मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
वैशाखपौर्णमासी

द्वितीय परिच्छेद - वैशाखपौर्णमासी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


वैशाखपौर्णमास्यांविशेषोऽपरार्केजाबालिः शृतान्नमुदकुंभंचवैशाख्यांचविशेषतः निर्दिश्यधर्मराजाय गोदानफलमाप्नुयात् सुवर्णतिलयुक्तैस्तुब्राह्मणान्सप्तपंचच तर्पयेदुदपात्रैस्तुब्रह्महत्यांव्यपोहतीति उदकुंभदान मंत्रस्त्वक्षय्यतृतीयाप्रकरणेउक्तः भविष्येपि वैशाखीकार्तिकीमाघीतिथयोतीवपूजिताः स्नानदानविहीनास्ताननेयाः पांडुनंदन अत्रकृष्णाजिनदानंकार्यं तथाचविष्णुः कृष्णाजिनेतिलान् कृष्णान् हिरण्यंमधुसर्पिषी ददातियस्तुविप्रायसर्वंतरतिदुष्कृतमिति इतिश्रीकमलाकरभट्टकृतेकालनिर्णयसिंधौवैशाखमासः समाप्तः ॥

वैशाखपौर्णमासीस विशेष सांगतो अपरार्कांत जाबालि - “ वैशाखी पौर्णिमेस शिजविलेलें अन्न व उदकुंभ विशेषेंकरुन धर्मराजाला द्यावा, म्हणजे गोदानाचें फल प्राप्त होतें. सुवर्णतिलयुक्त उदकपात्रांनीं ( उदकुंभांनीं ) बारा ब्राह्मणांस तृप्त करावें, म्हणजे ब्रह्महत्येचें पाप नाहींसें होतें. ” उदकुंभदानाचा मंत्र तर अक्षयतृतीयाप्रकरणीं पूर्वीं सांगितला आहे. भविष्यांतही - ‘‘ वैशाखी, कार्तिकी आणि माघी ह्या पौर्णिमा अत्यंत पूज्य आहेत ह्या तिथींस स्नान दान केल्याविरहित राहूं नये. ” या वैशाखी पौर्णमासीस कृष्णाजिन दान करावें. तेंच सांगतो विष्णु - “ कृष्णाजिन, काळे तिळ, सुवर्ण, मध, तूप हीं जो ब्राह्मणास देतो त्यांचें सर्व पातक नष्ट होतें. ” इति वैशाखमासनिर्णयाची महाराष्ट्र टीका समाप्त झाली.  

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP