मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
जन्माष्टमी

द्वितीय परिच्छेद - जन्माष्टमी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथजन्माष्टमी साचकृष्णादिमासेनभाद्रपदकृष्णाष्टमी तथाभाद्रपदेमासिकृष्णाष्टम्यांकलौयुगे अष्टा विंशतिमेजातः कृष्णोसौदेवकीसुतइतिकल्पतरौब्राह्मोक्तेः अत्रेदंमाधवमतं अष्टमीद्वेधा जन्माष्टमीजयंतीचेति तत्राद्याकेवलाष्टमी येनकुर्वंतिजानंतः कृष्णजन्माष्टमीव्रतं तेभवंतिनराः प्राज्ञव्यालाव्याघ्राश्चकाननइतिस्कांदात् ‍ दिवावायदिवारात्रौनास्तिचेद्रोहिणीकला रात्रियुक्तांप्रकुर्वीतविशेषेणेंदुसंयुतामितिपुराणांतरात् ‍ श्रावणेबहुलेपक्षेकृष्णजन्माष्टमीव्रतं नकरोतिनरोयस्तुभवतिक्रूरराक्षसइतिभविष्योक्तेश्चकेवलाष्टम्याएवोपोष्यत्वावगतेः सैवरोहिणीयुक्ताजयंती कृष्णाष्टम्यांभवेद्यत्रकलैकारोहिणीयदि जयंतीनामसाप्रोक्ताउपोष्यासाप्रयत्नतइतिवह्निपुराणात् ‍ अष्टमीकृष्णपक्षस्यरोहिणीऋक्षसंयुता भवेत्प्रौष्ठपदेमासिजयंतीनामसास्मृतेतिविष्णुरहस्यादिवचनाच्च ज्योतिरादिवत्संज्ञयाकर्मभेदः रोहिणीयोगश्चाहोरात्रंमुख्यः निशीथमात्रेमध्यमः दिवसादावधमः अहोरात्रंतयोर्योगोह्यसंपूर्णोभवेद्यदि मुहूर्तमप्यहोरात्रेयोगश्चेतामुपोषयेदितिवसिष्ठसंहितोक्तेः अर्धरात्रेतुयोगोयंतारापत्युदयेसति नियतात्माशुचिः स्नातः पूजांतत्रप्रवर्तयेदितिविष्णुधर्मोक्तेः वासरेवानिशायांवायत्रस्वल्पापिरोहिणी विशेषेणनभोमासेसैवोपोष्यामनीषिभिरितिपुराणांतराच्च विशेषेणेतिश्रुतेर्भाद्रपदेपीदं श्रावणेवानभस्येवेतिवक्ष्यमाणात् ‍ गौडास्तुनिशीथएवरोहिणीयोगेजयंतीनान्यथेत्याहुः तन्न वासरेवानिशायांवेतिविरोधात् ‍ योगविशेषाद्गुणात्फलमित्यन्ये तेप्यकरणेदोषश्रुतेरुपेक्ष्याः ।

आतां जन्माष्टमी सांगतो - ती जन्माष्टमी कृष्णपक्षादिमासानें ( पौर्णिमांत मासानें ) भाद्रपदकृष्णाष्टमी जाणावी . कारण , " अठ्ठाविसाव्या कलियुगामध्यें भाद्रपदमासांत कृष्णपक्षीं अष्टमीस हा कृष्ण देवकीपुत्र झाला . " असें कल्पतरुंत ब्राह्मवचन आहे . या व्रताविषयीं माधवमत असें - अष्टमी दोन प्रकारची , एक जन्माष्टमी व दुसरी जयंती . त्यांत पहिली केवल अष्टमी . कारण , " जे समजून कृष्णजन्माष्टमीव्रत करीत नाहींत ते मनुष्य अरण्यामध्यें व्याल किंवा व्याघ्र होतात " ह्या स्कंदपुराणवचनावरुन , व " दिवसा किंवा रात्रीस जर रोहिणी कलामात्रही नाहीं तर रात्रियुक्त अष्टमी विशेषेंकरुन चंद्रयुक्त असेल ती करावी " ह्या पुराणांतरवचनावरुन , आणि " जो मनुष्य श्रावणमासीं कृष्णपक्षीं कृष्णजन्माष्टमीव्रत करीत नाहीं तो क्रूर राक्षस होतो " ह्या भविष्यपुराणवचनावरुनही केवल अष्टमीसच उपोषण करावें असें समजतें . तीच अष्टमी रोहिणीयुक्त असतां जयंती होते . कारण , " कृष्णाष्टमीचे ठायीं जर एक कलामात्रही रोहिणीयोग असेल तर ती अष्टमी जयंतीनामक म्हटली आहे , तिचें उपोषण प्रयत्नानें करावें " असें वह्निपुराणवचन आहे . आणि " भाद्रपदमासांत कृष्णपक्षाची अष्टमी , रोहिणीनक्षत्रयुक्त होईल तर ती जयंतीनामक होते " असें विष्णुरहस्यादिवचनही आहे . जसें - " अथैष ज्योतिः , अथैष विश्वज्योतिः , अथैष सर्वज्योतिः " ह्या वाक्यांत ज्योति , विश्वज्योति , सर्वज्योति ह्या भिन्न भिन्न संज्ञांनीं भिन्न भिन्न कर्मै होतात , तसें येथें जन्माष्टमी व जयंती ह्या संज्ञा निरनिराळ्या असल्यामुळें निरनिराळीं कर्मै आहेत असें समजावें . रोहिणीयोग रात्रदिवस असणें मुख्य , मध्यरात्रीसच असणें मध्यम , दिवसा प्रदोषकालीं वगैरे असणें अधम . कारण , " रोहिणीनक्षत्र व अष्टमी यांचा योग संपूर्ण अहोरात्रांत नाहीं तर अहोरात्रांत मुहूर्तमात्रही योग असला तरी तिचें उपोषण करावें " असें वसिष्ठसंहितेंत वचन आहे , आणि " हा नक्षत्रतिथियोग अर्धरात्रीं चंद्रोदयीं असतां नियतात्मा शुद्ध होत्साता , स्नान करुन त्या वेळीं पूजेस प्रारंभ करावा " असें विष्णुधर्मांत वचन आहे . " दिवसा किंवा रात्रीं जेव्हां स्वल्पही रोहिणी असेल तेव्हां विशेषेंकरुन श्रावणमासीं त्याच दिवशीं बुद्धिमंतांनीं उपोषण करावें " असें पुराणांतरही आहे . ह्या पुराणांतरवचनांत ‘ विशेषेण नभोमासे ’ असें म्हटलें , यावरुनही भाद्रपदांतहे हें व्रत होतें . कारण , " श्रावणांत किंवा भाद्रपदांत ’’ असें वचन पुढें सांगावयाचें आहे , गौड तर मध्यरात्रीसच रोहिणीयोग असतां जयंती होते , मध्यरात्रीं नसतां जयंती नाहीं असें म्हणतात , तें बरोबर नाहीं , कारण , ‘ दिवसा किंवा रात्रीं अल्पही रोहिणी असतां उपोषण करावें . ’ असें जें पूर्वींचें पुराणांतरवचन त्याच्याशीं विरोध येईल . विशेष योगरुप जो गुण त्याचें विशेष फल आहे , असें अन्य ग्रंथकार म्हणतात . त्यांचें मतही उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . कारण , केलें नसतां दोष सांगितला आहे .

तत्रजन्माष्टमीव्रतंनित्यं पूर्वोक्तवचनेषुअकरणेनिंदाश्रुतेः वर्षेवर्षेतुयानारीकृष्णजन्माष्टमीव्रतं नकरोतिमहाप्राज्ञव्यालीभवतिकानन इतिस्कांदेवीप्साश्रुतेश्च नकरोतिनरोयस्त्वितिपूर्वमुक्तेरत्रस्त्रींलिंगमतंत्रं मदनरत्ने स्कांदेत्वत्रफलमप्युक्तं जन्माष्टमीव्रतंयेवैप्रकृर्वंतिनरोत्तमाः कारयंत्यथवालोकान् ‍ लक्ष्मीस्तेषांसदास्थिरा सिद्ध्यंतिसर्वकार्याणिकृतेजन्माष्टमीव्रतइति ।

त्या दोन व्रतांमध्यें जन्माष्टमीव्रत नित्य आहे . कारण , पूर्वोक्त वचनांमध्यें न करणार्‍यांची निंदा सांगितली आहे . आणि " जी स्त्री वर्षावर्षाचे ठायीं कृष्णजन्माष्टमीव्रत करीत नाहीं , ती अरण्यांत व्याली ( सर्पिणी ) होते " ह्या स्कांदवचनांत ‘ वर्षेवर्षे ’ अशी वीप्सा ( द्विरुक्ति ) ही आहे . आतां ह्या वचनांत स्त्रियेला दोष सांगितला तरी स्त्रियेलाच समजावयाचा नाहीं . तर ‘ जो मनुष्य करीत नाहीं तो क्रूर राक्षस होतो ’ ह्या वरील भविष्यवचनावरुन पुरुषासही दोष समजावा . मदनरत्नांत स्कंदपुराणांत तर ह्या व्रताचें फलही सांगितलें आहे . - " जे मनुष्यश्रेष्ठ , जन्माष्टमीव्रत करितात किंवा लोकांकडून करवितात त्यांची लक्ष्मी निरंतर स्थिर होते व जन्माष्टमीव्रत केलें असतां सर्व कार्यै सिद्ध होतात . "

जयंतीव्रतंतुनित्यंकाम्यंच महाजयार्थंकुरुतांजयंतींमुक्तयेनघ धर्ममर्थंचकामंचमोक्षंचमुनिपुंगव ददातिवांछितानर्थान् ‍ येचान्येप्यतिदुर्लभाइतिस्कांदादौफलश्रुतेः शूद्रान्नेनतुयत्पापंशवहस्तस्यभोजने तत्पापंलभतेकुंतिजयंतीविमुखोनरः नकरोतियदाविष्णोर्जयंतीसंभवंव्रतं यमस्यवशमापन्नः सहतेनारकींव्यथामित्यकरणेनिंदाश्रुतेश्च यदाचपूर्वेद्युः परेद्युर्वारोहिणीयोगस्तदाजन्माष्टमीजयंत्यामंतर्भूताज्ञेया नतुजन्माष्टमीव्रतंपृथक्कार्यं विष्णुश्रृंखलवत् ‍ तदुक्तं माधवेनैव यस्मिन्वर्षेजयंत्याख्योयोगोजन्माष्टमीतदा अंतर्भूताजयंत्यांस्यादृक्षयोगप्रशस्तितइति मदनरत्ननिर्णयामृतगौडमैथिलमतेप्येवं ।

जयंतीव्रत तर नित्य व काम्यही आहे . कारण , " महाजयार्थ व मुक्तिप्राप्त्यर्थं जयंतीव्रत करावें , तें जयंतीव्रत धर्म , अर्थ , काम , मोक्ष यांना व इतर अति दुर्लभ मनोरथांना देतें " असें स्कंदपुराणादिकांत फल सांगितल्यावरुन काम्य आहे . आणि " शवहस्तांतील शूद्रान्नाचें भोजन केलें असतां जें पाप लागतें तें पाप जयंतीव्रत न करणारास प्राप्त होतें . जेव्हां मनुष्य विष्णूचें जयंतीव्रत करीत नाहीं , तेव्हां तो यमाचे स्वाधीन होऊन नरकपीडा पावतो . " अशा अकरणीं निंदाश्रवणावरुन नित्य आहे . ज्या वेळीं पूर्व दिवशीं किंवा दुसरे दिवशीं रोहिणीयोग असेल , त्या वेळीं जन्माष्टमी जयंतींत अंतर्भूत जाणावी . जन्माष्टमीव्रत नित्य वेगळें करुं नये . जसा श्रवणद्वादशींत विष्णुशृंखलायोग सांगितला आहे तसा हा योग होतो . तें माधवच सांगतो - " ज्या वर्षीं जयंती योग होतो त्या वर्षीं जन्माष्टमी , नक्षत्रयोगाच्या प्राशस्त्यामुळें जयंतींत अंतर्भूत होते . " मदनरत्न , निर्णयामृत , गौड , मैथिल यांच्या मतींही असेंच आहे .

हेमाद्यादयस्तु रोहिणीसंयुतोपोष्यासर्वाघौघविनाशिनी अर्धरात्रादधश्चोर्ध्वंकलयावायदाभवेत् ‍ जयंतीनामसाप्रोक्तासर्वपापप्रणाशिनीत्यग्निपुराणादर्धरात्रएवरोहिणीयोगस्यप्राशस्त्यात् ‍ मुहूर्तमपिलभ्येतेत्यादीनांचार्धरात्रयोगेप्युपपत्तेर्नजयंतीव्रतंभिन्नं तत्त्वंतुहेमाद्रिमतेपिजयंतीव्रतंभिन्नमेव उदयेचाष्टमीत्यस्यतेनजयंतीपरत्वोक्तेः किंच रोहिण्यामर्धरात्रेचयदाकृष्णाष्टमीभवेत् ‍ तस्यामभ्यर्चनंशौरेर्हंतिपापंत्रिजन्मजमिति विष्णुधर्मोक्तेः समायोगेतुरोहिण्यांनिशीथेराजसत्तम समजायतगोविंदोबालरुपीचतुर्भुजः तस्मात्तंपूजयेत्तत्रयथावित्तानुरुपत इतिवह्निपुराणाच्चार्धरात्रस्यकर्मकालत्वमवसीयते अतः कर्मणोयस्ययः कालइत्यादिवचनात्पूर्वत्रैवप्राप्तेः परदिनेसतोपिरोहिणीयोगस्यनप्रयोजकत्वं अन्यथाबुधवारादेरपितत्त्वापत्तेः किंच जयंतीशब्दोरात्रिविशेषवचनः अभिजिन्नामनक्षत्रंजयंतीनामशर्वरी मुहूर्तोविजयोनामयत्रजातोजनार्दन इतिब्रह्मांडपुराणात् ‍ तेनतद्योगिरोहिण्यांगौणत्वान्नव्रतभेदः यत्तुवासरेवानिशायांवेतितत्कैमुतिकन्यायेननिशीथयोगस्यैवस्तुत्यर्थंपूर्वदिनेर्धरात्रयोगाभावेप्राशस्त्यार्थंइत्याहुः यद्यपि दिवावायदिवारात्रौनास्तिचेद्रोहिणीकला रात्रियुक्तांप्रकुर्वीतविशेषेणेंदुसंयुतामित्यनेनरोहिणीयोगाभावेर्धरात्रव्याप्तेर्ग्राह्यतोक्ता तथापियस्मिन् ‍ वर्षेजयंतीयोगोनास्तितत्रजयंतीव्रतलोपेप्राप्तेअष्टमीमात्रेपिजयंतीव्रतंकार्यमित्येवंपरमिदमितितदाशयः अत्रहिसत्रायागूर्यविश्वजितायजेत एषामसंभवेकुर्यादिष्टिंवैश्वानरींद्विज इतिवद्रोहिणीयोगाभावेविधानात्तकार्यापत्तिः स्यात् ‍ अतएवोक्तं जयंतीनामशर्वरीति ।

हेमाद्रिप्रभृति ग्रंथकार तर " रोहिणीयुक्त अष्टमी सर्व पातकौघ नाश करणारी असल्यामुळें तिचें उपोषण करावें . अर्घरात्रीच्या आंत किंवा बाहेर एक कलामात्रही रोहिणीचा योग जेव्हां होईल तेव्हां ती सर्वपातकनाश करणारी जयंती म्हटली आहे . " ह्या अग्निपुराणावरुन अर्धरात्रींच रोहिणीयोग प्रशस्त असल्यामुळें , व ‘ मुहूर्तमात्र जरी प्राप्त होईल ’ इत्यादि वचनांची अर्धरात्रयोगाविषयींही उपपत्ति होत असल्यामुळें जयंतीव्रत भिन्न नाहीं . आतां यांत खरा प्रकार म्हटला तर हेमाद्रीमतीं देखील जयंतीव्रत भिन्नच आहे . कारण , ‘ उदये चाष्टमी किंचित्० ’ हें पुढील स्कांदवचन त्या हेमाद्रीनें जयंतीपर सांगितलें आहे . हें असो ; आणखी " रोहिणीनक्षत्रावर अर्धरात्रीं जेव्हां कृष्णाष्टमी होईल तेव्हां तिच्या ठिकाणीं कृष्णाचें पूजन करावें , म्हणजे तीन जन्मांचें पाप जातें " ह्या विष्णुधर्मवचनावरुन , व " मध्यरात्रीं रोहिणीच्या व अष्टमीच्या योगावर बालरुपी चतुर्भुज असा गोविंद झाला , तस्मात् ‍ त्या वेळीं त्याची आपल्या द्रव्यानुरुप पूजा करावी " ह्या वह्निपुराणवचनावरुनही अर्धरात्र हा कर्मकाल आहे , असें समजतें . म्हणून ‘ ज्या कर्माचा जो काल तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी . इत्यादि वचनावरुन पूर्वदिवशींच प्राप्त असल्यामुळें दुसर्‍या दिवशीं रोहिणीयोग असला तरी तो जयंतीव्रताला प्रयोजक नाहीं . प्रयोजक आहे असें म्हटलें , तर बुधवारादिकांनाही प्रयोजकत्व प्राप्त होईल . आणखी जयंती हा शब्द विशेष रात्रीचा वाचक आहे . कारण , " ज्या वेळीं जनार्दन झाला त्या वेळचें नक्षत्र अभिजित् ‍, रात्रि जयंती आणि मुहूर्त विजय होय " असें ब्रह्मांडपुराणवचन आहे . तेणेंकरुन तादृशरात्रियुक्त रोहिणी गौण ( अमुख्य ) असल्यामुळें व्रतभेद नाहीं . आतां जें ‘ दिवसा किंवा रात्रीं अल्पही रोहिणी असेल ’ असें पूर्वीं सांगितलेलें पुराणांतरवचन , तें कैमुतिकन्यायानें ( म्हणजे इतर वेळीं देखील अल्पही योग असला तरी उपोषणास योग्य होते मग मध्यरात्रीं योग असला तर काय सांगावें ? या न्यायानें ) मध्यरात्रीं योगाच्याच स्तुतीकरितां आहे व पूर्व दिवशीं अर्धरात्रीं योग नसतां व दिवसा योग असतां प्राशस्त्य बोधन करण्याकरितां आहे , असें सांगतात . जरी " दिवसा अथवा रात्रीं एक कलामात्रही रोहिणी नसेल तर रात्रियुक्त असेल ती करावी , विशेषेंकरुन चंद्रोदयीं असेल ती घ्यावी " ह्या वचनानें रोहिणीयोग नसतां अर्धरात्रव्याप्ति ग्राह्य म्हणून सांगितली आहे . तरी ज्या वर्षीं जयंतीयोग नाहीं त्या वर्षीं जयंतीव्रतलोप प्राप्त असतां केवळ अष्टमीचे ठायींच जयंतीव्रत करावें , अशा अर्थाचें बोधक हें वचन आहे , असा त्यांचा आशय होय . या ठिकाणीं , जसें - " सत्रयाग करण्याविषयीं उद्युक्त होऊन तो सत्रयाग झाला नाहीं तर विश्वजित् ‍ याग करावा . त्यांच्या असंभवीं वैश्वानरी इष्टि करावी " असें सांगितलें आहे , त्याप्रमाणें अष्टमीस रोहिणीयोगाच्या अभावीं जयंतीव्रताचें विधान त्या दिवशीं केल्यामुळें जयंतीव्रताच्या कार्यांची प्राप्ति होईल . म्हणूनच जयंती म्हणजे शर्वरी ( रात्रि ) असें सांगितलें आहे .

यच्च स्कांदे उदयेचाष्टमीकिंचिन्नवमीसकलायदि भवतेबुधसंयुक्ताप्राजापत्यर्क्षसंयुता अपिवर्षशतेनापि लभ्यतेवाथवानवेति यच्च पाद्मे प्रेतयोनिगतानांतुप्रेतत्वंनाशितंतुतैः यैः कृताश्रावणेमासिअष्टमीरोहिणीयुता किंपुनर्बुधवारेणसोमेनापिविशेषतः किंपुनर्नवमीयुक्ताकुलकोट्यास्तुमुक्तिदेतितद्दानादिविषयं उपवासाश्रवणादित्यनंतभट्टः जयंतीपरमितिहेमाद्रिः उदयेचंद्रोदयइतिकेचित् ‍ तन्न चंद्रोदयसत्त्वेऽसंदेहान्नवमीसकलेत्ययोगान्मानाभावाच्च तेनपूर्वेद्युः सप्तमीवेधेपरदिनेसूर्योदयेघटिकापिग्राह्या पूर्वविद्धाष्टमीतिपाद्मोक्तेः इतियुक्तं अतोनव्रतभेदोनाप्यंतर्भावइत्यूचिवान् ‍ गौडास्तुनवमीक्षयपरमिदंवचनं नवमीसकलायदीतिविशिष्योक्तेः एतत्पूर्वंदिनेजयंत्यभावपरमित्याहुः जयंत्यादिसर्वापवादोयमितिचूडामण्यादयः वयंतुसत्यंव्रतभेदः लोकास्तुजन्माष्टमीमेवानुतिष्ठंति नहि श्रावणेवानभस्येवारोहिणीसहिताष्टमी यदाकृष्णानरैर्लब्धासाजयंतीतिकीर्तिता श्रावणेनभवेद्योगोनभस्येतुभवेद्धुवमितिमाधवीयेवसिष्ठसंहितोक्तापिभाद्रेजयंतीकेनापिक्रियते अतः पूर्वेद्युरेवोपवासः यद्वागुणात्फलं सप्तमेब्रह्मवर्चसकाममुपनयेदितिवदित्यन्ये तन्न नित्यत्वानुपपत्तेः अत्र गौणमुख्यचांद्राभ्यामेकेवमासइत्यन्ये तन्न एकवाक्येउभयनिर्देशेवाशब्दद्वयायोगात् ‍ अतोजयंतीव्रतस्यापिनित्यत्वादुपवासद्वयंकार्यमितिब्रूमः अतएवहेमाद्रिमदनरत्नादौजन्माष्टमीव्रतंजयंतीव्रतंचभिन्नमुक्तं भिन्नकालत्वात्सर्वथातावदंतर्भावोनेतिसिद्धं यद्यपि पूर्वापरावाल्पारोहिणीयुतैवकार्येतिग्रंथानांतत्त्वंप्रतीयतेतदपिजयंतीपरमेव इदंचकाम्यमेवेत्यनंतभट्टः तद्दूषणंहेमाद्रौज्ञेयं नित्यंकाम्यमितितुबहवः ।

आतां जें स्कांदांत - " जर उदयकालीं किंचित् ‍ अष्टमी असून सारा दिवस नवमी आहे व ती बुधवार व रोहिणीनक्षत्र यांनीं युक्त आहे तर असा उत्तम योग शेंकडों वर्षांनीं प्राप्त होईल किंवा न होईल . " आणि जें पाद्मांत " ज्यांनीं श्रावणमासांत रोहिणीयुक्त अष्टमी केली त्यांनीं प्रेतयोनींत गेलेल्या मृतांचें प्रेतत्व नष्ट केलें असें समजावें . मग बुधवार किंवा विशेषेंकरुन सोमवारयुक्त असेल तर काय सांगावें ? आणि ती नवमीयुक्त असली म्हणजे काय सांगावें ? ती अष्टमी कोटिकुलांना मुक्ति देणारी आहे . " असें वचन तें दानादिविषयक आहे . कारण , ह्या वचनांत उपवासाचें श्रवण नाहीं , असें अनंतभट्ट सांगतो . हें वचन जयंतीविषयक आहे , असें हेमाद्री सांगतो . वरील स्कांदवचनांत ‘ उदये ’ याचा अर्थ चंद्रोदये , असें केचित् ‍ म्हणतात . तें बरोबर नाहीं . कारण , चंद्रोदयीं अष्टमी असेल तर संशय नाहीं , व सारा दिवस नवमी संभवत नाहीं आणि तसा अर्थ करण्याविषयीं प्रमाणही नाहीं . तेणेंकरुन पूर्वदिवशीं सप्तमीवेध असतां दुसर्‍या दिवशीं सूर्योदयीं एक घटिका असली तरी ती , ‘ पूर्वाविद्धाष्टमी या तु ’ असें पुढें सांगावयाचे पाद्मवचनावरुन घ्यावी , हें योग्य आहे . म्हणून व्रतभेद नाहीं , व जयंतींत अष्टमीव्रताचा अंतर्भावही नाहीं , असें ( तो अनंतभट्ट ) सांगता झाला . गौड तर - नवमीचा क्षय असेल त्याविषयीं हें वचन आहे . कारण , ‘ उदयीं अष्टमी असून सारा दिवस नवमी असेल तर ’ असें विशेषेंकरुन सांगितलें आहे . ह्याच्या पूर्वदिवशीं जयंती नाहीं , असा त्याचा अर्थ समजावा , असें सांगतात . जयंती , जन्माष्टमी या सर्वांचा अपवाद हें वचन आहे , असें चूडामणि इत्यादि ग्रंथकार सांगतात . आह्मीं तर - खरोखर दोन व्रतें भिन्न आहेत , असें सांगतों . आतां लोक तर जन्माष्टमीचेंच अनुष्ठान करितात . जरी जयंतीव्रत सांगितलें तरी करीत नाहींत . " श्रावणांत किंवा भाद्रपदांत ज्या वेळीं रोहिणीसहित कृष्णाष्टमी मनुष्यांस प्राप्त होईल त्या वेळीं ती जयंती अशी म्हटली आहे . श्रावणांत हा योग नसला तर भाद्रपदांत निश्चयानें योग होईल " याप्रमाणें माधवीयांत वसिष्ठसंहितेंत उक्त भाद्रपदांतील जयंती कोण करितात काय ? कोणीही करीत नाहींत . मग जयंतीव्रत सांगितलेलें असून उपयोग काय ? म्हणून पूर्वदिवशींच उपवास करावा . अथवा जयंतीरुप गुणानें विशेष फल होतें , जसें - ब्रह्मवर्चस ( वेदाध्ययनाचें तेज ) इच्छिणाराचें सातव्या वर्षीं उपनयन करावें . येथें सातवें वर्षरुप गुणानें ब्रह्मवर्चसरुप फल प्राप्त होतें , तसें जयंतीव्रत केल्यानें फल प्राप्त होतें , असें अन्य म्हणतात , तें बरोबर नाहीं . कारण , पूर्वीच्या वचनांनीं जयंतीव्रत नित्य सांगितलें आहे तें उपपन्न होणार नाहीं . काम्यमात्र होईल . आतां ह्या वरील वसिष्ठसंहितावचनांत श्रावण व भाद्रपद असे दोन मास म्हटले ते असे - कृष्णप्रतिपदेपासून पूर्णिमेपर्यंत मास धरला तर गौण चांद्र भाद्रपद घ्यावा . आणि शुक्ल प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत मास धरला तर मुख्य चांद्र श्रावण घ्यावा . मिळून दोन सांगितले तरी तो एकच मास आहे , असें इतर म्हणतात , तें बरोबर नाहीं . कारण , त्या एका वचनांत दोन मास सांगितले असून त्या ठिकाणीं दोन ‘ वा ’ हे शब्द आहेत ते लागत नाहींत . म्हणून जयंतीव्रतही नित्य असल्यामुळें दोन उपवास करावे , असें आह्मीं सांगतो . म्हणूनच हेमाद्रि - मदनरत्न इत्यादि ग्रंथांत जन्माष्टमीव्रत आणि जयंतीव्रत भिन्न सांगितलें आहे . दोघांचे काल भिन्न असल्यांमुळें सर्वथा एकांत दुसर्‍याचा अंतर्भाव होत नाहीं , असें सिद्ध झालें . आतां जरी पूर्वा किंवा परा अल्प अष्टमी असली तरी रोहिणीयुक्त असेल तीच करावी , असें ग्रंथांचें तत्त्व प्रतीतीस येतें , तें देखील जयंतीविषयकच आहे . जन्माष्टमीविषयक नाहीं . हें जयंतीव्रत काम्यच आहे , असें अनंतभट्ट सांगतो . त्याचें दूषण हेमाद्रींत पाहावें . नित्य व काम्य आहे असें तर बहुत लोक सांगतात .

ननुयथाविष्णुशृंखलयोगेनश्रवणद्वादशीवामनजयंत्यादिसर्वसिद्धिर्यथावैकादशीस्वल्पापिपरातथा कलाकाष्ठामुहूर्तापियदाकृष्णाष्टमीतिथिः नवम्यांसैवग्राह्यास्यात्सप्तमीसंयुतानहि इत्यादिवचनादर्धोदयादिवद्योगाधिक्येफलाधिक्यात्परैवजन्माष्टमीयुक्तेतिचेत् ‍ वार्तामात्थ नहितत्रव्रतभेदोद्वयोर्नित्यत्वंद्वयोकरणेदोषोवाश्रुतः इहत्वेतैस्त्रिभिर्हेतुभिः संज्ञाभेदाद्धर्मभेदात्कालभेदाच्चोपवासभेदः स्पष्टएव एकदैवतत्वाच्छ्र्वणद्वादशीवन्नपारणालोपदोषोपि तेनव्रतद्वयमेवयुक्तं द्वयोरपिनित्यत्वात् ‍ केचित्तु त्रेतायांद्वापरेचैवराजन् ‍ कृतयुगेतथा रोहिणीसहिताचेयंविद्वद्भिः समुपोषिता अतः परंमहीपालसंप्राप्तेतामसेकलौ जन्मनावासुदेवस्यभविताव्रतमुत्तममितिहेमाद्रौवह्निपुराणात् ‍ कलौजन्माष्टमीव्रतमेवनजयंतीव्रतमित्याहुः तन्न तामसेकलावित्युक्तेः परमश्रेयोहेतोरस्यकलौपापिनांदुर्लभत्वमुच्यते तेनकलौतामसानकरिष्यंति किंतुधन्याएवेत्यर्थः अन्यथाशूद्राश्चब्राह्मणाचाराभविष्यंतियुगेकलौ इत्यादौविधिकल्पनापत्तेः अत्रनिशीथवेधएवग्राह्यः पूर्वोक्तवचनेषुतस्यैवमुख्यकालत्वोक्तेः अष्टमीशिवरात्रिश्चह्यर्धरात्रादधोयदि दृश्यतेघटिकायासापूर्वविद्धाप्रकीर्तितेतिमाधवीयेपुराणांतरात् ‍ अर्धरात्रेतुरोहिण्यांयदाकृष्णाष्टमीभवेत् ‍ तस्यामभ्यर्चनंशौरेर्हंतिपापंत्रिजन्मजमितिभविष्योक्तेः अष्टमीरोहिणीयुक्तानिश्यर्धेदृश्यतेयदि मुख्यकाल इतिख्यातस्तत्रजातोहरिः स्वयमितिवसिष्ठसंहितोक्तेश्च ।

शंका - श्रवणद्वादशीप्रकरणीं विष्णुशृंखलयोग सांगितला आहे , तो योग असतां जशी - श्रवणद्वादशी , वामनजयंती इत्यादि सर्वांची सिद्धि होते , अथवा जशी - स्वल्प एकादशी असली तरी परा करावी , तशी - " ज्या वेळीं नवमींत कलामात्र , किंवा काष्ठा ( कलेचा तिसरा भाग ) मात्र अथवा मुहूर्तमात्र अष्टमी असेल त्या वेळीं तीच घ्यावी ; सप्तमीयुक्त घेऊं नये " इत्यादि वचनांवरुन - जसें अर्धोदय , महोदय पर्वाचे ठायीं अधिक योग असतां अधिक फल आहे तसें अधिक योग असतां अधिक फल असल्यामुळें - पराच जन्माष्टमी युक्त आहे असें म्हणूं ? समाधान - ही तर वार्ता बोलूं नकोस ? कारण , त्या विष्णुशृंखलयोगाचे ठिकाणीं भिन्न व्रतें , किंवा दोन्ही नित्य अथवा दोन्ही न केलीं असतां दोष सांगितला आहे काय ? सांगितला नाहीं . या ठिकाणीं भिन्न व्रते , दोन्ही नित्य व दोन्ही न केलीं असतां दोष ह्या तीन कारणांनीं आणि दोन्ही व्रतांचीं नामें भिन्न , धर्म भिन्न , काल भिन्न असल्यामुळें उपवास भिन्न स्पष्टच आहे . दोन्ही व्रतांची देवता एक असल्यामुळें पूर्वीच्या उपवासाचे पारणेचा लोपप्रयुक्त दोषही नाहीं . तेणेंकरुन दोन व्रतेंच युक्त आहेत . कारण , दोन्ही नित्य आहेत . केचित् ‍ ग्रंथकार तर - " कृत , त्रेता आणि द्वापार ह्या तीन युगांमध्यें विद्वानांनीं रोहिणीसहित ह्या अष्टमीचें उपोषण केलें आहे . याउपर तामस असें कलियुग प्राप्त झालें असतां वासुदेवाच्या जन्मानें उत्तम व्रत होणार आहे " ह्या हेमाद्रींतील वह्निपुराणवचनावरुन कलियुगांत जन्माष्टमीव्रतच आहे . जयंतीव्रत नाहीं , असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , ‘ तामस कलियुग प्राप्त असतां ’ असें सांगितल्यावरुन हें व्रत परम कल्याणाला कारण असल्यामुळें पाप्यांना हें दुर्लभ , असें सुचविलें आहे . तेणेंकरुन कलियुगांत तामस करणार नाहींत . तर धन्य असतील तेच करितील . असा त्याचा अर्थ आहे . असा अर्थ न करितां ‘ तामस कलि प्राप्त असतां रोहिणीसहित करणार नाहींत , तर जन्माष्टमीव्रत करितील ’ याचा अर्थ - रोहिणी सहित जयंतीव्रत करुं नये , असा विधि जर कराल तर " कलियुगांत शूद्र ब्राह्मणांचा आचार करतील " याचा अर्थ - शूद्रांनीं ब्राह्मणाचा आचार करावा , असा विधि होऊं लागेल . येथें सप्तमीवेधनिषेधक वचनांत वेध घ्यावयाचा तो मध्यरात्रींच वेध घ्यावा . कारण , पूर्वी सांगितलेल्या वह्निपुराणादिवचनांमध्यें मध्यरात्रच मुख्य काल सांगितला आहे . व " अष्टमी आणि शिवरात्रि जर अर्धरात्रीच्या आंत एक घटिका असेल तर ती पूर्वविद्धा म्हटली आहे " असें माधवीयांत पुराणांतरवचन आहे . " अर्धरात्रीं रोहिणीवर जेव्हां कृष्णाष्टमी होईल त्या वेळीं तिच्या ठिकाणीं कृष्णाचें पूजन केलें असतां तीन जन्मांचें पाप जातें . " असें भविष्यवचन आहे . आणि " जर रोहिणायुक्त अष्टमी मध्यरात्रीं दिसली तर तो मुख्य काल आहे , कारण , त्या कालीं हरि स्वतः उत्पन्न झाला आहे . " असें वसिष्ठसंहितावचनही आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP