अत्रैवचातुर्मास्यव्रतारंभउक्तोभारते आषाढेतुसितेपक्षेएकादश्यामुपोषितः चातुर्मास्यव्रतंकुर्याद्यत्किंचिन्नियतोनरइति अस्यनित्यत्वंतत्रैवोक्तम् वार्षिकांश्चतुरोमासान्वाहयेत्केनचिन्नरः व्रतेननोचेदाप्नोतिकिल्बिषंवत्सरोद्भवम् असंभवेतुलार्केपिकर्तव्यंतत्प्रयत्नतइति तेनाषाढशुक्लैकादश्यांद्वादश्यांपौर्णमास्यांवारंभः समाप्तिस्तुकार्तिकशुक्लद्वादश्यामेवतदुक्तंहेमाद्रौभारते चतुर्धागृह्यवैचीर्णंचातुर्मास्यव्रतंनरः कार्तिकेशुक्लपक्षेतुद्वादश्यांतत्समापयेदिति अस्यारंभः शुक्रास्तादावपिकार्यः नशैशवंनमौढ्यंचशुक्रगुर्वोर्नवातिथेः खंडत्वंचिंतयेदादौचातुर्मास्यविधौनरइतिहेमाद्रौवृद्धगार्ग्योक्तेः इदंचद्वितीयाद्यारंभविषयम् प्रथमारंभस्तुनभवत्येव आशौचमध्येपिद्वितीयाद्यारंभोभवति अशुचिर्वाशुचिर्वापियदिस्त्रीयदिवापुमान् व्रतमेतन्नरः कृत्वामुच्यतेसर्वपातकैरितिभार्गवार्चनदीपिकायांस्कांदोक्तेः आरब्धेसूतकंनस्यादनारब्धेतुसूतकमितिविष्णुवचनाच्च यत्तुअसंक्रांतंतथामासंदैवेपित्र्येचकर्मणि मलमासमशौचंचवर्जयेन्मतिमान्नरइतिहेमाद्रौ चातुर्मास्यव्रतप्रकरणेभविष्यवचनं तत्पूषानुमंत्रणमंत्रवदसंबद्धंमध्येपठितमितिज्ञेयं अन्यथापित्र्यस्यपूर्वोक्तस्यविवाहादेश्चचातुर्मास्यव्रतेकः प्रसंगः प्रकरणनिवेशेपिवाप्रथमारंभविषयंज्ञेयं केचित्तुप्रतिवर्षंचातुर्मास्यव्रतप्रयोगानांभिन्नत्वादाशौचादिपातेद्वितीयादिप्रयोगोनभवत्येवेत्याहुः तन्न प्रतिवर्षंचयः कुर्यादेवंवैसंस्मरन्हरिं देहांतेऽतिप्रदीप्तेनविमानेनार्कवर्चसा मोदतेविष्णुलोकेसौयावदाभूतसंप्लवमितिहेमाद्रौभविष्यवचनादित्यास्तांविस्तरः ।
ह्या एकादशीसच चातुर्मास्यव्रतांचा आरंभ सांगतो. भारतांत - “ आषाढशुक्लपक्षीं एकादशीस उपोषण करुन कोणत्याही चातुर्मास्यव्रताचा आरंभ नियमित होऊन मनुष्यानें करावा. ” चातुर्मास्यव्रत नित्य आहे, असें तेथेंच सांगतो - “ वार्षिक ( वर्षाकालाचे ) चार महिने कोणत्याही व्रतानें घालवावे. असें न करील तर त्या मनुष्यास संवत्सराचें पाप लागतें. चार महिने व्रत न होईल तर तूलसंक्रांतीस सूर्य असतांही तें व्रत यत्नानें करावें. ” यावरुन आषाढशुक्ल एकादशी, द्वादशी, किंवा पौर्णिमा यांचे ठायीं आरंभ करावा. आणि समाप्ति तर कार्तिकशुक्ल द्वादशीसच करावी; तें सांगतो. हेमाद्रींत भारतांत - “ मनुष्यानें चातुर्मास्यव्रत चार प्रकारचें ( श्रावणांत शाक, भाद्रपदांत दहीं, आश्विनांत दूध, कार्तिकांत द्विदल हें वर्जनरुप ) ग्रहण करुन आचरण केलेलें तें कार्तिकशुक्ल द्वादशीस समाप्त करावें. ” चातुर्मास्यव्रताचा आरंभ गुरुशुक्रांच्या अस्तादिकांतही करावा. कारण, “ शुक्र व गुरुचें शिशुत्व, अस्त व खंडातिथि यांचा विचार चातुर्मास्यव्रताचे आरंभाविषयीं मनुष्यानें करुं नये ” असें हेमाद्रींत वृद्धगार्ग्याचें वचन आहे. हें वचन दुसर्या वगैरे आरंभाविषयीं होय. प्रथमारंभ तर होत नाहींच. आशौचामध्येंही दुसर्या वर्षीं वगैरे व्रतारंभ होतो. कारण “ स्त्री किंवा पुरुष अशुचि किंवा शुचि असेल तथापि त्यानें हें व्रत केलें असतां सर्व पातकांपासून मुक्त होतो ” असें भार्गवार्चनदीपिकेंत स्कांदवचन आहे. आणि प्रारंभ केलेल्याविषयीं सूतक नाहीं, आरंभ केला नसेल तर त्याविषयीं सूतक दोष होतो ” असें विष्णुवचनही आहे. आतां जें “ दैवपित्र्यकर्मांचे ठायीं मलमास व अशौच वर्ज्य करावीं, म्हणजे मलमासांत व आशौचांत दैवपित्र्यकर्म करुं नये. ” असें हेमाद्रींत चातुर्मास्यव्रतप्रकरणीं भविष्यवचन आहे तें पूषानुमंत्रण मंत्रासारखें असंबद्ध मध्यें पठित आहे, असें जाणावें. असंबद्ध म्हटलें नाहीं तर हेमाद्रींत पूर्वोक्त पित्र्यकर्म व विवाह यांचा चातुर्मास्यव्रतामध्यें काय प्रसंग आहे ? अथवा चातुर्मास्यव्रतप्रकरणांत तें वचन सुसंबद्ध मानिलें तरी प्रथमारंभविषयक जाणावें. केचित् विद्वान् तर प्रतिवर्षीं चातुर्मास्यव्रतप्रयोग भिन्न भिन्न असल्यामुळें दुसर्या वर्षीं आशौचादि प्राप्त असतां द्वितीयादिप्रयोग ( द्वितीयादिव्रतारंभ ) होतच नाहीं असें म्हणतात. तें बरोबर नाहीं; कारण, “ प्रतिवर्षीं हरीचें स्मरण करुन असें जो व्रत करील तो देहांतीं सूर्यासारख्या तेजस्वी अशा विमानांत बसून कल्पपर्यंत विष्णुलोकीं आनंद पावतो. ” असें हेमाद्रींत भविष्यवचन आहे. यावरुन द्वितीयादि आरंभ अवश्य आहे. आतां हा विस्तार राहूं दे.
इदंचशिवभक्तादिभिरपिकार्यं शिवेवाभक्तिसंयुक्तोभानौवागणनायके कृत्वाव्रतस्यनियमंयथोक्तफलभाग्भवेदितिब्रह्मवैवर्तात् व्रतग्रहणप्रकारस्तुहेमाद्रौभविष्ये महापूजांततः कुर्याद्देवदेवस्यचक्रिणः जातीकुसुममालाभिर्मंत्रेणानेनपूजयेत् सुप्तेत्वयिजगन्नाथेजगत्सुप्तंभवेदिदं विबुद्धेचविबुद्ध्येतप्रसन्नोमेभवाच्युत एवंतांप्रतिमांविष्णोः पूजयित्वास्वयंनरः प्रभाषेताग्रतोविष्णोः कृतांजलिपुटस्तथा चतुरोवार्षिकान्मासान्देवस्योत्थापनावधि इमंकरिष्येनियमंनिर्विघ्नंकुरुमेच्युत इदंव्रतंमयादेवगृहीतंपुरतस्तव निर्विघ्नंसिद्धिमायातुप्रसादात्तवकेशव गृहीतेस्मिन्व्रतेदेवपंचत्वंयदिमेभवेत् तदाभवतुसंपूर्णंत्वत्प्रसादाज्जनार्दन गृहीतेस्मिन्व्रतेदेवयद्यपूर्णेमृतोह्यहं तन्मेभवतुसंपूर्णंत्वत्प्रसादाज्जनार्दनेति ।
हें चातुर्मास्यव्रत शिवभक्तादिकांनींहीं करावें. कारण, “ शिव किंवा सूर्य अथवा गणपति यांचे ठायीं भक्तियुक्त असलेला मनुष्य व्रतनियम करील तर यथोक्त फल पावेल. ” असें ब्रह्मवैवर्तांत वचन आहे. व्रतग्रहणाचा प्रकार तर हेमाद्रींत भविष्यपुराणांत सांगतो - “ देवांचाही देव असा जो विष्णु त्याची महापूजा करुन जाईच्या पुष्पमालांनीं पुढें सांगितलेल्या मंत्रानें पूजा करावी. ” तो मंत्र - “ सुप्ते त्वयि जगन्नाथे जगत्सुप्तं भवेदिदम् ॥ विबुद्धे च विबुद्ध्येत प्रसन्नो मे भवाच्युत ॥ ” या मंत्रानें त्या विष्णुप्रतिमेची पुरुषानें स्वतः पूजा करुन हात जोडून विष्णूच्या पुढें प्रार्थना करावी. ती अशी - “ चतुरो वार्षिकान् मासान् देवस्योत्थापनावधि ॥ इमं करिष्ये नियमं निर्विघ्नं कुरु मेऽच्युत ॥ इदं व्रतं मया देव गृहीतं पुरस्तव ॥ निर्विघ्नं सिद्धिमायातु प्रसादात्तव केशव ॥ गृहीतेस्मिन्व्रते देव पंचत्वं यदि मे भवेत् ॥ तदा भवतु संपूर्णं त्वत्प्रसादाज्जनार्दन ॥ गृहीतेस्मिन् व्रते देव यद्यपूर्णे मृतो ह्यहं ॥ तन्मे भवतु संपूर्णं त्वत्प्रसादाज्जनार्दनेति ॥ ”
तत्रभार्गवार्चनदीपिकायांनृसिंहपरिचर्यायांचभविष्ये श्रावणेवर्जयेच्छाकंदधिभाद्रपदे तथा दुग्धमाश्वयुजेमासिकार्तिकेद्विदलंत्यजेदिति स्कांदेपिचातुर्मास्यकल्पे चत्वार्येतानिनित्यानिचतुराश्रमवर्णिनां प्रथमेमासिकर्तव्यंनित्यंशाकव्रतंनरैः द्वितीयेमासिकर्तव्यंदधिव्रतमनुत्तमं पयोव्रतंतृतीयेतुचतुर्थेपिनिशामय द्विदलंबहुबीजंचवृतांकंचविवर्जयेत् नित्यान्येतानिविप्रेंद्रव्रतान्याहुर्मनीषिणः जंबीरंराजमाषांश्चमूलकंरक्तमूलकं कूष्मांडंचेक्षुदंडंचचातुर्मास्येत्यजेद्बुधः तथा विशेषाद्बदरींधात्रींकूष्मांडंतिंतिणींत्यजेत् जीर्णधात्रीफलंग्राह्यंकथंचित्कायशोधनमिति तीर्थसौख्येस्कांदे वार्षिकांश्चतुरोमासान्प्रसुप्तेवैजनार्दने मंचखट्वादिशयनंवर्जयेद्भक्तिमान्नरः अनृतौवर्जयेद्भार्यांमांसंमधुपरौदनं पटोलंमूलकंचैववृंताकंचनभक्षयेत् अभक्ष्यंवर्जयेद्दूरान्मसूरंसितसर्षपं राजमाषान्कुलित्थांश्च आशुधान्यंचसंत्यजेत् शाकंदधिपयोमाषान् श्रावणादिषुसंत्यजेत् अत्र त्यजेदितिवर्जनसंकल्परुपः पर्युदासोज्ञेयः व्रतोपक्रमात् ।
चातुर्मास्यव्रतांविषयीं भार्गवार्चनदीपिकेंत नृसिंहपरिचर्यैत भविष्यांत - “ श्रावणमासीं शाक ( भाजी ), भाद्रपदांत दधि, आश्विनांत दुग्ध, कार्तिकांत द्विदल ( दोन डाळीचा ) हीं सोडावीं. ” स्कांदांतही चातुर्मास्यकल्पांत - “ चार वर्णांच्या चारी आश्रमांतल्या मनुष्यांस हीं चार व्रतें नित्य होत. तीं अशीं - मनुष्यांनीं पहिल्या महिन्यांत नित्य शाकव्रत करावें. दुसर्या महिन्यांत उत्तम दधिव्रत करावें. तिसर्या महिन्यांत पयोव्रत करावें. चवथ्यांतही सांगतों, श्रवण कर - द्विदल, बहुबीज, वृंताक हीं वर्ज्य करावीं. हीं व्रतें नित्य होत असें विद्वान् म्हणतात. जंबीर, राजमाष ( चवळ्या ) मुळा, रक्तमूलक, कूष्मांड, इक्षुदंड हीं चातुर्मास्यांत वर्ज्य करावीं. तसेंच विशेषेंकरुन बोर, आंवळा, कूष्मांड, चिंच, हीं वर्ज्य करावीं. परंतु जुने आंवळे देहशोधनार्थ कांहीं घ्यावे. ” तीर्थसौख्यांत स्कंदपुराणांत - “ वार्षिक चार महिन्यांत जनार्दन निजला असतां मंचक, खट्वा इत्यादिकांवर शयन भक्तिमान् मनुष्यानें वर्ज्य करावें. ऋतुकाला ( रजोदर्शनापासून १६ दिवस ) वांचून स्त्रीगमन वर्ज्य करावें. मांस, मध, परान्न, पडवळ, मुळा, वांगें हीं भक्षण करुं नयेत. अभक्ष्य पदार्थ मसूरा, पांढरे सर्षप ( मोहर्या ) हे अत्यंत सोडावे. चवळ्या, कुलित्थ, आशुधान्य ( तुषधान्य ) हीं सोडावीं. शाक, दधि, पय, माष हीं श्रावणादि चार मासांत वर्ज्य करावीं. ” येथें वर्जन करणें हें व्रत असल्यामुळें ‘ त्यजेत् ’ हा वर्जनसंकल्परुप निषेध जाणावा.
अत्रकेचिच्छाकाख्यंपत्रपुष्पादीत्यमरकोशस्यशक्यतेशितुमनेनेतिशाक इतिक्षीरस्वामिनाव्याख्यानात् व्यंजनमात्रस्यनिषेधमाचक्षते अन्येतुशाकशब्दस्यपत्रादिदशविधशाकेयोगरुढत्वात् योगाच्चरुढेर्बलीयस्त्वात्सूपादीनामपित्यागापत्तेश्चतत्प्रत्याचक्षते तेन मूलपत्रकरीराग्रफलकांडाधिरुढकाः त्वक्पुष्पंकवचंचेतिशाकंदशविधंस्मृतं इतिक्षीरस्वामिनोक्तस्यशाकस्यनिषेध इति अधिरुढक अंकुरः वस्तुतस्तु तत्तत्कालोद्भवाः शाकावर्जनीयाः प्रयत्नतः बहुबीजमबीजंचविकारिचविवर्जयेदितिभविष्यवचनात्तत्तत्कालोत्पन्नानांदशविधशाकानांनिषेधः अत्रतत्कालोद्भवजातीयत्वंविवक्षितं तेनातपादिशोषितानांवर्षांतरोद्भवानामपिनिषेधः अत्रतत्कालोद्भवत्वमात्रंविवक्षितंनतुतन्मात्रकालोद्भवानांसर्वेषांनिषेध इतिनिष्कर्षः बहुबीजमित्यनेकबीजमितिकेचित् इतरावयवापेक्षयाबीजावयवायत्रबहवस्तदित्यन्ये अबीजंकदलादि वस्तुतस्तु इदंमहानिबंधेश्वभावान्निर्मूलमेव आचारप्रदीपे वृंताकंचकलिंगंचबिल्वौदुबरभिः सटाः उदरेयस्यजीर्यंतितस्यदूरतरोहरिः तथापरार्केदेवलः ब्रह्मचर्यंतथाशौचंसत्यमामिषवर्जनं व्रतेष्वेतानिचत्वारिवरिष्ठानीतिनिश्चयः ॥
येथें कोणी ग्रंथकार ‘ शाकाख्यं पत्रपुष्पादि ’ असें अमरांत आहे त्याची व्याख्या ‘ शक्यतेऽशितुं अनेन ’ म्ह० ज्यानें भोजन करण्यास शक्य होतें तें शाक अशी क्षीरस्वामीनें केली आहे म्हणून भोजनसमयीं तोंडास लावण्याच्या सर्व चटणी कोशिंबरी भाज्या यांचा निषेध करितात. इतर विद्वान् मूल पत्र इत्यादि पुढें सांगावयाच्या दहा प्रकारच्या शाकांचेठायीं शाकशब्द योगरुढ आहे, व योगापेक्षां ( व्युत्पत्तीपेक्षां ) रुढी बलवत्तर असल्यामुळें; आणि असें न केलें तर वरण इत्यादिकांचाही त्याग प्राप्त होत असल्यामुळें वरील मताचा त्याग करितात. तेणेंकरुन असें सूचित होतें कीं, “ मूळ, पत्र, करीर ( कोंब ), अग्र, फल, कांड, अधिरुढक ( मोड आलेलें धान्य ), साल, पुष्प, कवच ह्या दहा प्रकारच्या शाका होत. ” ह्या क्षीरस्वामीनें सांगितलेल्या दशविध शाकांचा निषेध होय. वास्तविक म्हटलें तर - “ त्या त्या कालीं उत्पन्न ज्या शाका त्या प्रयत्नानें सोडाव्या. बहुबीज, वीजरहित व विकारी हीं सोडावीं ” ह्या भविष्यवचनावरुन त्या त्या कालीं उत्पन्न दशविध शाकांचा निषेध होय. येथें त्या कालीं उत्पन्न जातींच्या शाका वर्ज्य, असें असल्यामुळें पूर्ववर्षीं उत्पन्न असून उन्हानें सुकवून ठेविलेल्यांचाही निषेध होतो. या वचनांत ‘ त्या कालीं उत्पन्न ’ इतकाच अर्थ करावयाचा आहे. ‘ त्याच कालीं उत्पन्न ’ असा नाहीं. कारण, तसा केला तर गौरव हा दोष येतो. यावरुन असा अर्थ केल्यानें त्या कालीं उत्पन्न होत असून इतर
कालीं होणार्या तोंडलीं इत्यादिकांचा निषेध होतो. या वचनांत ‘ तत्तत्कालोद्भवाः ’ म्हणजे ‘ त्या त्या कालीं उत्पन्न ’ अशी वीप्सा ( द्विरुक्ति ) असल्यामुळें आपापल्या कालीं उत्पन्न झालेल्या सर्वांचा निषेध हा सारांश समजावा. बहुबीज म्हणजे अनेक बीज असें कोणी म्हणतात. इतर अवयवांपेक्षां बीजावयव ज्यांत अधिक तें बहुबीज, असें अन्य म्हणतात. वस्तुतः पाहिलें तर हें वचन महानिबंधांत नसल्यामुळें तें निर्मूलच होय. आचारप्रदीपांत - “ वृंताक ( वांगें ), कलिंग, बिल्व, उंबर, भिःसटा ( दग्धान्न ) हीं ज्याच्या पोटांत जिरतात त्यास हरि दूर होतो. ” तसेंच अपरार्कांत देवल - “ ब्रह्मचर्य, शूचिर्भूतपणा, सत्यभाषण, आमिषवर्जन हीं चार, व्रतामध्यें वरिष्ठ होत हा निश्चय आहे. ”
आमिषानिचोक्तानिरामार्चनचंद्रिकायांपाद्मे प्राण्यंगचूर्णंचर्मांबुजंबीरंबीजपूरकं अयज्ञशिष्टमाषादियद्विष्णोरनिवेदितं दग्धमन्नंमसूरंचमांसंचेत्यष्टधामिषं रुच्यंतत्तद्देशलभ्यंसुप्तेदेवेविवर्जयेत् पाद्मे कार्तिकमाहात्म्ये गोछागीमहिषीदुग्धादन्यद्दुग्धादिचामिषं धान्येमसूरिकाः प्रोक्ताअन्नंपर्यूषितंतथा द्विजक्रीतारसाः सर्वेलवणंभूमिजंतथा ताम्रपात्रस्थितंगव्यंजलंपल्वलसंस्थितं आत्मार्थंपाचितंचान्नमामिषंतत्स्मृतंबुधैः तथा निष्पावान् राजमाषांश्चमसूरंसंधितानिच वृंताकंचकलिंगंचसुप्तेदेवेविवर्जयेत् संधितानिलवणशाकादीनि ।
आमिषें सांगतो रामार्चनचंद्रिकेंत पद्मपुराणांत - “ प्राण्यंगचूर्ण ( शिंपीचा चुना ), चर्मोदक ( पखाल इत्यादिकांतलें उदक ), जंबीर, बीजपूरक ( महाळुंग ), यज्ञशेष नसून विष्णूस निवेदित नाहीं तें माषादि अन्न, दग्धान्न, मसूरा, मांस हीं आठ प्रकारचीं आमिषें होत. आप आपल्या देशांत मिळणारा असा रुचकर पदार्थ तोही देव निजला असतां वर्ज्य करावा. ” पद्मपुराणांत कार्तिकमाहात्म्यांत - “ गाय, बकरी, महिषी यांवांचून इतरांचें दुग्धादिक, व घान्यामध्यें मसूरा, पर्युषित अन्न, ब्राह्मणापासून विकत घेतलेले सर्व रस, भूमीपासून उत्पन्न झालेंलें मीठ, तांब्याच्या पात्रांत ठेवलेलें गाईचें दुग्धादि, पल्वलोदक, आपणासाठींच शिजवलेलें अन्न हीं अमिषें होत, असें विद्वान् सांगतात. ” तसेंच “ पावटे, चवळी, मसूरा, संधित ( लोणचें वगैरे ), वांगें, कलिंगडें हीं देव निद्रिस्थ असतां वर्ज्य करावीं. ”
तत्रैवविष्णुधर्मे चतुर्ष्वपीहमासेषुहविष्याशीनपापभाक् हविष्याणितुपृथ्वीचंद्रोदयेभविष्ये हैमंतिकंसितास्विन्नंधान्यंमुद्गायवास्तिलाः कलायकंगुनीवारावास्तुकंहिलमोचिका षष्टिकाकालशाकंचमूलकंके मुकेतरत् कंदः सैंधवसामुद्रेगव्येचदधिसर्पिषी पयोनुद्धृतसारंचपनसाम्रहरीतकी पिप्पलीजीरकंचैवनागरंगंचतित्तिणी कदलीलवलीधात्रीफलान्यगुडमैक्षवं अतैलपक्कंमुनयोहविष्याणिप्रचक्षते इति सितास्विन्नंअनूष्मपक्कं धान्यंचतंडुलाः केमुकंकेमुताइतिप्राच्येषुप्रसिद्धः कंदः कलायस्तुसतीनक इत्यमरः बटुरीइतिप्रसिद्धंधान्यं मदनरत्नेप्येवं अगस्तिसंहितायां हैमंताद्युक्त्वा नारीकेलफलंचैवकदलीलवलीतथा आम्रमामलकंचैवपनसंचहरीतकी व्रतांतरप्रशस्तंचहविष्यंमन्वतेबुधाः ।
तेथेंच विष्णुधर्मांत - “ चातुर्मास्यांत जो हविष्य भक्षण करील तो पापी होत नाहीं. ” हविष्यें सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत भविष्यांत - हेमंत ऋतूंत उत्पन्न झालेलें असून ऊष्म्यावांचून पक्क, धान्य ( तंडुल ), मूग, यव, तिल, कलाय ( वाटाणे, मठरी ), कांग, नीवार ( देवभात ), वास्तुक ( बथुवा - चंदनबटुवा ), हिलमोचिका ( चाकवत ), षष्टिका ( साठें भात ), कालशाक ( ), मुळा, केमुकेतरत् ( केमुता असा प्राच्यदेशी प्रसिद्धकंद ), सेंधेलोण, समुद्रमीठ, गाईचें दहीं व तूप, लोणी न काढलेलें दूध, फणस, आंबा, हरीतकी, पिंपळी, जिरें, नागरंग, चिंचा, केळें, लवलीफल, आंवळा, गुळावांचून इतर उंसाचे पदार्थ, हे सारे तेलांत पक्क न केलेले असले म्हणजे हविष्य आहेत, असें मुनि सांगतात. ” मदनरत्नांतही असेंच सांगितलें आहे. अगस्तिसंहितेंत - हैमंतिकं० ’ हें वरील वचन सांगून - “ नारीकेलफळ, केळें,
लवली ( ), आंबा, आंवळा, फणस, हरीतकी, आणि अन्यव्रतांत प्रशस्त तीं, यांस पंडित हविष्यें मानितात.
अन्यायपिव्रतान्युक्तानिहेमाद्रौभविष्ये स्त्रीवानरोवामद्भक्तोधर्मार्थंसुदृढव्रतः गृह्णीयान्नियमानेतान्दंतधावनपूर्वकान् तेषांफलानिवक्ष्यामितत्कर्तृणांपृथक् पृथक् मधुरस्वरोभवेद्राजापुरुषोगुडवर्जनात् तैलस्यवर्जनाद्राजन्सुंदरांगः प्रजायते कटुतैलपरित्यागाच्छत्रुनाशः प्रजायते योगाभ्यासीभवेद्यस्तुसब्रह्मपदमाप्नुयात् तांबूलवर्जनाद्भोगीरक्तकंठश्चजायते घृतत्यागाच्चलावण्य़ंसर्वस्निग्धतनुर्भवेत् शाकपत्राशनाद्भोगीअपक्कादोऽमलोभवेत् भूमौप्रस्तरशायीचविप्रोमुनिवरोभवेत् एकांतरोपवासेनब्रह्मलोकेमहीयते धारणान्नखरोम्णांचगंगास्नानफलंलभेत् मौनव्रतीभवेद्यस्तुतस्याज्ञाऽस्खलिताभवेत् भूमौभुंक्तेसदायस्तुसपृथिव्याः पतिर्भवेत् प्रदक्षिणाशतंयस्तुकरोतिस्तुतिपाठकः हंसयुक्तविमानेनसचविष्णुपुरंव्रजेत् अयाचितेनप्राप्नोतिपुत्रान्धर्म्यान्विशेषतः षष्ठान्नकालभोक्तायः कल्पस्थायीभवेदिति पर्णेषुयोनरोभुंक्तेकुरुक्षेत्रफलंलभेत् गुडवर्जीनरोदद्यात्तद्भृतंताम्रभाजनं सहिरण्यंनरश्रेष्ठलवणस्याप्ययंविधिः सुप्तेदेवेतुयोविष्णोः शिवस्यांगणमर्चयेत् पंचवर्णैस्तुयोनित्यंस्वस्तिकैः पद्मकैस्तथा सयातिरुद्रलोकंहिगाणपत्यमवाप्नुयात् अथैषांसमाप्तौकार्तिक्यांदानानि एकभक्तव्रतेदंपतीसंपूज्यधेनुर्देया नक्तेवस्त्रयुगम् एकांतरोपवासेगौः भूशयनेशय्या षष्ठकालभोजनेगौः व्रीहिगोधूमादित्यागेहैमव्रीह्यादि कृच्छ्रेगोयुग्मं शाकाशनेगौः पयोव्रतेच दधिमधुघृतव्रतेषुवासोगौश्च ब्रह्मचर्येस्वर्णमूर्तिः तांबूलव्रतेवासोयुगं मौनेघृतकुंभोवस्त्रयुगंघंटाच देवाग्रेरंगमालिकाकरणेधेनुर्हेमपद्मंच दीपिकाव्रतेदीपिकावासोयुगंच भूमिभोजनेपर्णभोजनेचकांस्यपात्रंगौश्च चतुष्पथदीपेगोग्रासेचगोवृषौ प्रदक्षिणाशतेवस्त्रं अनुक्तेषुस्वर्णंगौश्चेत्यादिहेमाद्रौज्ञेयम् ।
इतरही व्रतें सांगतो हेमाद्रींत भविष्यांत - “ स्त्री किंवा पुरुष जो माझा भक्त त्यानें दृढव्रत होऊन दंतधावन करुन हे ( पुढें सांगावयाचे ) नियम ग्रहण करावे. ते ग्रहण करणारांस फळें निरनिराळीं सांगतो - गूळ वर्ज्य केल्यानें मधुरस्वरी राजा होतो. तेल वर्ज्य केल्यानें सुंदरांग होतो. कटुतैल वर्ज्य केल्यानें शत्रुनाश होतो. योगाभ्यास करील तो ब्रह्मपदातें प्राप्त होतो. तांबूल वर्ज्य केल्यानें नानाविध भोगप्राप्ति व रक्तकंठ होतो. घृत वर्ज्य केल्यानें लावण्ययुक्त व स्निग्धशरीर होतो. शाकपानें भक्षण करुन राहाणारा भोगी होतो. अपक्क खाणारा स्वच्छ होतो. भूमीवर किंवा प्रस्तरावर ( दर्भांवर ) निजणारा मुनिश्रेष्ठ ब्राह्मण होतो. एकांतरोपवासानें ब्रह्मलोकीं पूज्य होतो. नखें व रोम यांच्या धारणानें गंगास्नानाचें फल प्राप्त होतें. मौनव्रत जो करतो त्याची आज्ञा अस्खलित चालते. भूमीवर निरंतर जो भोजन करतो तो पृथ्वीपति होतो. जो स्तुतिपाठ करीत विष्णूला शंभर प्रदक्षिणा करितो तो हंसयुक्त विमानांत बसून वैकुंठीं जातो. अयाचित भोजनानें धर्म्य ( धर्मास हितकर ) पुत्रांतें प्राप्त होतो. सहाव्या अन्नकालीं ( दोन दिवस उपोषण करुन तिसर्या दिवशीं सायंकाळीं ) जो भोजन करतो तो स्वर्गलोकीं चिरकाल राहतो. पानांवर जो मनुष्य भोजन करतो तो कुरुक्षेत्रफल पावतो. गूळ वर्ज्य करणार्यानें गुडपूर्ण ताम्रपात्र सुवर्णसहित द्यावें. मीठ वर्ज्य करणारानेंही सहिरण्य ताम्रपात्र द्यावें. देव निजला असतां पांचरंगी स्वस्तिकें व कमलें यांहींकरुन विष्णूचे किंवा शिवाचे अंगणाची पूजा करील तो रुद्रलोकीं जाऊन गाणपत्यातें पावेल. ” आतां या व्रतांच्या समाप्तीस कार्तिकीस दानें सांगतो - एकभुक्तव्रती यानें दंपत्याची पूजा करुन धेनु ( गाय ) द्यावी. नक्तव्रताचे ठायीं दोन वस्त्रें. एकांतरोपवासास गाय. भूशयनास शय्या. षष्ठकालभोजनास गाय. व्रीहि गोधूमादिकांच्या त्यागास सुवर्णव्री ह्यादिक. कृच्छ्रव्रत केलें तर दोन गायी. शाकभक्षणास व पयोव्रतास गाय. दधि, मध, घृत यांच्या व्रतांस वस्त्र व गाय. ब्रह्मचर्यधारण केलें तर सुवर्णमूर्ति. तांबूलव्रतास दोन वस्त्रें. मौनव्रतास घृतकुंभ, दोन वस्त्रें, घंटा हीं द्यावीं. देवापुढें रंगमालिका करण्यास गाय व सुवर्णकमल. दीपिकाव्रतास दीपिका व दोन वस्त्रें. भूमिभोजनास व पर्णभोजनास कांस्यपात्र व गाय. चतुष्पथीं दीपदानास व गोग्रासास गाय व बैल. शतप्रदक्षिणाव्रतास वस्त्र. न सांगितलेल्या अन्यव्रतांविषयीं स्वर्ण व गोदान करावें, इत्यादि प्रकार हेमाद्रीवरुन जाणावा.
तथाचभार्गवार्चनदीपिकायांपाद्मे शयनीबोधिनीमध्येशमीदूर्वापमार्गकैः भृंगराजेनदेवांस्तुनार्चयीतकदाचन हेमाद्रौपाद्मे आषाढादिचतुर्मासानभ्यंगंवर्जयेन्नरः समाप्तौचपुनर्दद्यात्तिलतैलयुतंघटं आषाढादिचतुर्मासंवर्जयेन्नखकृंतनं वृंताकंगृंजनंचैवमधुसर्पिर्घटान्वितं कार्तिक्यांतत्पुनर्हैमंब्राह्मणायनिवेदयेत् अन्यान्यपिकेशकर्तनादिवर्जनसंकल्पानुरुपाणिपृथ्वीचंद्रोदयेज्ञेयानि टोडरानंदेस्कांदे एकांतरंव्द्यंतरंवाकुर्यान्मासोपवासकं अनोदनंफलाहारंनक्तव्रतमथापिवा ।
तसेंच भार्गवार्चनदीपिकेंत पद्मपुराणांत सांगतो - “ शयनी व बोधिनी ह्या एकादशींमध्यें ( चातुर्मासांत ) शमी, दूर्वा, आघाडा, माका यांहींकरुन देवांचें पूजन कधींही करुं नये. ” हेमाद्रींत पद्मपुराणांत - “ आषाढादि चार महिन्यांत मनुष्यानें अभ्यंग वर्ज्य करावा. त्याच्या समाप्तीस तिलतैलानें युक्त घट द्यावा. आषाढादिक चार महिने नखें काढणें, व वांगें, गाजर, मध, हीं वर्ज्य करावीं व त्याचे समाप्तीस सुवर्णाचा तो तो पदार्थ व घृतयुक्त घट ब्राह्मणास द्यावा. ” अन्यही केशकर्तनादिवर्जनव्रतें पृथ्वीचंद्रोदयावरुन जाणावीं. टोडरानंदांत स्कंदपुराणांत - “ एकांतरोपवास, दोन दिवसांच्या अंतरानें उपवास, मासोपवास, अनोदन, फलाहार, अथवा नक्तव्रत हीं करावीं. ”
अत्रैवतप्तमुद्राधारणमुक्तंरामार्चनचंद्रिकायांभविष्ये शयन्यांचैवबोधिन्यांचक्रतीर्थेतथैवच शंखचक्रविधानेनवह्निपूतोभवेन्नर इति अतप्ततनूर्नतदामोअश्नुतेइतिऋग्वेदात् सहोवाचयाज्ञवल्क्यस्तस्मात्पुमानात्महितायहरिंभजेत् सुश्लोकमौलेर्वर्माण्यग्निनासंदधत इतिशतपथश्रुतेः प्रतद्विष्णोअब्जचक्रेसुतप्तेजन्मांभोधीतर्तवेचर्षणींद्राः मूलेबाह्वोर्दधन्येपुराणात्तुलिंगान्यंगेतप्तायुधान्यर्पयंत इतिसामवेदात् अग्निहोत्रंयथानित्यंवेदस्याध्ययनंयथा ब्राह्मणस्यतथैवेदंतप्तमुद्रादिधारणमितिपद्मपुराणाच्चेति ब्राह्मणः क्षत्रियोवैश्यः शूद्रोवायदिवेतरः शंखमुद्रांकिततनुस्तुलसीमंजरीधरः गोपीचंदनलिप्तांगोदृष्टश्चेत्तदघंकृतः इतिकाशीखंडात् तत्प्रकारस्तुरामार्चनचंद्रिकातोज्ञेयः ।
याच एकादशीस तप्तमुद्राधारण सांगतो रामार्चनचंद्रिकेंत भविष्यांत - “ शयनी व बोधिनी एकादशीस तसेंच चक्रतीर्थांत शंखचक्रविधानेंकरुन मनुष्यानें अग्निपूत व्हावें. ” कारण, “ ज्याची तनु तप्त झाली नाहीं त्याला परमेश्वरप्राप्ति होत नाहीं ” असा ऋग्वेदमंत्र आहे. “ त्या याज्ञवल्क्यानें असें सांगितलें आहे कीं, पुरुषाने आत्महिताकरितां हरीचें भजन करावें. भगवंताचीं चिह्ने अग्नीच्या योगानें धारण करितात. ” अशी शतपथश्रुति आहे. “ श्रेष्ठ मनुष्य अंगावर तप्त आयुधें अर्पण करणारे जन्मसागर तरण्याकरितां विष्णूचीं कमलचक्रें तापवून बाहुमूलाचे ठायीं धारण करितात. ” असा सामवेद आहे, आणि “ जसें अग्निहोत्र नित्य व वेदाध्ययन नित्य तसें तप्तमुद्रादिधारण ब्राह्मणाला नित्य आहे. ” असें पद्मपुराणवचनही आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अथवा शूद्र किंवा दुसरा कोणी मनुष्य आपलें अंग शंखमुद्रेनें अंकित करुन तुलसीमंजरी धारण करणारा व गोपीचंदनाचा अंगास लेप केलेला असा मनुष्य पाहिला असतां त्याला ( पाहाणाराला ) पातक कोठून होणार ? ” असें काशीखंडवचन आहे. तो तप्तमुद्राधारणप्रकार तर रामार्चनचंद्रिकेपासून जाणावा.
पृथ्वीचंद्रोदयादयस्तु यस्तुसंतप्तशंखादिलिंगचिह्नतनुर्नरः ससर्वयातनाभोगीचंडालोजन्मकोटिषु द्विजंतुतप्तशंखादिलिंगांकिततनुंनरः संभाष्यरौरवंयातियावदिंद्राश्चतुर्दशेतिबृहन्नारदीयोक्तेः शंखचक्राद्यंकनंचगीतनृत्यादिकंतथा एकजातेरयंधर्मोनजातुस्याद्दूजन्मनः शंखचक्रेमृदायस्तुकुर्यात्तप्तायसेनवा सशूद्रवद्बहिः कार्यः सर्वस्माद्दिजकर्मणः यथाश्मशानजंकाष्ठमनर्हंसर्वकर्मसु तथाचक्रांकितोविप्रः सर्वकर्मसुगर्हितः तथा शिवकेशवयोरंकांश्छूलचक्रादिकान् द्विजः नधारयेतमतिमान्वैदिकेवर्त्मनिस्थित इतिविष्ण्वाश्वलायनादिवचनात् ऋग्वेदादिश्रुतीनामन्यार्थत्वादन्यश्रुतीनांचासत्त्वात् चक्रादिधारणंशूद्रविषयमित्यूचुः नृत्यंचोदरार्थंनिषिद्धमितिश्रीधरस्वामी यद्यपिनिषेधस्यप्राप्तिसापेक्षत्वाद्विधिंविनाचतदयोगादुपजीव्यविरोधेन नतौपशौकरोतीतिवद्विकल्पोयुक्तस्तथापि एकजातेरयंधर्म इत्यनेनविधिवाक्यानामुपसंहारात् द्विजातिनिषेधो नित्यानुवाद इतितदाशयः अत्रशिष्टाचारएवसंकटपाशनिः सरणसृणिरितिसंक्षेपः ।
पृथ्वीचंद्रोदयादिक ग्रंथकार तर “ जो तप्तशंखादिमुद्रायुक्तशरीर मनुष्य तो सर्व यातना भोगणारा व कोटि जन्माचेठायीं चांडाल होतो. तप्तशंखादिचिह्नांनीं अंकित आहे शरीर ज्याचें अशा द्विजाशीं जो मनुष्य भाषण करितो तो चवदा इंद्र आहेत तोंपर्यंत रौख नरकांत जातो ” अशा बृहन्नारदीय वचनावरुन; आणि “ शंखचक्रादिकांनीं शरीर अंकित करणें व गीत, नृत्य इत्यादिक करणें हा एकजातीचा ( शूद्राचा ) धर्म होय, द्विजातींचा मुळींच धर्म नाहीं. जो मृत्तिकेनें किंवा तापविलेल्या लोखंडानें शरीरावर शंखचक्रें करील त्याला सर्व ब्राह्मणकर्मापासून शूद्रासारखा बाहेर करावा. जसें स्मशानांतील काष्ठ सर्वकर्मांस अयोग्य तसा चक्रांकित ब्राह्मण सर्व कर्माविषयीं निंद्य होय. ” तसेंच “ वैदिकमार्गीं स्थित अशा बुद्धिवान् ब्राह्मणानें शिव व विष्णु यांच्या शूलचक्रादिक मुद्रा धारण करुं नयेत ” ह्या विष्णु, आश्वलायन इत्यादिकांच्या वचनांवरुन व ऋग्वेदादिक श्रुतींचा अन्य अर्थ असल्यामुळें ( म्हणजे ‘ अतप्ततनूर्नतदामोअश्रुते ’ या मंत्राचा अर्थ - पयोव्रतादिकेंकरुन ज्याची तनू तप्त झाली नाहीं त्याला सोमरसाची प्राप्ति नाहीं - इत्यादि अर्थ असल्यांमुळें ) व इतर श्रुति
मुळींच नसल्यामुळें चक्रादिकामुद्राधारण शूद्रविषयक आहे, असें सांगते झाले. नृत्य हें उदरभरण्याकरितां निषिद्ध आहे, भगवंताकरितां निषिद्ध नाहीं, असें श्रीधरस्वामी सांगतो. आतां बृहन्नारदीय - विष्णु - आश्वलायनादि वचनांनीं तप्तमुद्राधारणाचा निषेध केला. यावरुन तप्तमुद्राधारणाची प्राप्ति आहे असें होतें व ती प्राप्ति विधीवांचून संभवत नाहीं, म्हणून त्याचा विधि आहे, असें होतें. ज्याच्या आश्रयानें जो झाला तो त्याचा ( आश्रयाचा ) सर्वथा बाध करीत नाहीं असा न्याय आहे, जसें - ‘ नतौ पशौ करोति ’ म्हणजे पशुयागाचे ठायीं आज्यभाग करीत नाहीं असा निषेध केला तरी तो निषेध आज्यभागांचा सर्वथा बाध करीत नाहीं. करील तर उपजीव्याचा ( आश्रयाचा ) विरोध होईल म्हणून एकवेळ बाध व एकवेळ आज्यभागांची प्रवृत्ति, याप्रमाणें विकल्प होतो, तसा येथें एकदां विधि एकदा निषेध अर्थात् विकल्प युक्त आहे, असें जरी आहे तरी ‘ एकजाति जो शूद्र त्याचा हा धर्म ’ या वाक्यानें तप्तमुद्राधारणाचीं जीं सामान्य वाक्यें त्यांचा उपसंहार म्हणजे - अनेकांविषयीं प्रवृत्त जीं तप्तमुद्राधारणाचीं सामान्य वाक्यें त्यांचा एक विषयावर म्हणजे ( शूद्रावर पर्यवसान ) केल्यामुळें द्विजातीला जो तप्तमुद्राधारणनिषेध केला तो अपूर्व नाहीं, तर नित्य जी अप्राप्ति त्याचाच अनुवाद ( सिद्धकथन ) आहे, असा पृथ्वीचंद्रोदयादि ग्रंथांचा आशय होय. ह्या वरील सर्व वाक्यांच्या तात्पर्यावरुन तप्तमुद्राधारण केलें तरी दोष आणि न केलें तरी दोष असा संकटपाश आला त्यांतून सुटण्याला मार्ग म्हटला म्हणजे एक शिष्टाचारच आहे. म्हणजे जसा शिष्टाचार असेल तसें करावें, हा सारांश थोडक्यांत समजावा.
आषाढपौर्णमास्यांकोकिलाव्रतमुक्तंहेमाद्रौभविष्ये आषाढपौर्णमास्यांतुसंध्याकालेह्युपस्थिते संकल्पयेन्मासमेकंश्रावणेप्रत्यहंह्यहं स्नानंकरिष्येनियताब्रह्मचर्येस्थितासती भोक्ष्यामिनक्तंभूशय्यांकरिष्येप्राणिनांदयामिति अस्यनक्तव्रतत्वात्सायाह्नव्यापिनीग्राह्या अत्रैवशिवशयनोत्सव उक्तो हेमाद्रौवामनपुराणे पौर्णमास्यामुमानाथः स्वपतेचर्मसंस्तरे वैय्याघ्रेचजटाभारंसमुद्ग्रथ्याहिवर्ष्मणा मदनरत्नेप्येवं इयंचप्रदोषव्यापिनी अत्रैवव्यासपूजोक्ता तत्रत्रिमुहूर्ताचेत्परैवेतिसंन्यासपद्धतौ त्रिमुहूर्ताधिकंग्राह्यंपर्वक्षौरप्रणामयोरितिवचनात् इतिश्रीरामकृष्णभट्टात्मजदिनकरभट्टानुजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौ आषाढः समाप्तः ॥
आषाढपौर्णमासीस कोकिलाव्रत सांगतो हेमाद्रींत भविष्यांत - “ आषाढ पौर्णमासीचे ठायीं संध्याकाल प्राप्त असतां असा संकल्प करावा कीं, ‘ श्रावणाचेठायीं एक महिना प्रत्यहीं स्नान करीन व नियम धारण करुन ब्रह्मचर्यव्रतानें राहून नक्तभोजन करीन, भूशय्या करीन, व प्राण्यांवर दया करीन ’ अशा अर्थाचा संकल्प करावा. ” हें व्रत नक्तव्रत असल्यामुळें ही आषाढी सायाह्नव्यापिनी घ्यावी. याच तिथीस शिवशयनोत्सव सांगतो. हेमाद्रींत वामनपुराणांत - “ आषाढ पौर्णमासीचेठायीं उमापति ( शंकर ) सर्पशरीरानें आपला जटाभार बांधून व्याघ्रचर्मावर शयन करितो. ” मदनरत्नांतही असेंच सांगितलें आहे. ही पौर्णिमा शिवशयनोत्सवाविषयीं प्रदोषव्यापिनी घ्यावी. याच तिथीला व्यासपूजा सांगितली आहे. व्यासपूजेविषयीं दुसर्या दिवशीं तीन मुहूर्त ( ६ घटिका ) असेल तर पराच घ्यावी, असें संन्यासपद्धतींत सांगितलें आहे. कारण, “ क्षौर व नमस्कार याविषयीं पर्व घ्यावयाचें तें तीन मुहूर्तांहून अधिक असेल तें घ्यावें ” असें वचन आहे. इति आषाढमासनिर्णयाची महाराष्ट्रटीका समाप्त झाली.