कार्तिककृष्णचतुर्थी करकचतुर्थी साचंद्रोदयव्यापिनीग्राह्या दिनद्वयेतत्त्वेपूर्वा तत्रैवपूजाद्याम्नानात् कार्तिककृष्णद्वादशीगोवत्ससंज्ञा साप्रदोषव्यापिनीग्राह्या दिनद्वयेतत्त्वेपूर्वा युग्मवाक्यात् वत्सपूजावटश्चैव कर्तव्याप्रथमेहनीतिनिर्णयामृतेभिधानाच्च अत्रविशेषोमदरत्नेभविष्ये सवत्सांतुल्यवर्णांचशीलिनीं गांपयस्विनीम् चंदनादिभिरालिप्यपुष्पमालाभिरर्चयेत् अर्घ्यंताम्रमयेपात्रेकृत्वापुष्पाक्षतैस्तिलैः पादमूलेतुदद्याद्वैमंत्रेणानेनपांडव क्षीरोदार्णवसंभूतेसुरासुरनमस्कृते सर्वदेवमयेमातर्गृहाणार्घ्यंनमोनमः ततोमाषादिसंसिद्धान्वटकान्विनिवेदयेत् सुरभित्वंजगन्मातर्देविविष्णुपदेस्थिता सर्वदेवमयेग्रासंमयादत्तमिमंग्रस ततः सर्वमयेदेविसर्वदेवैरलंकृते मातर्ममाभिलषितंसफलंकुरुनंदिनि इतिप्रार्थयेत् तथा तद्दिनेतैलपक्कंचस्थालीपक्कंयुधिष्ठिर गोक्षीरंगोघृतंचैवदधितक्रंचवर्जयेत् ।
कार्तिककृष्णचतुर्थी करकचतुर्थी . ती चंद्रोदयव्यापिनी घ्यावी . दोन दिवस चंद्रोदयव्यापिनी असतां पूर्वा घ्यावी . कारण , चंद्रोदयकालींच पूजादि कृत्य सांगितलें आहे . कार्तिककृष्ण द्वादशी ही गोवत्सद्वादशी होय . ती गोवत्सद्वादशी प्रदोषकालव्यापिनी घ्यावी . दोन दिवशीं प्रदोषव्यापिनी असतां युग्मवाक्यावरुन पूर्वा करावी . आणि " गोवत्सपूजा , आणि वटपूजा हीं पूर्वदिवशीं करावीं " असें निर्णयामृतांतही सांगितलें आहे . हा गोवत्सद्वादशीचे ठायीं विशेषविधि - मदनरत्नांत भविष्यांत - " सवत्स गाई वत्सतुल्य वर्णाची उत्तम स्वभावाची बहुत दूध देणारी अशी आणून तिला चंदनादिकांनीं लेप करुन पुष्पमालांनीं पूजन करावें . आणि ताम्रपात्रामध्यें पुष्प , अक्षता , तिल यांनीं अर्घ्य करुन पायांजवळ पुढील मंत्रानें द्यावें . तो मंत्रः - क्षीरोदार्णवसंभूते सुरासुरनमस्कृते ॥ सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्यं नमो नमः ॥ नंतर माषादिकानें केलेले वटक गाईस द्यावे . देण्याचा मंत्रः - सुरभि त्वं जगन्मातर्देवि विष्णुपदे स्थिता ॥ सर्वदेवमये
ग्रासं मया दत्तमिमं ग्रस . ॥ नंतर प्रार्थना करावी . प्रार्थनामंत्रः - ततः सर्वमये देवि सर्वदेवैरलंकृते ॥ मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि . ॥ तसेंच , त्या दिवशीं तेलांत तळलेला , स्थालींत शिजवलेला पदार्थ आणि गाईचें दूध , तूप , दहीं , ताक हीं वर्ज्य करावीं . "
ज्योतिर्निबंधेनारदः आश्विनेकृष्णपक्षेतुद्वादश्यादिषुपंचसु तिथिषूक्तः पूर्वरात्रेनृणांनीराजनाविधिः नीराजयेयुर्देवांस्तुविप्राग्नाश्चतुरंगमान् ज्येष्ठान् श्रेष्ठान् जघन्यांश्चमातृमुख्याश्चयोषित इति निर्णयामृतेस्कांदे कार्तिकस्यासितेपक्षेत्रयोदश्यांनिशामुखे यमदीपंबहिर्दद्यादपमृत्युर्विनश्यति मंत्रस्तु मृत्युनापाशदंडाभ्यांकालेनश्यामयासह त्रयोदश्यांदीपदानात्सूर्यजः प्रीयतांममेति ।
ज्योतिर्निबंधांत नारद - " आश्विनकृष्णद्वादशीपासून कार्तिकशुद्धप्रतिपदेपर्यंत पांचदिवस पूर्वरात्रीं मनुष्यांस नीराजनविधि सांगितला आहे तो असा - देव , ब्राह्मण , गाई , घोडे , ज्येष्ठ , श्रेष्ठ , लहान या सर्वांस मातृप्रमुख स्त्रियांनीं नीराजन करावें ( दिवे ओंवाळावे ). " निर्णयामृतांत स्कांदांत - " कार्तिककृष्णपक्षीं त्रयोदशीचे दिवशीं प्रदोषकाळीं घराबाहेर यमाला दीप द्यावा , तेणेंकरुन अपमृत्यूचा नाश होतो . " त्याचा मंत्रः - " मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह ॥ त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यजः प्रीयतां मम . "
कार्तिककृष्णचतुर्दश्यांप्रभातेचंद्रोदयेऽभ्यंगंकुर्यात् तदुक्तं हेमाद्रौनिर्णयामृतेचभविष्योत्तरे कार्तिकेकृष्णपक्षेतुचतुर्दश्यामिनोदये अवश्यमेवकर्तव्यंस्नानंनरकभीरुभिः इनश्चंद्रः मदनरत्नेविधूदय इति पाठः दिनोदय इतिपाठात्सूर्योदयोत्तरंत्रिमुहूर्तेस्नानंवदतांगौडानांतदनुसारिणांचाज्ञतैव पूर्वविद्धचतुर्दश्यांकार्तिकस्यसितेतरे पक्षेप्रत्यूषसमयेस्नानंकुर्यात्प्रयत्नत इति स्मृतिदर्पणेपि चतुर्दशीचाश्वयुजश्चकृष्णास्वात्यृक्षयुक्ताचभवेत्प्रभाते स्नानंसमभ्यज्यनरैस्तुकार्यंसुगंधतैलेनविभूतिकामैरिति पृथ्वीचंद्रोदयेपाद्मे आश्वयुकृष्णपक्षस्यचतुर्दश्यांविधूदये तिलतैलेनकर्तव्यंस्नानंनरकभीरुणेति कर्तव्यंमंगलस्नानंनरैर्निरयभीरुभिरिति कालादर्शेपाठः उभयत्राश्वयुगित्यमावास्यांतंमासमभिप्रेत्योक्तम् तथा तैलेलक्ष्मीर्जलेगंगादीपावल्याश्चतुर्दशीं प्राप्येतिशेषः प्रातः स्नानंतुयः कुर्याद्यमलोकंनपश्यतीति ।
कार्तिककृष्णचतुर्दशीचेठायीं प्रभातकाळीं चंद्रोदयीं तैलाभ्यंग करावा . तें सांगतो हेमाद्रींत व निर्णयामृतांत भविष्योत्तरांत - " कार्तिककृष्णपक्षामध्यें चतुर्दशीचेठायीं चंद्रोदयीं नरकास भिणारांनीं अवश्य स्नान करावें . " मदनरत्नांत ‘ इनोदये ’ यास्थानीं ‘ विधूदये ’ असा पाठ आहे . ‘ दिनोदये ’ अशा पाठावरुन सूर्योदयानंतर तीन मुहूर्तांत स्नान करावें , असें सांगणारे गौड व त्यांचे अनुयायी अजाणतेच म्हटले पाहिजेत . " कार्तिकाच्या कृष्णपक्षांत त्रयोदशीयुक्त चतुर्दशीचे ठायीं उषःकालीं प्रयत्नानें स्नान करावें " असें वचन आहे . स्मृतिदर्पणांतही " आश्विनकृष्णचतुर्दशी स्वातीनक्षत्रानें युक्त असतां ऐश्वर्येच्छू नरांनीं प्रातःकाळीं सुगंधितैलानें अभ्यंग करुन स्नान करावें . " पृथ्वीचंद्रोदयांत पाद्मांत - " आश्विनकृष्णपक्षाच्या चतुर्दशीस चंद्रोदयीं नरकास भिणारानें तिळांचें तेल लावून स्नान करावें . " वरील वचनांत ‘ कर्तव्यं मंगलस्नान्नं नरैर्निरयभीरुभिः ’ असा कालादर्शांत पाठ आहे . मंगलस्नान करावें , असा अर्थ . ह्यावरील दोन्हीं वचनांमध्यें आश्विन असें पद आहे तें अमावास्यान्त मास घेऊन सांगितलें आहे . तसेंच " दीपावलीची चतुर्दशी प्राप्त झाली म्हणजे तैलांत लक्ष्मी व उदकांत गंगा असते , म्हणून तैलाभ्यंग करुन प्रातःस्नान जो करील त्याच्या दृष्टीस यमलोक पडत नाहीं . "
दिनद्वयेपिचंद्रोदयेचतुर्दशीसत्वेतदभावेप्यरुणोदयेसंपूर्णेखंडेवादिनद्वयेचतुर्दशीसमत्वेचपूर्वदिनेभ्यंगंकुर्यात् पूर्वविद्धचतुर्दश्यामितिवचनात् पूर्वदिनेपरदिनएववासत्त्वेसैवग्राह्या दिनद्वयेप्यसत्त्वेअरुणोदयव्यापिनीग्राह्या पक्षेप्रत्यूषसमयइत्युक्तेः वक्ष्यमाणवचनाच्च तदभावेतुचतुर्दशीह्नासंपूर्वेद्युः प्रवेश्यपूर्वेऽह्नित्रयोदशीमध्यएवाभ्यंगंकुर्यादितिदिवोदासः केचिदत्रवचनमपिसाधकत्वेनवदंति तिथ्यादौतुभवेद्यावान्हासोवृद्धिः परेऽहनि तावान् ग्राह्यः सपूर्वेद्युरदृष्टोपिस्वकर्मणीति तन्मंदम् नहीदंवचनंपूर्वदिनस्याऽपूर्वंग्राह्यत्वंविधत्ते नक्तैकभक्तजन्माष्टम्यादौदिनद्वयेकर्मकालव्याप्त्यभावेसर्वत्रपूर्वदिनस्यग्राह्यत्वप्रसंगात् किंतु यत्रैकभक्तादौदिनद्वयेकर्मकालव्याप्त्यभावेवाक्यांतरेणन्यायेनवापूर्वदिनस्यग्राह्यत्वमुक्तम् तत्रमुख्यकालेतत्तिथेरभावेपितत्रैवानुष्ठानबोधकमिदम् नचात्रतदस्तीतियत्किंचिदेतत् तेनचतुर्थयामगामिनीग्राह्या अतएवसर्वज्ञनारायणः तथाकृष्णचतुर्दश्यामाश्विनेऽर्कोदयात्पुरा यामिन्याः पश्चिमेयामेतैलाभ्यंगोविशिष्यतइति मृगांकोदयवेलायांत्रयोदश्यांयदाभवेत् दर्शेवामंगलस्नानंदुः खशोकभयप्रदमिति कालादर्शेत्रयोदशीनिषेधाच्च तेनायमर्थः यथाग्निहोत्रेयावज्जीवंसायंप्रातः कालेषुव्याप्यकालस्यगुरुत्वम् तथात्रचतुर्दशीचतुर्थयामारुणोदयचंद्रोदयानामुत्तरोत्तरस्यव्याप्यत्वाद्गुरुत्वमिति यदपिदिवोदासीये त्रयोदशीयदाप्रातः क्षयंयातिचतुर्दशी रात्रिशेषेत्वमावास्यातदाभ्यंगेत्रयोदशीतिवचनं तद्धेमाद्रिनिर्णयामृताद्यलिखितत्वेननिर्मूलम् समूलत्वेपिनचतुर्दश्याः सूर्योदयद्वयासंबंधित्वरुपः क्षयोत्रविवक्षितः सूर्योदयात्प्राक् समाप्तौचंद्रोदयकालसत्त्वेचत्वयैवांगीकारात् किंतु अभ्यंगकालात्प्राक् समाप्तिरुपोऽत्रह्नासः क्षयशब्देनविवक्षितः सचारुणोदयाच्चतुर्थयामाद्वाप्राक् यदाह्नासस्तत्परमिदम् अतएवसर्वज्ञनारायणेनचतुर्थयाममात्रेस्नानमुक्तम् तथाचोदाह्रतम् तथाकृष्णचतुर्दश्यामिति ज्योतिर्निबंधेनारदोपि इषासितचतुर्दश्यामिंदुक्षयतिथावपि ऊर्जादौस्वातिसंयुक्तेतदादीपावलीभवेत् कुर्यात्संलग्नमेतच्चदीपोत्सवदिनत्रयम् येतुत्रयोदशीमध्येस्नानमाहुस्तेषामाशयंनविद्मइत्यलंभूयसा यदपि अरुणोदयतोऽन्यत्ररिक्तायांस्नातियोनरः तस्याब्दिकभवोधर्मोनश्यत्येवनसंशयइतिदिवोदासीयेभविष्यवचनंतन्मुख्यकालेऽरुणोदयेचतुर्दश्यभावेपितत्रैवस्नातव्यमित्येवंपरमितिसर्वंसिद्धम् चतुर्घटिकात्मकोऽरुणोदयइतितत्रैवोक्तम् ।
दोन्ही दिवशीं चंद्रोदयीं चतुर्दशी असतां , दोन्हीं दिवशीं चंद्रोदयीं नसेल तर अरुणोदयीं संपूर्ण अथवा खंड व्याप्ति असतां आणि दोन्हीं दिवशीं चतुर्दशीची सम व्याप्ति असतां पूर्वदिवशीं अभ्यंग करावा . कारण , " त्रयोदशीयुक्त चतुर्दशीचे ठायीं स्नान करावें . " असें वचन येथेंच वर सांगितलेम आहे . पूर्वदिवशींच चंद्रोदयव्यापिनी असतां पूर्वाच घ्यावी . परदिवशींच चंद्रोदयव्यापिनी असतां पराच घ्यावी . दोन्हीं दिवशीं चंद्रोदयीं नसेल तर अरुणोदयव्यापिनी घ्यावी . कारण , " पक्षे प्रत्यूषसमये . " म्हणजे वरील वचनांत उषःकालीं ( अरुणोदयीं ) स्नान करावें , असें सांगितलें आहे . आणि " आश्विन मासीं कृष्णचतुर्दशीस रात्रीच्या चतुर्थप्रहरीं तैलाभ्यंग विशेष फलदायक आहे . " असें सर्वज्ञनारायणवचन पुढें सांगावयाचेंही आहे . दोन्हीं दिवशीं अरुणोदयव्यापिनी नसेल तर चतुर्दशीचा जितका क्षय असेल तितका पूर्वदिवसांत मिळवून तितकी चतुर्दशी पूर्वदिवशीं आहे असें समजून त्या कालीं वस्तुतः त्रयोदशीमध्येंच अभ्यंग करावा , असें दिवोदास सांगतो . केचित् ग्रंथकार असें करण्याविषयीं साधकवचन देखील सांगतात - " जितक्या घटी तिथिक्षय झालेला असेल तितकी तिथि त्या तिथीच्या आदीं नसली तरी कर्माविषयीं घ्यावी . आणि जितकी वृद्धि असेल तितकी परदिवशीं घ्यावी . " तें सांगणें मंद आहे . कारण , इतर वचनानें पूर्वीं ग्रहण अप्राप्त असतां हें वचन पूर्वदिवस ग्रहण करण्याविषयीं सांगत नाहीं . जर हें वचन पूर्वदिवस ग्रहण करण्याविषयीं सांगेल तर नक्त , एकभक्त , जन्माष्टमी इत्यादिकांविषयीं दोन दिवस कर्मकालव्याप्ति नसतां सर्वत्र ठिकाणीं पूर्वदिवसाला ग्रहण करण्याचा प्रसंग येईल ! तर ज्या एकभक्तादि व्रताचे ठायीं दोन दिवस कर्मकालव्याप्ति नसतां इतर वाक्यानें किंवा न्यायानें पूर्वदिवस घ्यावा म्हणून सांगितलें आहे , त्या ठिकाणीं मुख्यकालीं त्या तिथीचा अभाव असला तरी त्याच कालीं त्या कर्माचें अनुष्ठान बोध करणारें हें वचन आहे . ह्या प्रकृतस्थलीं त्रयोदशी ग्रहण करण्याविषयीं वचन नसल्यामुळें हें वचन एथें लागू होत नाहीं , म्हणून हें कांहींतरी सांगणें आहे . तेणेंकरुन अरुणोदयीं नसेल तर रात्रीच्या चतुर्थप्रहरांत असणारी चतुर्दशी घ्यावी . म्हणूनच सर्वज्ञनारायण सांगतो - " आश्विनमासीं कृष्णचतुर्दशींत सूर्योदयाच्या पूर्वीं रात्रीच्या शेवटच्या प्रहरीं तैलाभ्यंग विशिष्ट फलदायक आहे . " आणि " ज्या वेळींज चंद्रोदयकालीं त्रयोदशींत अथवा दर्शांत मंगलस्नान होईल त्या वेळीं तें दुःख , शोक , भय यांतें देणारें आहे . " असा कालादशात त्रयोदशींत निषेधही आहे . ह्या वरील वचनावरुन असा अर्थ झाला कीं , जसा - अग्निहोत्रहोमाविषयीं यावज्जीवपर्यंत असलेल्या सायंप्रातः कालामध्यें सायंप्रातःकालांनीं व्यापलेल्या अशा उदितादि कालाला गुरुत्व ( श्रेष्ठत्व ) आहे . तसें - येथें चतुर्दशी , चतुर्थप्रहर , अरुणोदय , चंद्रोदय हे पूर्वपूर्वांनीं उत्तरोत्तर व्यापलेले असल्यामुळें उत्तरोत्तराला गुरुत्व ( श्रेष्ठत्व ) आहे . आतां जें दिवोदासीयांत - " ज्या वेळीं त्रयोदशी प्रातःकालीं असून चतुर्दशीचा क्षय होतो आणि त्या दिवशीं पहांटेस अमावास्या असते त्या वेळीं अभ्यंगाविषयीं त्रयोदशी होते . " असें वचन तें हेमाद्रि - निर्णयामृत इत्यादिकांनीं लिहिलेलें नसल्यामुळें निर्मूल आहे . समूल मानिलें तरी पूर्वदिवशींच्या सूर्योदय व परदिवशींचा सूर्योदय या दोघांलाही चतुर्दशीचा संबंध नसणें अशा प्रकारचा तिथिक्षय एथें क्षयशब्दानें घ्यावयाचा नाहीं . कारण , तसा तिथिक्षय घेतला तर परदिवशीं सूर्योदयाच्या पूर्वीं चतुर्दशी समाप्त असतां व चंद्रोदयीं असतां त्याच चतुर्दशीचा तूंच ( दिवोदासानेंच ) स्वीकार केलेला आहे . तर अभ्यंगकालाच्या पूर्वी समाप्ति होणें हा क्षय एथें क्षयशब्दानें घ्यावयाचा आहे . तो ह्नास ( क्षय ) अरुणोदयाच्या किंवा चतुर्थप्रहराच्या पूर्वीं जेव्हां असेल तद्विषयक हें वचन आहे . म्हणजे जेव्हां परदिवशीं अरुणोदयाच्या किंवा चतुर्थप्रहराच्या पूर्वी चतुर्दशी समाप्त होईल तेव्हां त्रयोदशीचे दिवशीं पहांटेस चतुर्दशीमध्येंच अभ्यंग करावा . पहांटेस सूर्योदयाच्या आंत चतुर्दशी नसेल तर परदिवशीं रात्रीचे चतुर्थप्रहरीं असलीच पाहिजे , त्या वेळीं अभ्यंग करावा . असें आहे म्हणूनच सर्वज्ञनारायणानें चवथ्या प्रहरीं अभ्यंगस्नान सांगितलें आहे . तेंच सांगतो . - " आश्विनकृष्णचतुर्दशीचे ठायीं सूर्योदयाचे पूर्वीं रात्रीच्या चतुर्थप्रहरीं तैलाभ्यंग करावा . " हें वचन वर लिहिलें आहे . ज्योतिर्निबंधांत नारदही - " आश्विनकृष्ण चतुर्दशी , अमावास्या व स्वातियुक्त कार्तिकशुक्ल प्रतिपदा हे तीन दिवस दीपावलि होते . ह्या तीन दिवशीं दीपोत्सव करावा . " जे ग्रंथकार त्रयोदशीमध्यें स्नान करावें असें सांगतात त्यांचा आशय आम्हांला कळत नाहीं , असेंच म्हणतों . याहून ज्यास्त सांगत नाहीं . आतां जें " जो मनुष्य चतुर्दशीचे दिवशीं अरुणोदयावांचून इतरकालीं स्नान करितो , त्याचा एक वर्षांत उत्पन्न झालेला धर्म नष्ट होतो , यांत संशय नाहीं . " असें दिवोदासीयांत भविष्यवचन तें स्नानाचा मुख्य काल जो अरुणोदय त्यावेळीं चतुर्दशी नसली तरी त्याचवेळीं स्नान करावें , अशा अर्थाचें बोधक आहे . तात्पर्य - वरील सर्व वचनांवरुन सूर्योदयाच्या पूर्वीं पहाटेस चतुर्दशी नसतां त्रयोदशींत स्नान करावें , असा अर्थ होत नाहीं . याप्रमाणें सर्व अभीष्ट सिद्ध झालें आहे . अरुणोदय कोणता म्हणाल तर सूर्योदयाच्या पूर्वी चार घटिका जो काल तो अरुणोदय , असें तेथेंच सांगितलें आहे .
मदनरत्नेपाद्मे अपामार्गमथोतुंबींप्रपुन्नाटमथापरम् भ्रामयेत्स्नानमध्येतुनरकस्यक्षयायवै प्रपुन्नाटश्चक्रमर्दः मंत्रस्तु सीतालोष्ठसमायुक्तसकंटकदलान्वित हरपापमपामार्गभ्राम्यमाणः पुनः पुनरिति अस्यामेवप्रदोषेदीपान्दद्यादित्युक्तंहेमाद्रौस्कांदे ततः प्रदोषसमयेदीपान्दद्यान्मनोरमान् ब्रह्मविष्णुशिवादीनांभवनेषुमठेषुचेति दिवोदासीयेब्राह्मे अमावास्याचतुर्दश्योः प्रदोषेदीपदानतः यममार्गाधिकारेभ्योमुच्यते कार्तिकेनरः खंडतिथौतुपूर्वेह्निप्रदोषेदीपान् दत्वापरेद्युः स्नायादितिदिवोदासीयेउक्तम् अत्रनरकोद्देशेनचतुर्वर्तियुक्तंदीपदानंकार्यम् तत्रमंत्रः दत्तोदीपश्चतुर्दश्यांनरकप्रीतयेमया चतुर्वर्तिसमायुक्तः सर्वपापापनुत्तये तत्रैवलैंगे माषपत्रस्यशाकेनभुक्त्वातत्रदिनेनरः प्रेताख्यायांचतुर्दश्यांसर्वपापैः प्रमुच्यते ।
मदनरत्नांत पाद्मांत - " आघाडा किंवा भोपळ्याचें पान अथवा टाकळा हा स्नानकालीं नरकनाशार्थ अंगावरुन फिरवावा . " फिरविण्याचा मंत्रः - " सीतालोष्टसमायुक्त सकंटक दलान्वित ॥ हर पापमपामार्ग भ्राम्यमाणः पुनः पुनः " या चतुर्दशीचे दिवशींच प्रदोषकालीं दीप लावावे असें सांगतों - हेमाद्रींत स्कांदांत " नंतर प्रदोषसमयीं ब्रह्मा , विष्णु , शिव , इत्यादिकांच्या मंदिरांत व मठांत दीप लावावे . " दिवोदासीयांत ब्राह्मांत " कार्तिकमासामध्यें अमावास्या व चतुर्दशी ह्या दिवशीं प्रदोषकालीं दिवे लावल्यानें मनुष्य यममार्गाच्या अधिकारांपासून मोकळा होतो . " खंड तिथि चतुर्दशी असेल तर पूर्वदिवशीं प्रदोषकालीं दिवे लावून परदिवशीं स्नान करावें . असें दिवोदासीयांत सांगितलें आहे . या चतुर्दशीचे ठायीं नरकासुराचे उद्देशानें चार वातींनीं युक्त दीप लावावा . त्याविषयीं मंत्रः - " दत्तो दीपश्चतुर्दश्यां नरकप्रीतये मया ॥ चतुर्वर्तिसमायुक्तः सर्वपापापनुत्तये . " दिवोदासीयांत लैंगांत " नरकचतुर्दशीचे दिवशीं उडदांच्या पानांच्या भाजीनें भोजन केलें असतां मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो . "