आतां या स्थलीं प्रसंगेंकरुन शतचंडीविधान सांगतों.
अथात्रप्रसंगाच्छतचंडीविधानमुच्यते रुद्रयामले शतचंडीविधानंचप्रोच्यमानंश्रृणुष्वतत् सर्वोपद्रवना शार्थेशतचंडींसमारभेत् षोडशस्तंभसंयुक्तंमंडपंपल्लवोज्ज्वलम् वसुकोणयुतांवेदींमध्येकुर्यात्र्त्रिभागतः पक्केष्टक चितांरम्यामुच्छ्रायेहस्तसंमिताम् पंचवर्णरजोभिश्चकुर्यान्मंडलकंशुभम् पंचवर्णवितानंचकिंकीणीजालमंडितम् आचार्येणसमंविप्रान्वरयेद्दशसुव्रतान् ईशान्यांस्थापयेत्कुंभंपूर्वोक्तविधिनाचरेत् वारुण्यांचप्रकर्तव्यंकुंडंलक्षणलक्षितम् मूर्तिदेव्याः प्रकुर्वीतसुवर्णस्यपलेनवै तदर्धेनतदर्धेनतदर्धेनमहामते अष्टादशभुजांदेवींकुर्याद्वाष्टकरामपि पट्टकूलयुगच्छन्नांदेवींमध्येनिधापयेत् देवीसंपूज्यविधिवज्जपंकुर्युर्दशद्विजाः शतमादौशतंचांतेजपेन्मंत्रंनवार्णवम् चंडींसप्तशतींमध्येसंपुटोयमुदाह्रतः एकंद्वेत्रीणिचत्वारिजपेद्दिनचतुष्टयम् रुपाणिक्रमशस्तद्वत्पूजनादिकमाचरेत् पंचमेदिवसेप्रातर्होमंकुर्याद्विधानतः गुडूचींपायसंदूर्वांतिलाञ्छुक्लान्यवान्यपि चंडीपाठस्यहोमंतुप्रतिश्लोकंदशांशतः होमंकुर्याद्ग्रहादिभ्यः समिदाज्यचरुन् क्रमात् हुत्वापूर्णाहुतिंदद्याद्विप्रेभ्योदक्षिणांक्रमात् कपिलांगांनीलमणिंश्वेताश्वंछत्रचामरे अभिषेकंततः कुर्युर्यजमानस्यऋत्विजः एवंकृतेमरेशानसर्वसिद्धिः प्रजायते ।
रुद्रयामलांत “ शतचंडीविधान सांगतों. तें श्रवण कर ! सर्व उपद्रवनाशाकरितां शतचंडी करावी. सोळा स्तंभांनीं युक्त व पल्लवांनीं सुशोभित असा मंडप करुन त्या मंडपाच्या तिसर्या भागांत आठकोनी वेदी करावी. ती वेदी भाजलेल्या विटांची सुंदर व एक हात उंच असावी. त्या वेदीवर पांच रंगी सुंदर मंडल करावें. त्यावर बारीक घंटांनीं सुशोभित पांच रंगी छत करावें. नंतर व्रस्थ असें आचार्यासहित दहा ब्राह्मण वरावे. वेदीच्या ईशानीस कुंभस्थापना पूर्वोक्त विधीनें करावी. पश्चिमेस लक्षणयुक्त कुंड करावें. नंतर देवीची मूर्ति सोन्याची पल ( चार तोळे ) प्रमाण अथवा त्याचें अर्ध २ किंवा त्याचें अर्ध १ अथवा त्याचें अर्ध ( ६ मासे ) यांची, अष्टादश ( १८ ) भुजांची अथवा आठ भुजांची करावी. ती देवी दोन पीतांबरांनीं आच्छादित करुन वेदीच्या मध्यभागीं स्थापावी. त्या देवीची पूजा यथाविधि करुन दहा ब्राह्मणांनीं सप्तशतीचा जप करावा. जपाचे आदीं व अंतीं नवार्णमंत्राचा शंभर शंभर जप करावा आणि मध्यें सप्तशतीचंडीचा जप, हा संपुटित जप म्हटला आहे. याप्रमाणें प्रथमदिवशीं एक, दुसरे दिवशीं दोन, तिसरेदिवशीं तीन, चवथे दिवशीं चार, असे पाठ, चारदिवस प्रत्येक ब्राह्मणानें करावे. तसेंच पूजनादिकही वृद्धीनें करावें. पांचव्या दिवशीं प्रातःकाळीं यथाविधि होम करावा. गुडूची, पायस, दूर्वा, श्वेततिल व यव या द्रव्यांनीं चंडीपाठाचा होम पाठांच्या दशांशमानानें प्रतिश्लोकानें करावा. नंतर ग्रहादिकांना होम समिधा, घृत, चरु यांचा करुन पूर्णाहुति द्यावी. नंतर ब्राह्मणांस दक्षिणा अनुक्रमानें द्यावी व कपिला गाय, नीलमणि, पांढरा घोडा, छत्र, चामर, हीं द्यावीं. नंतर ऋत्विजांनीं यजमानास अभिषेक करावा. असें शतचंडीविधान केलें असतां सर्व कार्यसिद्धि होते. ”