द्वितीय परिच्छेद - भाद्रपद
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
सिंहेपराः षोडशघटिकाः पुण्यकालः अन्यत्पूर्ववत् अत्रगोप्रसवेऽद्भुतसागरेनारदः भानौसिंहगतेचैव यस्यगौः संप्रसूयते मरणंतस्यनिर्दिष्टंषड्भिर्मासौर्नसंशयः तत्रशांतिंप्रवक्ष्यामियेनसंपद्यतेशुभं प्रसूतांतत्क्षणादेवतांगांविप्रायदापयेत् ततोहोमंप्रकुर्वीतघृताक्तैराजसर्षपैः आहुतीनांघृताक्तानामयुतंजुहुयात्ततः व्याह्रतिभिश्चायंहोमः सोपवासः प्रयत्नेनदद्याद्विप्रायदक्षिणामिति तथा सिंहराशौगतेसूर्येगोप्रसूतिर्यदाभवेत् पौषेचमहिषीसूतेदिवैवाश्वतरीतथा तदानिष्टंभवेत्किंचित्तच्छांत्यैशांतिकंचरेत् अस्यवामेतिसूक्तेनतद्विष्णोरितिमंत्रतः जुहुयाच्चतिलाज्येनशतमष्टोत्तराधिकं मृत्युंजयविधानेनजुहूयाच्चतथायुतं श्रीसूक्तेनततः स्नायाच्छांतिसूक्तेनवापुनः मध्यरात्रेनिशीथेवायदागौः क्रंदतेसदा ग्रामेवास्वगृहेवापिशांतिकंपूर्ववद्दिशेत् एवंश्रावणेवडवाप्रसवोदिनेनिषिद्धः तदुक्तमथर्ववेदिनांगार्ग्यपरिशिष्टे माघेबुधेचमहिषीश्रावणेवडवादिवा सिंहेगावः प्रसूयंतेस्वामिनोमृत्युदायकाइति अत्रतदुक्तामृताख्याशांतिः कार्या ।
आतां भाद्रपद सांगतो. सिंहसंक्रांतीला पुढच्या सोळा घटिका पुण्यकाळ. रात्रीं संक्रांत असतां पूर्वीप्रमाणें समजावें. सिंहसंक्रांतींत गाई व्याली असतां सांगतो - अद्भुतसागरांत - नारद “ सूर्य सिंहसंक्रांतीस गेला असतां ज्याची गाय प्रसूत होईल त्यास सहा महिन्यांनीं मरण होतें, यांत संशय नाहीं. त्याविषयीं शांति सांगतों कीं जी केली असतां कल्याण होईल. प्रसूत झालेली गाय त्याच वेळीं ब्राह्मणास द्यावी, नंतर घृतयुक्त राजसर्षपांनीं होम करावा. घृतयुक्त आहुती अयुत ( १०००० ) द्याव्या. व्याह्रतींनीं हा होम करावा. प्रयत्नानें उपवास करुन ब्राह्मणांस दक्षिणा द्यावी. ” तसेंच “ सिंहराशीस सूर्य गेला असतां जेव्हां गाय प्रसूत होईल, पौषमासीं महिषी प्रसूत होईल, तशीच श्रावणांत दिवसास घोडी प्रसूत होईल तेव्हां कांहीं अनिष्ट होईल तें जाण्याकरितां शांति करावी. “ अस्यवाम० ” या सूक्तानें व “ तद्विष्णोः ” या मंत्रानें तिलयुक्तघृताचा अष्टोत्तरशत होम करावा. मृत्युंजयमंत्राचे विधानानें तसाच अयुत ( १०००० ) होम करावा. नंतर श्रीसूक्तानें अथवा शांतिसूक्तानें पुनः स्नान करावें. रात्रीचे तीन भाग करुन मध्यभागीं किंवा दोनप्रहर रात्रीं जर गाई गांवांत किंवा स्वगृहांत निरंतर ओरडेल तर पूर्वींप्रमाणें शांति करावी. ” याप्रमाणेंच श्रावणमासीं दिवसा घोडी व्यालेली निषिद्ध होय. तें अथर्ववेद्यांचे गार्ग्यपरिशिष्टांत सांगतो. “ माघमासीं किंवा बुधवारीं महिषी, श्रावणांत दिवसा घोडी, सिंहसंक्रांतींत गाय प्रसूत होईल तर त्यांचे धन्यास मृत्यु येतो. ” येथें त्या गार्ग्यानेंच सांगितलेली अमृताख्यशांति करावी.
भाद्रकृष्णतृतीयाकज्जलीसंज्ञा सापराग्राह्येतिदिवोदासीय उक्तं वचनंतुहरितालिकाप्रकरणेवक्ष्यामः भाद्रकृष्णचतुर्थीबहुलाख्यामध्यदेशेप्रसिद्धा सासायाह्नव्यापिनीग्राह्या दिनद्वयेतत्त्वेपूर्वाग्राह्या गौर्याश्चतुर्थीवटधेनुपूजादुर्गार्चनंदुर्भरहोलिकेच वत्सस्यपूजाशिवरात्रिरेताः परान्विताघ्नंतिनृपंसराष्ट्रमितिदिवोदासीयेवचनात् अत्रवत्सपूजायाः पृथगुपादानाद्धेनुपूजाशब्देनबहुलाख्यागृह्यत इतिसएवव्याचख्यौ मदनरत्नेप्येवं अत्रगोपूजायवान्नाशनंचतत्रैवोक्तं भाद्रकृष्णषष्ठीहलषष्ठी सासप्तमीयुतेतिदिवोदासः भाद्रकृष्णसप्तम्यांशीतलाव्रतं तत्रपूर्वाग्राह्येतिहेमाद्रौ ।
भाद्रपदकृष्ण तृतीया ही कज्जलीसंज्ञक होय. ती परा घ्यावी, असें दिवोदासीयांत सांगितलें आहे. त्याविषयीं वचन तर हरितालिकाव्रतप्रकरणीं पुढें सांगूं. भाद्रकृष्णचतुर्थी ही बहुलानामक मध्यदेशीं प्रसिद्ध आहे. ती सायाह्नव्यापिनी घ्यावी. दोन दिवशीं सायाह्नव्यापिनी असतां पूर्वा घ्यावी. कारण, “ गौरीचतुर्थी, वटपौर्णिमा, धेनुपूजा ( बहुला ), दुर्गाअष्टमी, दुर्भरा, होलिका, गोवत्सद्वादशी, शिवरात्रि ह्या परयुक्त घेतल्या तर राष्ट्रासहित राजाचा नाश होतो. ” असें दिवोदासीयांत वचन आहे. येथें वत्सपूजेचें पृथक् ग्रहण असल्यामुळें धेनुपूजाशब्दानें बहुलाख्या चतुर्थी घ्यावी, अशी त्यानेंच ( दिवोदासानेंच ) व्याख्या केली आहे. मदनरत्नांतही असेंच आहे. या चतुर्थीचे दिवशीं गोपूजा व यवान्नप्राशन दिवोदासीयांत सांगितलें आहे. भाद्रकृष्ण षष्ठी ही हलषष्ठी होय. ती सप्तमीयुक्त घ्यावी असें दिवोदास सांगतो. भाद्रपदकृष्णसप्तमीस शीतलाव्रत सांगितलें. त्याविषयीं पूर्वा घ्यावी असें हेमाद्रींत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2013
TOP