ग्राह्यमुक्तंस्कांदे व्रीहयोयवगोधूमाः प्रियंगुतिलशालयः एतेहिसात्विकाः प्रोक्ताः स्वर्गमोक्षफलप्रदाः काशीखंडे ऊर्जेयवान्नमश्नीयाद्देवान्नमथवापुनः वृतांकंसूरणंचैवशूकशिंबीश्चवर्जयेत् पृथ्वीचंद्रोदयेपाद्मे नोर्जोवंध्योविधातव्योव्रतिनाकेनचित्क्कचित् तथानारदीये अव्रतेनक्षपेद्यस्तुमासंदामोदरप्रियम् तिर्यग्योनिमवाप्नोतिनात्रकार्याविचारणा अन्यान्यपितांबूलतैलकेशकर्तनादिवर्जनसंकल्परुपाणिप्रागुक्तानि ।
कार्तिकमासांत ग्राह्य पदार्थ सांगतो - स्कंदपुराणांत - “ व्रीहि, यव, गहूं, कांग, तिल, शालि हीं धान्यें सात्विक सांगितलीं आहेत, तीं स्वर्गमोक्षरुप फल देणारीं होत. ” काशीखंडांत - “ कार्तिकमासीं यवान्न अथवा शालि, गहूं इत्यादि देवांचें अन्न भक्षण करावें. वृंताक ( वांगें ). सुरण, शूकधान्यें व शेंगेंतील धान्यें हीं सोडावीं. ” पृथ्वीचंद्रोदयांत पाद्मांत - “ कोणत्याही व्रतस्थ मनुष्यानें कधींही कार्तिकमास व्रतावांचून व्यर्थ दवडूं नये. ” तसेंच नारदीयांत “ दामोदराला प्रिय असा कार्तिकमास व्रतावांचून जो दवडील तो तिर्यग्योनींत जातो यांत संशय नाहीं. ” इतरही तांबूल, तैल, केशकर्तन इत्यादि वर्ज्य करण्याचीं व्रतें पूर्वीं आषाढमास प्रकरणीं सांगितलीं आहेत.
तथा कार्तिकेआकाशदीप उक्तो निर्णयामृतेपुष्करपुराणे तुलायांतिलतैलेनसायंकालेसमागते आकाशदीपंयोदद्यान्मासमेकंहरिंप्रति महतींश्रियमाप्नोतिरुपसौभाग्यसंपदमिति तद्विधिश्चहेमाद्रावादिपुराणे दिवाकरेस्ताचलमौलिभूतेगृहाददूरेपुरुषप्रमाणम् यूपाकृतिंयज्ञियवृक्षदारुमारोप्यभूमावथतस्यमूर्ध्नि यवांगुलच्छिद्रयुतास्तुमध्येद्विहस्तदीर्घाअथपट्टिकास्तु कृत्वाचतस्रोऽष्टदलाकृतीस्तुयाभिर्भवेदष्टदिशानुसारी तत्कर्णिकायांतुमहाप्रकाशोदीपः प्रदेयोदलगास्तथाष्टौ निवेद्यधर्मायहरायभूम्यैदामोदरायाप्यथधर्मराज्ञे प्रजापतिभ्यस्त्वथसत्पितृभ्यः प्रेतेभ्यएवाथतमः स्थितेभ्य इति अपरार्केत्वन्योमंत्र उक्तः यथा दामोदरायनभसितुलायांलोलयासह प्रदीपंतेप्रयच्छामिनमोनंतायवेधसइति ।
तसाच कार्तिकमासामध्यें आकाशदीप सांगतो - निर्णयामृतांत पुष्करपुराणांत - “ तुलासंक्रांतींत तिलतैलानें सायंकालीं एक महिना हरीला जो आकाशदीप देईल तो मोठी लक्ष्मी व रुप सौभाग्य संपत्ति पावेल. त्या आकाशदीपाचा विधि - हेमाद्रींत आदिपुराणांत - “ सूर्य अस्ताचलाप्रत गेला असतां गृहाजवळ एकपुरुष उंच यज्ञस्तंभासारखें यज्ञियवृक्षाचें ( खदिरादिकाचें ) काष्ठ भूमींत पुरुन त्याचे मस्तकावर दोन हात लांबीच्या चार पट्ट्या त्या, मध्यभागीं यवपरिमित एक अंगुल लांब असें छिद्र पाडलेल्या अष्टदलाकृति बसवाव्या. तीं अष्टदलें आठ दिशांस येतील असें दीपयंत्र करावें. त्याच्या कर्णिकेमध्यें मोठा दीप लावावा. आणि आठ दलांवर आठ दीप लावावे. ते दीप धर्माय, हराय, भूम्यै, दामोदराय, धर्मराजाय, प्रजापतिभ्यः, पितृभ्यः, तमः स्थितेभ्यः प्रेतेभ्यः ह्या नाममंत्रांनीं समर्पण करावे. ” अपरार्कांत तर दुसरा मंत्र सांगितला, तो असाः - “ दामोदराय नभसि तुलायां दोलया सह ॥ प्रदीपं ते प्रयच्छामि नमोनंताय वेधसे. ”