मार्गशीर्षशुक्लचतुर्दश्यांपिशाचविमोचनीतीर्थेश्राद्धंत्रिस्थलीसेतौभट्टचरणैरुक्तम् तस्यप्राप्तपैशाच्यस्वपित्राद्युद्देश्यकत्वेपार्वणत्वादपराह्णव्यापिनीग्राह्या अज्ञातनामपिशाचाद्युद्देश्यकत्वेत्वेकोद्दिष्टत्वान्मध्याह्नव्यापिनीति कुलधर्मव्रतादौतूत्तरैव चैत्रनभोगतेतरसितास्यादूर्ध्वमितिदीपिकोक्तेः ।
मार्गशीर्षशुक्ल चतुर्दशीस पिशाचमोचनी तीर्थाचे ठायीं श्राद्ध त्रिस्थलीसेतूंत नारायणभट्टांनीं सांगितलें आहे . तें श्राद्ध पिशाचयोनि प्राप्त झालेल्या स्वकीय पित्रादिकांच्या उद्देशानें कर्तव्य असतां तें पार्वण असल्यामुळें त्याविषयीं अपराह्णव्यापिनी चतुर्दशी घ्यावी . नांव माहीत नाहीं अशा पिशाचादिकांच्या उद्देशानें कर्तव्य असेल तर तें श्राद्ध एकोद्दिष्टरुप असल्यामुळें त्याविषयीं मध्याह्नव्यापिनी घ्यावी . कुलधर्म , व्रत इत्यादिकांविषयीं तर पराच घ्यावी . कारण , " चैत्र व श्रावण यांवांचून शुक्लपक्षीची चतुर्दश्गी परा करावी " असें दीपिकेंत सांगितलें आहे .