भाद्रपदशुक्लतृतीयायांहरितालिकाव्रतं तत्रपराग्राह्या मुहूर्तमात्रसत्त्वेऽपिदिनेगौरीव्रतंपरे शुद्धाधिकायामप्येवं गणयोगप्रशंसनादितिमाधवोक्तेः चतुर्थीयुक्तायांफलाधिक्यं माधवीयेआपस्तंबः चतुर्थीसहितायातुसातृतीयाफलप्रदा अवैधव्यकरास्त्रीणांपुत्रपौत्रप्रवर्धिनी द्वितीयायोगेप्रत्यवायमाहसएव द्वितीयाशेषसंयुक्तांयाकरोतिविमोहिता सावैधव्यमवाप्नोतिप्रवदंतिमनीषिण इति आद्यामधुश्रावणिकाकज्जलीहरितालिका चतुर्थीमिश्रितास्त्रीभिर्दिवानक्तेविधीयते तृतीयानभसःशुक्लामधुश्रावणिकास्मृता भाद्रस्यकज्जलीकृष्णाशुक्लाचहरितालिकेतिदिवोदासोदाह्रतवचनाच्च ।
भाद्रपदशुक्ल तृतीयेस हरितालिकाव्रत आहे . त्या व्रताविषयीं तृतीया परा घ्यावी . कारण , " पर दिवशीं मुहूर्तमात्र तृतीया असली तरी गौरीव्रत पर दिवशीं होतें . पूर्व दिवशीं शुद्ध असून दुसर्या दिवशीं वृद्धि असली तरी पर दिवशींच समजावें , कारण , चतुर्थीयोग प्रशस्त आहे " असें माधवाचें वचन आहे . चतुर्थीयोग असतां फल अधिक आहे , असें सांगतो - माधवीयांत - आपस्तंब - " चतुर्थीयुक्त जी तृतीया ती स्त्रियांना फल देणारी , अवैधव्य करणारी व पुत्रपौत्र वाढविणारी अशी आहे . " द्वितीयेचा योग असतां प्रत्यवाय तोच ( आपस्तंब ) सांगतो - " जी अविचारी स्त्री द्वितीयायुक्त तृतीयेचा उपवास करिते तिला वैधव्य प्राप्त होतें , असें विद्वान् सांगतात " आणि " स्त्रियांनीं मधुश्रावणिका , कज्जली व हरितालिका ह्या तिथि रात्रिदिवसाच्या व्रताविषयीं चतुर्थीयुक्त घ्याव्या . श्रावण शुक्ल तृतीया ही मधुश्रावणिका होय . भाद्रपदकृष्ण ( श्रावणकृष्ण ) तृतीया कज्जली आणि भाद्रपदशुक्ल तृतीया हरितालिका होय " असें दिवोदासानें दिलेलें वचनही आहे .