भाद्रपदशुक्लचतुर्दश्यामनंतव्रतं तत्रत्रिमुहूर्ताप्यौदयिकीग्राह्येतिमाधवः तदुक्तम् उदयेत्रिमुहूर्तापिग्राह्यानंतव्रतेतिथिरिति मध्याह्नेभोज्यवेलायामितिकथायांश्रवणादुपरिहिदेवेभ्योधारयतीतिवद्विधिकल्पनात् पूजाव्रतेषुसर्वेषुमध्याह्नव्यापिनीतिथिरितिमाधवीयेवचनात् मध्याह्नव्यापिनीग्राह्येतितुदिवोदासः प्रतापमार्तंडेप्येवं इदमेवचयुक्तं निर्णयामृतेतुघटिकामात्राप्यौदयिकीत्युक्तम् तथाभाद्रपदस्यांतेचतुर्दश्यांद्विजोत्तम पौर्णमास्याः समायोगेव्रतंचानंतकंचरेदितिभविष्योक्तेः मुहूर्तमपिचेद्भाद्रेपूर्णिमायांचतुर्दशी संपूर्णांतांविदुस्तस्यांपूजयेद्विष्णुमव्ययमितिस्कांदाच्चेति अत्रमूलंचिंत्यम् व्द्यहेप्यौदयिकत्वेपूर्णत्वात्पूर्वेतियुक्तम् तत्त्वंतुविध्यर्थवादयोर्भिन्नार्थत्वे एकवाक्यतायोगात् संदिग्धेषुएकवाक्यत्वादितिन्यायेनपूर्वापरावामध्याह्नव्यापिन्येवमुख्या माधवस्तुसामान्यवाक्यान्निर्णयंकुर्वन् भ्रांतएव अनंतव्रतस्यपुराणांतरेष्वभावान्निबंधांतरेष्वभावाच्चवचनंनिर्मूलमेवेति ।
भाद्रपदशुक्ल चतुर्दशीस अनंतव्रत. त्याविषयीं उदयकाळीं तीन मुहूर्तही असली तरी ती चतुर्दशी घ्यावी, असें माधव सांगतो - तें असें - “ उदयकाळीं त्रिमुहूर्तही चतुर्दशी अनंतव्रताविषयीं घ्यावी. ” “ मध्याह्नीं भोजनाच्या वेळीं कौंडिन्य ऋषीच्या पत्नीनें नदीच्या कांठीं उतरुन इत्यादि ” अनंताचे कथेंत सांगितल्यावरुन, ‘ उपरि हि देवेभ्यो धारयति ’ म्ह० देवतोद्देश्यक यागामध्यें जुहूचें उपभृतीवर धारण करितो, हें वेदांतील वाक्य अर्थवाद असतां याच वाक्यानें विधि आहे अशी कल्पना होते, तसें येथें या कथेंतील वचनावरुन मध्याह्नकालाचे विधीची कल्पना होत असल्यामुळें, ‘‘ सर्व पूजाव्रतांचे ठायीं मध्याह्नव्यापिनी तिथि घ्यावी ” असें माधवीयांत वचन आहे म्हणून तोच विधि समजून मध्याह्नव्यापिनी घ्यावी, असें तर दिवोदास सांगतो. प्रतापमार्तेडांतही असेंच आहे. हेंच युक्त आहे. निर्णयामृतांत तर घटिकामात्रही उदयव्यापिनी घ्यावी, असें सांगितलें आहे. कारण, “ हे द्विजोत्तमा ! भाद्रपदाचे अंतीं चतुर्दशीस पौर्णिमेचा योग असतां अनंतव्रत करावें ” असें भविष्यपुराणवचन आहे. व “ भाद्रपदमासीं पौर्णिमेस मुहूर्तमात्रही चतुर्दशी असेल तर ती संपूर्ण जाणून तिचे ठायीं अनंतरुपी विष्णूची पूजा करावी ” असें स्कंदपुराणांतही वचन आहे. याविषयीं मूल चिंत्य आहे. दोन दिवशीं उदयकाळीं असतां पूर्वदिवशीं पूर्ण असल्यामुळें पूर्वा घ्यावी हें योग्य. खरा प्रकार म्हटला तर - ‘ उदये त्रिमुहूर्तापि ’ हें माधववचन व ‘ मुहूर्तमपि ’ इत्यादि स्कांदवचन हीं विधिवाक्यें म्हटलीं असतां विधिवाक्यांचा आणि वरील कथेंतील अर्थवादवाक्याचा अर्थ भिन्नभिन्न झाला असतां दोघांची ( अर्थवाद व विधि यांची ) एकवाक्यता होणार नाहीं, म्हणून संदिग्धस्थळीं एकवाक्यतेनें अर्थ करावा, या न्यायानें पूर्वा किंवा परा मध्याह्नव्यापिनीच मुख्य आहे. माधव तर सामान्य वाक्यावरुन निर्णय करितो म्हणून तो भ्रांतिष्ट झाला आहे. अनंतव्रत इतर पुराणांत व इतर निबंधांतही नसल्यामुळें वरील भविष्यादिवचन निर्मूलच आहे.