत नाहीं , आणि उपलक्षण केलें असतां इतरही दुर्मरणाला चतुर्दशी येते ती इष्ट नाहीं , तर असें म्हणूं नये ; कारण , " सारे समानधर्मी असतां त्यांमध्यें एकालाही जें सांगितलें तें त्या सर्वांना समजावें . कारण , ते सारे एकरुपी आहेत " ह्या उशनसाचे वचनावरुन इतरही दुर्मरणाला चतुर्दशी इष्ट आहे . तें चतुर्दशीस श्राद्ध ज्यांची क्रिया केली असेल त्यांचेंच होतें , हा प्रकार पुढें सांगूं . मरीचि - " विष , शस्त्र , श्वापद , सर्प , तिर्यग्योनि , ब्राह्मण यांनीं मारलेल्यांच्या क्रिया ( श्राद्धें ) चतुर्दशीस कराव्या . अन्यांच्या करुं नयेत " या वचनांत ‘ ब्राह्मणघाती ’ असें पद आहे त्याचा अर्थ - ब्राह्मणानें मारलेला , असा समजावा . ब्राह्मणमारणारा , असा समजूं नये ; कारण , तो पतित आहे , असें शूलपाणि सांगतो . येथें वरील वचनांत शस्त्रादिमृत अशा पुल्लिंगी मनुष्यांचा उद्देश करुन चतुर्दशीस श्राद्ध सांगितलें तेथें उद्देश्याचें विशेषण पुल्लिंग हें अविवक्षित असल्यामुळें स्त्रिया देखील शस्त्रादिमृत असतां त्यांचेंही एकोद्दिष्ट करावें . पार्वण करुं नये , असें श्रीदत्तोपाध्याय सांगतो . हें श्राद्ध विषादिमृतांचेंच समजावें , सूतिकादि मृतांचें नाहीं , असें वाचस्पति सांगतो . आतां जें शाकटायन - " संन्यास घेतलेला असतां किंवा घरांत अथवा मार्गांत असतां उदक व अग्नि यांनीं जे मृत झाले त्यांचें श्राद्ध चतुर्दशीस वर्ज्य करुन इतर तिथीस करावें " असें सांगितलें तें , प्रायश्चित्ताकरितां उदकादिमृतविषयक समजावें , असें आकरांत सांगितलें आहे . म्हणूनच विधिविहित मरण असल्यामुळें स्त्रियांचें सहगमन असतांही चतुर्दशीस करुं नये , असें हेमाद्रि सांगतो . हें चतुर्दशीश्राद्ध दैवयुक्त एकोद्दिष्ट करावें , असें सांगितलें . प्रयोगपारिजातांत - " पितृपक्षांतील चतुर्दशीस विधीनें विहित जें एकोद्दिष्ट श्राद्ध तें दैवयुक्त केलें तर पितरांन अक्षय होतें . तें श्राद्ध दैवहीन केलें तर पुत्र , स्त्रिया , धन यांचा क्षय होतो . एकोद्दिष्ट दैवयुक्त करावें , असें मनु सांगता झाला . " भविष्यांत - " शस्त्रानें मृत झालेला पिता समानत्व ( पितृत्व ) पावला असला तरी त्याचें महालयांत चतुर्दशीस एकोद्दिष्ट करावें . शस्त्रानें मारलेल्याचें सपिंडीकरण केल्यावर जें चतुर्दशीस श्राद्ध करावयाचें तें एकोद्दिष्ट विधीनें करावें . " संवत्सरप्रदीपांत हारीत - " चतुर्दशीसही पूर्वी निर्मल अशा विश्वेदेवांची पूजा करुन जे शस्त्रानें मृत असतील त्यांचें श्राद्ध निरलसपणानें करावें . " येथें एकोद्दिष्टबोधकवचनें निर्मूल आहेत . समूल असलीं तरी पार्वणाविषयीं अशक्त असेल त्याविषयीं आहेत . कारण , विष्णु इत्यादिकांच्या वचनांनीं प्रकरणावरुन कृष्णपक्षांतील पार्वण येथें प्राप्त होतें , असें शूलपाणि सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , वचनानें प्रकरणाचा बाध होतो . पिता इत्यादिकांचें पार्वण , आणि भ्राता इत्यादिकांचें एकोद्दिष्ट करावें , असें अर्वाचीन गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , वरील भविष्यवचनांत ‘ पितुः ’ असें म्हटलें आहे त्याचा विरोध येईल . आणि हें विशेष वाक्य व्यर्थही होईल . या ठिकाणीं शस्त्रहताचेंच श्राद्ध चतुर्दशीस , असा नियम आहे . शस्त्रहताचें श्राद्ध चतुर्दशीसच करावें , असा नियम नाहीं . कारण , " शस्त्रहताचेंच श्राद्ध महालयांतील चतुर्दशीस करावें ’’ असें कालादर्शवचन आहे . असा नियम केल्यानें महालयांतील चतुर्दशीस इतरांचें श्राद्ध करुं नये , असें झालें . असा नियम न करितां , शस्त्रहताचें श्राद्ध महालयांतील चतुर्दशीसच करावें , असा नियम केला तर इतर दिवशीं वार्षिकादिक श्राद्धें करुं नयेत , असेंही होईल , तें अनिष्ट आहे . तेणें करुन ( शस्त्रहताचे श्राद्धाची इतरदिवशीं निवृत्ति नसल्यानें ) महालयांतच इतरदिवशीं मातामहादिकांच्या तृप्तीकरितां शस्त्रहताचें पार्वणश्राद्ध करावेंच . पितामह देखील शस्त्रहत असेल तर पित्याचें व पितामहाचें अशीं दोन एकोद्दिष्टें करावीं , तें सांगतो हेमाद्रींत स्मृत्यंतरांत - " एक किंवा दोघे शस्त्रानें मृत असतां एकोद्दिष्ट करावें . " तिघे शस्त्रहत असतां पार्वणच करावें .

यत्तुदेवस्वामिनोक्तंत्रिष्वपिशस्त्रहतेषुपृथगेकोद्दिष्टत्रयंकार्यम् ‍ नतुपार्वणमाहत्यवचनाभावादितितदयुक्तम् ‍ पित्रादयस्त्रयोयस्यशस्त्रैर्यातास्त्वनुक्रमात् ‍ सभूतेपार्वणंकुर्यादाब्दिकानिपृथक् ‍ पृथगितिबृहत्पराशरोक्तेः एकस्मिन्वाद्वयोर्वापिविद्युच्छस्त्रेणवाहते एकोद्दिष्टंसुतः कुर्यात्रयाणांदर्शवद्भवेदितिस्मृत्यंतराच्चेति पृथिवीचंद्रोदयेउक्तम् ‍ अपरार्केहेमाद्रौचैवम् ‍ यस्तुअत्रैवशस्त्रादिनाहतस्तस्यवार्षिकमेवपार्वणमेकोद्दिष्टंवाकार्यंनतुश्राद्धद्वयं प्रसंगसिद्धेरितिपृथिवीचंद्रोदये अत्रश्राद्धाकरणेग्रिमापरपक्षेदिनांतरेपार्वणेनैवकार्यमितितत्रैवोक्तम् ‍ यद्यपि शस्त्रविप्रहतानांचशृंगिदंष्ट्रिसरीसृपैः आत्मनस्त्यागिनांचैवश्राद्धमेषांनकारयेदितिछागलेयाद्यैः शस्त्रादिहतानांश्राद्धंनिषिद्धं तथापिप्रमादमृतानांश्राद्धार्हत्वात्कार्यं वृद्धादिभिन्नबुद्धिपूर्वमृतानांतुनकार्यम् ‍ यत्तुचतुर्दश्यांतर्पणीयालुप्तपिंडोदकक्रियाइतिब्राह्मेतद्गौणमितिशूलपाणिः लक्षणायांमानाभावात् ‍ पतितेनापिकर्तव्यं कर्तव्यंपतितस्यचेति गयादिवद्विशेषविधिबलात्पतितानामपिकार्यमितिनव्यगौडाः तत्त्वंतुसमत्वमागतस्येत्यादिवशात्कृतक्रियाणांकार्यंनान्येषामितिवयंप्रतीमः यत्तुमनुः नपैतृयज्ञियोहोमोलौकिकाग्नौविधीयते नदर्शेनविनाश्राद्धमाहिताग्नेर्विधीयत इति अत्रपूर्वार्धंहेतुत्वेनोक्तम् ‍ तद्यथाश्रुतमेवमन्यंतेपृथ्वीचंद्रोदयादयः आहिताग्नेः पिंडपितृयज्ञकल्पेनश्राद्धनिषेधार्थमिदंनतुसाकल्यादेरपीत्यस्मद्गुरवः कृष्णपक्षश्राद्धमन्यदिनेषुप्राप्तमाहिताग्नेर्दर्शेनियम्यत इतितुवयम् ‍ दर्शेनपार्वणेनविनाश्राद्धंन तेनक्कापिवार्षिकादावेकोद्दिष्टंनेतिहरिहरः इतिचतुर्दशी ।

आतां जें देवस्वामीनें सांगितलें कीं , तिघेही शस्त्रहत असतां वेगवेगळीं तीन एकोद्दिष्टें करावीं . पार्वण करुं नये . कारण , पार्वण करुन करण्याविषयीं विधि वचन नाहीं . तें अयुक्त आहे . कारण , " ज्याचे पिता , पितामह , प्रपितामह हे शस्त्रानें अनुक्रमानें मृत आहेत , त्यानें चतुर्दशीस पार्वण करावें . सांवत्सरिकें वेगवेगळीं करावीं . " असें बृहत्पराशरवचन आहे . आणि " विजेनें किंवा शस्त्रानें एक किंवा दोन मृत असतां पुत्रानें एकोद्दिष्ट करावें . तीन असामी शस्त्रानें मृत असतां त्यांचें दर्शाप्रमाणें होईल . " असें स्मृत्यंतरही आहे , असें पृथ्वीचंद्रोदयांत सांगितलें आहे . अपरार्कांत हेमाद्रींतही असेंच आहे . जो मनुष्य ह्याच चतुर्दशीस शस्त्रादिकानें मृत असेल त्याचें सांवत्सरिकच पार्वण किंवा एकोद्दिष्ट करावें . दोन श्राद्धें ( सांवत्सरिक व अपरपक्षिक अशीं दोन ) करुं नयेत . कारण , सांवत्सरिकानें अपरपक्षिकाची प्रसंगसिद्धि होते , असें पृथ्वीचंद्रोदयांत सांगितलें आहे . ह्या चतुर्दशीस श्राद्ध केलें नसेल तर पुढच्या अपरपक्षांत चतुर्दशीभिन्न दिवशीं पार्वणानेंच करावें , असें तेथेंच ( पृथ्वीचंद्रोदयांतच ) सांगितलें आहे . आतां जरी " शस्त्र , ब्राह्मण , शृंगाचे व दाढांचे पशु , सर्प यांनीं मारलेल्यांचें आणि आत्महत्या करणारांचें श्राद्ध करुं नये " असें छागलेयादिकांनीं शस्त्रादिहतांचें श्राद्ध निषिद्ध आहे , तरी प्रमादानें मृत झालेले श्राद्धाला योग्य असल्यामुळें त्यांचें करावें . वृद्धादिमरण तृतीयपरिच्छेदोत्तरार्धांत सांगितलें आहे त्यावांचून इतर बुद्धिपूर्वक मृत असतील त्यांचें करुं नये . आतां जें " ज्यांची पिंड उदकक्रिया लुप्त असेल ( मृतदोषामुळें झालेली नसेल ) त्यांना चतुर्दशीस तृप्त करावें " हें ब्राह्मवचन दुर्मरणानें मृतांचें श्राद्ध चतुर्दशीस सांगतें , यांचा वरच्या सांगण्यास विरोध येईल , असें म्हणूं नका . कारण , तें ब्राह्मवचन गौण ( लाक्षणिक म्हणजे लुप्तपिंडोदकक्रिय हा शब्द लक्षणेनें प्रमादमृतांचा बोधक ) असें शूलपाणि सांगतो . लक्षणा करण्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें , " गयेंत पतितानेंही करावें , आणि पतिताचेंही करावें ’ हें जसें गयादिकश्राद्ध विशेष विधीनें सांगितलें , तसें - दुर्मरणानें मृतांचें चतुर्दशीस श्राद्ध करण्याविषयीं विशेष विधि वर सांगितला आहे , त्याच्या बळानें पतितांचेंही करावें , असें नवीन गौड सांगतात . खरा प्रकार - म्हटला तर - ‘ समत्वमागतस्यापि० ’ ह्या वर सांगितलेल्या भविष्यादिवचनानुरोधानें ज्यांच्या क्रिया केल्या असतील त्यांचें करावें , इतरांचें करुं नये , असें आम्हीं समजतों . आतां जें मनु - " पिंडपितृयज्ञाचा होम लौकिकाग्नीवर

होत नाहीं , म्हणून आहिताग्नीला दर्शावांचून इतर दिवशीं श्राद्ध सांगितलें नाहीं . " ह्या वचनांत पहिल्या अर्धांत दर्शावांचून श्राद्ध न होण्याला हेतु सांगितला आहे . पृथ्वीचंद्रोदयादिक या वचनांत सांगितलें तसेंच मानितात . आहिताग्नीला इतर दिवशीं पिंडपितृयज्ञ विधीनें श्राद्धनिषेधाकरितां हें वचन आहे . सकल श्राद्धादिकांच्या निषेधाकरितां नाहीं , असें आमचे गुरु सांगतात . कृष्णपक्षांतील श्राद्ध इतरदिवशीं प्राप्त झालें तें आहिताग्नीनें दर्शाचे ठायींच करावें . असा ह्या वचनानें नियम केला आहे , असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) सांगतों . आहिताग्नीला दर्शावांचून म्हणजे पार्वणावांचून श्राद्ध नाहीं , तेणेंकरुन कोठेंही सांवत्सरिकादिश्राद्धांत एकोद्दिष्ट नाहीं , असें हरिहर सांगतो . इति चतुर्दशी .

अमायांविशेषमाहापरार्केयमः हंसेकरस्थितेयातुअमावास्याकरान्विता साज्ञेयाकुंजरच्छायाइतिबौधायनोब्रवीत् ‍ वनस्पतिगतेसोमेछायायाप्राड्मुखीभवेत् ‍ गजच्छायातुसाप्रोक्तातस्यांश्राद्धंप्रकल्पयेत् ‍ भारते अजेनसर्वलोहेनवर्षासुनियतव्रतः हस्तिच्छायासुविधिवत्कर्णव्यजनवीजितम् ‍ श्राद्धंदद्यादितिशेषः ।

अमावास्येस विशेष सांगतो अपरार्कांत यम - " सूर्य हस्तनक्षत्रास असतां जी हस्तनक्षत्रयुक्त अमावास्या ती गजच्छाया जाणावी , असें बौधायन सांगता झाला . " सोम वनस्पतींत गेला असतां जी प्राड्मुख छाया होते ती गजच्छाया म्हटली आहे , तिच्या ठिकाणीं श्राद्ध करावें . " भारतांत - " वर्षाकालीं व्रतनियम धारण करुन गजच्छायेचे ठायीं म्हणजे हत्तीच्या ( हस्तनक्षत्राच्या ) कानाची छाया जेथें पडली असेल अशा ठिकाणीं यथाविधि श्राद्ध करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP