अत्रविशेषमाहकार्ष्णाजिनिः उपाकर्मणिचोत्सर्गेयथाकालंसमेत्यच ऋषीन्दर्भमयान्कृत्वापूजयेत्तर्पयेत्तत इति उपाकर्मण्युत्सर्गेचत्रिरात्रंपक्षिणीमहोरात्रंवानध्याय इतिमिताक्षरायामुक्तं अत्रनदीनांरजोदोषोनास्ति उपाकर्मणिचोत्सर्गेरजोदोषोनविद्यतेइतिगार्ग्योक्तेः ।
येथें विशेष सांगतो - कार्ष्णाजिनि - “ उपाकर्म व उत्सर्जन यांचेठायीं यथाकालीं सर्वांनीं एकत्र मिळून दर्भमयऋषींचें पूजन करुन तर्पण करावें. ” उपाकर्म व उत्सर्जन यांचेठायीं त्रिरात्र किंवा पक्षिणी किंवा अहोरात्र अनध्याय करावा असें मिताक्षरेंत सांगितलें आहे. या उपाकर्म उत्सर्जनाविषयीं नद्यांना रजोदोष नाहीं. कारण, “ उपाकर्म व उत्सर्जन यांचेठायीं रजोदोष नाहीं ” असें गार्ग्यवचन आहे.
अत्रैवरक्षाबंधनमुक्तं हेमाद्रौभविष्ये संप्राप्तेश्रावणस्यांतेपौर्णमास्यांदिनोदये स्नानंकुर्वीतमतिमान् श्रुतिस्मृतिविधानतः उपाकर्मादिकंप्रोक्तमृषीणांचैवतर्पणं शूद्राणांमंत्ररहितंस्नानंदानंचशस्यते उपाकर्मणिकर्तव्यमृषीणांचैवपूजनं ततोपराह्णसमयेरक्षापोटलिकांशुभां कारयेदक्षतैः शस्तैः सिद्धार्थैर्हेमभूषितैरिति अत्रोपाकर्मानंतर्यस्यपूर्णतिथावार्थिकस्यानुवादोनतुविधिः गौरवात्प्रयोगविधिभेदेनक्रमायोगाच्छूद्रादौतदयोगाच्च तेनपरेद्युरुपाकरणेपिपूर्वेद्युरपराह्णेतत्करणंसिद्धं इदंभद्रायांनकार्यं भद्रायांद्वेनकर्तव्येश्रावणीफाल्गुनीतथा श्रावणीनृपतिंहंतिग्रामंदहतिफाल्गुनीतिसंग्रहोक्तेः तत्सत्त्वेतुरात्रावपितदंतेकुर्यादितिनिर्णयामृते इदंप्रतिपद्युतायांनकार्यं नंदायादर्शनेरक्षाबलिदानंदशासुच भद्रायागोकुलक्रीडादेशनाशायजायते इतिमदनरत्नेब्रह्मवैवर्तात् भविष्ये उपलिप्तेग्रहमध्येदत्तचतुष्केन्यसेत्कुंभं पीठेतत्रोपविशेद्राजामात्यैर्युतश्चसुमुहूर्ते तदनुपुरोधानृपतेरक्षांबध्नीतमंत्रेण इदंरक्षाबंधनंनियतकालत्वाद्भद्रावर्ज्यग्रहणदिनेपिकार्यंहोलिकावत् ग्रहसंक्रांत्यादौरक्षानिषेधाभावात् सर्वेषामेववर्णानांसूतकंराहुदार्शने इतितत्कालीनकर्मपरएवनत्वन्यत्र अन्यथाहोलिकायांकागतिः अतएव नित्येनैमित्तिकेजप्येहोमेयज्ञक्रियासुच उपाकर्मणिचोत्सर्गेग्रहवेधोनविद्यत इतिनियतकालीनेतदभाव इतिदिक् उपाकर्मणितद्दिनभिन्नपरं तत्रतन्निषेधादित्युक्तंप्राक् मंत्रस्तु येनबद्धोबलीराजादानवेंद्रोमहाबलः तेनत्वामपिबध्नामिरक्षेमाचलमाचल ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैः शूद्रैरन्यैश्चमानवैः कर्तव्योरक्षिताचारोंद्विजान्संपूज्यशक्तित इति अत्रैवहयग्रीवोत्पत्तिः तदुक्तं कल्पतरौ श्रावण्यांश्रवणेजातः पूर्वंहयशिराहरिः जगादसामवेदंतुसर्वकल्मषनाशनं स्नात्वासंपूजयेत्तंतुशंखचक्रगदाधरम् ।
ह्या पौर्णिमेचे ठायींच रक्षाबंधन करण्याविषयीं सांगितलें आहे. तें असें - हेमाद्रींत भविष्यपुराणांत - “ श्रावणमासाच्या अंतीं पौर्णिमेस सूर्योदयीं ज्ञात्यानें स्नान करुन श्रुतिस्मृतिविधानानें उपाकर्म व ऋषींचें तर्पण करावें. शूद्रांनीं मंत्ररहित स्नान, दान करावें, तें प्रशस्त होय. उपाकर्माचे ठायीं ऋषींचें पूजन करावें, नंतर अपराह्णीं शुभकारक रक्षापोटलिका ( राखी ) स्वच्छ तांदूळ व सुवर्णयुक्त सिद्धार्थ ( पांढरे शिरीष ) यांहींकरुन करावी. ” येथें हें रक्षाबंधन उपाकर्मानंतर सांगितलें तें पूर्णतिथि असतां अर्थात् त्या दिवशीं प्राप्त झालें त्याचा अनुवाद आहे, उपाकर्मानंतरच करावें, असा विधि नाहीं. कारण तसा विधि केला असतां गौरव येतें. याचा प्रयोग भिन्न असल्यामुळें उपाकर्म केल्यावर हें रक्षाबंधन करावें, असा क्रमही होत नाहीं. आणि शूद्रादिकांना उपाकर्म नसल्यामुळें क्रमही संभवत नाहीं. तेणेंकरुन दुसर्या दिवशीं उपाकरण असतांही पूर्वदिवशीं अपराह्णीं रक्षाबंधन करावें असें सिद्ध होतें. हें रक्षाबंधन भद्रेचे ठायीं करुं नये. कारण, “ भद्रा ( कल्याणी ) असतां श्रावणी व फाल्गुनी ह्या दोन करुं नयेत. श्रावणी राजाचा नाश करिते, फाल्गुनी ग्रामदाह करिते ” असें संग्रहवचन आहे. दिवसा भद्रा असतां भद्रा गेल्यावर रात्रीसही करावें, असें निर्णयामृतांत सांगितलें आहे. हें रक्षाबंधन प्रतिपदायुक्त पौर्णिमा तिथीस करुं नये. कारण, “ प्रतिपदेंत रक्षाबंधन, दशमीस बलिदान, भद्रेला ( द्वितीयेला ) गोकुलक्रीडा ही देशनाशकारक होते ” असें मदनरत्नांत ब्रह्मवैवर्तवचन आहे. भविष्यपुराणांत “ सारवलेल्या घरांत चतुष्कोणी वेदीवर कुंभस्थापना करुन तेथें आसनावर सुमुहूर्ती राजानें बसावें. नंतर उपाध्यायानें राजास मंत्रानें रक्षाबंधन करावें. ” हें रक्षाबंधन नियमितकालीं सांगितल्यामुळें भद्रावर्ज्यग्रहणदिवशींही करावें. कारण, जशी होलिका तद्वत् हें रक्षाबंधन आहे. ग्रहण, संक्रांति इत्यादिक असतांही रक्षाबंधनाचा निषेध नाहीं. “ सर्व वर्णांस ग्रहणसंबंधी सूतक आहे ” असें जें वचन तें तत्कालीन ( ग्रहणकालीन ) कर्मविषयक आहे, अन्यत्र नाहीं. असें नसेल तर होलिकेविषयीं गति काय ? म्हणूनच “ नित्य, नैमित्तिक, जप, होम, यज्ञक्रिया, उपाकर्म, उत्सर्जन यांचे ठायीं ग्रहणवेध नाहीं. ” यावरुन नियतकालीं होणार्या कर्माविषयीं ग्रहणदोष नाहीं, असें दिग्दर्शन केलें आहे. ह्या वचनांत ‘ उपाकर्माविषयीं ग्रहणवेध नाहीं ’ असें सांगितलें तें ग्रहणदिवसाहून भिन्नदिवशीं नाहीं, असें समजावें. कारण, ग्रहणदिवशीं उपाकर्माचा निषेध आहे, असें पूर्वीं उक्त आहे. रक्षाबंधनाचा मंत्र - येन बद्धो बलीराजा दानवेंद्रो महाबलः ॥ तेन त्वामपि बध्नामि रक्षे माचल माचल ॥ “ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर मनुष्य यांनींही ब्राह्मणाचें यथाशक्ति पूजन करुन जसा आचार असेल तसें रक्षाबंधन करावें. ” ह्याच पौर्णिमेचे ठायीं हयग्रीवाचा अवतार झाला, तो कल्पतरुंत सांगतो - “ श्रावणी पौर्णिमेस श्रवणनक्षत्रावर पूर्वी हयग्रीव उत्पन्न झाला व त्यानें सर्व पापनाशक असा सामवेद सांगितला, म्हणून त्या दिवशीं स्नान करुन शंख चक्र, गदा धारण करणार्या हयग्रीवरुप हरीचें पूजन करावें. ”
अत्राश्वलायनेनश्रवणाकर्मोक्तं श्रावण्यांपौर्णमास्यांश्रवणाकर्मेति तत्रास्तमययोगिनीग्राह्या अस्तमितेस्थाली पाकंश्रपयित्वेतिसूत्रात् अतएवनिशीष्टेर्दर्शप्रयोगांतः पातनियमात्तदंगैः प्रसंगसिद्धिरुक्ताद्वादशे अन्यथा परेद्युः प्राप्तौकः प्रसंगः प्रसंगस्य याज्ञिकास्तुपौर्णिमादर्शशब्दयोः पर्वांत्यक्षणवदहोरात्रवाचित्वात्तत्रैवकर्मकालव्याप्तिर्ग्राह्येतिविकृतित्वाच्छेषपर्वेच्छंति श्रावणादिमासचतुष्टयकृष्णपक्षद्वितीयासुअशून्यशयनव्रतं तत्रचंद्रोदयव्यापिनी दिनद्वयेतत्त्वेपरेतिनिर्णयामृते इतिकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौश्रावणमासः ।
ह्या पौर्णिमेस आश्वलायनांनीं श्रवणाकर्म सांगितलें आहे - “ श्रावणी पौर्णिमेस श्रवणाकर्म करावें. ” ह्या श्रवणाकर्माविषयीं पौर्णिमा सूर्यास्तव्यापिनी घ्यावी. कारण, “ सूर्यास्तीं स्थालीपाक श्रपण करुन ” असें आश्वलायन सूत्र आहे. सूर्यास्तव्यापिनी घ्यावी म्हणूनच रात्रीं इष्टीच्या दर्शप्रयोगामध्यें हें श्रवणाकर्म अंतर्भूत होत असल्यामुळें त्या दर्शप्रयोगाच्या अंगांनीं ह्या श्रवणाकर्माची प्रसंगसिद्धि बाराव्या अध्यायांत जैमिनींनीं सांगितली आहे. दुसर्या दिवसाची पौर्णिमा श्रवणाकर्माला घेतली तर प्रसंगसिद्धीचा प्रसंग काय आहे ? याज्ञिक तर पौर्णिमा व दर्श ह्या शब्दांनीं पर्वाचे अंत्यक्षणानें युक्त असा अहोरात्र घ्यावयाचा असल्यामुळें त्याच दिवशीं कर्मकालव्यापिनी असेल ती घ्यावी, असें विकृतिइष्टीच्या कालांत सांगितलें आहे व ही विकृति असल्यामुळें शेष ( उर्वरित ) पर्व घ्यावें, असें इच्छितात. श्रावण इत्यादि चार महिन्यांच्या कृष्णपक्षांच्या द्वितीयांस अशून्यशयनव्रत सांगितलें आहे, त्याविषयीं चंद्रोदयव्यापिनी द्वितीया घ्यावी. दोन दिवशीं चंद्रोदयीं व्याप्ति असतां परा घ्यावी, असें निर्णयामृतांत सांगितलें आहे. इति श्रावणमासाची महाराष्ट्र टीका समाप्त झाली.