यानंतर सहस्रचंडीविधान.
अथसहस्रचंडी साचतत्रैवोक्ता सहस्रचंडींविधिवच्छृणुविष्णोमहामते राज्यभ्रंशेमहोत्पातेजनमारेमहाभये गजमारेऽश्वमारेचपरचक्रभयेतथा इत्यादिविविधेदुः खेक्षयरोगादिजेभये सहस्रचंडिकापाठंकुर्याद्वाकारयेत्तथा जापकास्तुशतंप्रोक्ताविंशद्धस्तश्चमंडपः भोज्याः सहस्रंविप्रेंद्रागोशतंदक्षिणांदिशेत् गुरवेद्विगुणंदेयंशय्यादानंतथैवच सप्तधान्यंचभूदानंश्वेताश्वंचमनोहरम् पंचनिष्कमितामूर्तिः कर्तव्यावार्धमानतः अष्टादशभुजादेवीसर्वायुधविभूषिता अवारितान्नंदातव्यंसहस्रंप्रत्यहंप्रभो शतंवानियताहारः पयः पानेनवर्तयेत् एवंयश्चंडिकापाठंसहस्रंतुसमाचरेत् तस्यस्यात्कार्यसिद्धिस्तुनात्रकार्याविचारणेति एतद्दूयंयद्यपिमहानिबंधेषुनास्तितथापिप्रचरद्रूपत्वादुक्तमितिदिक् ।
ती सहस्रचंडी तेथेंच सांगतो “ सहस्रचंडीचें विधान यथाविधि सांगतों श्रवण कर. राज्यनाश, मोठा उत्पात, जनमार ( महामारी, ग्रंथिक संनिपात वगैरे ), महाभय, गजमार, अश्वमार, शत्रुभय इत्यादिक अनेक दुःखें, क्षयरोगादि भय ह्यांतून कोणतेंही प्राप्त असतां सहस्त्रचंडीपाठ करावा किंवा करवावा. त्याविषयीं पाठकर्ते शंभर ब्राह्मण असावे. वीस हस्तपरिमित मंडप असावा. सहस्त्र ब्राह्मणभोजन करावें. शंभर गाई दक्षिणा द्यावी. गुरुस दुप्पट दक्षिणा द्यावी. व शय्या, सप्तधान्यें, भूमि, पांढरा सुंदर घोडा हीं द्यावीं. पांच निष्क ( २० तोळे ) सुवर्णाची देवीची मूर्ति करावी. अथवा त्याचे अर्ध ( १० तोळे ) सुवर्णाची करावी. ती अष्टादश ( १८ ) भुजांची व सर्व आयुधांनीं युक्त सुंदर करावी. प्रतिदिवशीं अवारित ( जो येईल त्यास ) व सहस्र ब्राह्मणांस अन्न द्यावें. आणि पाठाविषयीं वरलेल्या शंभर ब्राह्मणांस फलाहार व दुग्ध द्यावें. असा सहस्रचंडीपाठ जो करील त्याचीं सर्व कार्यैं सिद्ध होतील यांत संशय नाहीं ” हीं दोन ( शतचंडी व सहस्रचंडी ) जरी महानिबंधांमध्यें सांगितलीं नाहींत तथापि यांचा प्रचार असल्यावरुन सांगितलीं आहेत. ही दिशा दाखविली आहे.
वाराहीतंत्रे संकटेसमनुप्राप्तेदुश्चिकित्स्यामयेतथा जातिभ्रंशेकुलोच्छेदेऽप्यायुषोनाश आगते वैरिवृद्धौव्याधिवृद्धौधननाशेतथाक्षये तथैवत्रिविधोत्पातेतथाचैवोपपातके कुर्याद्यत्नाच्छतावृत्तंततः संपद्यतेशुभम् श्रेयोवृद्धिः शतावृत्ताद्राज्यवृद्धिस्तथापरा मनसाचिंतितंदेविसिद्ध्येदष्टोत्तराच्छतात् सहस्रावर्तनाल्लक्ष्मीरावृणोतिस्वयंस्थिरा भुक्त्वामनोरथान्कामान्नरोमोक्षमवाप्नुयात् चंड्याःशतावृत्तिपाठात्सर्वाः सिद्ध्यंतिसिद्धयः इति शतचंडीसहस्रचंडीविधिः ।
वाराहीतंत्रांत “ संकट प्राप्त झालें असतां, चिकित्सा करण्यास कठिण रोग, जातिभ्रंश, कुलाचा उच्छेद, आयुष्यनाश, शत्रुवृद्धि, रोगवृद्धि, धननाश, क्षय, त्रिविध ( दिव्य, भौम, अंतरिक्ष ) उत्पात, उपपातक, हीं प्राप्त झालीं असतां शंभर पाठ करावे, तेणेंकरुन शुभ होतें. शंभर पाठांनीं श्रेयोवृद्धि व राज्यवृद्धि होते. अष्टोत्तरशत ( १०८ ) पाठांनीं मनांतील चिंतितकार्य सिद्ध होतें. सहस्रपाठांनीं लक्ष्मी स्थिर होऊन राहते व मनोरथ भोगून मनुष्य मोक्षातें पावतो. चंडीच्या शंभर पाठांनीं सर्व सिद्धि होतात. ” असा शतचंडीचा व सहस्रचंडीचा विधि समजावा.