मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
अन्वष्टकाश्राद्ध

द्वितीय परिच्छेद - अन्वष्टकाश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां नवमीस अन्वष्टकाश्राद्ध सांगतो.
अथनवम्यामन्वष्टकाश्राद्धम्‍ तत्रकात्यायनः अन्वष्टकासुनवभिः पिंडैः श्राद्धमुदाह्रतं पित्रादिमातृमध्यंचततोमातामहांतकम्‍ पृथ्वीचंद्रोदयेब्रह्मांडे पितृणांप्रथमंदद्यान्मातृणांतदनंतरम्‍ ततोमातामहानांचआन्वष्टक्येक्रमः स्मृतः श्राद्धहेमाद्रौछागलेयः केवलास्तुक्षयेकार्यावृद्धावादौप्रकीर्तिताः अन्वष्टकासुमध्यस्थानांत्याः कार्यास्तुमातरः दीपिकायांतुमातृश्राद्धमादौकार्यमित्युक्तं मातृयजनंत्वन्वष्टकास्वादितइति हेमाद्रौब्राह्मेपि अन्वष्टकासुक्रमशोमातृपूर्वंतदिष्यतइति अत्रशाखाभेदेनव्यवस्थेतिपृथ्वीचंद्रोदयः जीवत्पितृकविषयमितिनिर्णयदीपः इदंचजीवत्पितृकेणापिकार्यम्‍ तदुक्तंनिर्णयामृतेमैत्रायणीयपरिशिष्टे आन्वष्टक्यंगयाप्राप्तौसत्यांयच्चमृतेहनि मातुः श्राद्धंसुतः कुर्यात्पितर्यपिचजीवति यद्यपिजीवत्पितृकस्यपंचान्वष्टकाअवश्यंकर्तव्याः तथाप्यशक्तस्येयमावश्यकी प्रौष्ठपद्यष्टकाभूयः पितृलोकेभविष्यतीतिहेमाद्रौपाद्मोक्तेः सर्वासामेवमातृणांश्राद्धंकन्यागतेरवौ नवम्यांहिप्रदातव्यंब्रह्मलब्धवरायतइतिसूतेनावश्यकत्वोक्तेश्च अत्रसर्वासामित्युक्तेः स्वमातरिजीवंत्यामपिसपत्नमातृभ्योदद्यात्‍ तन्मरणेसतितस्यैताभ्यश्चदद्यादित्युक्तं जीवत्पितृकनिर्णयेगुरुभिः अत्रसर्वासांनामनिर्देशेनैकोब्राह्मणोर्घ्यः पिंडश्च नामैक्येतुद्विवचनादिप्रयोगइत्युक्तंनारायणवृत्तौ अन्वष्टकाश्राद्धंतद्यागश्चगोभिलीयानांमध्यमायामेवनसर्वासु आन्वष्टक्यंमध्यमायामितिगोभिलगौतमावितिछंदोगपरिशिष्टात् अत्रभर्तृमरणोत्तरंपूर्वमृतमातृश्राद्धंनकार्यमितिकेचिदाहुः पठंतिच श्राद्धंनवम्यांकुर्यात्तन्मृतेभर्तरिलुप्यतइति तदेतन्निर्मूलत्वान्मूर्खप्रतारणमात्रं श्राद्धदीपकलिकायांब्राह्मे पितृमातृकुलोत्पन्नायाः काश्चित्तुमृताः स्त्रियः श्राद्धार्हामातरोज्ञेयाः श्राद्धंतत्रप्रदीयतइति अत्रदेशाचाराव्द्यवस्था ।

त्याविषयीं कात्यायन - “ अन्वष्टकांचे ठायीं नऊ पिंडांनीं श्राद्ध सांगितलें आहे. पहिली पितृत्रयी, मधली मातृत्रयी, अंती मातामहत्रयी असें नवदेवताक श्राद्ध करावें. पृथ्वीचंद्रोदयांत ब्रह्मांडांत “ प्रथम पिता इत्यादिकांस द्यावें. नंतर मातांना द्यावें. तदनंतर मातामहांना द्यावें. आन्वष्टक्य श्राद्धांत असा क्रम समजावा. ” श्राद्धहेमाद्रींत छागलेय - “ मृतदिवशीं केवळ मातेचेंच श्राद्ध करावें. वृद्धिकर्माचे ठायीं मातेचें आधीं करावें. अन्वष्टकांमध्यें मातेचें मध्यें करावें. मातेचें श्राद्ध अंतीं करुं नये. ” दीपिकेंत तर - मातृश्राद्ध आधीं करावें असें सांगितलें आहे - “ अन्वष्टकांचे ठायीं मातृपूजन ( श्राद्ध ) आधीं करावें. ” हेमाद्रींत ब्राह्मांतही - “ अन्वष्टकांचे ठायीं क्रमानें मातृपूर्वक तें इष्ट आहे. ” येथें शाखाभेदानें व्यवस्था जाणावी, असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो. मातृपूर्वक यजन हें जीवत्पितृकाविषयीं आहे, असें निर्णयदीप सांगतो. हें अन्वष्टक्य श्राद्ध जीवत्पितृकानेंही करावें. तें सांगतो निर्णयामृतांत मैत्रायणीयपरिशिष्टांत - “ पिता जीवंत असतांही अन्वष्टकाचे ठायीं, गया प्राप्त असतां आणि मृतदिवशीं मातेचें श्राद्ध पुत्रानें करावें. ” आतां जरी जीवत्पितृकाला पांच अन्वष्टका अवश्य कर्तव्य आहेत तरी अशक्ताला ही अन्वष्टका आवश्यक आहे. कारण, “ भाद्रपदांतील अष्टका ( अन्वष्टका ) पितृलोकांत फार मोठी फलदायक होईल. ” असें हेमाद्रींत पाद्मवचन आहे. आणि “ रवि कन्यागत असतां नवमीस सार्‍याच मातांना श्राद्ध द्यावें; कारण, त्यांना ब्रह्मदेवानें वर दिलेला आहे. ” असें सूतानें ह्या नवमीस श्राद्ध आवश्यक सांगितलेंही आहे. ह्या वचनांत ‘ सार्‍याच ’ असें सांगितल्यावरुन आपली माता जीवंत असतांही सापत्नमातेला द्यावें, असें जीवत्पितृकनिर्णयांत गुरुंनीं सांगितलें आहे. ह्या श्राद्धांत सर्वांचें नांव घेऊन श्राद्ध करावें. एक ब्राह्मण, एक अर्घ्य व एक पिंड असावा. दोघांचें नांव एक असेल तर द्विवचनादिप्रयोग करावा, असें नारायणवृत्तींत सांगितलें आहे. अन्वष्टकाश्राद्ध आणि त्याचा याग गोभिलशाख्यांचा मधल्या ( पौषमासाचे ) अन्वष्टकेंतच होतो. सार्‍या पांचही अन्वष्टकांत होत नाहीं. कारण, “ अन्वष्टक मध्यमेचे ठायीं होते, असें गोभिल व गौतम सांगतात. ” असें छंदोगपरिशिष्ट आहे. येथें भर्ता मेल्यावर पूर्वी मृत मातेचें श्राद्ध करुं नये, असें केचित्‍ सांगतात. त्याविषयीं वचनही म्हणतात. “ नवमीस श्राद्ध करावें. भर्ता मृत असतां तें लुप्त होतें. ” तें हें वचन निर्मूल असल्यामुळें मूर्खांची प्रतारणामात्र आहे. श्राद्धदीपकलिकेंत ब्राह्मांत - “ पित्याच्या कुलांत व मातेच्या कुलांत उत्पन्न झालेल्या ज्या कांहीं स्त्रिया मृत असतील त्या सार्‍या माता श्राद्धाला योग्य आहेत, त्यांना नवमीस श्राद्ध देतात. ” हें कोणास द्यावें त्याविषयीं देशाचारावरुन व्यवस्था जाणावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP