मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
होमाविषयीं विशेष प्रकार

द्वितीय परिच्छेद - होमाविषयीं विशेष प्रकार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


होमेचविशेष उक्तोडामरतंत्रे पायसंसर्पिषायुक्तंतिलैः शुक्लैर्विमिश्रितम् ‍ होमयेद्विधिवद्भक्त्यादशांशेननृपोत्तम रुद्राध्यायेयथाहोमंमंत्रेणैकेनसाधयेत् ‍ तथास्तोत्रजपेहोमंश्लोकेनैकेनसाधयेत् ‍ यद्वासप्तशतींजप्यहोममंत्रोनवाक्षरः ऐंह्नींक्लींचामुंडायैविच्चेइतिनवाक्षर इतिकेचित् ‍ पूजोक्तोग्राह्य इतितुयुक्तं रुद्रयामलेपि प्रधानद्रव्यमुद्दिष्टंपायसान्नंतिलास्तथा किंशुकैः सर्षपैः पूगैर्लाजदूर्वांकुरैरपि यवैर्वाश्रीफलैर्दिव्यैर्नानाविधफलैस्तथा रक्तचंदनखंडैश्चगुग्गुलैश्चमनोहरैः प्रतिश्लोकंचजुहुयात्सर्वद्रव्याणिचक्रमात् ‍ नवाक्षरेणवाहुत्वानमोदेव्याइतीतिचेति रहस्येतु प्रतिश्लोकंचजुहुयात्पायसंतिलसर्पिषेत्युक्तम् ‍ दुर्गाभक्तितरंगिण्यांतुतिलैर्जयंतीमंत्रेणचहोम उक्तः पुरश्चरणकार्येतुबिल्वपत्रयुतैस्तिलैरितिकालिकापुराणाद्बिल्वपत्रैश्चेतिस्मार्ताः तन्न अत्रमानाभावात् ‍ ।

होमाविषयीं विशेष प्रकार सांगतो - डामरतंत्रांत - " घृतयुक्त पायस , शुक्लतिलांनीं मिश्रित करुन भक्तीनें यथाविधि जपाचे दशांशानें होम करावा . रुद्राध्यायाचा होम जसा एका मंत्रानें होतो तसा स्तोत्रजपाचा होम एका श्लोकमंत्रानें करावा . अथवा सप्तशतीचा जप करुन नवाक्षर मंत्रानें होम करावा . ‘ ऐंर्‍हींक्लींचामुंडायैविच्चे ’ हा नवाक्षर मंत्र असें केचित् ‍ म्हणतात . पूर्वी सांगितलेला पूजेचा नवाक्षर मंत्र घ्यावा हें तर योग्य होय . रुद्रयामलांत ही " पायसान्न व तिळ हें प्रधानद्रव्य सांगितलें आहे . पळसाची फुलें , सर्षप ( राई ), पूग ( सुपार्‍या ), लाह्या , दुर्वांकुर , यव , श्रीफल ( नारळ ), उत्तम नानाप्रकारचीं फळें , रक्तचंदनाचीं खंडें , सुंदर गुग्गुळ ह्या सर्व द्रव्यांचा अनुक्रमानें दर एक श्लोकमंत्रेंकरुन होम करावा . अथवा नवाक्षरमंत्रानें किंवा ‘ नमोदेव्यै० ’ या मंत्रानें होम करावा . " रहस्यांत तर - " दरएक श्लोकमंत्रानें तिल व घृत यांनीं युक्त पायसाचा होम करावा " असें सांगितलें आहे . दुर्गाभक्तितरंगिणींत तर - जयंती - मंत्रानें तिळांचा होम सांगितला आहे . " पुरश्चरण कार्याचे ठायीं तर बिल्वपत्रयुक्त तिलांनीं होम करावा . " ह्या कालिकापुराणावरुन बिल्वपत्रांनींही होम करावा , असें स्मार्त म्हणतात . तें बरोबर नाहीं . कारण , येथें तो ( बिल्वपत्र होम ) करण्याविषयीं प्रमाण नाहीं .

अथबलिदानम् ‍ तत्राश्वमेषछागमहिषस्वमांसानामुत्तरोत्तरप्राशस्त्यंफलविशेषश्चान्यतोवसेय इतिदिक् ‍ बलिप्रकारस्तुदेवीपुराणे कन्यासंस्थेरवौशक्तः शुक्लाष्टम्यांप्रपूज्यतु द्रोणपुष्पैश्चबिल्वाम्रजातीपुन्नागचंपकैः पंचाब्दंलक्षणोपेतंगंधपुष्पसमन्वितम् ‍ विधिवत्कालिकालीतिजप्त्वाखड्गेनघातयेत् ‍ ॐकालिकालियज्ञेश्वरिलोहदंडायैनम इतिमंत्रः तदुत्थरुधिरंमांसंगृहीत्वापूतनादिषु आदिशब्दात् ‍ चरकीविदारीपापराक्षस्यः नैऋतेभ्यः प्रदातव्यंमहाकौशिकमंत्रितम् ‍ मंत्रस्तुवक्ष्यते तथा तस्याग्रतोनृपः स्नायात्कृत्वाशत्रुंतुपैष्टिकम् ‍ खड्गेनघातयित्वातुदद्यास्कंदविशाखयोः अशक्तौब्राह्मणेनचकूष्मांडादिभिर्बलिदानंकार्यम् ‍ तदुक्तंकालिकापुराणे कूष्मांडमिक्षुदंडंचमांसंसारसमेवच एतेबलिसमाः प्रोक्तास्तृप्तौछागसमाः सदा रुद्रयामलेपि छागाभावेतुकूष्मांडंश्रीफलंवामनोहरं वस्त्रसंवेष्टितंकृत्वाछेदयेच्छुरिकादिना तथा ब्राह्मणेनसदादेयंकूष्मांडंबलिकर्मणि श्रीफलंवासुराधीशछेदंनैवतुकारयेत् ‍ छेदेविकल्पः माषान्नेनबलिर्देयोब्राह्मणेनविजानता कालिकापुराणे उत्तराभिमुखोभूत्वाबलिंपूर्वमुखंतथा निरीक्ष्यसाधकः पश्चादिमंमंत्रमुदीरयेत् ‍ पशुस्त्वंबलिरुपेणममभाग्यादुपस्थितः प्रणमामिततः सर्वरुपिणंबलिरुपिणं चंडिकाप्रीतिदानेनदातुरापद्विनाशनम् ‍ चामुंडाबलिरुपायबलेतुभ्यंनमोस्तुते यज्ञार्थेबलयः सृष्टाः स्वयमेवस्वयंभुवा अतस्त्वांघातयाम्यद्यतस्माद्यज्ञेवधोवधः ऐंह्नींश्रीमितिमंत्रेणतंबलिंमत्स्वरुपिणम् ‍ चिंतयित्वान्यसेत्पुष्पंमूर्ध्नितस्यतुभैरव रसनात्वंचंडिकायाः सुरलोकप्रसाधकः ह्नींह्नींखड्गेतिमंत्रेणध्यात्वाखड्गंचपूजयेत् ‍ पूजयित्वाततः खड्गंओंहुंफडितिमंत्रकैः गृहीत्वाविमलंखड्गंछेदयेद्बलिमुत्तमं ॐह्नींऐंह्नीं कौशिकीतिरुधिरेणाप्यायतामिति बलिदानेतुदुर्गायाः सर्वत्रायंविधिः स्मृतः मत्स्यसूक्ते नवम्यांपूर्ववत्पूजाकर्तव्याभूतिमिच्छता दक्षिणांवस्त्रयुग्मंच आचार्यायनिवेदयेत् ‍ ।

आतां बलिदान सांगतो - बलिदानाविषयीं घोडा , मेंढा , बकरा , महिष व स्वशरीरमांस हें पूर्वपूर्वाहून उत्तरोत्तर प्रशस्त व त्यांचीं विशेष फलें अन्य ग्रंथांवरुन जाणावीं . ही दिशा समजावी . बलिप्रकार तर देवीपुराणांत - " पशुबलिदानास समर्थ असेल त्यानें कन्यासंक्रांतीस सूर्य असतां शुक्लपक्षांत अष्टमीचे दिवशीं द्रोणपुष्पें , बिल्व , आम्र , जाई , पुन्नाग , चंपक , या पुष्पांनीं [ देवीची ] पूजा करुन सर्व लक्षणांनीं युक्त व गंधपुष्पांनीं युक्त पांच वर्षांचा पूर्वोक्त अश्वादि पशु " कालिकालि० " या मंत्राचा यथाविधि जप करुन खड्गानें मारावा . " ॐ कालि कालि यज्ञेश्वरि लोहदंडायै नमः " हा मंत्र होय . त्या पशूचें रक्त व मांस घेऊन पूतना , चरकी , विदारी , पापराक्षसी यांना द्यावें . आणि महाकौशिकीमंत्रानें मंत्रित असें रक्त मांस राक्षसांना द्यावें . " मंत्र पुढें सांगूं . तसेंच - " त्या पशूच्या पुढें राजानें स्नान करावें आणि पिठाची शत्रूची मूर्ति करुन खड्गानें ती तोडून स्कंद व विशाख यांस द्यावी . " क्षत्रियादिकांस शक्ति नसतां कूष्मांडादिकानें बलिदान करावें . ब्राह्मणानें कूष्मांड , माषमिश्रित अन्न यांचें बलिदान करावें . तें सांगतो - कालिकापुराणांत " कूष्मांड , इक्षुदंड , सारस पक्ष्याचें मांस , हे बलिसमान असून तृप्तीविषयीं छागसमान सांगितले आहेत . " रुद्रयामलांतही " छागाच्या अभावीं कूष्मांड किंवा सुंदर श्रीफल वस्त्रवेष्टित करुन सुरी इत्यादिकानें छेदन करावें . " तसेंच " ब्राह्मणानें बलिकर्माचे ठायीं सदा कूष्मांड द्यावा , अथवा श्रीफल द्यावें , छेद करुंच नये . " यावरुन छेदाविषयीं विकल्प म्हणजे छेद करावा किंवा न करावा . " ब्राह्मणानें माषान्नानें बलि द्यावा . " कालिकापुराणांत - " साधकानें आपण उत्तराभिमुख होऊन पूर्वाभिमुख बलि करुन त्याजकडे पाहून नंतर हा पुढील मंत्र म्हणावा . तो मंत्र :- पशुस्त्वं बलिरुपेण ममभाग्यादुपस्थितः ॥ प्रणमामि ततः सर्वरुपिणं बलिरुपिणं ॥ चंडिकाप्रीतिदानेन दातुरापद्विनाशनं ॥ चामुंडाबलिरुपाय बले तुभ्यं नमोस्तु ते ॥ यज्ञार्थे बलयः सृष्टाः स्वयमेव स्वयंभुवा ॥ अतस्त्वां घात याम्यद्य तस्माद्यज्ञे वधोऽवधः ॥ कालिका म्हणते - " ऐं र्‍हीं श्रीं " या मंत्रानें तो बलि मत्स्वरुपी आहे असें चिंतन करुन त्याच्या मस्तकावर पुष्प ठेवावें . देवलोकाचा साधक तूं चंडिकेची जिव्हा आहेस , असें ध्यान करुन ‘ र्‍हीं र्‍हीं खड्ग ’ या मंत्रानें खड्गाचें पूजन करावें . या प्रकारें खड्गाची पूजा करुन ‘ ॐ हुं फट ’ या मंत्रानें खड्ग घेऊन उत्तमबलीचें छेदन करावें . मंत्रः - " ॐ र्‍हींऐंर्‍हीं कौशिकीति रुधिरेणाप्यायतां . " दुर्गेच्या बलिदानाविषयीं सर्वत्र हा विधि सांगितला आहे . " मत्स्यसूक्तांत - " ऐश्वर्य इच्छिणारानें नवमीस पूर्वीसारखी पूजा करावी आणि दक्षिणा व दोन वस्त्रें आचार्यास द्यावीं . "

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP