द्वितीय परिच्छेद - परशुरामजयंती
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
इयमेवतृतीयापरशुरामजयंती साप्रदोषव्यापिनीग्राह्या तदुक्तंभार्गवार्चनदीपिकायांस्कांदभविष्ययोः वैशाखस्यसितेपक्षेतृतीयायांपुनर्वसौ निशायाः प्रथमेयामेरामाख्यः समयेहरिः स्वोच्चगैः षड्गहैर्युक्तेमिथुनेराहुसंस्थिते रेणुकायास्तुयोगर्भादवतीर्णोहरिः स्वयमिति दिनद्वयेतव्द्याप्तावंशतः समव्याप्तौचपरा अन्यथापूर्वैव तदुक्तंतत्रैवभविष्ये शुक्लतृतीयावैशाखेशुद्धोपोष्यादिनद्वये निशायाः पूर्वयामेचेदुत्तरान्यत्रपूर्विकेति वैशाखशुक्लसप्तम्यांगंगोत्पत्तिस्तदुक्तंपृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे वैशाखेशुक्लसप्तम्यांजह्नुनाजाह्नवीपुरा क्रोधात्पीतापुनस्त्यक्ताकर्णरंध्रात्तुदक्षिणात् तांतत्रपूजयेद्देवींगंगांगगनमेखलामिति अत्रशिष्टाचारान्मध्याह्नव्यापिनीग्राह्या दिनद्वयेतव्द्याप्तावव्याप्तावेकदेशव्याप्तौवापूर्वा युग्मवाक्यात् वैशाखशुक्लद्वादश्यांयोगविशेषो हेमाद्रौज्योतिःशास्त्रे पंचाननस्थौगुरुभूमिपुत्रौमेषेरविः स्याद्यदिशुक्लपक्षे पाशाभिधानाकरभेणयुक्तातिथिर्व्यतीपात इतीहयोगः अस्मिंस्तुगोभूमिहिरण्यवस्त्रदानेनसर्वपरिहायपापं सुरत्वमिंद्रत्वमनामयत्वंमर्त्याधिपत्यंलभतेमनुष्य इति पंचाननः सिंहः पाशाभिधानातिथिर्द्वादशी करभोहस्तः ।
हीच तृतीया परशुरामजयंती होय. ती प्रदोषव्यापिनी ( रात्रिप्रथमप्रहरव्यापिनी ) घ्यावी. तें सांगतो भार्गवार्चनदीपिकेंत स्कांदांत भविष्यांत - “ वैशाखशुक्लपक्षीं तृतीयेस पुनर्वसुनक्षत्रावर रात्रींच्या प्रथमप्रहरीं सहा ग्रह उच्चीचे व मिथुनेचा राहु असतां रेणुकेच्या गर्भापासून परशुराम अवतार झाला. ” ही तृतीया दोन दिवशीं प्रदोषकालीं पूर्णव्यापिनी किंवा अंशतः समव्यापिनी असतां परा करावी. तशी नसतां पूर्वाच करावी. तें सांगतो तेथेंच भविष्यांत - “ वैशाख शुक्ल तृतीया शुद्ध ( इतरानें अविद्ध ) असेल त्या दिवशीं उपोषण करावें. दोन दिवशीं रात्रीच्या प्रथम प्रहरीं असेल तर दुसरे दिवशीं उपोषण करावें. तशी नसेल तर पूर्वदिवशीं उपोषण करावें. ” वैशाखशुक्ल सप्तमीस गंगोत्पत्ति ( गंगावतार ) झाली. तें सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - “ जह्नुऋषीनें गंगा क्रोधानें प्राशन केली ती वैशाखशुक्ल सप्तमीस पुनः उजव्या कर्णरंध्रानें बाहेर टाकिली. त्या तिथीस गंगादेवीचें पूजन करावें. ” ह्या गंगापूजनाविषयीं शिष्टाचारावरुन मध्याह्नव्यापिनी सप्तमी घ्यावी. दोन दिवशीं मध्याह्नव्याप्ति, अव्याप्ति अथवा एकदेशव्याप्ति असतां युग्मवाक्यावरुन पूर्वा घ्यावी. वैशाखशुक्ल द्वादशीचे ठायीं विशेष्ज योग सांगतो - हेमाद्रींत ज्योतिःशास्त्रांत - ‘‘ वैशाखशुक्लपक्षीं सिंहास गुरु व भौम, मेषास सूर्य आणि हस्तनक्षत्रानें युक्त द्वादशी तिथि असेल तर व्यतीपात योग होतो. या योगावर गाई, भूमि, सुवर्ण, वस्त्र यांचें दान केल्यानें सर्व पाप घालवून देवत्व, इंद्रत्व, रोगरहितत्व आणि मनुष्याधिपत्य यांतें मनुष्य पावतो. ”
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2013
TOP