मार्गशीर्षपौर्णिमानंतराष्टमीअष्टका एवंपौषादिमासत्रयेपि हेमंतशिशिरयोश्चतुर्णामपरपक्षाणामष्टमीष्वष्टका एकस्यांवेत्याश्वलायनोक्तेः एकस्यामष्टम्यांवैकाकार्येतिहरदत्तः क्कचित्पंचम्यप्युक्ता प्रौष्ठपद्यष्टकाभूयः पितृलोकेभविष्यतीतिपाद्मवचनात् तत्पूर्वसप्तमीषुपूर्वेद्युः तत्परनवमीष्वन्वष्टकाचश्राद्धमुक्तम् कालादर्शे मार्गशीर्षेचपौषेचमाघेप्रौष्ठेचफाल्गुने कृष्णपक्षेचपूर्वेद्युरन्वष्टक्यंतथाष्टकाइति यत्तुविष्णुः अमावास्यास्तिस्रोऽन्वष्टकाइति यच्चकौर्मे अमावास्याष्टकास्तिस्रः पौषमासादिषुत्रिष्विति तच्चतुर्थ्यामनावश्यकत्वार्थं याचाप्यन्याचतुर्थीस्यात्तांचकुर्यात्प्रयत्नत इतिवायुब्रह्मांडपुराणात् श्राद्धमेतेष्वकुर्वाणोनरकंप्रतिपद्यत इतिविष्णूक्तेरितिशूलपाणिः शाखाभेदाव्द्यवस्थेतितत्त्वम् वायुब्रह्मांडयोः आद्यापूपैः सदाकार्यामांसैरन्यासदाभवेत् शाकैः कार्यातृतीयास्यादेषद्रव्यगतोविधिः पौषादिक्रमः अन्वष्टकातुप्रागेवनिर्णीता तत्राष्टम्यपराह्णव्यापिनीग्राह्या अथाच्छादनपर्यंतंश्राद्धंपार्वणवद्भवेदित्याश्वलायनकारिकोक्तेरपराह्णकालत्वाच्चपार्वणस्य पूर्वेद्युरन्वष्टकाश्राद्धयोस्तुअष्टम्यनुरोधेननिर्णयः अतएवसूत्रम् पूर्वेद्युः पितृभ्योदद्यात् अपरेद्युरन्वष्टक्यमितिच अत्रकामकालौविश्वेदेवौ इष्टिश्राद्धेक्रतूदक्षावष्टम्यांकामकालावितिसायणीयेशंखोक्तेः अत्रश्राद्धाकरणेप्रायश्चित्तमुक्तमृग्विधाने एभिर्द्युभिर्जपेन्मंत्रंशतवारंतुतद्दिने आन्वष्टक्यंयदान्यूनंसंपूर्णंयातिसर्वथेति अशक्तौत्वाश्वलायनः - अथश्वोभूतेष्टकाः पशुनास्थालीपाकेनचाप्यनडुहोयवसमाहरेदग्निनावाकक्षमुपोषेदेषामेष्टकेतिनत्वेवानष्टकः स्यादिति मार्गशीर्षादिषुमलमासेसतितत्राष्टकानकार्या चतुर्णामितिग्रहणादित्युक्तंनारायणवृत्तौ तथाकाठकगृह्येपि महालयाष्टकाश्राद्धोपाकर्माद्यपिकर्मयत् स्पष्टमासविशेषाख्याविहितंवर्जयेन्मलेइति ।
मार्गशीर्षपौर्णिमेच्या पुढील ( कृष्णपक्षांतील ) अष्टमीस अष्टकाश्राद्ध होतें . अशाच पौषादिक तीनमासांमध्येंही कृष्ण अष्टमीस अष्टका होतात . कारण , ‘‘ हेमंत व शिशिर या ऋतूंचे जे चार महिने त्यांच्या कृष्णपक्षांतील अष्टमीचे ठायीं अष्टका कराव्या . अथवा एका अष्टमीचे ठायीं अष्टका ( श्राद्ध ) करावी . " असें आश्वलायनांनीं सूत्रांत सांगितलें आहे . सूत्रांतील ‘ एकस्यां ’ याचा अर्थ - एका अष्टमीचे ठायीं एक अष्टका करावी , असें हरदत्त सांगतो . क्कचित् ठिकाणीं पांचवीही अष्टका सांगितली आहे . कारण , " भाद्रपदांतील अष्टका पितृलोकांत मोठी होईल " असें पाद्मवचन आहे . त्या अष्टकांच्या पूर्वदिवशीं सप्तमींचे ठायीं पूर्वेद्युः श्राद्धें , आणि अष्टकांच्या दुसर्या दिवशीं नवमीचे ठायीं अन्वष्टकाश्राद्धें सांगतो कालादर्शांत - " मार्गशीर्ष , पौष , माघ , फाल्गुन आणि भाद्रपद या मासांमध्यें कृष्णपक्षांत पूर्वेद्युः अन्वष्टका आणि अष्टका हीं श्राद्धें होतात . " आतां जें विष्णु - ‘‘ अमावास्या , तीन अष्टका , आणि तीन अन्वष्टका अशी श्राद्धें होतात . " आणि जें कौर्मांत - " अमावास्या बारा आणि पौषादि तीन मासांमध्यें तीन अष्टका कराव्या " असें सांगितलें तें चवथी आवश्यक नाहीं , असें सुचविण्याकरितां आहे . सर्वथा चवथी नाहीं असें नाहीं . कारण , " जी इतर चवथी अष्टका आहे तीसुद्धां प्रयत्नानें करावी . " असें वायुपुराण व ब्रह्मांडपुराणवचन आहे . यावरुन चवथी अष्टका आहे . पण तीन अष्टका जशा अवश्य आहेत , तशी चवथी नाहीं . कारण , " ह्या वर सांगितलेल्या अमावास्या व तीन अष्टका यांचे ठायीं श्राद्ध न करणारा नरकास जातो " असें विष्णुवचन आहे , असें शूलपाणि सांगतो . तीन कोणास व चार कोणास याची शाखाभेदानें व्यवस्था करावी , हें तत्त्व होय . वायु व ब्रह्मांडपुराणांत - " पहिली अष्टका अपूपांनीं सदा करावी . दुसरी अष्टका मांसांनीं सदा करावी . तिसरी अष्टका शाकांनीं करावी . हा अष्टकांस लागणार्या पदार्थांचा विधि समजावा . ह्या तीन अष्टका पौष , माघ , फाल्गुन ह्या मासांतील अनुक्रमानें समजाव्या . अन्वष्टकेचा निर्णय तर पूर्वींच ( भाद्रपदप्रकरणीं ) केला आहे . ह्या अष्टकाश्राद्धाविषयीं अष्टमी अपराह्णव्यापिनी घ्यावी . कारण " आच्छादनपर्यंत श्राद्ध पार्वणासारखें होतें " असें आश्वलायनकारिकेंत पार्वण सांगितलें आहे . पार्वणाचा अपराह्णकाल आहे . पूर्वेद्युः श्राद्ध व अन्वष्टकाश्राद्ध यांचा निर्णय अष्टमीच्या अनुरोधानें म्हणजे अष्टकाश्राद्धाच्या पूर्व दिवशीं पूर्वेद्युः श्राद्ध व अष्टकाच्या दुसर्या दिवशीं अन्वष्टक्य असा समजावा . म्हणूनच सूत्रकार सांगतो - " अष्टकाच्या पूर्वदिवशीं पितरांला द्यावें , आणि परदिवशीं अन्वष्टका श्राद्ध करावें " ह्याश्राद्धांत कामकाल विश्वेदेव होतात . कारण , " इष्टिश्राद्धाचे ठायीं क्रतुदक्ष विश्वेदेव , आणि अष्टमीश्राद्धाचे ठायीं कामकाल विश्वेदेव समजावे " असें सायणीयग्रंथांत शंखवचन आहे . अन्वष्टकाश्राद्ध न केलें तर प्रायश्चित्त सांगतो ऋग्विधानांत - " त्या दिवशीं ‘ एभिर्द्युभिः० ’ ह्या मंत्राचा शंभरवेळां जप करावा , म्हणजे अन्वष्टकाश्राद्ध जर न्यून असेल तर तें सर्वथा संपूर्ण होतें " ह्या अष्टकाश्राद्धाविषयीं शक्ति नसेल तर सांगतो आश्वलायन - " दुसर्या दिवशीं अष्टका पशुयागानें व स्थालीपाकानें कराव्या . अथवा वृषभाला तृण द्यावें . किंवा अग्नीनें तृण जाळावें . आणि ही माझी अष्टका असें म्हणावें ; पण अष्टका केल्यावांचून राहूं नये . " मार्गशीर्षादिचारमासांत मलमास आला असतां त्या मलमासांत अष्टका करुं नये . कारण , वर सांगितलेल्या आश्वलायनसूत्रांत ‘ चतुर्णां ’ म्हणजे चार मासांचे कृष्णपक्षांत असें म्हटलें आहे , असें नारायणवृत्तींत सांगितलें आहे . तसेंच काठकगृह्यांतही - " महालय , अष्टकाश्राद्ध , उपाकर्म इत्यादिक जें कर्म स्पष्ट मासाचें नांव घेऊन सांगितलें तें मलमासांत वर्ज्य करावें .