आतां दशावतारजयंत्या सांगतो.
चैत्रशुक्लतृतीयैवमत्स्यजयंती अत्रैवप्रसंगाद्दशावतारजयंत्योनिर्णीयंते तत्रपुराणसमुच्चये मत्स्योभूद्धुतभुग्दिनेमधुसितेकूर्मोविधौमाधवेवाराहोगिरिजासुतेनभसियद्भूतेसितेमाधवे सिंहोभाद्रपदेसितेहरितिथौश्रीवामनोमाधवेरामोगौरितिथावतः परमभूद्रामोनवम्यांमधोः कृष्णोष्टम्यांनभसिसितपरेचाश्विनेयद्दशम्यांबुद्धः कल्कीनभसिसमभूच्छुक्लषष्ठ्यांक्रमेण अह्नोमध्येवामनोरामरामौमत्स्यः क्रोडश्चापराह्णेविभागे कूर्मःसिंहोबौद्धकल्कीचसायंकृष्णोरात्रौकालसाम्येचपूर्वेति केचित्तुस्फुटान् श्लोकान्पठंति तथा चैत्रेतुशुक्लपंचम्यां भगवानमीनरुपधृक् ज्येष्ठेतुशुक्लद्वादश्यांकूर्मरुपधरोहरिः चैत्रेकृष्णेनवम्यांतुहरिर्वाराहरुपधृक् नरसिंहश्चतुर्दश्यांवैशाखेशुक्लपक्षके मासिभाद्रपदेशुक्लद्वादश्यांवामनोहरिः राधशुद्धतृतीयायांरामोभार्गवरुपधृक् चैत्रशुक्लनवम्यांतुरामोदशरथात्मजः नभस्येतुद्वितीयायांबलभद्रोभवद्धरिः श्रावणेबहुलेऽष्टम्यांकृष्णोभूल्लोकरक्षकः ज्येष्ठेशुक्लद्वितीयायांबौद्धः कल्कीभविष्यतीतिं ।
चैत्रशुक्लतृतीया हीच मत्स्यजयंती होय. येथेंच प्रसंगेंकरुन दशावतारांच्या जयंत्या ( जन्मदिवस ) सांगतो. पुराणसमुच्चयांत - चैत्रशुद्ध तृतीयेस मत्स्यावतार, वैशाखशुद्ध पौर्णिमेस कूर्मावतार, भाद्रपदशुक्ल तृतीयेस वराहावतार, वैशाखशुद्ध चतुर्दशीस नारसिंहावतार, भाद्रपदशुक्ल द्वादशीस वामनावतार, वैशाखशुद्ध तृतीयेस परशुरामावतार, चैत्रशुद्ध नवमीस रामावतार, श्रावणकृष्ण अष्टमीस कृष्णावतार, आश्विनशुक्ल दशमीस बौद्धावतार, श्रावणशुद्ध षष्ठीस कल्क्यवतार, असे हे दहा अवतार आहे. दिवसाच्या मध्यभागीं ( मध्याह्नीं ) वामन, परशुराम, आणि राम हे झाले. अपराह्णीं मत्स्य व वराह हे झाले. सायंकाळीं कूर्म, नारसिंह, बौद्ध व कल्की हे झाले. मध्यरात्रीस कृष्ण झाला. याप्रमाणें हे अवतारकाल होत. या जन्मतिथि दोनही दिवशीं जन्मकालीं सम असतां पूर्वतिथि घ्याव्या. ” या अवताराविषयीं केचित् ग्रंथकार स्फुट श्लोक म्हणतात - ते असे - “ चैत्रशुक्लपंचमीस मत्स्यरुपधारणकर्ता भगवान् झाला. ज्येष्ठशुद्ध द्वादशीस कूर्म, चैत्रकृष्ण नवमीस वराह, वैशाखशुद्ध चतुर्दशीस नारसिंह, भाद्रपदशुक्ल द्वादशीस वामन, वैशाखशुद्ध तृतीयेस भार्गवराम, चैत्रशुद्ध नवमीस दाशरथीराम, भाद्रपदशुद्ध द्वितीयेस बलभद्र, श्रावणकृष्ण अष्टमीस कृष्ण, ज्येष्ठशुद्ध द्वितीयेस बौद्ध, हे अवतार या तिथींस झाले. व कल्की पुढें होईल. ”
कोंकणास्तु वराहपुराणस्थत्वेनवाक्यानिपठंति आषाढेशुक्लपक्षेतुएकादश्यांमहातिथौ जयंतीमत्स्यनाम्नीतितस्यांकार्यमुपोषणं नभोमासितृतीयायांहरिः कमठरुपधृक् नभस्यशुक्लपंचम्यांवराहस्यजयंतिका वैशाखेतुचतुर्दश्यांनृसिंहः समपद्यत मासिभाद्रपदेशुक्लैकादश्यांवामनोहरिः वैशाखेशुक्लपक्षेतुतृतीयायांभृगूद्वहः चैत्रेनवम्यांरामोभूत्कौशल्यायांपरः पुमान् श्रावणेबहुलेष्टम्यांवासुदेवोजनार्दनः पौषशुक्लेतुसप्तम्यांकुर्याद्वौद्द्धस्यपूजनं माघशुक्लतृतीयायांकल्किनः पूजनंहरेः प्रातः प्रातस्तुमधाह्नेसायंसायंतथानिशि मध्याह्नेमध्यरात्रेचसायंप्रातरनुक्रमादिति तदत्रसमूलत्वनिर्णयेसतिकल्पभेदन्व्यवस्थाद्रष्टव्या एताश्चतदुपासकानांनित्याः अन्येषांतुकाम्याः जन्माष्टम्यादौतुविशेषंवक्ष्यामः ।
कोंकणस्थजन तर वराहपुराणांतील म्हणून वाक्यें ( वचनें ) म्हणतात, तीं अशीं - “ आषाढशुद्ध एकादशी ही मत्स्यजयंती, तिचेठायीं उपोषण करावें. श्रावणमासीं तृतीया ही कूर्मजयंती. भाद्रपदशुद्ध पंचमी ही वराहजयंती. वैशाखशुद्धचतुर्दशी ही नृसिंहजयंती. भाद्रपदशुद्ध एकादशी वामनजयंती. वैशाखशुद्ध तृतीया भार्गवजयंती. चैत्रशुक्ल नवमी दाशरथिरामजयंती. श्रावणकृष्ण अष्टमी कृष्णजयंती. पौषशुद्ध सप्तमीच बौद्धपूजन करावें. माघशुद्ध तृतीयेस कल्कीचें पूजन करावें. प्रातःकालीं मत्स्य व कूर्म, मध्याह्नीं वराह, सायंकालीं नारसिंह व वामन, रात्रीस भार्गवराम, मध्याह्नीं राम, मध्यरात्रीं कृष्ण, सायंकालीं बौद्ध, प्रातःकालीं कल्की, हे अवतार या कालीं झाले. ” येथें कितीएक जयंतीविषयीं पुराणसमुच्चयाचें मत वेगळें, स्फुटश्लोकांचें वेगळें आणि वराहपुराणस्थवाक्यांचें वेगळें अशीं मतें भिन्न आहेत. हीं सारीं वचनें समूल असतील तर त्या मतभेदांची व्यवस्था कल्पभेदानें समजावी. ह्या जयंत्या त्या त्या देवतांच्या उपासकांस नित्य व इतरांस काम्य होत. जन्माष्टमी इत्यादिक जयंत्यांविषयीं तर नित्य व काम्य याचा निर्णय पुढें सांगूं.