इयमेवविजयादशमी साचद्वितीयदिनेश्रवणयोगाभावेपूर्वाग्राह्या तदुक्तंहेमाद्रौस्कांदे दशम्यांतुनरैः सम्यक् पूजनीयापराजिता ऐशानींदिशमाश्रित्य अपराह्णेप्रयत्नतः यापूर्णानवमीयुक्तातस्यांपूज्याऽपराजिता क्षेमार्थंविजयार्थंचपूर्वोक्तविधिनानरैः नवमीशेषुयुक्तायांदशम्यामपराजिता ददातिविजयंदेवीपूजिताजयवर्धिनी तथा आश्विनेशुक्लपक्षेतुदशम्यांपूजयेन्नरः एकादश्यांनकुर्वीतपूजनंचापराजितमिति यदातुपूर्वदिनेश्रवणयोगाभावः परदिनेचाल्पापितद्योगिनीतदापरैव तथाचहेमाद्रौव्रतकांडेकश्यपः उदयेदशमीकिंचित्संपूर्णैकादशीयदि श्रवणर्क्षंयदाकालेसातिथिर्विजयाभिधा श्रवणर्क्षेतुपूर्णायांकाकुत्स्थः प्रस्थितोयतः उल्लंघयेयुः सीमानंतद्दिनर्क्षेततोनराइति कालेऽपराह्णे परदिनेअपराह्णेश्रवणाभावेतुसर्वपक्षेषुपूर्वैव मदनरत्नेऽप्येवम् ज्योतिर्निबंधेरत्नकोशेचनारदः ईषत्संध्यामतिक्रांतः किंचिदुद्भिन्नतारकः विजयोनामकालोयंसर्वकार्यार्थसिद्धिदः इषस्यदशमींशुक्लांपूर्वविद्धांनकारयेत् श्रवणेनापिसंयुक्तांराज्ञांपट्टाभिषेचने सूर्योदयेयदाराजन् दृश्यतेदशमीतिथिः आश्विनेमासिशुक्लेतुविजयांतांविदुर्बुधाः अत्रायंनिर्गलितोर्थः अपराह्णोमुख्यः कर्मकालः तत्रैवपूजाद्युक्तेः प्रदोषोगौणः तत्रदिनद्वयेऽपराह्णव्यापित्वेपूर्वा प्रदोषव्याप्तेराधिक्यात् दिनद्वयेप्रदोषव्यापित्वेपरा अपराह्णव्याप्तेराधिक्यात् श्रवणस्तुरोहिणीवदप्रयोजकः दिनद्वयेऽपराह्णास्पर्शेतुपूर्वा तत्रापिपरदिनेऽपराह्णेश्रवणसत्त्वेपरैवेतिदिक् ।
आश्विनशुक्लदशमी हीच विजयादशमी . ती विजयादशमी दुसर्या दिवशीं श्रवणयोग नसतां पूर्वा घ्यावी . तें सांगतो हेमाद्रींत स्कांदांत - " पुरुषांनीं दशमीचेठायीं ईशानी दिशेस जाऊन अपराह्णीं यथाविधि अपराजिता देवीचें पूजन करावें . नवमीयुक्त दशमीचेठायीं कल्याणासाठीं व विजयासाठीं पूवोक्तविधीनें अपराजितेचें पूजन पुरुषांनीं करावें . नवमीयुक्त दशमीचेठायीं अपराजितेचें पूजन केलें असतां ती जय वाढविणारी देवी विजय देते . " तसेंच " आश्विनशुक्लदशमीस अपराजितेचें पूजन करावें . एकादशीस अपराजितेचें पूजन करुं नये . " जेव्हां पूर्वदिवशीं श्रवणयोग नसेल व परदिवशीं अल्पही दशमी श्रवणयुक्त असेल तेव्हां पराच करावी . तसेंच हेमाद्रींत व्रतकांडांत कश्यप - " उदयकाळीं किंचित् दशमी व सर्वदिवस एकादशी जर असेल आणि अपराह्णीं श्रवणनक्षत्र असेल ती तिथि विजया होय . कारण , दशमीचेठायीं श्रवणनक्षत्रावर रामानें प्रस्थान केलें आहे यास्तव त्या दिवशीं व त्या नक्षत्रावर मनुष्यांनीं सीमेचें उल्लंघन करावें . " दुसर्यादिवशीं अपराह्णीं श्रवण नसेल तर सर्वपक्षीं पूर्वाच करावी . मदनरत्नांतही असेंच सांगितलें आहे . ज्योतिर्निबंधांत व रत्नकोशांत नारद - " संध्यासमय किंचित् जाऊन कांहीं नक्षत्रें दिसूं लागलीं म्हणजे तो काल विजयनांवाचा आहे . हा सर्व कार्याची सिद्धि करितो . आश्विनशुक्लदशमी श्रवणनक्षत्रानेंही युक्त असली तरी राजांच्या पट्टाभिषेकाविषयीं नवमीयुक्त घेऊं नये . आश्विनशुक्लपक्षांत सूर्योदयीं जेव्हां दशमी असेल तेव्हां तिला विजया असें पंडित म्हणतात . " या वरील वचनांवरुन निघालेला अर्थ असा आहे कीं , - अपराह्णकाल हा मुख्य कर्मकाल . कारण , त्या कालींच पूजादिक सांगितलीं आहेत . प्रदोषकाल हा गौणकाल . त्यांत दोनदिवशीं अपराह्णव्यापिनी दशमी असतां पूर्वा करावी . कारण , पूर्वदिवशीं प्रदोषव्याप्ति अधिक आहे . दोनदिवशीं प्रदोषव्यापिनी असतां परा करावी . कारण , परदिवशीं अपराह्णव्याप्ति अधिक आहे . श्रवणनक्षत्र तर रोहिणीसारखें अप्रयोजक आहे . म्हणजे श्रवणाच्या अनुरोधानें निर्णय करावयाचा नाहीं . दोनदिवशीं अपराह्णीं दशमीचा स्पर्श नसेल तर पूर्वा करावी . त्यामध्येंही परदिवशीं अपराह्णीं श्रवण असेल तर पराच करावी . ही दिशा दाखविली आहे .
अत्रविशेषोभार्गवार्चनदीपिकायांभविष्ये शमीयुक्तंजगन्नाथंभक्तानामभयंकरम् अर्चयित्वाशमीवृक्षमर्चयेच्चततः पुनः शमीमंत्रस्तुहेमाद्रौगोपथब्राह्मणे अमंगलानांशमनींशमनींदुष्कृतस्यच दुःखप्ननाशिनींधन्यांप्रपद्येहंशमींशुभाम् तथाभविष्ये शमीशमयतेपापंशमीलोहितकंटका धारिण्यर्जुनबाणानांरामस्यप्रियवादिनी करिष्यमाणयात्रायांयथाकालंसुखंमया तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वंभवश्रीरामपूजितेइति तथा गृहीत्वासाक्षतामार्द्रांशमीमूलगतांमृदम् गीतवादित्रनिर्घोषैरानयेत्स्वगृहंप्रति ततोभूषणवस्त्रादिधारयेत्स्वजनैः सहेति अत्रैवबलनीराजनमुक्तंकृत्यरत्ने तत्रमंत्रः चतुरंगंबलंमह्यंनिररित्वंव्रजत्विह सर्वत्रविजयोमेस्तुत्वत्प्रसादात्सुरेश्वरीति गौडनिबंधेज्योतिषे कृत्वानीराजनंराजाबलवृद्ध्यैयथाक्रमं शोभनंखंजनंपश्येज्जलगोगोष्ठसन्निधौ अस्यफलानिशुभाशुभदेशाश्चतत्रैवज्ञेयाः ।
या विजयादशमीचेठायीं विशेष सांगतो भार्गवार्चनदीपिकेंत भविष्यांत - " भक्तांना अभय करणार्या अशा शमीयुक्त भगवंताचें पूजन करुन नंतर शमीवृक्षाचें पुनः पूजन करावें . " शमीच्या पूजनाचा मंत्र हेमाद्रींत गोपथब्राह्मणांत आहे तो असाः - " अमंगलानां शमनीं शमनीं दुष्कृतस्य च ॥ दुःखप्ननाशिनीं धन्यां प्रपद्येऽहं शमीं शुभां ॥ " तसेंच भविष्यांत मंत्रः - " शमी शमयते पापं शमी लोहितकंटका ॥ धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥ करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया ॥ तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥ " या मंत्राने पूजन करुन नंतर " शमीवृक्षाच्या मुळांतील ओली माती अक्षतासहित घेऊन गीतवाद्यें वाजवीत आपल्या घरीं आणावी . नंतर भूषणें व वस्त्रें स्वजनांसहित धारण करावीं . " या दशमीचे दिवशींच सैन्यास नीराजनविधि सांगतो - कृत्यरत्नांत - नीराजनमंत्रः - " चतुरंगं बलं मह्यं निररित्वं व्रजत्विह ॥ सर्वत्रविजयोमेस्तु त्वत्प्रसादात्सुरेश्वरि ॥ " गौडनिबंधांत ज्योतिषांत " राजानें सैन्यवृद्धीकरितां अनुक्रमानें नीराजनविधि करुन शुभकारक खंजनपक्ष्याचें दर्शन , उदकाजवळ किंवा गाईंच्या गोठ्याजवळ करावें . " या खंजनपक्ष्याच्या दर्शनाचीं फळें व शुभाशुभ प्रदेश गौडनिबंधांतच पाहावे .