आतां आश्विनमास.
कन्यासंक्रमेपराः षोडशघटिकाः पुण्याः शेषंप्राग्वत् अथमहालयः तत्रपृथ्वीचंद्रोदयेवृद्धमनुः आषाढीमवधिंकृत्वापंचमंपक्षमाश्रिताः कांक्षंतिपितरः क्किष्टाअन्नमप्यन्वहंजलं कन्यायोगेपुण्यतमत्वमाह शाठ्यायनिः कन्यास्थार्कान्वितः पक्षः सोत्यंतंपुण्यमुच्यत इति अत्रविशेषमाहवृद्धमनुः मध्येवायदिवाप्यंतेयत्रकन्यांव्रजेद्रविः सपक्षः सकलः श्रेष्ठः श्राद्धषोडशकंप्रति तथाब्रह्मांडमार्कंडेययोः कन्यागतेसवितरिदिनानिदशपंचच पार्वणेनेहविधिनाश्राद्धंतत्रविधीयते तथातत्रैवषोडशदिनान्युक्तानि कन्यागतेसवितरियान्यहानितुषोडश क्रतुभिस्तानितुल्यानिदेवोनारायणोब्रवीत् अत्रहेमाद्रिः षोडशत्वंत्रेधाव्याचख्यौ तिथिवृद्ध्यापक्षस्यषोडशदिनात्मकत्वेश्राद्धवृद्ध्यर्थमेकः पक्षः भाद्रपदपूर्णिमयासहेतिद्वितीयः आश्विनशुक्लप्रतिपदासहेतितृतीयः अंत्यएवतुयुक्तः अहः षोडशकंयत्तुशुक्लप्रतिपदासह चंद्रक्षयाविशेषेणसापिदर्शात्मिकास्मृतेतिदेवलोक्तेः ।
कन्यासंक्रांतीच्या पुढच्या षोडश ( सोळा ) घटिका पुण्यकाळ. बाकीचा निर्णय ( रात्रीं संक्रांत असतां वगैरे ) पूर्वींप्रमाणें समजावा. आतां महालय सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धमनु - “ क्लेशयुक्त झालेले पितर आषाढीपासून पांचव्या पक्षामध्यें दररोज अन्न व उदक यांची इच्छा करितात. ” कन्यासंक्रांतीचा योग असतां अतिशयेंकरुन पुण्य सांगतो शाठ्यायनि - “ कन्यार्कानें युक्त जो पक्ष तो अत्यंत पुण्यकारक सांगितला आहे. ” येथें विशेष सांगतो वृद्धमनु - “ ज्या पक्षाच्या मध्यें किंवा अंतीं सूर्य कन्येस जाईल तो सारा पक्ष सोळाश्राद्धांविषयीं श्रेष्ठ आहे. ” तसेंच ब्रह्मांडांत व मार्केंडेयांत - “ सूर्य कन्येस गेला असतां जे पंधरा दिवस त्यांचे ठायीं पार्वणविधीनें श्राद्ध करावें. ” तसे तेथेंच सोळा दिवस सांगितले आहेत - “ सूर्य कन्येस गेला असतां जे सोळा दिवस ते यज्ञसमान आहेत, असें देवनारायण सांगतात. ” या वचनांत सोळा दिवस सांगितले ते हेमाद्रि तीन प्रकारानें सांगतो - ह्या भाद्रपदकृष्णपक्षांत तिथीची वृद्धि होऊन पक्षाचे सोळा दिवस झाले असतां श्राद्धांची वृद्धि ( सोळा श्राद्धें ) होते हा एक पक्ष. भाद्रपदपूर्णिमेसह सोळा दिवस होतात, हा दुसरा पक्ष. आश्विन शुक्लप्रतिपदेसह सोळा दिवस होतात, हा तिसरा पक्ष. ह्या तीन पक्षांत शेवटचा तिसरा पक्षच युक्त आहे. कारण, “ आश्विनशुक्लप्रतिपदेसह जे सोळा दिवस ते श्राद्धाला योग्य आहेत; कारण, शुक्लप्रतिपदेसही चंद्राचा क्षय असल्यामुळें ती देखील दर्शरुपी आहे ” असें देवलवचन आहे.