मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
उत्सर्जन

द्वितीय परिच्छेद - उत्सर्जन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


आतां प्रसंगेंकरुन इथेंच उत्सर्जन सांगतों.

अथप्रसंगादत्रैवोत्सर्जनमुच्यते तच्चपौषमासेरोहिण्यांतत्कृष्णाष्टम्यांवाकार्यं पौषमासस्यरोहिण्यामष्टकायामथापिवा जलांतेछंदसांकुर्यादुत्सर्गंविधिवद्बहिरितियाज्ञवल्क्योक्तेः श्रावण्यांप्रौष्ठपद्यांवोपाकृतौक्रमेणपौषशुक्लप्रतिपदिमाघशुक्लप्रतिपदिवाकार्यं अर्धपंचमान्मासानधीयीतेतितेनैवोक्तेः अर्धः पंचमोयेषु सार्धचतुर इत्यर्थः यत्तुहारीतः अर्धपंचमान्मासानधीत्योर्ध्वमुत्सृजेत् पंचार्धषष्ठान्वेतितदाषाढ्युपाकर्मविषयं बौधायनास्तु पौष्यांमाघ्यांवाकुर्युः पौष्यांमाघ्यांचोत्सृजेदितितत्सूत्रात्‍ तैत्तिरीयैस्तु तैष्यांकार्यं तैष्यांपौर्णमास्यांरोहिण्यांवाविरमेदितितत्सूत्रात्‍ बह्वृचैस्तुमाघ्यांकार्यं अध्यायोत्सर्जनंमाघ्यांपौर्णमास्यांविधीयत इतिकारिकोक्तेः कातीयास्तुभाद्रपदेकुर्युः उत्सर्गश्चेतिनंदादितिथ्यांप्रौष्ठपदेपिवेतिकात्यायनोक्तेः सामगास्तुसिंहार्केपुष्येकुर्युः तथाचसिंहेरवौत्वितिगार्ग्यवचनंपूर्वमुक्तं सर्वैरुपाकर्मदिनेवाकार्यं पुष्येतूत्सर्जनंकुर्यादुपाकर्मदिनेथवेतिहेमाद्रौखादिरगृह्योक्तेः यदासिंहस्थेसूर्येसतितन्मध्यस्थहस्तनक्षत्रात्प्राक्पुष्यः कर्कटस्थोभवति तदातस्मिन्पुष्येउत्सर्गंकृत्वातदुत्तरहस्तेउपाकर्मसामगाः कुर्यः मासेप्रौष्ठपदेहस्तात्पुष्यः पूर्वोभवेद्यदा तदाचश्रावणेकुर्यादुत्सर्गंछंदसांद्विज इतितत्रैवपरिशिष्टोक्तेः अत्रद्वावपिसौरौमासौज्ञेयौ तेषांसौरस्यैवोक्तेः ।

तें पौषमासांत रोहिणीनक्षत्रावर किंवा पौष कृष्ण अष्टमीस करावें. कारण, “ पौषमासीं रोहिणी नक्षत्रावर किंवा कृष्णाष्टमीस वेदांचा यथाविधि उत्सर्ग बाहेर उदकाजवळ करावा ” असें याज्ञवल्क्यवचन आहे. श्रावणी किंवा भाद्रपदी पौर्णिमेस उपाकरण केलें असतां अनुक्रमानें पौषशुक्लप्रतिपदेस किंवा माघशुक्लप्रतिपदेस उत्सर्जन करावें. कारण, “ साडेचार महिने अध्ययन करावें ” असें याज्ञवल्क्यानेंच सांगितलें आहे. आतां जें हारीत “ अर्धपंचम ( साडेचार ) किंवा अर्धषष्ठ ( साडेपांच ) महिने अध्ययन करुन पुढें उत्सर्जन करावें, ” असें सांगतो, तें आषाढी पौर्णिमेस उपाकरण केलें असतां तद्विषयक होय. बौधायनांनीं तर पौषी किंवा माघी पौर्णिमेस करावें. कारण, ‘ पौषी पौर्णिमेस किंवा माघी पौर्णिमेस उत्सर्जन करावें. ” असें बौधायनसूत्र आहे. तैत्तिरीयांनीं तर पौषी पौर्णिमेस करावें. कारण, “ पौषी पौर्णिमेस किंवा रोहिणी नक्षत्रीं ( तैत्तिरीयांनीं ) उत्सर्जन करावें ” असें त्याचें सूत्र आहे. ऋग्वेदीयांनीं तर माघी पौर्णिमेस करावें. कारण, “ वेदांचें उत्सर्जन माघी पौर्णिमेस करावें ” असें कारिकेंत उक्त आहे. कात्यायनशाखीयांनीं तर भाद्रपदमासीं करावें. कारण, “ भाद्रपदमासीं प्रतिपदादि तिथीस उत्सर्ग करावा ” असें कात्यायनवचन आहे. सामगांनीं तर सिंहाचा सूर्य असतां पुष्यनक्षत्रीं करावें. कारण, “ सिंहस्थ सूर्य असतां पुष्यनक्षत्रीं करावें ” असें गार्ग्यवचन पूर्वीं सांगितलें आहे. अथवा सर्वांनीं उपाकर्मदिवशीं करावें. कारण, “ पुष्यनक्षत्रीं अथवा उपाकर्मदिवशीं उत्सर्जन करावें ” असें हेमाद्रींत खादिर गृह्यसूत्रवचन आहे. जेव्हां सिंहस्थ सूर्य असतां त्यांतील हस्तनक्षत्राच्या पूर्वी पुष्यनक्षत्र कर्कसंक्रांतींत होईल तेव्हां त्या पुष्यनक्षत्रीं उत्सर्जन करुन पुढील हस्तनक्षत्रावर उपाकर्म सामवेदीयांनीं करावें. कारण, “ भाद्रपदमासीं हस्ताच्या पूर्वी पुष्य जेव्हां होईल तेव्हां श्रावणांत वेदांचें उत्सर्जन द्विजानें करावें ” असें हेमाद्रींतच परिशिष्टवचन आहे. येथें श्रावण व भाद्रपद हे दोनही मास सौर घ्यावे. कारण त्यांना सौरच मास उक्त आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP