मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
षष्ठी

द्वितीय परिच्छेद - षष्ठी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथषष्ठी गौडनिबंधे देवीपुराणे ज्येष्ठानक्षत्रयुक्तायांषष्ठ्यांबिल्वाभिमंत्रणं सप्तम्यांमूलयुक्तायांपत्रिकायाः प्रवेशनम् ‍ पूर्वाषाढायुताष्टम्यांपूजाहोमाद्युपोषणम् ‍ उत्तरेणनवम्यांतुबलिभिः पूजयेच्छिवाम् ‍ श्रवणेनदशम्यांतुप्रणिपत्यविसर्जयेत् ‍ कालिकापुराणे बोधयेद्बिल्वशाखायांषष्ठ्यांदेवींफलेषुच सप्तम्यांबिल्वशाखांतामाह्रत्यप्रतिपूजयेत् ‍ पुनः पूजांतथाष्टम्यांविशेषेणसमाचरेत् ‍ जागरंचस्वयंकुर्याब्दलिदानंमहानिशि प्रभूतबलिदानंतुनवम्यांविधिवच्चरेत् ‍ विसर्जनंदशम्यांतुकुर्याद्वैसारवोत्सवैः धूलिकर्दमनिक्षेपैः क्रीडाकौतुकमंगलैः अत्रसर्वत्रतिथिनक्षत्रयोगादरोमुख्यः कल्पः तदभावेतुतिथिरेवग्राह्या तिथिः शरीरंदेवस्यतिथौनक्षत्रमाश्रितम् ‍ तस्मात्तिथिंप्रशंसंतिनक्षत्रंनतिथिंविनेतिविद्यापतिलिखितवचनात् ‍ तिथिनक्षत्रयोर्योगेद्वयोरेवानुपालनम् ‍ योगाभावेतिथिर्ग्राह्यादेव्याः पूजनकर्मणीतितत्रैवदेवलोक्तेश्च ।

आतां षष्ठी सांगतो - गौडनिबंधांत - देवीपुराणांत - " ज्येष्ठानक्षत्रयुक्त षष्ठीचेठायीं बिल्ववृक्षावर अधिवासनादि करावें . मूलनक्षत्रयुक्त सप्तमीचेठायीं पत्रिकेचें प्रवेशन करावें . पूर्वाषाढायुक्त अष्टमीचेठायीं पूजा , होम इत्यादि व उपोषण करावें . उत्तराषाढायुक्त नवमीचेठायीं बलिदानांनीं देवीचें पूजन करावें . श्रवणयुक्त दशमीचेठायीं देवीला नमस्कार करुन विसर्जन करावें . " कालिकापुराणांत " षष्ठीस बिल्ववृक्षाच्या शाखेचेठायीं व फलांचेठायीं देवीचा प्रबोधोत्सव करावा . सप्तमीचेठायीं ती बिल्ववृक्षाची शाखा आणून तिचें पूजन करावें . तशीच अष्टमीस विशेषेंकरुन पुनः पूजा करावी . व मोठ्या रातीं स्वतां जागरण करुन बलिदान करावें . नवमीस यथाशास्त्र मोठें बलिदान करावें . दशमीस सारवोत्सवांनीं , धूलिकर्दमनिक्षेपांनीं व क्रीडाकौतुकमंगलांनीं विसर्जन करावें . " येथें सर्वत्र तिथिनक्षत्रयोग असावा हा मुख्य पक्ष आहे , तो नसेल तर तिथीच घ्यावी . कारण , " देवाचें शरीर तिथि आहे . तिथीचा आश्रय करुन नक्षत्र राहतें ; याकरितां तिथीची प्रशंसा करितात . तिथीवांचून नक्षत्र प्रशस्त नाहीं . " असें विद्यापतीनें लिहिलेलें वचन आहे . आणि " तिथि व नक्षत्र यांचा योग असतां दोघांचेंही ग्रहण करावें . तिथि व नक्षत्र या दोघांचा योग नसेल तर देवीच्या पूजेविषयीं तिथि घ्यावी . " असें तेथेंच देवलवचनही आहे .

अत्रचपत्रीप्रवेशात्पूर्वेद्युः सायंकालेषष्ठ्यभावेतत्पूर्वदिनेऽधिवासनंकार्यम् ‍ सायंकालेत्यंतासत्त्वेत्वधिवासनलोपः षष्ठ्यांसायंप्रकुर्वीतबिल्ववृक्षेधिवासनमितिपूर्ववचनादितिकल्पतरुः सायंश्रुतिः फलातिशयमात्रार्था नतुकर्मलोप इत्याचार्यचूडामणिः अत्रक्रमः बिल्वसमीपंगत्वादेवीबिल्वंचसंपूज्यप्रार्थयेत् ‍ तत्रमंत्रः रावणस्यवधार्थायरामस्यानुग्रहायच अकालेब्रह्मणाबोधोदेव्यास्त्वयिकृतः पुरा । अहमप्याश्रितः षष्ठ्यांसायाह्नेबोधयाम्यतः श्रीशैलशिखरेजातः श्रीफलः श्रीनिकेतनः नेतव्योसिसमागच्छपूज्योदुर्गास्वरुपत इति एवंदेवीमधिवास्यपरदिनेनिमंत्रितबिल्वशाखापत्रीप्रवेशपूजांकुर्यात् ‍ तदुक्तंहेमाद्रौलैंगे मूलाभावेतुसप्तम्यांकेवलायांप्रवेशयेत् ‍ युग्माभ्यांनवबिल्वस्यफलाभ्यांशाखिकांतथा तथैवप्रतिमांदेव्याः स्नात्वाभ्युक्ष्यप्रवेशयेत् ‍ ।

येथें पत्रीप्रवेशाच्या पूर्वदिवशीं सायंकालीं षष्ठी नसेल तर त्याचे पूर्वदिवशीं अधिवासन करावें . सायंकालीं मुळींच षष्ठी नसेल तर अधिवासनाचा लोप होतो . कारण , " षष्ठीस सायंकालीं बिल्ववृक्षावर अधिवासन करावें " असें पूर्वीं वचन सांगितलें आहे , असें कल्पतरु सांगतो . सायंकालीं षष्ठी असावी ही फलातिशयाकरितांच सांगितली आहे . ती नसेल तर कर्मलोप होत नाहीं , असें आचार्यचूडामणि सांगतो . याविषयीं क्रम सांगतो - बिल्ववृक्षाच्या समीप जाऊन देवी व बिल्व यांची पूजा करुन प्रार्थना करावी . प्रार्थनेचा मंत्र - " रावणस्य वधार्थाय रामस्यानुग्रहाय च । अकाले ब्रह्मणा बोधो देव्यास्त्वयि कृतः पुरा ॥ अहमप्याश्रितः षष्ठ्यां सायाह्ने बोधयाम्यतः । श्रीशैलशिखरे जातः श्रीफलः श्रीनिकेतनः । नेतव्योऽसि समागच्छ पूज्यो दुर्गास्वरुपतः " इति . असें पूर्वदिवशीं देवीचें अधिवासन करुन दुसर्‍या दिवशीं निमंत्रित बिल्वशाखेवर पत्रीप्रवेशपूजा करावी . तें सांगतो - हेमाद्रींत लिंगपुराणांत - " मूलनक्षत्र नसेल तर केवळ सप्तमीचेठायीं नूतन बिल्ववृक्षाच्या दोन फळांसहित शाखे ( खांदी ) चें आणि देवीच्या प्रतिमेचें अभ्युक्षण करुन प्रवेशपूजा करावी . "

अत्रचोपवासपूजादावौदयिकीसप्तमीग्राह्या नतुयुग्मवाक्यात् ‍ पूर्वा युगाद्यावर्षवृद्धिश्चसप्तमीपार्वतीप्रिया रवेरुदयमीक्षंतेनतत्रतिथियुग्मतेतिकृत्यतत्त्वार्णवोदाह्रतवचनात् ‍ भगवत्याः प्रवेशादिविसर्गांताश्चयाः क्रियाः तिथावुदयगामिन्यांसर्वास्ताः कारयेद्बुध इतितिथितत्त्वेनंदिकेश्वरपुराणाच्च दुर्गाभक्तितरंगिण्यामप्येवम् ‍ तत्रापिघटिकातोन्यूनत्वेपरानकार्या व्रतोपवासनियमेघटिकैकापियाभवेदितिदेवलोक्तेरितिगौडाः दाक्षिणात्यास्तुपूर्ववचनमदृष्ट्वायुग्मवाक्यात्पूर्वांकुर्वंति पत्रिकापूजाचपूर्वाह्णएवकार्यानतुमूलानुरोधान्मध्याह्नादावितिकृत्यतत्त्वार्णवेउक्तम् ‍ पत्रिकास्तु रंभाकवीहरिद्राचजयंतीबिल्वदाडिमौ अशोकोमानवृक्षश्चधान्यादिनवपत्रिकाइतितत्रैवोक्ताः ।

इथें उपवास , पूजा इत्यादिकांविषयीं उदयव्यापिनी सप्तमी घ्यावी . युग्मवाक्यावरुन पूर्वींची ( षष्ठीयुक्त ) घेऊं नये . कारण , " युगादि तिथि , वाढदिवसाची तिथि , देवीसप्तमी , ह्या तिथि सूर्योदयव्यापिनी घ्याव्या . एथें युग्मवाक्याची प्रवृत्ति करुं नये . " असें कृत्यतत्वार्णवांत सांगितलेलें वचन आहे . आणि " भगवतीदेवीच्या प्रवेशापासून विसर्जनापर्यंत ज्या क्रिया करावयाच्या त्या सार्‍या उदयव्यापिनी तिथिचेठायीं कराव्या . " असें तिथितत्त्वांत नंदिकेश्वरपुराणवचनही आहे . दुर्गाभक्तितरंगिणींतही असेंच सांगितलें आहे . त्यामध्येंही सूर्योदयकालीं घटिकेहून कमी असेल तर परा करुं नये . कारण , " व्रत , उपवास , नियम यांविषयीं एक घटिका जरी असेल तरी ती घ्यावी " असें देवलवचन आहे , असें गौड म्हणतात . दाक्षिणात्य तर , पहिलें वचन न पाहतां युग्मवाक्यावरुन पहिली करितात . पत्रिकापूजाही पूर्वाह्णींच करावी . मूलनक्षत्रानुरोधानें मध्याह्नदिकालीं करुं नये , असें कृत्यतत्त्वार्णवांत सांगितलें आहे . पत्रिका तर - " धणे , रंभा ( केळी ), कवी , हरिद्रा , जयंती , बिल्व , दाडिम , अशोक , मानवृक्ष , ह्यांच्या नऊ पत्रिका होत . " अशा कृत्यतत्त्वार्णवांतच सांगितल्या आहेत .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP