अत्रपक्षेश्राद्धाकरणेगौणकालमाहहेमाद्रौयमः हंसेकन्यासुवर्षास्थेशाकेनापिगृहेवसन् पंचम्योरंतरेदद्यादुभयोरपिपक्षयोः आश्विनकृष्णशुक्लपंचम्योर्मध्य इत्यर्थः तत्राप्यसंभवेभविष्ये येयंदीपान्विताराजन्ख्यातापंचदशीभुवि तस्यांदद्यान्नचेद्दत्तंपितृणांवैमहालये तत्राप्यसंभवेभारते यावच्चकन्यातुलयोः क्रमादास्ते दिवाकरः शून्यंप्रेतपुरंतावद्वृश्चिकंयावदागतः ब्राह्मे वृश्चिकेसमतिक्रांतेपितरोदैवतैः सह निःश्वस्यप्रतिगच्छंतिशापंदत्वासुदारुणं यत्तुजातूकर्ण्यः आकांक्षंतिस्मपितरः पंचमंपक्षमाश्रिताः तस्मात्तत्रैवदातव्यंदत्तमन्यत्रनिष्फलमितितत्फलातिशयहानिपरम् कन्यांगच्छतुवानवेतितुर्यपादेवापाठः तेनकन्यायोगेप्राशस्त्यमात्रं अतः श्राद्धविवेकोक्तंश्राद्धद्वयंहेयम् ।
या पक्षांत श्राद्ध केलें नसतां गौणकाल सांगतो हेमाद्रींत यम - “ घरांत राहणारानें वर्षाऋतूंत कन्येस सूर्य असतां भाद्रपदकृष्णपंचमी व आश्विनशुक्लपंचमी यांच्या मध्यें भाजीपाला यानें देखील श्राद्ध करावें. ” या वचनानें आश्विनाच्या शुक्लप्रतिपदेपासून शुक्लपंचमीपर्यंत काल सांगितला. त्या कालींही असंभव असतां सांगतो भविष्यांत - “ जर महालयाचे ठायीं पितरांना श्राद्ध दिलें नसेल तर जी ही दीपयुक्त अमावास्या भूमीवर प्रसिद्ध आहे तिच्या ठिकाणीं श्राद्ध द्यावें. ” त्या कालीं देखील असंभव असतां सांगतो भारतांत - “ जों कालपर्यंत कन्या व तूळ या संक्रांतींस सूर्य अनुक्रमानें प्राप्त आहे, तों काळपर्यंत प्रेतनगर शून्य झालेलें असतें. तें वृश्चिकास सूर्य येई तोंपर्यंत शून्य समजावें; म्हणजे प्रेतनगरांतून सारे पितर आपापल्याला श्राद्ध देणारांकडे जात असतात. ” ब्राह्मांत - “ वृश्चिकापर्यंत श्राद्ध केलें नसून वृश्चिकसंक्रांति अतिक्रांत झाली असतां पितर देवतांसहित श्वासोच्छ्वास टाकून दारुण शाप देऊन निघून जातात. ” आतां जें जातूकर्ण्य - ‘‘ आषाढीपासून पांचव्या पक्षांत पितर अन्नोदकाची इच्छा करितात, म्हणून पांचव्या पक्षांतच अन्नादिक द्यावें. इतर कालीं ( पुढें ) दिलेलें निष्फल होय. ” या वचनानें पुढें आश्विनादिकांत दिलेलें निष्फल होतें असें सांगितलें, तें अतिशय फलाच्या हानिबोधक समजावें. अथवा या वचनाच्या चवथ्या पादांत ‘ दत्तमन्यत्र निष्फलं ’ या स्थानीं ‘ कन्यां गच्छतु वा न वा ’ असा पाठ आहे. म्हणजे ‘ आषाढीपासून पांचव्या पक्षांत अन्नादिक द्यावें. सूर्य कन्येस जावो किंवा न जावो ’ असा अर्थ आहे. तेणेंकरुन कन्यासंक्रांतीचा योग असतां श्राद्ध प्रशस्त इतकेंच समजावें. योग नसतां पुनः करावें असें नाहीं. म्हणून श्राद्धविवेकांत दोन श्राद्धें करावीं, असें सांगितलें तें त्याचें सांगणें त्याज्य आहे.
इदंचश्राद्धमन्नेनैवकार्यंनामान्नादिना मृताहंचसपिंडंचगयाश्राद्धंमहालयम् आपन्नोपिनकुर्वीतश्राद्धमामेनकर्हिचिदितिस्मृतिदर्पणेगालवोक्तेः ।
हें श्राद्ध अन्न्नानेंच करावें. आमान्न, हिरण्य इत्यादिकानें करुं नये. कारण, “ सांवत्सरिकश्राद्ध, सपिंडीकरण, गयाश्राद्ध, महालय हीं श्राद्धें आपत्कालीं देखील कधींही आमान्नानें करुं नयेत ” असें स्मृतिदर्पणांत गालववचन आहे.