मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
मातामहश्राद्ध

द्वितीय परिच्छेद - मातामहश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आश्विनशुक्लप्रतिपदिदौहित्रस्यमातामहश्राद्धमुक्तम् हेमाद्रौसंग्रहेच जातमात्रोपिदौहित्रोविद्यमानेपिमातुले कुर्यान्मातामहश्राद्धंप्रतिपद्याश्विनेसित इति इयंसंगवव्यापिनीग्राह्येतिनिर्णयदीपेउक्तम् प्रतिपद्याश्विनेशुक्लेदौहित्रस्त्वेकपार्वणम् श्राद्धंमातामहंकुर्यात्सपितासंगवेसदा जातमात्रोपिदौहित्रोजीवत्यपिचमातुले प्रातः संगवयोर्मध्येआर्यस्यप्रतिपद्भवेदितिवचनात् अत्रसमूलत्वंविमृश्यम्‍ इदंचमलमासेनकार्यं स्पष्टमासविशेषाख्याविहितंवर्जयेन्मलेइतिनिषेधात् इदंचजीवत्पितृकेणैवकार्यमितिशिष्टाः इदंचशिष्टाचारात्सपिंडकंकार्यमितिकेचित् पिंडरहितंतुयुक्तं जीवत्पितृकस्य मुंडनंपिंडदानंचप्रेतकर्मचसर्वशः नजीवत्पितृकः कुर्याद्गुर्विणीपतिरेवचेतिदक्षेणपिंडनिषेधात् आन्वष्टक्यवद्विशेषवचनाभावाच्चेतिसंक्षेपः इतिश्रीकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौमहालयनिर्णयः ।

आश्विन शुक्ल प्रतिपदेस दौहित्राला मातामहश्राद्ध सांगितलें आहे - हेमाद्रींत व संग्रहांत - “ मातुल विद्यमान असतांही उत्पन्न झालेल्याही ( बाल्य अवस्थेंत असलेल्याही ) दौहित्रानें आश्विनशुक्लप्रतिपदेस मातामहश्राद्ध करावें. ” ही प्रतिपदा दौहित्रश्राद्धाविषयीं संगवकालव्यापिनी घ्यावी, असें निर्णयदीपांत सांगितलें आहे. तें असें - “ जीवत्पितृक दौहित्रानें आश्विनशुक्लप्रतिपदेस संगवकालीं एकपार्वण मातामहश्राद्ध सर्वदा करावें. मातुल जीवंत असतांही उत्पन्न होतांच दौहित्रानें प्रतिपदेस प्रातःकाल व संगवकाल यांच्यामध्यें आर्याचें ( मातामहाचें ) श्राद्ध करावें. ” असें वचन आहे. ह्या वचनाविषयीं समूलपणाचा विचार करावा. हें मातामहश्राद्ध मलमासांत करुं नये. कारण, “ विशेष महिन्यांचें स्पष्ट नांव घेऊन जें विहित कर्म तें मलमासांत वर्ज्य करावें. ” असा निषेध आहे. हें श्राद्ध जीवत्पितृकानेंच करावें, असें शिष्ट सांगतात. हें श्राद्ध शिष्टाचारावरुन सपिंडक करावें असें केचित्‍ म्हणतात. पिंडरहित करणें हें योग्य आहे. कारण, “ क्षौर, पिंडदान, आणि सर्व प्रेतकर्म हें जीवत्पितृकानें व गर्भिणीपतीनें करुं नये ” असा दक्षानें जीवत्पितृकाला पिंडनिषेध केला आहे. आणि आन्वष्टक्य ( नवमी ) श्राद्धांत पिंडाविषयीं विशेष वचन आहे, तसें येथें विशेष वचनही नाहीं. याप्रमाणें हा संक्षेपानें निर्णय समजावा. इति महालयनिर्णयः.

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP