मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
नदींस रजोदोष

द्वितीय परिच्छेद - नदींस रजोदोष

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


आतां नदींस रजोदोष सांगतो.

अथनदीनांरजोदोषः हेमाद्रावत्रिः सिंहकर्कटयोर्मध्येसर्वानद्योरजस्वलाः नस्नानादीनिकर्माणितासु कुर्वीतमानवः इदंचक्षुद्रनदीषु सिंहकर्कटयोर्मध्येसर्वानद्योरजस्वलाः तासुस्नानंनकुर्वीतवर्जयित्वासमुद्रगाइति व्याघ्रोक्तेः मात्स्येत्वगस्त्योदयावधित्वमुक्तं यावन्नोदेतिभगवान्‍ दक्षिणाशाविभूषणः तावद्रजोमहानद्यः करतोयाः प्रकीर्तिताः करतोयाअल्पतोयाः तथाकात्यायनः याः शोषमुपगच्छंतिग्रीष्मेकुसरितोभुवि तासुप्रावृषिनस्नायादपूर्णेदशवासरे इदंचापदि स्मृतिसंग्रहे धनुः सहस्राण्यष्टौतुगतिर्यासांनविद्यते नतानदीशब्दवहागर्तास्ताः परिकीर्तिताः महानदीषुतुभविष्येउक्तं आदौतुकर्कटेदेविमहानद्योरजस्वलाः त्रिदिनंचचतुर्थेह्निशुद्धाः स्युर्जाह्नवीयथा महानद्यश्चब्राह्मे गोदावरीभीमरथीतुंगभद्राचवेणिका तापीपयोष्णीविंध्यस्यदक्षिणेतुप्रकीर्तिताः भागीरथीनर्मदाचयमुनाचसरस्वती विशोकाचविहस्ताचविंध्यस्योत्तरसंस्थिताः द्वादशैतामहानद्योदेवर्षिक्षेत्रसंभवाः मदनरत्नेपुराणांतरे महानद्योदेविकाचकावेरीवंजरातथा रजसातुप्रदुष्टाः स्युः कर्कटादौत्र्यहंनृप कात्यायनः कर्कटादौरजोदुष्टागोमतीवासरत्रयं चंद्रभागासतीसिंधुः सरयूर्नर्मदातथा इदंगंगाद्यतिरिक्तविषयं गंगाचयमुनाचैवप्लक्षजातासरस्वती रजसानाभिभूयंतेयेचान्येनदसंज्ञिताः शोणसिंधुहिरण्याख्याः कोकलोहितघर्घराः शतद्रूश्चनदाः सप्तपावनाः परिकीर्तिताः इतिदेवलोक्तेः यत्तु प्रथमंकर्कटेदेवित्र्यहंगंगारजस्वलेत्यादिवचनं तज्जाह्नवीभिन्नगोदावर्यादिगंगांतरपरमितिमदनरत्ने अन्येत्वंतर्गतरजोविषयं गंगाधर्मद्रवः पुण्यायमुनाचसरस्वती अंतर्गतरजोदोषाः सर्वावस्थासुचामला इतिनिगमोक्तेः ।


हेमाद्रींत अत्रि - “ सिंह व कर्क या संक्रांतींमध्यें सर्व नद्या रजस्वला होतात त्यांमध्यें मनुष्यानें स्नानादि कर्मै करुं नयेत. ” हें वचन क्षुद्रनदीविषयक आहे; कारण, “ सिंह व कर्क या संक्रांतींत सर्व नद्या रजस्वला असतात, त्यांत स्नान करुं नये, हा निषेध समुद्रास पोंचणार्‍या महानद्या सोडून समजावा. ” असें व्याघ्रवचन आहे. मत्स्यपुराणांत तर अगस्त्योदयापर्यंत नद्या रजस्वला असतात असें उक्त आहे - जोंपर्यंत दक्षिणदिशेला भूषणभूत भगवान्‍ अगस्त्यऋषि उदय पावत नाहीं तोंपर्यंत अल्पोदक महानद्या रजस्वला असतात. ” तसेंच कात्यायन म्हणतो - “ ग्रीष्मऋतूंत शुष्क होणार्‍या ज्या लहान नद्या त्यांत वर्षाकालीं दहा दिवसपर्यंत स्नान करुं नये. ” हें वचन आपत्कालविषयक समजावें. आपत्काल नसतां वरील वचन समजावें. स्मृतिसंग्रहांत सांगतो - “ ज्या नद्यांची आठ हजार धनुष्यें गति नाहीं त्यांस नद्या म्हणूं नयेत, तर त्या गर्त होत. ” महानदीविषयीं तर भविष्यांत सांगतो - “ कर्कसंक्रांतींत प्रथम तीन दिवस महानद्या रजस्वला असून चवथ्या दिवशीं भागीरथीसारख्या शुद्ध होतात. ” महानद्या कोणत्या तें ब्रह्मपुराणांत सांगतो - “ गोदावरी, भीमरथी, तुंगभद्रा, वेणिका, तापी, पयोष्णी ह्या विंध्याद्रीच्या दक्षिणेस होत. भागीरथी, नर्मदा, यमुना, सरस्वती, विशोका, विहस्ता ह्या विंध्याद्रीच्या उत्तरेस अशा ह्या बारा नद्या देवर्षिक्षेत्रांत उत्पन्न महानद्या आहेत. ” मदनरत्नांत पुराणांतरांत - “ महानदी, देविका, कावेरी, वंजरा ह्या कर्कसंक्रांतींत प्रथम तीन दिवस रजोदूषित होतात. ” कात्यायन - “ कर्कसंक्रांतीच्या आरंभीं तीन दिवस गोमती, चंद्रभागा, सती, सिंधु, सरयू, नर्मदा ह्या नद्या रजोदूषित होतात. ” हा रजोदोष गंगोदिव्यतिरिक्त नद्यांस होय. कारण, “ गंगा, यमुना, प्लक्षजाता, सरस्वती, या रजोदूषित होत नाहींत व जे नदसंज्ञक तेही रजोदूषित होत नाहींत. ते नद असे - शोण, सिंधु, हिरण्य, कोक, लोहित, घर्घर, शतद्रू हे सात नद पवित्र सांगितले आहेत. ” असें देवलाचें वचन आहे. आतां जें “ हे देवि, कर्कसंक्रांतींत प्रथम तीन दिवस गंगा रजस्वला असते ” इत्यादि वचन तें जाह्नवाव्यतिरिक्त जया गोदावर्यादि अन्य गंगा तद्विषयक होय, असें मदनरत्नांत आहे. अन्य ग्रंथकार तर तें वचन अभ्यंतर रजोविषयक आहे असें म्हणतात; कारण, “ गंगा, धर्मद्रव, पुण्या, यमुना, सरस्वती, ह्या नद्या अंतर्गत रजोयुक्त असतात म्हणून सर्वदा स्वच्छ आहेत ” असें निगमवचन आहे.

तीरवासिनांतुरजोदोषोनास्ति नतुतत्तीरवासिनामितिनिगमोक्तेः रजोदुष्टमपिजलंगंगाजलयोगेपावनं गंगांभसासमायोगाद्दृष्टमप्यंबुपावनमितिमात्स्योक्तेः नूतनकूपादौतुयोगियाज्ञवल्क्यः अजागावोमहिष्यश्चब्राह्मणीचप्रसूतिका भूमेर्नवोदकंचैवदशरात्रेणशुध्यतीति क्वचित्त्वदोषमाहव्याघ्रपादः अभावेकूपवापीनामनपायिपयोभृतां रजोदुष्टेपिपयसिग्रामभोगोनदुष्यति गौडास्तु अन्येनापिसमुद्धृतेइतिद्वितीयपादेपाठः तेनोद्धृतेनदोषः तथाचतासुस्नानंनेतिप्रागुक्तमित्याहुः वसिष्ठोपि उपाकर्मणिचोत्सर्गेप्रेतस्नानेतथैवच चंद्रसूर्यग्रहेचैवरजोदोषोनविद्यते इत्यलंविस्तरेण ।

तीरवासी लोकांस तर रजोदोष नाहीं. “ कारण, त्या नद्यांच्या तीरवासीजनांस स्नानादिकांविषयीं दोष नाहीं ” असें निगमवचन आहे. रजोदुष्टही उदक गंगाजलाच्या योगानें पवित्र होतें. कारण, “ गंगाजलाशीं योग झाला म्हणजे दुष्ट असलेलेंही उदक पवित्र होतें ” असें मत्स्यपुराणांत वचन आहे. नूतन कूपादिकांविषयीं तर योगियाज्ञवल्क्य म्हणतात - “ बकरी, गाई, महिषी, ब्राह्मणी ह्या प्रसूत झाल्या असतां व भूमीचें नवोदक हीं दहा दिवसांनीं शुद्ध होतात. ” क्वचित्‍ ठिकाणीं दोष नाहीं असें सांगतो - व्याघ्रपाद - “ शुष्क न होणार्‍या अशा उदकानें युक्त असे कूप, वापी नसतील तर रजोदुष्टही उदक गांवांतील लोक सेवन करतील तर ते दूषित होणार नाहींत. ” गौड तर वरील व्याघ्रपादवचनाचे द्वितीयचरणीं ‘ अनपायिपयोभृतां ’ या स्थानीं ‘ अन्येनापि समुद्धृते ’ असा पाठ मानितात, तेणेंकरुन काढलेल्या जलाविषयीं दोष नाहीं, त्यांमध्यें स्नान करुं नये, असें पूर्वी सांगितलें आहे, असें सांगतात. वसिष्ठही - “ उपाकर्म, उत्सर्जन, प्रेतस्नान व चंद्रसूर्यग्रहण, यांविषयीं रजोदोष नाहीं. ” याप्रकारें विस्तार केला इतका पुरे.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP