मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
ऋषिपंचमी

द्वितीय परिच्छेद - ऋषिपंचमी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


भाद्रपदशुक्लपंचमीऋषिपंचमी सामध्याह्नव्यापिनीग्राह्या पूजाव्रतेषुसर्वेमध्याह्नव्यापिनीतिथिरितिमाधवीयेहारीतोक्तेः दिनद्वयेतत्त्वेहेमाद्रिमतेपरा सितापरयुतास्यात्पंचमीतिदीपिकोक्तः माधवमते पूर्वा सर्वत्रपंचमीपूर्वेत्युक्तेः युग्मवाक्यान्निर्णयस्तुयुक्तः ऋषिपंचमीषष्ठीयुतैवेतिदिवोदासः अत्रऋषीन्प्रतिमासुपूजयित्वाऽकृष्टभूमिजशाकेनवर्तनं एवंसप्तवर्षाणिकृत्वासप्तकुंभेषुप्रतिमासुसंपूज्यापरेह्नितत्तन्मंत्रेणाष्टोत्तरशतंतिलान्हुत्वासप्तब्राह्मणान् ‍ भोजयेदितिनिर्णयामृते ।

भाद्रपदशुक्ल पंचमी ही ऋषिपंचमी - ती मध्याह्नव्यापिनी घ्यावी . कारण , " सर्व पूजाव्रतांत मध्याह्नव्यापिनी तिथि घ्यावी . " असें माधवीयांत हारीतवचन आहे . दोन दिवशीं मध्याह्नकालव्यापिनी असतां हेमाद्रिमतीं परा करावी . कारण , " शुक्लपंचमी परयुक्ता घ्यावी " असें दीपिकावचन आहे . " माधवमतीं पूर्वा - कारण , " सर्वत्र पंचमी पूर्वा घ्यावी " असें वचन आहे . युग्मवाक्यानें निर्णय करणें म्हणजे चतुर्थीयुक्त घेणें हें योग्य आहे . ऋषिपंचमी षष्ठीयुक्तच घ्यावी असें दिवोदास सांगतो . या पंचमीचे ठायीं सप्तऋषींची प्रतिमेचे ठायीं पूजा करुन न नांगरलेल्या भूमींत उत्पन्न झालेल्या शाकांचा आहार करावा . असें सात वर्षै व्रत करुन सात कुंभांवर सात ऋषिप्रतिमा पुजून दुसरे दिवशीं त्या त्या मंत्रानें अष्टोत्तरशत संख्याक तिलहोम करुन सात ब्राह्मणांस भोजन घालावें असें निर्णयामृतांत सांगितलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP